राम राम मिपाकरहो.
उद्या रविवार त्यात परत एकादशी, संकष्टी वैग्रे ही काही नाही. तेव्हा कोंबडी हाणायला कुणाची हरकत नसावी. काय म्हणता ? ;)
ईथे बाहेर मस्त धो धो पाऊस कोसळतोय. काही तरी झणझणीत चापायची इच्छा होतेय.
आज फार दिवसांनी मुड ही लागलाय. (त्यात आम्ही वार पाळत नसल्याने आम्हाला एक संकष्टी सोडली तर सगळे दिवस सारखेच.)
काय मग करायची का सुरवात?
पेरी पेरी सॉस
साहित्यः
लाल मिरच्या (मिरच्यांची संख्या त्यांच्या तिखटपणाच्या तीव्रतेवर अवलंबून.)
मी habanero peppers वापरल्यात.
एक लहान कांदा.
एक गड्डा लसुण.
एका लिंबाचा रस.
२ लहान चमचे काळीमीरी पुड
३ मोठे चमचे पेपरीका (नसल्यास काश्मीरी लालतिखट) याने रंग चांगला येतो.
१/२ कप व्हिनेगर.
१/२ लहान चमचा साखर (ऑप्शनल. व्हिनेगरचा उग्रपणा कमी करण्यासाठी.)
१/२ कप तेल. (ऑलिव्हच असल्यास उत्तम)
चवी नुसार मीठ.
कृती :
मी वापरलेल्या मिरच्या अतीजहाल असल्यामुळे त्यांचा तिखटपणा थोडा कमी करण्यासाठी व एक स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी या मिरच्या शेगडीवर भाजुन आणि नंतर सोलून घेतल्या.
(कांद्याचा कच्चटपणा घालण्यासाठी कांदा थोडा परतुन घेतला होता.)
सॉससाठी म्हणुन लागणारे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये वाटुन घेतले.
तयार सॉस बाटलीत बंद करुन फ्रीजमध्ये ठेवल्यास ४-५ आठवडे सहज टिकतो.
शक्य असल्यास हा सॉस आदल्या दिवशी करुन ठेवावा. मुरल्यावर याची चव अधीक खुलते.
कोंबडी स्वच्छ धुवून घेतली. तिच्या पाठीच्या कण्याकडचा भाग खालील चित्रफितीमध्ये दाखवल्या प्रमाणे कापून टाकला. (सुपसाठी स्टॉक बनवायचा असल्यास याचा काढुन टाकलेल्या भागाचा वापर करता येईल.)
चिकन ब्रेस्टमध्ये असणारं हाड/कुर्चा काढुन टाकल्यास चिकन एकदम फ्लॅट होतं.
कोंबडीला चरे देऊन चवी नुसार मीठ भुरभुरलं. तयार असलेला पेरी-पेरी सॉस लावून किमान ३-४ तास मुरत ठेवलं.
ओव्हन १० मिनिटं २००°C वर प्रीहिट करुन घेतला. आणि नंतर मुरवलेली कोंबडी आत अंदाजे ६०-८० मिनीटं शिजत ठेवली. (कोंबडीच्या आकारावर शिजण्यासाठी लागणारा वेळ कमी जास्त करावा.)
चियर्स.
प्रतिक्रिया
13 Jul 2013 - 8:14 pm | यशोधरा
मस्त! भारतात कधी येतो आहेस रे?
13 Jul 2013 - 9:09 pm | दिपक.कुवेत
कसलं सह्हि दिसतय! हे चिकन, चिल्ड बियरचा ग्लास आणि बाहेर धो धो कोसळणारा पाऊस......बास मग सगळेच वार झकत गेले!
13 Jul 2013 - 9:16 pm | सस्नेह
चिकनचे फूल बनलेले पहिल्यांदाच पाहिले !
13 Jul 2013 - 9:42 pm | सोत्रि
झक्कास!
तो पहिल्या फोटोतला शॉट ग्लास बघून घाईघाईने साहित्य बघितले... पण त्यात व्हिनेगार असल्याचे बघून थोडा हिरमोड झाला. ;)
- (चिकनचा आकार बघून गार झालेला) सोकाजी
13 Jul 2013 - 10:26 pm | पैसा
आणखी एक गणपा पेश्शल! तरी म्हटलं, गेल्या काही दिवसांत तू पाकृ न टाकल्यामुळे आफ्रिकेत कोंबड्यांची लोकसंख्या बरीच वाढली असणार. फोटो आणि कृटी नेहमीप्रमाणे खासच!
मागणी केल्याबरोबर व्हिडो टाकल्याबद्दल धन्यवाद! पण व्हिडो उघडला नाही. कारण पाहू शकणार नाही! पण बाकी मंडळींना नक्की उपयोगी पडेल.
13 Jul 2013 - 11:50 pm | नंदन
क्या बात है! झक्कास पाकृ.
14 Jul 2013 - 1:15 am | रेवती
लाल सॉसचा रंग एकदम मस्त! मी काय म्हणते, गणपा, अशाच पद्धतीने जर दह्यात नेहमीचं (आलं, लसूण पेस्ट, तिखट इ. घालून केलेले)मॅरिनेट केलेले चिकनचे पिसेस रॅकवर ठेवून व खाली ट्रे (निथळणारे पाणी जमायला) आणि बेक केले तर खाण्यायोग्य प्रकार होईल का?
14 Jul 2013 - 2:04 am | बहुगुणी
रेवती ताई चिकन बेकिंगविषयी विचारतायेत, खाद्यांतर केलं की काय? :-)
(बाकी गणपाशेठ, पाकृ फर्मासच असणार पण ते पेरी पेरी सॉस म्हणजे अॅटमबाँबच असेल! की व्हिनेगार तिखटपणा कमी करतं? हे सॉस शाकाहारी भाज्यांसाठी ग्रेव्ही करायलाही वापरायला हरकत नसावी....)
14 Jul 2013 - 3:40 am | रेवती
छे हो! मी कुठली खातीये.......हे आपलं दुरुस्ती म्हणून! ;) मुलासाठी करताना अनेकवेळा चुकतं त्यावेळी दुरुस्ती करता येईल का हे बघत होते.
14 Jul 2013 - 11:41 am | गणपा
नक्कीच.
वाटल्यास त्यात थोडा तंदुर मसाला टाकला की डायरेक्ट तंदूरीच. :)
बहुगुणी काका,
एकदम बरोबर.
ह्या habanero peppers चा (मिरच्यांच्या)तिखटपणाच्या बाबतीत चौथा नंबर लागतो. त्यामुळे त्यांचा तिखतपणाचा जाळ कमी करण्यासाठी त्या भाजुन घेतल्या वर व्हिनेगरही घातलय.
हा सॉस वापरुन पेरीपेरी पनीर सर्व्ह करतात असं ऐकलय. त्यामुळे मश्रूम, बटाटा, पनीर, सिमला मिरची आदी स्क्युअरमध्ये ओवून आणि या सॉसने मॅरिनेट करुन भाजल्यास/बेक/तंदुर केल्यास नक्कीच चांगले लागेल.
14 Jul 2013 - 5:58 pm | रेवती
ओके. धन्यवाद.
14 Jul 2013 - 7:43 pm | बहुगुणी
Thanks!
14 Jul 2013 - 1:54 am | प्रभाकर पेठकर
तजेलदार सॉस लावून 'मेक-अप' केलेली कोंबडी ओव्हनमध्ये भाजून सादर करण्याची पद्धत आणि बटरफ्लाय नांव सार्थकी लावणारी सजावट अत्युत्तम.
ओव्हन नसल्याकारणाने निखार्यावर 'ओपन-ग्रील'चा प्रयत्न करण्यात येईल.
14 Jul 2013 - 3:07 am | पाषाणभेद
नॉनव्हेज खात नसल्याने ही फक्त पोच.
बाकी बर्याच दिवसात किचनमध्ये वेंट्री केली?
14 Jul 2013 - 3:11 am | सुहास झेले
आयचा घोव... खपलो राव... :) :)
14 Jul 2013 - 4:48 am | स्पंदना
दम कसा धरवला म्हणते मी फोटो काढे पर्यंत?
खर सांगा गणपा भाऊ एक बनवुन हाणत असताना दुसरी सजवली की नाही?
पेरी पेरी सॉसची पाककृती दिल्याबद्दल कोंबडीपासुन....आय मिन ...मनापासून धन्यवाद.
मस्ताड! कोंबडी सुखाने स्वर्गात पोहोचली असेल याबद्दल दुमत नाही.
14 Jul 2013 - 8:54 am | मुक्त विहारि
झक्कास...
14 Jul 2013 - 10:34 am | स्वाती दिनेश
स्स्स्स.. लै भारी दिसते आहे पेरी पेरी चिकन..मस्त..
स्वाती
14 Jul 2013 - 12:29 pm | सानिकास्वप्निल
पेरी-पेरी बटरफ्लाय (स्पॅचकॉक) चिकन बघून जीव गेला.....
एकतर इतक्या दिवसांनी पाकृ दिलीत ती पण कसली जबरी, एकदम फर्स्ट्क्लास...काय रंग आलाय.... सॉल्लिड :)
+११११११११११११११११११
14 Jul 2013 - 2:31 pm | नेहरिन
गणपाशेट तिकडे कुठे कीबोर्ड बडवायला गेलात ...? गल्लि चुकलात बर का....... माश्टर शेफ इंडिया मधे जायला हव तुम्हि खरतर.....
मी नॉन्व्हेज खात नाहि आणि करतहि नाहि पण फोटो बघुन एकदम मस्त वाटल. फक्त एवढच सांगा ते चिकन आहे कि बटरफ्लाय............?
14 Jul 2013 - 2:36 pm | नेहरिन
आता ह्या habanero peppers शोधण आलं ....त्या पुण्यात कुठे मिळायच्या .....................????
14 Jul 2013 - 6:49 pm | आदूबाळ
डोळे निवले आणि जीभ खवळली...
14 Jul 2013 - 6:53 pm | प्यारे१
वजन आटोक्यात आलेलं दिस्तंय.
संदर्भ : काही दिवसांपूर्वीची चेपु चर्चा. ;)
14 Jul 2013 - 9:06 pm | प्रभो
:)
15 Jul 2013 - 10:26 am | मोदक
भारी!!!!!
15 Jul 2013 - 1:49 pm | मी_देव
मस्तच
15 Jul 2013 - 2:21 pm | त्रिवेणी
भारी रेसिपी,
खर सांगते गणपा दा तुमच्या रेसिपी बघुनच मि पा ची पंखा झाले होते. पण प्लीज रेसिपींमध्ये ईतके दिवसांचा गॅप नका ठेवत जाऊ.
15 Jul 2013 - 2:32 pm | त्रिवेणी
माझा पहिला प्रतिसाद का दिसत नाही.
15 Jul 2013 - 3:16 pm | कवितानागेश
पेरीपेरी सॉस आणलय घरी.
ते पनीर, बटाटा वगरै वापरुन असच बेक करुन बघते..
15 Jul 2013 - 4:14 pm | बॅटमॅन
क्या बात! क्या बात!! क्या बात!!!
15 Jul 2013 - 5:23 pm | अद्द्या
हे बघून
घरी कोणी करून देणार नाही . आणि करू पण देणार नाही म्हणून डोळे पाणावले :(
कोणतं तरी हॉटेल शोधणं आलं आता .
भारी . जबरा . मस्त . इत्यादी इत्यादी
15 Jul 2013 - 5:40 pm | इरसाल
मी अज्जिबात ह्या धाग्यावर प्रतिक्रिया देणार नाही.
एकतर आधीच पशुहत्या वरुन बिचारीला पाठीमागुन दाबुन पेल्व्हिक गर्डल मोडले वरुन सजावट छ्या...........
बरंबरं .....कधी खायला देणार आहात ?
15 Jul 2013 - 5:52 pm | कपिलमुनी
सजावट इतकि सुंदर आहे ! ति मोडून घास घ्यावा असे वाटत नाही ..
एकदम तोंपासू..
16 Jul 2013 - 5:11 pm | मदनबाण
शेवटचे २ फोटो पाहुन जेव्हा मी पहिल्यांदा लोखंडी शिगेत अडकवलेले तंदुरी चिकन पाहिले होते त्याची आठवण आली.त्या वेळी तो लटकवलेला प्राणी कोणता असेल असे बरेच तर्कवितर्क मनात केले पण कळेना,मग मित्रानी सांगितले की ते चिकन आहे ते... :)
17 Jul 2013 - 7:37 am | पेरु
ती मिक्सी कोणती आहे एवढे बारीक वाटण करणारी?
चिकन छानच दिसतयं.
17 Jul 2013 - 1:27 pm | गणपा
फिलीप्स कंपनीचा मिक्सर आहे.
17 Jul 2013 - 7:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गंपाशेठ, लैच भारी. रेग्युलर पाककृत्या टाकत जा राव.
अवांतर : चिकन असं कात्रीनं कापतांना पाहुन आमच्याकडे हसु... आणि विविध प्रतिक्रिया उमटल्या करिता माहितीस्तव. (कात्रीचा उपयोग फक्त कागद आणि कापड कापण्यापूरताच असतो, एवढंच आम्हाला माहिती होतं.)
-दिलीप बिरुटे
17 Jul 2013 - 1:26 pm | गणपा
हा हा हा. सर १०-१२ वर्षांपुर्वी पहिल्यांदा जेव्हा मी बहिणीला किचन सिझरने कोथिंबीर कापताना पहिलं होतं तेव्हा वेड्यासारखा हसत सुटलो होतो. च्यायला कोथिंबीर कापायला कात्री? सहनच होईना. म्हटलं तायडे उसात जाऊन वाया गेलीस गो.
नंतर या कात्रीचा उपयोग कळुन चुकला. हल्ली व्हेज पेक्षा मासे,चिकन साफ करताना याचा सर्रास वापर करतोय.
17 Jul 2013 - 1:39 pm | ऋषिकेश
वाहवा!
17 Jul 2013 - 3:55 pm | अत्रुप्त आत्मा
गंपादादानी "कोंबडीचे शवविच्छेदन" (बेडूक शवविच्छेदना सारखं ;) ) लै भारी केलय...! ;)
आणी त्याच व्हिडू खालचा तो पहिला...फोटू म्हणजे...हत्तीणीच्या पोटातली "जुळी" वाटताहेत...एकमेकाकडे तोंड आणी मागे कान करून...काँप्रमाइझ करून बसलेली...ह्ही ह्ही ह्ही ह्ही ह्ही :D
18 Jul 2013 - 12:38 am | देवांग
कोंबडीवर ४ शब्द ...
१. मला सगळेच प्राणी आणि पक्षि आवडतात . प्राणी खूप चविष्ट असतात . "कोंबडी" विशेषतः जास्त चविष्ट असल्याने माझा आवडता पक्षि आहे.
२. कोंबडी खाल्ल्याने "बर्ड फ्लू" होतो.
३. कोंबडी "शाकाहारी " आहे , म्हणून मला तिचा आदर वाटतो .
४. कोंबडीला दगड मारला तर तिचा 'पक पकाक' असा आवाज येतो. मला तो फार आवडतो. नाना पाटेकरचा एक सिनेमाचे नाव 'पक पक पकाक ' असा आहे .
५. पूर्वीचे लोक कोंबड्या चोरत ,त्यांना कोंबडी चोर असे म्हणत,चोरी करणे गुन्हा आहे.
६. कोंबडी "अंडे" देते, प्रत्येक कोंबडीला नेहमीच जुळी (ट्विन्स) अंडी होतात...
७. कोंबडीचा बळी देतात. बळी देणे हि प्रथा वाईट आहे असे, "आदित्य" काल 'चीकेन तंदुरी' खातांना म्हणाला.
८. पूर्वी 'कोंबडा' आरवायचा आणि 'कोंबडी' झोपून असायची,,,,(आळशी कुठली )
९. कोंबडी कधी कधी 'सोन्या' चे अंडे देते. मला घरी लाडाने 'सोन्या' हाक मारतात .
गटारी चा दिवशीचा चार ओळी - कोंबडीच्या हातात हात घालून बोकड लागले नाचू, आषाढ गेला श्रावण आला आता महिनाभर तरी वाचू !! :)
18 Jul 2013 - 1:33 am | अत्रुप्त आत्मा
=)) =)) =))
18 Jul 2013 - 10:51 am | बाळ सप्रे
एका नव्या धाग्याचे पोटेन्शिअल आहे या प्रतिसादात :-)
18 Jul 2013 - 12:27 pm | तुमचा अभिषेक
बराच वेळ ते फोटो बघतोय नुसते पण त्यांना वर्णावे असे शब्दच सुचत नाहियेत प्रतिसाद द्यायला..
दुपारचे साडेबारा वाजलेत, लंच टाईम झालाय, आज गुरुवार आहे, आणि मझ्या डब्यात उसळ.... कठीण्च आहे एकंदरीत.. :(