हिंदुस्थानात क्रिकेट आणि राजकारण या विषयावर सार्वजनिक ठिकाणी चर्चा करू नये म्हणतात. कोण कुणाचा सहानुभुतीदार असेल आणि कसा दुखावला जाइल ते सांगता येत नाही. उद्याचा पंतप्रधान कोण ? या प्रश्नावर एरवी कुणी विचारलं तर आम्ही गप्प राहणेच पसंत करतो. पण चर्चा केल्याशिवाय आणि विचारंथनाशिवाय अमृत हाताला कसे
लागणार ? म्हणून हा काथ्याकूट...
राहुल गांधी- ही व्यक्ती अशा घराण्यात जन्मली आहे की जिथे त्यांना काही कर्तुत्त्व गाजविण्यापूर्वी जन्मतःच एक ओळख मिळालेली आहे. कुणाचा नातू, कुणाचा सुपुत्र इ.
अनेक वर्षे खासदार आहेत. पक्षाचे स्टार कँपेनर आहेत. बंगालच्या निवडणूकीत सहभागी झाले आणि कित्येक दशकांची कम्युनिस्टांची सत्ता उलथवून टाकली. महाराष्ट्र असो की उत्तर प्रदेश कुठेही गरीबाच्या झोपडीत जाऊन पिठले भाकरी खाऊ शकतात. अतिशय साधे आहेत. मोठ्या प्रमाणावर जनताही पाठीशी आहे.
शरद पवार - जवळ जवळ ५० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. केंद्रात मंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते. देशात सर्वात कमी वयाचे दुसरे मुख्यमंत्री. कुशल प्रशासक. निरनिराळ्या प्रश्नांची सखोल माहिती. यांची भाषणे अतिशय माहितीपूर्ण असतात. राजकारणाव्यतिरीक्त अनेक विषयांचा अभ्यास आहे. देशातील अनेक संस्थांचे आधार. भारतीय क्रिकेट संघटना यांच्या कारकीर्दीत भरभराटीस आली. दोन विश्वचषक जिंकले. सर्व पक्षात मित्रमंडळी. देशातील अनेक राज्यांमधे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. माहीतगारीमुळे जाणता राजा असा उल्लेख होतो.
मनोहर पर्रीकर - एका छोट्या राज्याचा मुख्यमंत्री. पण किर्ती केव्हाच राज्याबाहेर पोहोचली आहे. कुशल प्रशासक. स्वच्छ प्रतिमा. गोव्यातील अनेक बलदंड राजकारण्यांना, खाणमाफीयांना चाप लावला आहे. आय आय टी चे इंजिनीयर. जनतेत अत्यंत लोकप्रिय.
गोपीनाथ मुंडे - पक्षातला ज्येष्ठ नेता. अनेक चढउतार पचवलेले आहेत. इतर पक्षात पवारांचे जे अनेक मित्र पसरले आहेत त्यापैकी एक. दोघेही एकमेकांच्या साम्राज्याला हात लावीत नाहीत. राज्याचे उर्जामंत्री असताना सत्तेचा खरा उपयोग करून दाखवला. प्रमोद महाजन गेल्यानंतर पक्षात गॉडफादर राहीला नाही. मराठवाड्याचा लाडका नेता.
सुशीलकुमार शिंदे - अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून वर आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री होते. उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार होते. गृहमंत्री असताना कसाब, अफजल गुरु यांच्या फाशीची अंमलबजावणी केली आणि मोठीच लोकप्रियता मिळाविली. श्रेष्ठींचे लाडके.
अरुण जेटली - निष्णात कायदेतज्ञ, उत्तम वक्ते. अनेक प्रश्नांवर सरकारच्या नाकी नऊ आणले होते. पांढरपेशा वर्गात लोकप्रिय. पण तळागाळातील कार्यकर्त्याशी संपर्क कमी.
सुषमा स्वराज - प्रभावी वक्त्या, सुप्रीम कोर्टातील यशस्वी वकील. भारतीय महिलांना अतिशय भावणारे व्यक्तिमत्त्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही पंतप्रधापदासाठी स्वराज यांनाच पसंती होती.
नरेंद्र मोदी - अनेक वर्षे राष्ट्रीय राजकारणात होते. पण गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून खर्या अर्थाने चर्चेत आले. विकासपुरुष म्हणून प्रतिमा आहे. देशात सर्वत्र अत्यंत लोकप्रिय. देशाचे नेते झाले तर अपेक्षांचे ओझे प्रचंड असेल.
मनमोहनसिंग - जाणकार अर्थतज्ञ. मुक्त आर्थिक धोरणाचे शिल्पकार. दहा वर्षे पंतप्रधान. पक्षातील ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तिमत्त्व. वय ८० वर्षे. तरीही पुढील पाच वर्षे पंतप्रधान बनण्याची घोषणा केली आहे. इच्छाशक्ती दांडगी दिसते. व्यक्तिगतरीत्या कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले नाहीत.
मुलायमसिंग यादव - देवीगौडांप्रमाणे निरुपाय म्हणून का होइना काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधान होवू शकतात. अनेक वर्षे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री होते. काँग्रेसेतर पक्षांमधील एक प्रमुख उमेदवार. मुलाकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद देवून केंद्रीय राजकारणातच रस असल्याचा संदेश नेताजींनी सर्वांना दिला आहे.
चंद्राबाबू नायडू - कुशल प्रशासक, उत्तम संघटक. युवक काँग्रेसचा दांडगा अनुभव. त्याच आधारावर मुख्यमंत्री झाले. त्यातही स्वतःचा ठसा उमटवला. पण ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्याची टीका झाली. तिसर्या आघाडीचे पसंतीचे नाव.
जाणकारांनी यावर आपले मत मांडावे... जेणेकरून मतदार राजालाही मार्गदर्शन होइल.
प्रतिक्रिया
15 Jul 2013 - 11:27 pm | कापूसकोन्ड्या
२००२ चे गुजरात चे दन्गे, हसरत जहाँ, आणि जातियवादी, आणि ते कधीच पंतप्रधान होणार नाहीत असा तळतळाट केला नसल्यामुळे लेखक/खिका हे जातीयवादी आहेत आणि सेकुलर नाहीत हे सिदध होते आहे. संपादकानी अशा धाग्यावर (जिथे एवढ्या मोठ्या चर्चेत साधा सेकुलर हा शब्द पण नाही म्हणून समज द्यावी. :):):):):
17 Jul 2013 - 7:05 pm | विकास
खरे आहे! :)
आजकाल अनेकांना काय झाले आहे ते समजत नाही... आता प्रितिश नंदींसारखे पत्रकारच बघाना काय म्हणतात ते!
16 Jul 2013 - 1:15 am | खटपट्या
राहुल गांधी - अतिशय साधे आहेत. मोठ्या प्रमाणावर जनताही पाठीशी आहे.
पटत नाही.
16 Jul 2013 - 9:41 am | झकासराव
जर कॉन्ग्रेस आली तर सुशीलकुमार शिन्दे...
अनेक गणितं आहेत त्यामागे.
सगळ्यात मोठे गणीत हे की ते मनमोहन सिन्ग यांचा मौन आणि आज्ञापालन वारसा चालवु शकतात. ते ही फक्त हास्य देवुन. :)
16 Jul 2013 - 10:41 am | ऋषिकेश
बघुया की!. घोडेमैदान फार लांब नाही
भारतीय मतदारांना मार्गदर्शनाची अजिबात गरज नाही. निश्चिंत असावे ;)
16 Jul 2013 - 5:42 pm | रमेश आठवले
काँग्रेसचाच पंत प्रधान होणार असे मतांचे गणित पुढच्या निवडणुकी नंतर झाले तर पी. चिदम्बरन यांचे नाव वरील यादीत असावे लागेल. हुशार आणि अनुभवी मुत्सद्दी म्हणून त्यांचा लौकिक आहे . ते मुखदुर्बळ नाहीत. राहुल गांधींची हे पद स्वीकारण्याची हिम्मत होईल असे त्यांच्या आजवरच्या वागण्यावरून वाटत नाही. शिवाय त्यांनी पंतप्रधान बनण्याच्या बाबत काही तांत्रिक अथवा कायदेशीर अडचणी आहेत असे सुब्रमनियम स्वामी म्हणतात.
16 Jul 2013 - 9:34 pm | रमेश आठवले
माफ करा. चिदंबरम असे लिहावयास हवे होते.
17 Jul 2013 - 4:58 pm | विक्रान्त कुलकर्णी
सध्याच्या परिस्थितीत तरि कॉन्ग्रेस परत सत्तेवर येइल अशी चिन्हे आहेत. डॉ. मनमोहन सिंग परत पंतप्रधान होतील अशी चिन्हे दिसत असली तरी पॄथ्वीराज चव्हाण होण्याची शक्यता सुशील कुमार पेक्षा जास्ती आहे...
17 Jul 2013 - 7:15 pm | मालोजीराव
दिग्गीराजा नसल्याने पास !
17 Jul 2013 - 7:34 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो. दिग्गीराजांचा समावेश न करण्यामागे आरेसेसचा हात असण्याची अतिदाट शक्यता आहे.
17 Jul 2013 - 7:47 pm | विकास
अजून लॉजिकः हात (पंजा) ही काँग्रेसची निशाणी.. याचा अर्थ आर एस एस चा हात आहे तर काँग्रेसनेच असे घडवून आणले आणि आर एस एस ही काँग्रेसचीच संघटना आहे असा होऊ शकतो का? ;)
17 Jul 2013 - 7:50 pm | बॅटमॅन
आयो...जबरी उत्तर एकदम!!! दिग्गीनेही अशा उत्तराची अपेक्षा बापजन्मात कधी केली नसेल =)) =))
17 Jul 2013 - 8:31 pm | मालोजीराव
माझ्या नातवाच्या वयाची मुले मला डॉगविजय,पिग्विजय म्हणतात तरी मी त्यांच्या विचारांचा आदर करतो असे दिग्गीराजा म्हणाल्याने आदर दुन्नाव्ल्ला आणि ड्वोले पानाव्वले
17 Jul 2013 - 8:56 pm | बॅटमॅन
पिग्विजय हे नाव नव्यानेच कळाले! डॉगविजय माहिती होते.
17 Jul 2013 - 8:41 pm | वेल्लाभट
मोदी झाल्यास मोद होईल
17 Jul 2013 - 10:36 pm | आशु जोग
दिग्गीराजा नसल्याने पास !
दिग्गीराजांची लागून राहीली आहे आस
18 Jul 2013 - 9:28 am | पिंपातला उंदीर
अरे रे रे. माजी 'लोहपुरुषांच' नाव आजकाल पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मिपावर पण नसाव?
18 Jul 2013 - 2:02 pm | उद्दाम
साबरमतीवाले रेसमध्ये आल्याने बाबरमतीवाले रिटायर झालेत.
18 Jul 2013 - 10:55 am | रमेश आठवले
गेल्या निवडणुकीत,आयोगाने घालून दिलेल्या बंधनाच्या पेक्षा कैक पटीने अधिक खर्च केल्याची कबुली दिल्यांनतर गोपीनाथ मुंडे यांना पुन्हा उभे रहायला निवडणूक आयोग परवानगी देईल असे वाटत नाही.
त्यामुळे जोगांच्या यादीतील हे नाव बाद करावे लागेल.
18 Jul 2013 - 11:03 am | ऋषिकेश
बहन मायावतींचे आणि नवीन पटनायक यांचे नाव नसल्याने (खरोखर) आश्चर्य वाटले.
18 Jul 2013 - 11:34 am | श्रीरंग
त्यांना स्वतःलाही आश्चर्य वाटेल, या यादीत स्वतःचे नाव बघून.
18 Jul 2013 - 1:06 pm | बॅटमॅन
तीच गोष्ट मनोहर पर्रीकरांची.
19 Jul 2013 - 1:28 pm | विजुभाऊ
मायवती / जयललीता / ममता यांची नावे का नाहीत.
पर्रीकर यांचे नाव वाचून आश्चर्य वाटले.
लालू नितीश यांचीही नावे नाहीत.
22 Jul 2013 - 11:12 pm | आशु जोग
आज देशासमोर अनेक प्रश्न आहेत. आसाममधे बांगलादेशी लोकसंख्या वाढत आहे. यातले काही लोक मतदानाचा अधिकार मिळवून आसाम विधानसभेतही पोचले आहेत.
याउलट काश्मीरमधे फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून आलेले अनेक हिंदू जीव असे आहेत ज्यांना अजून भारताचे नागरीकत्त्व मिळालेले नाही. स्वातंत्र्यानंतर तीन पिढ्या झाल्या पण हा प्रश्न सुटलेला नाही.
१९८९ मधे काश्मीरमधून हिंदूना हाकलून देण्यात आले. त्या हिंदूंना त्यांचे काश्मीरातील घर परत मिळवून देण्यासाठी कुणीच प्रयत्न करताना दिसत नाही.
चीन आमच्या देशाच्या सीमा पार करून आत घुसतो आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत.
या सगळ्या प्रश्नांचे गांभीर्य असणारा नेता हवा आहे.