दिवाळी अंकासाठी आवाहन...

उदय ४२'s picture
उदय ४२ in काथ्याकूट
12 Jul 2008 - 8:38 pm
गाभा: 

समग्र मिसळपाव वासियांना सप्रेम आवाहन,

सांप्रतकाळी दिवाळीअंकांची चलती सुरु असताना आम्ही देखील त्यात आणखी एका अंकाची भर टाकत आहोत्.गेल्या चार्-पाच वर्षांपासुन

झुंजुमुंजु

नामे एक अंक प्रसिध्द करतो आहो.यंदा आमचा विषय आहे

'...आणि म्हणे मी मराठी!'

असा आहे.यात मराठीपणा बद्दल ज्याना जे वाटते ते त्यांनी लिहावे,अशी कल्पना आहे.मी गेल्या काही महिन्यंपासुन मिपा चा नियमीत सदस्य आहे.या दिवाळी अंका साठी मिपा च्या लेखकांकडुन साहित्य मागवित आहे.अट एकचः गंभीर लेखन नसावे..उपहासात्मक,विनोदी लेख्,याशिवाय अनुभवात्मक लिखाणाचे स्वागत आहे.व्यनि वर सम्पर्क साधल्यास आणखी माहिती देइन.प्रतीसादाच्या अपेक्षेत.

(अखिल वैश्विक मिपा साहित्या महामंडळाचा सदस्य)

प्रतिक्रिया

मानस's picture

12 Jul 2008 - 8:42 pm | मानस

दिवाणी छान शब्द आहे.

ह्.घ्या..

अंकासाठी शुभेच्छा

उदय ४२'s picture

12 Jul 2008 - 8:43 pm | उदय ४२

सजवण्याच्या नादात जरा गडबड झाली वाटते...
अंकाचे नाव झुंजुमुंजु असे असुन विषय आहे '...आणि म्हणे मी मराठी!'

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

प्राजु's picture

12 Jul 2008 - 8:44 pm | प्राजु

चांगली आहे कल्पना..
अंकासाठी शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

12 Jul 2008 - 8:48 pm | यशोधरा

हा मिपाचा दिवाळी अंक आहे का तुमचा स्वतःचा काही उपक्रम?

विसोबा खेचर's picture

13 Jul 2008 - 12:17 am | विसोबा खेचर

हा मिपाचा दिवाळी अंक आहे का तुमचा स्वतःचा काही उपक्रम?

ह्यात मिपाचा काहीही संबंध नाही. अद्याप तरी मिपाच्या दिवाळीअंकाबद्दल काही निश्चित ठरलेले नाही. 'वीस रुपये रोजी अन् एक कप चाय' या बोलीवर काही संपादक मिळाले की मिपा दिवाळीअंक काढण्याबद्दल विचार करेल... :)

आपला,
(मिपाचा प्रवक्ता) तात्या.

प्रियाली's picture

12 Jul 2008 - 8:48 pm | प्रियाली

मूळ लेखात असणार्‍या टंकनचुका बदलून दिल्या आहेत.

उदय ४२'s picture

12 Jul 2008 - 9:02 pm | उदय ४२

सवय नाही ना टंकायची,म्हणून झाले.अंक माझाच आहे..मिपा चा नाही.

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

अरुण मनोहर's picture

13 Jul 2008 - 4:16 am | अरुण मनोहर

झुंजुमुंजु विषयी थोडी माहीती दिली तर बरे होईल.
हा छापील अंक आहे की जालावर आहे?
प्रकाशक कोण आहेत?
मागील अंक कुठे वाचायला मिळतील (म्हणजे सॉफ्ट कॉपी)

सर्वात महत्वाचे- लिखाण पाठवण्याची शेवटची तारीख काय?

धन्यवाद.

उदय ४२'s picture

13 Jul 2008 - 7:35 pm | उदय ४२

अरुणराव,शुभम पब्व्लीकेशन तर्फे हा अंक प्रकाशित होतो..त्याच्या मागील प्रती जालावर नाही मिळणार.

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

दिनेश५७'s picture

19 Jul 2008 - 9:39 am | दिनेश५७

उदयभाऊ,
चांगला असतो तुमचा अंक.
पत्रकार संघातल्या अंक प्रदर्शनात एकदा चाळला होता. आवडला. विषयाची निवडही अव्वल असते.
नव्या दिवाळीसाठी आणि दिवाळी अंकासाठी शुभेच्छा!!!