वारी......

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
8 Jul 2013 - 12:10 am
गाभा: 

दर आशाढी कार्तिकी एकादशी ला पंढरपूर ला वारी निघते. लाखो लोक वारीत सामील होतात.
आषाढी वारीला जायचे म्हणजे खरेतर शेतात पेरणीचा हंगाम ऐन बहरात असतो. नुकतीच पेरणी झालेली असएत व्हायची असते अशातच शेतकरी कामेधामे सोडून वारीला जातात.
त्यांच्यासाठी वारी हा एक विरंगुळा असतो. पण त्यामुळे कामे रखडतात / शासन यंत्रणेवर अवास्तव ताण येतो. कारण नसताना शासन यंत्रणेला सुरक्षा यंत्रणेला राबवले जाते. लोकांचाही वेळ वाया जातो.
खरेतर हिंदु धर्मात वारी देव दर्शन या वैयक्तीक गोष्टी मानलेल्या आहेत. धार्मीक भावनांचे सामुदायीक प्रदर्शन करून ज्यांच्या त्या गोष्टीशी सम्बन्ध नाही अशा जनतेस वेठीस धरण्याचे प्रकार बहुतेक सर्वच धर्मात वाढीस लागलेले आहेत.
गणपती उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ उद्देश बाजूस राहील आणि भलतेच रूप घेवून उत्सव खंडणी बहाद्दूर / व्यापारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी पर्वणी बनला आहे.जनजागृती हा उत्सवांचा उद्देश कधीच मागे पडला आहे.
आपण एखादी गोष्ट त्याचा उपयोग सम्पल्यानंतर ती त्याज्य ठरवतो तसे हे उत्सव देखील आता त्याज्य करायला हवेत.
त्यातून निर्माण झालेल्या अनाठायी प्रथा सम्पवायला हव्यात.
तुम्हाला काय वाटतय. ( मांजराच्या गळ्यात घंटा कोण बाम्धणार ???? )

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

8 Jul 2013 - 2:17 am | अभ्या..

सध्या 'काय काय त्याज्य करावं' हा विचारच त्याज्य करावा असे वाटू लागलय खरं :(
असो.....................................जय जय रामकॄष्ण हरी

स्पंदना's picture

8 Jul 2013 - 5:43 am | स्पंदना

आषाढी वारीला जायचे म्हणजे खरेतर शेतात पेरणीचा हंगाम ऐन बहरात असतो. नुकतीच पेरणी झालेली असएत व्हायची असते अशातच शेतकरी कामेधामे सोडून वारीला जातात.

पेरण्या मृगनक्षत्रावर होतात हो विजुभाऊ. दहा दिवसात पेरण्या उरकतात, नव्हे तर उरकाव्याच लागतात. उन्हाळाभर अश्या वार्‍या नसतात कारण जमिन तयार करावी लागते अन ते जास्त कष्टाचे असते. पाऊस पडत असताना तस शेतात फार काम नसत. गुडघाभर चिखलात आपल काही चालत नाही. हां पण आषाढ सरताना पिकं उगवलेली असतात अन मग कोळपणी करु शकतो, विरळणी करु शकतो, तोवर माणस परतलेली असतात. भांगलण मात्र जरा चांगली उघडीप झाल्यावरच.
तंबाखु, ऑगस्ट मध्ये लावायचा असतो कारण त्याला एव्हढ पाणी सोसत नाही.
तस काय अडत नाही शेतांच या मोसमात एकदा पेरणी झाली की, अन वारीला काही सारं घरदार झाडुन जात नाही, एखादा वारकरी असतो घरपती.

उगा शेताचा विषय काढला म्हणुन हा प्रतिसादाचा उपद्व्याप, बाकी चालुदे.

नेमकी उत्तरे दिली आहेत. मलाही काहीवेळेस असे वाटायचे की शेतातली कामे असताना ती सोडून कसे काय लोक वारीला जाऊ शकतात म्हणून. पण शेतीशी काही संबंध नसल्याने-पूर्ण अज्ञान असल्याने तुम्ही सांगितल्याप्रमाणे विचारही कधी केला नाही. तुम्ही दिलेली माहिती सर्वस्वी नवीन अन उपयोगी आहे, बहुत धन्यवाद.

आणि आता हाइंडसाइट मध्ये लक्षात येतंय, शेतीला फारसा अडथळा होत नसल्यानेच वारी चालूये, नैतर इतकी वर्षे चालू राहिलीच नसती.

तुषार काळभोर's picture

8 Jul 2013 - 5:15 pm | तुषार काळभोर


आणि आता हाइंडसाइट मध्ये लक्षात येतंय, शेतीला फारसा अडथळा होत नसल्यानेच वारी चालूये, नैतर इतकी वर्षे चालू राहिलीच नसती.

हे सगळ्यात महत्वाचं!!
तैं च्या म्हणण्यालाही (अनुभवोक्त) अनुमोदन..

मालोजीराव's picture

10 Jul 2013 - 2:03 pm | मालोजीराव

शेतीची बहुतेक कामे झालेली असतात…

त्या काळात भयंकर दुष्काळ पडला असताना आणि मोगलांनी महाराष्ट्रावर आक्रमण केल असतानाहि छत्रपति संभाजी महाराजांच्या छत्राखाली पालखी सोहळा सुरूच राहिला याशिवाय १६८५ साली तुकोबांच्या पादुका पालखीत पंढरपूरला नेण्याचा प्रघात पडला त्यासाठी निधी आणि संरक्षणसुद्धा स्वराज्याच्या नाजूक काळात देण्यात आलं होत…त्यामुळे आताच्या राज्यकर्त्यांना व्यवस्थेवर ताण येतो असं वाटत असेल तर त्यांनी जीव द्यावा फुलपात्रात (फुलपात्र बुवा देतील :P )

बॅटमॅन's picture

10 Jul 2013 - 3:27 pm | बॅटमॅन

तुकोबांच्या मुलांचे शिवाजीमहाराजांशी काहीतरी बोलणे कधीकाळी झाले होते असे वाचल्याचे आठवत आहे, पण १६८५ साली असा प्रघात पडला हे माहिती नव्हतं. रोचक आहे!

मालोजीराव's picture

10 Jul 2013 - 3:42 pm | मालोजीराव

तुकोबांच्या मुलांचे शिवाजीमहाराजांशी काहीतरी बोलणे कधीकाळी झाले होते असे वाचल्याचे आठवत आहे

होय ते नारायणमहाराज तुकोबांचे कनिष्ठ चिरंजीव बहुतेक…त्यांनीच तुकोबा-माउली यांचा पालखी सोहळा वारी बरोबर चालू केला, पूर्वी एकाच पालखीत तुकोबा-माउली दोघांच्या पादुका असत…नंतर (१५० वर्षांनी) काही वाद झाल्याने सरदार हैबतबाबांनी माउलींची पालखी स्वतंत्रपणे आळंदीहून नेण्यास सुरुवात केली.

अर्धवटराव's picture

10 Jul 2013 - 9:14 pm | अर्धवटराव

हाय रे कर्मा.

अवांतरः आयला, म्हणजे "राष्ट्रवादी" इतकी पुरातन आहे होय...

अर्धवटराव

मालोजीराव's picture

11 Jul 2013 - 11:32 am | मालोजीराव

'तसा' वाद नव्हता हो, तुकोबांच्या वंशजात वाद निर्माण झाला…त्यामुळे पालखी निघेल कि नाही असा संभ्रम होता…आणि एकाच पालखीत दोन्ही पादुका असल्याने त्याचा फटका उगाच माउली यांच्या पालखीला बसला असता…म्हणजे तुकोबांची पालखी निघाली नसती तर ज्ञानोबांची पण नसती निघाली,म्हणून पालखी वेगळ्या करण्याचा निर्णय शिंद्यांनी आणि हैबतबाबा पवारांनी घेतला.

बॅटमॅन's picture

10 Jul 2013 - 11:57 pm | बॅटमॅन

माहितीकरिता धन्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jul 2013 - 12:05 am | अत्रुप्त आत्मा

@ (फुलपात्र बुवा देतील smiley )>>> http://nashik.com/giftshop/dande/images/_pic0020.jpg हे घ्या...!!! चांगलं चांदिचं आहे हो....!!! :p

हलकत मालो जी :p

यशोधरा's picture

8 Jul 2013 - 7:31 am | यशोधरा

का ही ही.

किसन शिंदे's picture

8 Jul 2013 - 8:43 am | किसन शिंदे

या प्रश्नाचं उत्तर खरंतर खुप सोप्पंय.

वारीतला कुठलाही माणूस्/वारकरी हा त्याच्या फक्त आणि फक्त आत्मिक समाधानासाठीच वारीला जात असतो. त्यामागे धार्मिक भावनांचे सामुदायिक शक्तीप्रदर्शन अथवा शासन यंत्रणेवर भार देण्याचा यांपैकी कुठलाच हेतू नसतो.
विजूभौ, एकदातरी या वारीत चार पावलं चालून पहा मग कळेल तुम्हाला कि लोकं आपली कामधामं सोडून आषाढी-कार्तिकीच्या पंढरपूरच्या वार्‍या का करतात ते.

एखादी गोष्ट त्याचा उपयोग सम्पल्यानंतर ती त्याज्य ठरवतो तसे हे उत्सव देखील आता त्याज्य करायला हवेत.
त्यातून निर्माण झालेल्या अनाठायी प्रथा सम्पवायला हव्यात.

या प्रथेचा 'उपयोग' संपलेला नाही असं वाटतं त्याचप्रमाणे यात काही विशेष अनाठायी प्रथा आहे असंही वाटत नाही.

पुणे व मार्गावरील इतर शहरातील वाहतुकीवर पडणारा ताण, शहरातील स्वच्छता तसेच इतर मुद्द्यांवर उपाय नक्की व्हावेत. त्यासाठी वारीचा मार्गबदल वगैरे इतर उपाय असल्यास तिथे मान, परंपरा वगैरे बाजूला ठेउन खुल्या दिलाने स्वीकारले जावेत...
परंतु यासाठी वारीच बंद करणे फार टोकाची भूमिका वाटते. ज्यांना जायचय त्यांना जायला काय हरकत आहे? इतरांना कमीत कमी त्रास होइल इतकी खबरदारी घेतली की झालं.

अमोल केळकर's picture

10 Jul 2013 - 1:50 pm | अमोल केळकर

सहमत !!! :)

अमोल केळकर

जेपी's picture

8 Jul 2013 - 12:49 pm | जेपी

सार्वजनिक उत्सवाच मुळ उद्देश कधीच संपला आहे

कवितानागेश's picture

8 Jul 2013 - 12:49 pm | कवितानागेश

त्यांच्यासाठी वारी हा एक विरंगुळा असतो>>
अहो, विरंगुळ्यासाठी लोक्स बागेत/ सिनेमाला जातील की. वारीला कशाला कोण पायपीट करत जाईल?

वारी मुळे पुण्यातील वहातूक व्यवस्थेवर तान पडतो. प्ण वारीच्या मार्गात बदल कोणी करीत नाही
गणेशोत्सव , दहीहंडी यांच्या वाइट बाजुंबद्दल बरेचदा बोलून झालेले आहे.
गणेशोत्सवातील देखावे एकेकाळी जेंव्हा व्यक्त होण्याची कोणतीच माध्यमे नव्हती तेंव्हा लोकांचे प्रबोधन करीत होती.
देशभक्तांचे जिवंत देखावे देशभक्ती जागृत करीत होते , मेळे लोकाना कलागुणांचे एक व्यासपीठ देत होते त्याकाळात गणेशोत्सव आवश्यक होते. टिळकानी सार्वजनीक गणेशोत्सव ज्या उद्देशासाठी स्थापीत केले तो उद्देश साध्य करण्याची साधने आज उदंड आहेत.
गणेशोत्सवातील ध्वनीप्रदुशण , मंडळांची दादागिरी वगैरेवर शासन अंकुश घालु शकत नाही. हे उत्सव बंद केले तर निदान लोकांचा त्यात जाणारा अनाठायी वेळ वाचेल. तो उत्पादक कामांसाठी वापरता येइल.
आज आपण हायवेवर सुद्धा आसपास्च्या गावांमधुन निघणार्‍या पालख्या पहातो. त्यात बहुतेकदा २० ते ४५ वयोगटातील मंडळीच असतात. पालखी हा त्यांच्या साठी टाईमपास असतो.
त्या ऐवजी या लोकानी श्रमदान वगैरे केले तर गावची कामे होतील. उत्पादक कामात वाढ होईल.
गणेशोत्सवासारखा उत्सव हा तर निव्वळ शासन यंत्रणेवर /पोलीस यंत्रणेवर ताणच आणतो

हल्ली देव , उत्सव यांच्या विरोधात बोलायचे फ्याड आलेय
चालू द्या

पैसा's picture

8 Jul 2013 - 2:22 pm | पैसा

शेतीचा वेळ वगैरेबद्दल अपर्णाने लिहिलं आहेच. माझ्या माहितीप्रमाणे माळकरी हे शक्य तेवढे चांगले आणि सत्वाचे आयुष्य जगायचा प्रयत्न करतात. त्यांच्या परिणामी काही गुन्ह्यांना तरी चाप लागत असावा.

चालत जाणे हे कालापव्यय म्हणून पाहिले तर तसे. पण ज्याच्याकडे वेळ असेल आणि चालायची ताकद असेल त्याची मर्जी! तसे तर लोक नर्मदा परिक्रमा सुद्धा हजारों वर्षे करत आलेतच की!

आणि प्रत्येक गोष्टीकडे असे उत्पादक आणि अनुत्पादक काम म्हणून पाहता येणार नाही. तसे पाहिले तर गायन, नृत्य, नाट्य, चित्रपट, चित्रकला सगळ्याच अनुत्पादक ठरतील! पण प्रत्यक्षात त्यातून मिळणारा आनंद हा पैशात मोजता येण्यासारखा नसतो.

बाकी वाहतुकीचा खोळंबा, ध्वनीप्रदूषण याबाबत सहमत. पण ते तारतम्य सगळ्यांनीच ठेवायला हवे. आमच्या इथे तर काही ठिकाणी रस्त्यात मंडप घालून सार्वजनिक गणपती बसवतात. तेव्हा ट्रॅफिक हळू चालते, तशाच शिमगा, कार्निव्हल अनेक मिरवणुका असतात. केरळी लोकांची सुद्धा कसल्याशा सणाची मिरवणूक असते. ओल्ड गोव्याला फीस्टपूर्वी आणि नंतर काही दिवस चर्चसमोरचा राष्ट्रीय हमरस्ता बंद करतात. तेव्हा ट्रॅफिकला ३ किमि चा जास्तीचा वळसा घेऊन आणि अर्धा तास खर्च करून जावे लागते. दर वेळी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, केरलाईट्स कोणाचाही कसलाही सण असो, पहिले काम म्हणजे रस्ता बंद. असंच आहे. मग त्या बिचार्‍या वारकर्‍यांनाच कशाला विरोध करायचा?

मोठ्याने स्पीकर्स लावून गोंगाट केला की आपण ओरड घालतो, पण आमच्या घराशेजारी एक शाळा आहे. मधे फक्त एक लहान रस्ता, रोज सकाळी ७ वाजता मुलांना सोडायला येणार्‍या गाड्यांचे हॉर्न्स जे सुरू होतात ते दुपारी शाळा बंद झाली की थांबतात. अगदी वीट आला आहे. पण शाळेची मालकीण नगराध्यक्षा. कोणाला विचारणार? बरं लोकही असे की रस्ता सरळ आहे, मागचे पुढचे १/२ किमि व्यवस्थित दिसते, फक्त मुलांना घेण्यासाठी थांबलेली गाडी हलल्याशिवाय मागच्याला पुढे जाता येत नाही. एका सेकंदात यांचं पेंपें सुरू! या सगळ्याला आपण काय करू शकतो? घर बदलणे हा एकच उपाय मला दिसतोय!

क्लिंटन's picture

8 Jul 2013 - 9:46 pm | क्लिंटन

माझ्या माहितीप्रमाणे माळकरी हे शक्य तेवढे चांगले आणि सत्वाचे आयुष्य जगायचा प्रयत्न करतात. त्यांच्या परिणामी काही गुन्ह्यांना तरी चाप लागत असावा.

छे. पैसाताई तुमच्याकडे शास्त्रीय दृष्टीकोन अजिबात नाही बघा.आकडेवारी कुठे आहे?नक्की किती माळकरी?चांगले आणि सत्वाचे आयुष्य म्हणजे नक्की काय? :)

पैसा's picture

8 Jul 2013 - 10:29 pm | पैसा

मी म्हणते हाच्च पुरावा! =))

बाळ सप्रे's picture

9 Jul 2013 - 9:49 am | बाळ सप्रे

मी वारकरी ऐकले होते.. हे माळकरी कोण??

तुळशी माळा धारण करणारे आणि त्यासाठी ठरलेल्या नियमांचे पालन करणारे ते माळकरी.

आनंदी गोपाळ's picture

10 Jul 2013 - 9:22 pm | आनंदी गोपाळ

"यामुळे काही गुन्हे थांबतील" अशा अर्थाच्या वाक्यासंदर्भाने.

माळ घातली, की मटन मच्छी खाणे नाही. दारू पिणे नाही अशी शपथ असते. अन माळकरी ती जिवाच्या पणाने पाळतात हे पाहिले आहे..
वारीत उगा हौसे खातर सामिल होणारे आजकालचे येडे सोडले तर हार्डकोअर वारकरी हा माळकरीच असतो.

शिल्पा ब's picture

12 Jul 2013 - 10:48 pm | शिल्पा ब

<<<वारीत उगा हौसे खातर सामिल होणारे आजकालचे येडे सोडले तर हार्डकोअर वारकरी हा माळकरीच असतो.
+१
बाकी लेखाबद्दल : आधी ते दिवसरात्र चालणारे कर्णप्रदुषण करणारे मशिदीवरचे भोंगे बंद करा मग पुढचं पाहु.

विजुभाऊ's picture

12 Jul 2013 - 11:40 pm | विजुभाऊ

बाकी लेखाबद्दल : आधी ते दिवसरात्र चालणारे कर्णप्रदुषण करणारे मशिदीवरचे भोंगे बंद करा मग पुढचं पाहु.

दिवस रात्र कोणत्याही वेळी कुठेही चालणारी भजने. टीव्हीवरची भक्तीगीते बहुतेक चॅनलवरची गुरुदेवांची प्रवचने एह लिहायचे विसरलेला दिसताय.

अनिरुद्ध प's picture

8 Jul 2013 - 2:22 pm | अनिरुद्ध प

आपण आधी वारि कधी व कशि व का सुरु झाली याचा अभ्यास करुन मगच वारी बन्द वगैरे करण्याचा विचार करावयास हवा होता.

माळकरी वगैरे ठीक आहे. वारीत गैर प्रकार होत नाहीत असे नाही. समाज एकत्र येतो तेथे गैर प्रकार येतातच. वारीतही दादागिरी मारामार्‍या होतात. त्याबद्दल नाही पण माझा मुद्दा आहे की शासन यंत्रणेवर अनाठायी ताण येणे वगैरेबद्दल आहे. वारीमुळे सातारा पंढरपूर रस्ता पहा संपूर्ण महामार्ग एक ओपन टॉयलेट होतो. त्याबद्दल कोणी लिहीत नाही. स्थानीक लोकाना त्याचा त्रास होत नसेल असे नव्हे.
वारी /गणेशोत्सव्/मोहर्रम नेहमी एकापाठोपाठ येतात. राज्य पोलीस यंत्रणॅवर त्याचा जेवढा ताण येतो तेवढा इतर कशाचाही येत नाही. हल्ली गणेशोत्सवानम्त्र नवरात्रौत्सव येतो. महाराष्ट्रात सार्वजनीक नवरात्रौत्सव कधीच नव्हता. पन आपन त्यालाही आपलेसे केले आहे. एकूणच धांगडहिंगा /टाईम पास कसा करता येईल याची आपण वाटच पहात असतो. पण यात सामान्य नागरीक्/आजारी लोक/ विद्यार्थी /सामान्य पोलीस भरडले जातात. ( त्या उत्सवानंतर येणारे इतर प्रकार उदा: कानाचे घशाचे आजार/ गर्भपाताच्या प्रमाणात वाढ वगैरे. त्या बद्दल इथे बोलुन विषयांतर करायला नको)
हे उत्सव बंद करावे असे नव्हे मात्र सार्वजनीक स्वरूप बंद व्हावे.

अभ्या..'s picture

8 Jul 2013 - 3:30 pm | अभ्या..

हे उत्सव बंद करावे असे नव्हे मात्र सार्वजनीक स्वरूप बंद व्हावे.

म्हणजे कंपाऊंडाच्या दारापासून ते देवघरापर्यंत वारी का?
का ई-वारी? एका क्लिकावर इठोबारक्माई अ‍ॅटएटाइम?

मूकवाचक's picture

10 Jul 2013 - 11:53 am | मूकवाचक

विचारवंतांना वारी गँगरिन वाटू नये आणि वारकर्‍यांनी काळानुसार पुढे जावे यासाठी काही सोप्प्या उपाययोजना सुचवतो -

वारकरी मंडळींचा टिळा, माळा वाला जुनाट पेहराव बदलून त्यांना त्या जागी फिकट भगवे आणि सफेद रोब द्यावे. फुगडी, रिंगण वगैरेना 'डायनॅमिक मेडिटेशन', 'सूफी व्हर्लिंग' अशी नावे द्यावी. डोळे मिटून स्वस्थ बसून हृदयी विठ्ठलाचे समचरण स्मरण्यात मन एकाग्र/ नाहीसे वगैरे करण्याला 'झाझेन' असे म्हणावे. कीर्तन, प्रवचने वगैरें इव्हेंटना 'इव्हिनिंग सत्संगा' सारखी नावे द्यावीत. एकमेकांना माउली म्हणत बंधुभावाने वावरणे थांबवून वारकर्‍यांनी त्याजागी एकमेकांना स्वामीजी आणि माताजी असे वरवर म्हणत एरवी निसर्गधर्मानुसार वागत मुक्त प्रणयाचा आनंद वगैरे लुटून झाल्यावर रोज एखादा तास 'व्हाईट रोब ब्रदरहूड' साठी राखून ठेवावा.

वारीसारखे इव्हेंट पंचतारांकीत हॉटेले, अलिशान रिसॉर्ट अशा ठिकाणी ठेवावेत. रिसॉर्टचे मुख्य प्रवेशद्वार ते आवारातला बगिचा अशा दिंड्या काढाव्या. ईश्वर चराचरात असल्याने तिथल्या एखाद्या झाडात, रोपातच तुमचा विठ्ठल पहा असी सक्ती करावी. 'भाव' तेथे देव हे लक्षात घेता कुठल्याही रोबची किंमत किमान पाचशे रूपये असावी. वारीसाठीची दैनिक प्रवेश फी किमान पाच हजार असावी. या व्यतिरिक्त आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या सक्तीच्या करून त्यांचा खर्चही वसूल करावा. हे सगळे ज्यांना परवडत नाही त्यांनी वारीच्या फंदात पडू नये अशी सक्ती करावी. असे केल्याने व्यवस्थेवर ताण पडण्याचा प्रश्नच येणार नाही. असो.

स्पा's picture

10 Jul 2013 - 12:55 pm | स्पा

=)) =))

पैसा's picture

10 Jul 2013 - 1:02 pm | पैसा

जबरदस्त! आपण पण ई-वारी काढूया का रे? माझ्याकडे डालडाच्या डब्यातली तुळस मात्र नाही हां!

यशोधरा's picture

10 Jul 2013 - 1:04 pm | यशोधरा

ह्ये ब्येष्ट.

हा हा हा हा हा ...काय विजुभाउ ( कप्पाळाला हात लावणारी स्मायली ;) )

दुपारी

दर दुपारी दुपारी दुपारी ला पंढरपूर ला दुपारी निघते. लाखो दुपारी दुपारीत दुपारी होतात.
दुपारी दुपारीला जायचे म्हणजे खरेतर दुपारी दुपारीचा हंगाम ऐन दुपारात असतो. नुकतीच दुपारी झालेली असएत व्हायची असते अशातच दुपारी दुपारी सोडून दुपारीला जातात.
त्यांच्यासाठी दुपारी हा एक दुपारी असतो. पण त्यामुळे दुपारी दुपारतात / दुपार यंत्रणेवर अवास्तव दुपार येतो. कारण नसताना दुपारी यंत्रणेला सुरक्षा दुपारी राबवले जाते. लोकांचाही दुपार दुपारी जातो.
खरेतर दुपारी धर्मात दुपारी दुपार दर्शन या दुपारी गोष्टी मानलेल्या आहेत. दुपारी भावनांचे दुपार प्रदर्शन करून ज्यांच्या त्या गोष्टीशी दुपार नाही अशा दुपारीस दुपार धरण्याचे दुपारी बहुतेक सर्वच दुपारी वाढीस लागलेले आहेत.
दुपारी उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ दुपार बाजूस राहील आणि भलतेच दुपार घेवून दुपारी खंडणी बहाद्दूर / दुपारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी दुपार बनला आहे.दुपारी जागृती हा उत्सवांचा दुपार कधीच मागे पडला आहे.
आपण एखादी गोष्ट त्याचा दुपार सम्पल्यानंतर ती दुपारी ठरवतो तसे हे दुपारी देखील आता दुपार करायला हवेत.
त्यातून निर्माण झालेल्या दुपारी प्रथा सम्पवायला हव्यात.
दुपारी काय वाटतय. ( दुपारीच्या गळ्यात दुपारी कोण बाम्धणार ???? )

कवितानागेश's picture

8 Jul 2013 - 4:40 pm | कवितानागेश

=)) =))

ग्यांगरीन झालेले बोट्/पाय हात वगैरे कापावेच लागतात. त्यानी इतकी वर्षे सर्व्हीस दिली म्हणून ग्यांगरीन कोणी कुरवाळीत बसत नाही

कवितानागेश's picture

8 Jul 2013 - 4:17 pm | कवितानागेश

अगदी अगदी..
करुन टाका वारी बंद.
च्यायला, मी तर कुटूंबसंस्था आणि लग्नसंस्था कधी बंद पडतेय याचीपण वाट बघतेय.
आणि त्यानंतर तर मी शिक्षणसंस्थांचा नंबर लावणारेय. कुणाचं भलं झालयं शिकून?

आदूबाळ's picture

9 Jul 2013 - 9:02 am | आदूबाळ

हे हे हे

+१ :))

सुहास..'s picture

8 Jul 2013 - 4:23 pm | सुहास..

मी तर कुटूंबसंस्था आणि लग्नसंस्था कधी बंद पडतेय याचीपण वाट बघतेय. >>>

अग मग भाड्याने खोली कशी मिळायची ;) ते ही आमच्या गरीबांच्या पुण्यात ;)

कुंदन's picture

8 Jul 2013 - 4:36 pm | कुंदन

इकडे या एकदा , आपण इकडे पण वारी काढु.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Jul 2013 - 4:39 pm | बिपिन कार्यकर्ते

या गाण्यावरही बंदी घालावी अशी मी या निमित्ताने नम्रपणे मागणी करतो.

याही गाण्यावर

मैं वारी जावां

सुहास..'s picture

8 Jul 2013 - 5:10 pm | सुहास..

+१००००

मूकवाचक's picture

8 Jul 2013 - 6:25 pm | मूकवाचक

वारीवरच काय तर निवडणुकांचे प्रचार, तरूण व तडफदार युवानेत्यांचे वाढदिवस, नेतेमंडळींच्या जयंत्या मयंत्या, धनदांडग्यांकडची लग्नकार्ये या सगळ्यांवर बंदी आणावी. सामान्य लोकांना फार त्रास होतो सगळ्याचा.

या निमीत्ताने ओशो कम्युनची संपत्ती स्थावर जंगम मालमत्तेसकट जप्त करून समोरच्याच बुधरानी हॉस्पिटलला किंवा टाटांच्या एखाद्या समाजोपयोगी संस्थेला दान द्यावी आणि कृष्णमूर्ति फाउंडेशन बरखास्त करून तिथल्या अभ्यासवर्गात कालापव्यय करणार्यांना तो वेळ किमानपक्षी दैनिक संध्यानंदचे मुद्रित शोधन (प्रूफ रीडिंग) करण्यासारख्या उत्पादक कामांसाठी वापरणे बंधनकारक करावे असेही सुचवावेसे वाटतो. असो.

मुव्वा, का गरीबाच्या पोटावर पाय देतो आहेस?;-)

बॅटमॅन's picture

8 Jul 2013 - 6:54 pm | बॅटमॅन

मुव्वा,

नक्की सदस्यनाम लिहितोयस की ध्वनिवाचक शब्द ;) =))

नुसता घरात बसून काय जातंय मित्रानो वारी बंद करा बोलाया …एकदा अनुभव वारी
आणि जे जातात वारीला ते आपला शेती पाणी घर संसार सांभाळून जातात बाबाहो …. त्यांच्या शेतात नाही पिकल तर काय तुमचा मायबाप सरकार नाही देणार त्यांना खायला …. बाकी शासन यंत्रणेचे म्हणाल तर बाकी कुठे कुठे आणि ती बिझी असते त्याचा हिशोब न मांडलेला बरा … (ती नसली तरी कुठे गर्दी गोंधळ जाळला ऐकवत नाही …। सगळ नीट चालू असत

प्रकाश घाटपांडे's picture

8 Jul 2013 - 7:22 pm | प्रकाश घाटपांडे

पंढरपुरात एका वेळी ३-३ लाखा लोक जर येत असतील तर मुलभूत सुविधांसाठी कुठलीही यंत्रणा पुरी पडू शकत नाही. मग ते सरकार कोणतेही असो.वारी मधे सगळ्या प्रकारचे लोक असतात. हौशे, गवशे, नवशे. वारी हा आता एक इव्हेंट झाला आहे माध्यमांना,राजकारण्यांना. विज्ञानयुगात वारीचे प्रस्थ कमी कमी होत जाईल असे वाटले होते पण उलटच होत चाललय. वारी मुळे अनेक लोकांचे आर्थिक हितसंबंध जोपासले जातात म्हणुन वारी टिकून आहे.ते काही असले तरी वारी हा समाजजीवनाचा घटक आहे हे मान्य केले पाहिजे. वारीला समाजाभिमुख बनवताना कालसुसंगत पर्याये दिले पाहिजे. तीर्थे धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी| भाविकांनो दुरदर्शनवर लाईव्ह दर्शन घ्या आता वारीचे! तिथे जाउन गर्दी करुन यंत्रणेवरील ताण वाढवू नका! भविष्यात अतिरेकी वारीला टार्गेट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा जरा जपून.

धमाल मुलगा's picture

8 Jul 2013 - 9:09 pm | धमाल मुलगा

बाकी सगळं अगदी मान्य केलं, तरी मला एक कळत नाही, आज किती वर्षं झाली पंढरपूरात वारी येते? अजून यंत्रणेच्या अकलेची झोप पुर्ण होत नाही का? का नाही योग्य त्या पायाभूत सुविधा उभारल्या जात? दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्त विठ्ठलाची पूजा बांधता येते, त्या मुख्यमंत्र्यांसाठी, त्यांच्या ताफ्यासाठी सगळी सोय उभारता येते, मग स्वच्छतेच्या दृष्टीनं, मूलभूत सोयी-सुविधा / अत्यावश्यक स्वच्छतेसाठी असलेल्या गरजेच्या गोष्टी करताना नक्की काय आडवं येतं? अमुक इतके वारकरी येतात, तमुक तितके वारकरी येतात हे दरवर्षी ऐकायला मिळतं, मग ह्याच आकडेवारीचा अहवाल घेऊन यंत्रणेला तयारी करता येत नाही का? नगरपरिषदेपासून ते मंत्रालयापर्यंत कुणीही ह्याबद्दल गांभिर्यानं विचार करत नाही, केलाच तरी कार्यवाही होत नाही....म्हणून यंत्रणेवर ताण येतो हे आपण कधी मान्य करणार? तळागाळातला अडाणी गावकरी त्या माऊलीच्या कळसाच्या एका दर्शनासाठी इतकी पायपीट सोसून, ऊन-वारा-पाऊस झेलत तडफडत येतो, त्या पंढरीतल्या एका दिवसाच्या आठवणींवर पुढचं उभं वर्ष काढतो. त्याच्या आत्मिक समाधानाची मोजणी आपण कशी अन काय करणार?

वारी झाल्यानंतर पुढं जवळपास आठवडाभर वगैरे पंढरपूराचा पुरता उकिरडा झालेला असतो..मान्य!
येणारे वारकरी अस्वच्छता प्रचंड प्रमाणावर करतात...मान्य!
आजारपणं,रोगराई होण्याचा मोठा धोका संभावतो...मान्य!
पण हे जर कळतं आहे, तर ह्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्याची जी यंत्रणेची जबाबदारी आहे ती पुर्ण केली जाते का? फिरत्या शौचालयांची जुजबी सोय केली म्हणजे सगळं झालं का?
यंत्रणेवर ताण पडतो हे जर तुम्हा-आम्हाला कळतं तर वर्षांनुवर्षं खुर्च्या उबवणार्‍या निर्णयप्रक्रियेच्या साखळीतल्या सरकारी शुक्राचार्यांना का कळू नये हे कोडं मला काही केल्या उमगत नाही.

किसन शिंदे's picture

8 Jul 2013 - 10:11 pm | किसन शिंदे

हे धमालराव फार कमी बोलतात;) पण जेव्हा बोलायला तोंड उघडतात तेव्हा मात्र 'बरंच' काही बोलून जातात.

_/\_

यशोधरा's picture

8 Jul 2013 - 10:14 pm | यशोधरा

धमु कमी बोलतो? कधीपासून? :P

धमाल मुलगा's picture

9 Jul 2013 - 12:41 am | धमाल मुलगा

ए गप की. कधी नव्हे ते कुणीतरी जरा चांगलं म्हणतंय मला तर लगेच का असं? :P

@किसनदेवा: ठ्यांक्यू..ठ्यांक्यू हां! ;) (आपण भेटू तेव्हा एक मामलेदाराची मिसळ प्यार्टी करु आपुन. ;) )

प्रभाकर पेठकर's picture

9 Jul 2013 - 2:03 am | प्रभाकर पेठकर

३ लाख भाविकांना सक्काळी सक्काळी ३ तास (६ ते ९) १००% शौचालयाची सोय लागणार आणि पुढे दिवसभरात तुरळक वेळा तरी लागणारच. एका माणसाला आपला कोठा साफ करायला १० मिनिटे लागतात तर ३ तासात एका शौचालयात १८ भाविक मोकळे होऊ शकतील म्हणजे ३ लाख भाविकांना मोकळे होण्यासाठी एकंदर १६६६७ शौचालये पाहिजेत. एका शौचालयास (१.५X१.५ मीटर) २.२५ मीटर जागा लागत असेल तर निव्वळ शौचालयांना ३७५०० चौरस मीटर जागा पाहीजे. त्यात लोकांना यायला जायला रस्ता पाहिजे. मैला वाहून नेण्याची/जाण्याची यंत्रणा पाहिजे. दहा शौचालयात एक ह्या हिशोबाने हातपाय धुण्यासाठी १६६७ मोर्‍या आणि नळ पाहिजेत.
ही व्यवस्था महाराष्ट्रात जिथे जिथे वार्‍या मार्गक्रमणा करतात तिथे तिथे सर्व ठीकाणी पाहिजे. तसेच, मुंबईत आंबेडकरी जनतेसाठी ही अशी सोय असावी आणि जिथे जिथे मेळे, जत्रा भरतात तिथे तिथे ही सर्व व्यवस्था हवी. ही यंत्रणा उभारण्यासाठी येणारा खर्च, तसेच कर्मचारी वर्गाचे पगार, त्यांची राहायची व्यवस्था, विजेचा खर्च, डागडुजीचा खर्च सर्व अश्रद्ध लोकांकडून वसूल केला जावा. अशाने श्रद्धावानांची चांगली सोय पाहिली जाईल, अश्रद्धावानांमध्ये (कर टाळण्यासाठी तरी) श्रद्धेचे प्रमाण वाढीस लागेल आणि अवघा महाराष्ट्र अध्यात्म्याच्या वाटेवर वार्‍या, उत्सव, जत्रा, यात्रा, मेळावे वगैरे मार्फत देवाचरणी लीन राहून महाराष्ट्राच्या खात्यावरील पाप कमी होऊन पुण्य वाढीस लागेल. त्यामुळे दरवर्षी योग्य तितका पाऊस पडून शेते भरभरून धान्य येईल, नद्या कोरड्या पडणार नाहीत, अन्नावाचून, पाण्यावाचून कोणी मरणार नाही सर्वत्र आबादीआबाद नांदू लागेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jul 2013 - 7:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शोचालयाचा तपशिलवार हिशेब आवडला. एका माणसासाठी लागणारा वेळ वगैरे तर लैच भारी. :)

बाकी, पंढरपुरात नदीच्या काठावर फार तर हजारभर तात्पुरते शौचालये उभारली जातात. संख्या कमी जास्त असावी. पण पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तांसाठी ही व्यवस्था अतिशय कुचकामी अशी आहे. काठावर उभे असलेली ही शौचालये केवळ आडोसा याच अर्थाची आहे. सर्व लोंढा उघड्यावर वाहात येतो. पंढरपुरात आषाढी नंतर पंधरा मिनिटेही माणूस थांबू शकत नाही. उघड्यावर माणसांनी केलेला प्रचंड राडा, मरणाची दुर्गंधी, घोंघावणा-या माशा, असो....! गर्दीच इतकी उसळते की कितीही व्यवस्था केली तरी ती कमीच पडावी.

बाकी, जसे आत्मिक समाधान वगैरे हे जसे मान्यच आहे तसे शासन यंत्रणेवरील ताण वगैरे हेही मान्यच आहे.

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

9 Jul 2013 - 11:38 am | प्रकाश घाटपांडे

हिशोब आवडला. मी वर म्हटल्याप्रमाणे किती ही सुविधा पुरवण्याचा प्रामाणीक प्रयत्न जरी केला तरी तशी ती पुरवणे व्यवहार्य नाही. वारकर्‍यांनो/ श्रद्धावंतांनो पांडुरंगाचे आभासी दर्शन घ्या. तसेही परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी भरला आहे.विठठलाच्या दर्शनाला प्रत्येकाला पंढरपुरच कशाला पाहिजे? आणि तेही एका विशिष्ट दिवशी. त्यापेक्षा वर्षभरात अन्यवेळी जा ना हव तर! परमेश्वराच स्थान आपल्या मेंदूत आहे. परमेश्वराशी ( इथे स्पेसिफिक विठ्ठल) संवाद म्हणजे स्वतःशी संवाद. मला तर या वारी प्रकारातील वारकर्‍यांचा भाबडेपणा, गैरसोयी सोसून देखील दर्शनाची आस, परंपरेतील गतानुगतिकता काही लोक एन्जॉय करताना दिसतात. अर्थात मी त्यांना दोष देत नाही.

पैसा's picture

9 Jul 2013 - 12:01 pm | पैसा

फक्त काय होतं की जायचं न जायचं हे आपण आपल्यापुरतं ठरवू शकतो. इतर हजारों लाखों लोक आपलं ऐकणार नाहीत हे गृहीत धरून चालायचं. मग वर चर्चा झाली आहे तशी मुख्यमंत्र्यानी पांडुरंगाची पूजा वगैरे करण्यापेक्षा हज प्रमाणे व्यवस्था करता येणार नाही का? नैसर्गिक आपत्ती आली की सगळ्या यंत्रणा कामाला लागतात. आता वारी दर वर्षी नेमक्या कोणत्या दिवसांत असते हे माहिती आहे मग तशी व्यवस्था कायमस्वरूपी करता येईलच की.

असेच संमेलन रामलीला मैदानात निरंकारी पंथाचेही भरते. तिथे आता कशी व्यवस्था आहे माहिती नाही. पण काही वर्षांपूर्वी बेळगावहून तिकडे जाणारे एक काका काकू भेटले होते ते म्हणाले की लाखों लोक ७ दिवस एका जागी रहातात. संडास वगैरे फार कमी. मग आम्ही सगळे दिवस पाणी न पिता आणि संडासला न जाता रहातो. ऐकून आम्ही थक्क झालो.

दिल्लीहून परत येताना दोन वेळा या निरंकार्‍यांचा भयंकर त्रास झाला होता. आमच्या रिझर्व्ड सीटवर कब्जा करून बसले होते आणि टीसीला पण ऐकत नव्हते. आम्ही देवाच्या कामाला जातो. जरा अ‍ॅडजस्ट करून घ्या म्हणे. अरे पण अ‍ॅडजस्ट म्हणजे १ दिवस झोपेशिवाय कस आणि का काढायचा? तेही आमच्या हातात कन्फर्म्ड तिकिटे असताना? दुसर्‍याची अडवणूक करा किंवा त्रास द्या असे काही देव कोणाला सांगत नाही! पण आपल्याकडे सगळीकडे 'चलता है' अशीच वृत्ती असते. दुर्लक्ष करण्यापलीकडे काही करताही येत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

10 Jul 2013 - 4:47 pm | प्रभाकर पेठकर

दिल्लीहून परत येताना दोन वेळा या निरंकार्‍यांचा भयंकर त्रास झाला होता. आमच्या रिझर्व्ड सीटवर कब्जा करून बसले होते आणि टीसीला पण ऐकत नव्हते. आम्ही देवाच्या कामाला जातो. जरा अ‍ॅडजस्ट करून घ्या म्हणे. अरे पण अ‍ॅडजस्ट म्हणजे १ दिवस झोपेशिवाय कस आणि का काढायचा? तेही आमच्या हातात कन्फर्म्ड तिकिटे असताना? दुसर्‍याची अडवणूक करा किंवा त्रास द्या असे काही देव कोणाला सांगत नाही! पण आपल्याकडे सगळीकडे 'चलता है' अशीच वृत्ती असते. दुर्लक्ष करण्यापलीकडे काही करताही येत नाही.

आंबेडकर जयंतीला मुंबईत रेल्वेत आणि दादर परिसरात हाच अनुभव येतो.
'वैष्णव जन तो तेणे कहिए, पीड परायी जाणे रे..' वगैरे वगैरे भजनात म्हणायचे. प्रत्यक्षात?? आचार-विचारातील फरक हाच भक्तीमार्ग.

घाट्पान्डे साहेब्,माफ करा लहान तोन्डी मोठा घास घेत आहे.पण तुमच्या कडुन वरिल वाक्याची अपेक्षा नव्हती,कारण उपक्रम वरिल एका लेखात आपण ईश्वर जगात नाही असे प्रतिपादले होते,आणि ईथे बरोबर याच्या विरुद्ध?

प्रकाश घाटपांडे's picture

9 Jul 2013 - 9:32 pm | प्रकाश घाटपांडे

लेखाची लि़क द्या. मला आठवत नाही. मी इश्वर या बाबतीत असलेल्या वेगवेगळ्या संकल्पनेचा आधार नेहमी घेतो.बरेच लोक कृष्ण धवल दृष्टीने एखाद्या गोष्टी कडे पाहतात. खर तर त्यात करड्या रंगाच्या अनेक छटा असतात. विवेकी मानवतावादी जीवनासाठी इश्वर असणे नसणे मानणे न मानणे याने काही फरक पडत नाही. वारकरी हा सश्रद्ध व इश्वर मानणारा आहे असे गृहीत धरुन त्याला पटेल अशीच इश्वर या संकल्पनेचा आधार मी प्रतिपादनात घेतला आहे. मी व माझा देव या वि शं चौघुले यांच्या पुस्तकाचा परिचय उपक्रमावर दिला आहे.

अनिरुद्ध प's picture

10 Jul 2013 - 7:39 pm | अनिरुद्ध प

प्रकाश घाटपांडे [23 May 2013 रोजी 04:38 वा.]
समाजातले बहुसंख्य लोक देव ही संकल्पना खरी मानतात, (त्याच्या स्वरुपाविषयी मतभिन्नता असेलही.) ही गोष्ट पण कीव करण्यासारखी मानावी लागेल. खर तर काही लोक अस मानतात देखील. पण उघडपणे तस बोलत नाहीत.समाजाचा रोष ओढवून जगता येणार नाही याचे अजुन तरी त्यांना भान आहे. देव ही संकल्पना मानणे ही सरळ सरळ अंधश्रद्धा आहे .अंधश्रद्धा ही बाब वै़ज्ञानिक दृष्टीकोणाच्या विरुद्ध आहे. घटनेत वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे असे मानले आहे.परिणामी देव ही संकल्पना मानणे ही बाब घटना विरोधी आहे अशी मांडणी देखील करता येते.
हा आपल्याच लेखाचा एक भाग आहे.

अर्धवटराव's picture

10 Jul 2013 - 9:20 pm | अर्धवटराव

>>परिणामी देव ही संकल्पना मानणे ही बाब घटना विरोधी आहे अशी मांडणी देखील करता येते...
-- घाटपांडे सर दिग्गीराजा आणि राखी सावंत इ. मंडळींना साहित्यसेवा पुरवतात कि काय...

अर्धवटराव

राखी सावन्त बद्दल माहिती नाही पण आपले दिग्गीराजा गेले काही वर्शे सहकुतुम्ब वारीत सहभागी होण्याचा फार्स करत आहेत.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Jul 2013 - 3:41 pm | प्रकाश घाटपांडे

अच्छा शिव शिव रे काउ ही ती लिंक. चर्चेचा ओघातील तुकडा तोडून दिला की आशयाचा फोकस बदलू शकतो. वर मी असे म्हटले आहे की ".... अशी मांडणी देखील करता येते. तो देखील यनावालांच्या "कावळ्याला मृताचा आत्मा दिसतो हे अनेकजण खरे मानतात ही गोष्ट कीव करण्यासारखी आहे." या वाक्याच्या अनुषंगाने दिलेली प्रतिक्रिया आहे.

अनिरुद्ध प's picture

22 Jul 2013 - 7:50 pm | अनिरुद्ध प

आपल्याला असे म्हणणे अशी माझी योग्यता नाही पण त्या प्रतिक्रियेचे शिर्शक ' देव नाही' असेच होते.

धमाल मुलगा's picture

8 Jul 2013 - 9:15 pm | धमाल मुलगा

आपण आपल्या पांढरपेशा विचारांच्या रिंगणातूनच विचार करतो त्यामुळं कदाचित आपल्याला ह्या गोष्टीतलं मर्म कळत नाही.
वारी म्हणजे नक्की काय, त्यात काय काय चालतं, वारीचा विठ्ठल, ग्यानबा अन तुकाराम ह्यांच्या भक्तीशिवाय सोशिओ-इकॉनॉमिक असलेला पदर उलगडून पाहणं हे ही मोठं वेगळं प्रकरण आहे. पहा एकदा! शोधा..त्यातही गंमत आहे.

अग्निकोल्हा's picture

8 Jul 2013 - 10:49 pm | अग्निकोल्हा

.

प्रसाद गोडबोले's picture

8 Jul 2013 - 11:41 pm | प्रसाद गोडबोले

कैच्या कै फालतु लिहिलय ...

अकाऊंटॅबिलीटी नाही म्हणुन काय वाट्टेल ते लिहितात लोक ... खरच राव हिंदुधर्माचे मऊ लागले म्हणुन कोपर्‍याने खणणयातला प्रकार झालाय ...

फतवा काढण्याची पध्दत हिंदुधर्माने स्विकारावी अशी धर्मसुधारणा सुचवणुक ह्या निमित्ताने करीत आहे

बॅटमॅन's picture

9 Jul 2013 - 12:42 am | बॅटमॅन

याल्ला हबीबी, आधी ते फतवा बितवा अन मुतव्वा जरा थंड घ्या बरं ;) हिंदू धर्माचे *ट वाकडे होणार नाही त्याविरुद्ध कोणी बरळल्यामुळे.

राहता राहिला लेख. कैच्याकै आहेत काही मुद्दे, पण वारीमुळे सोयीसुविधांवर ताण पडतो अन त्याकरिता कोणी पावले उचलत नाही योग्य तितकी हे खरे नाही काय? लेखातला योग्य मुद्दा असेल तर तो इतकाच आहे. बहुत काय लिहिणे? तुम्ही सूज्ञ असा.

सगळे एव्हढे Excite का होत आहात.

तुम्ही सगळ्यांनी एक गोष्टीची दखल न घेतल्यमुळे हा धागाप्रपंच आहे हे तुमच्या लक्षात नाही का येत?

विजूभौ सध्या परदेशस्थ आहेत. त्यामुळे या विचारसरणीचा पगडा त्यांचावर झाला असेल.

पण परदेशागमनाची फारशी दखल न घेतल्यामुळे हा हा धागाप्रपंच आहे हे कृपया समजुन घ्या. :P

धमाल मुलगा's picture

9 Jul 2013 - 12:40 am | धमाल मुलगा

पंत, इजाभाऊंचं लोकायतप्रेम (हे लोकायत निराळं...चार्वाकवालं!) पाहता, आश्चर्याचं कारण नसावं. :)

हुप्प्या's picture

9 Jul 2013 - 12:32 am | हुप्प्या

अफाट लोकसंख्येमुळे पंढरीची वारीमुळे सार्वजनिक सोयी सुविधांवर ताण पाडत असेल हे नक्कीच खरे. पावसाळा असल्यामुळे अस्वच्छता, रोगराई, अपघात वाढत असतील. त्यामुळे ही वारी कालबाह्य आहे असे मानायला जागा आहे. मात्र वारीवर बंदी घालणे वा असे विचार मांडायलाच बंदी घालणे ही भारतीय संस्कृती नाही. निदान नसावी. ज्यांना वारीचे दुष्परिणाम जाणवतात त्यांनी आपापल्या परीने लोकांपर्यंत पोचवावे.
मिसळपाव हे व्यासपीठ ह्याकरता योग्य आहे. निदान ह्या विषयावर उहापोह होतो आहे आणि काही बाबींचे स्पष्टीकरण होते आहे हे ही नसे थोडके.
ह्या सगळ्या प्रकारातील सरकारी सहभाग मर्यादित असावा असे वाटते. सार्वजनिक शिस्त ठेवण्याकरता पोलिस वापरले तर ठीक आहे पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा वगैरे खुळे बंद करावीत.

त्याच प्रमाणे गणपती वा नवरात्र ह्या उत्सवांना हल्ली बाजारू, सवंग, गुन्हेगारी रुप आले आहे त्याविरुद्धही टिळकांप्रमाणेच समाज प्रबोधन केले पाहिजे. कदाचित कणाकणाने परिस्थिती सुधारेलही.

विजुभाऊ's picture

9 Jul 2013 - 1:57 am | विजुभाऊ


डोक्याला शॉट
गिरीजा - Mon, 08/07/2013 - 23:41
कैच्या कै फालतु लिहिलय ...
अकाऊंटॅबिलीटी नाही म्हणुन काय वाट्टेल ते लिहितात लोक ... खरच राव हिंदुधर्माचे मऊ लागले म्हणुन कोपर्‍याने खणणयातला प्रकार झालाय ...
फतवा काढण्याची पध्दत हिंदुधर्माने स्विकारावी अशी धर्मसुधारणा सुचवणुक ह्या निमित्ताने करीत आहे

हिंदु धर्मच नव्हे तर बहुतेक धर्म हे जुनाट झालेले आहेत. बुरसटलेल्या विचाराना धरून राहिल्यामुळे त्यात शेवाळ साचलेले आहे. वारी म्हणजे हिंदू धर्म नव्हे किंवा महा आरत्या म्हणजेही धर्म नव्हे.
राहता राहीला प्रश्न अकाउंटिबिलीटीचा.... वारीला गेलो/गणेशोत्सवात बीभत्स नाचलो /नवरात्रात डिस्को दांडीया केला/ साधु वान्याची धादान्त खोटारडी गोष्ट ऐकली / गाय या उपयुक्त पशूची विष्ठा -मूत्र प्यालो / डुकराला देवाचा अवतार मानला/कबुतराला चणे खायला घातले किंवा एकादशीला दुप्पट खाल्ली / पितरांच्या नावाखाली ब्राम्हणाला जेवू घातले / गटारी अमावस्येला दारू पिउन लोळलो / देवदासी-मुरळी बनून जटा वाढवल्या जोगती झालो की अकाउंटॅबिलीटी वाढेल असे म्हणायचे आहे काय. ( कृपया हे वैक्तीकरीत्या घेवु नये)
मऊ लागले म्हणून कोपराने खणायचे......
स्वतःच्या घरात घाण झाली ती दूर न करता ती घाण दाखवून देणाराच घाणेरडा असाच अर्थ झाला ना त्याचा. असो
फतवा काढण्याची पध्दत हिंदुधर्माने स्विकारावी अशी धर्मसुधारणा सुचवणुक ह्या निमित्ताने करीत आहे
उत्तम सूचना आहे. मात्र हा फतवा कोणी काढायचा ते ठरवा. कांचीच्या - पुरीच्या शंकराचार्‍यानी की करवीर पीठाच्या शंकराचार्यानी / वल्लभचार्यानी / शिर्डीच्या पुजार्‍यानी की बालाजीच्या पुजार्याने / महंत आखाड्याने/ हिंदु महासभेने की बजरंग दलाने ?
आणि फतवा काढणाराचे क्वालीफिकेशन काय ठरवायचे? त्याने केलेले उपास तपास की त्याने( तीने) केलेले इतर धर्मांचे निंदन ? आणि त्या फतव्याचे आदेश मानून त्याचे पालन कोणी करायचे.
मुद्देसूद उत्तरे देता नाही आली की गुद्देसूद हालचालीना जवळ करावे लागते हे नेहमीच जाणवते.
अवांतरः देवाला दारूचा नवैद्य दाखवा/ देवाला बळी द्या / देवाला मुलीचा नवैद्य दाखवा / देवाला स्वेटर घाला / देवाला दूध पाजा अशा बर्‍याचशा रुढी आहेत. रुढी म्हणजे धर्म नव्हे असेही कोणी साम्गतात. गिरीजा ताई/बै/मावशी तुमच्या डोक्याला षॉट लागून थोडा वेळ उलटला असेल तर मग हिंदू धर्म म्हणजे नक्की काय सांगाल का?
व्रते वैकल्ये म्हणजे धर्म नव्हे / पोथ्य पुराणे म्हणजे धर्म नव्हे हेही खरे.
अती अवांतरः हिंदू धर्मातील नवव्या अवतारा संदर्भातील बुद्ध पुराण हे वाचण्यास निषिद्ध का मानतात हो? ते निषिद्ध असेल तर बुद्धाला अवतार तरी का मानतात हे सांगाल का?
मी कै च्या कै लिहीले असेल ....... शक्य आहे. अजाण बुद्धी बालक आहे. मग नीट चांगले काय ते सांगाल तर हे अजाण बालकाच्या मतीत भर पडेल. हिंदू धर्माचे स्वरूप अल्प मतीला उमजेल.

प्रसाद गोडबोले's picture

9 Jul 2013 - 10:36 pm | प्रसाद गोडबोले

विजुभाऊ , आपण आग्रह केलत म्हणुन उत्तर देत आहे , एरव्ही अशा काथ्याकुटातुन काहीही कन्स्ट्रक्टीव्ह ऑटपुट निघत नाही असा अनुभव आहे ...

वारी म्हणजे हिंदू धर्म नव्हे किंवा महा आरत्या म्हणजेही धर्म नव्हे.

>>> हिंदु ही जगण्याची पध्द्ती आहे (असं कोर्ट म्हणतं ...मी नाही ). वारी / महाआरती / गणेशोत्स्वव वगैरे वगैरे हे सर्व जगण्याचे भाग आहेत . लाखो लोक भक्तीभावे ते करीत आहे त्यामुळे हे सर्व म्हणजेच हिंदुधर्मच(किंवा जे काही म्हणाल ते) त्याचा अविभाज्य भाग आहे ...आहेत.

अकाऊंतॅबिलीटी

>>> मला असे म्हणायचे होते की , आज आपल्याला खात्री आहे की हिंदुधर्माविषयी काहीही बोला सगळं खपवुन घेतलं जातं ...सब चलता है... you are not accountable for what you say . आणि म्हणुनच असं काही बोलायचं आपण धाडस करु शकता .इतर धर्मात असता तर हे धाडस केले असते का ? आणि केले असते तर किती काळ जगला असता ?

स्वतःच्या घरात घाण झाली ती दूर न करता ती घाण दाखवून देणाराच घाणेरडा असाच अर्थ झाला ना त्याचा. असो

ओके . मला आपल्या विषयी वैयक्तिक माहीती नाही म्हणुन विचारत आहे
१)आपण म्हणता शेतकरी कामधंदा सोडुन वारीला जातात . >>> ह्यामुळे शेतीचे उत्पादन किती प्रमाणात घटते अशे आपण शंशोधना अंती सिध्द केले आहे ?
२) शासन यंत्रणेवर अवास्तव ताण येतो >>> शासन यंत्रणेवर अवास्तव ताण आणणार्‍या इतर घटनांबाबत आपण इतरत्र अजुन काही लिहिले आहे का ?
शिवाय माझ्या माहीती नुसार शासन हे लोकांच्या सुविधे साठी आहे त्यांच्यावर बंधने आणण्यासाठी नाही .
३) शासन यंत्रणेवर ताण पडु नये म्हणुन आपण किती स्वयंसेवी संस्थाना प्रोत्साहन पर मदत केली आहे ?
४) एकुणच वारी ह्या प्रकाराने (तुमच्यामते) जे काही नुकसान होत आहे , ते होवु नये म्हणुन आपण काय कन्स्त्रक्तीव्ह कार्य करीत आहात ?

गणपती उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ उद्देश बाजूस राहील आणि भलतेच रूप घेवून उत्सव खंडणी बहाद्दूर / व्यापारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी पर्वणी बनला आहे.जनजागृती हा उत्सवांचा उद्देश कधीच मागे पडला आहे.

हा आत्मघातकीपणा फक्त आणि फक्त हिंदुधर्मातच दिसतो ...( कारण परत तेच ... अकांटॅबिलीटी नाही ...उचलली जीभ लावली टाळ्याला ) . आपल्या सणाचे उत्सवांचे उद्देश मागे पडले म्हणुन उत्ववच बंद करायचे की ते उद्देश ठळक करण्या करीता कार्य करायचे ? (अवांतर :आज हिंदुंना कधी नव्हती इतकी जनजागृतीची गरज आहे ... म्यानमार मधल्या वादांचे पडसाद बोधगयेवर उमटतात... आसाम बांग्लादेशी वादाचे पडसाद मुंबैत ... जरा डोळ्यावरचा सेक्युलॅरिझम गॉगल बाजुला करुन पाहिलंत तर कळेल हा दहशतवाद भारता विरुध्द नाहीये , हिंदुधर्माविरुध्द आहे .)

हिंदु फतव्या बद्दल बोलायचेच झाले तर ह्यात कोणाला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नसेल . फक्त आपण जे बोललात त्याबद्दल " कारणे दाखवा " नोटीस बजावण्यात येईल ... सो फतवा कोणीही काढु शकेल ... आणि तुम्हाला उत्तर द्यावे लागेल . आणि तुमच्या उत्तरावरुन लोक तुमच्या विषयी मत बनवतील आणि कसे वागायचे ते ठरवतील ... इन शॉर्ट वाळीत टाकण्याचा अधुनिक प्रकार अशी माझी व्हिजन आहे हिंदु फतव्याबद्दल.

अवांतर :

हिंदू धर्म म्हणजे नक्की काय सांगाल का?

>>>
आर्य जीवन पध्दती+ सनातन संस्कृती + वैदिक तत्वज्ञान = हिंदु धर्म
ही झाली क्लासिकल डेफिनिशन . आजच्या काळात बोलायचे तर "परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम" दुसर्‍यावर उपकार करणे हे पुण्य आणि दुसर्‍याला (प्रोअ‍ॅक्टीव्हली)पीडा देणे हे पाप असे जो मानतो तो हिंदु ( हे वैयक्तिक मत. प्लीज नोट द बोल्ड पार्ट ...)
अती अवांतरः

हिंदू धर्मातील नवव्या अवतारा संदर्भातील बुद्ध पुराण हे वाचण्यास निषिद्ध का मानतात हो? ते निषिद्ध असेल तर बुद्धाला अवतार तरी का मानतात हे सांगाल का?

कोण निशिध्द मानतं ? कर्मयोग ह्या पुस्तकात स्वामी विवेकानंद बुध्दाला हिंदु कर्मयोगाचा आदर्श मानतात ! आणि इतिहासाच्या संदर्भात बोलायचे झाले तर बुध्दाला अवतार मानणे ही एक क्लासिकल खेळी आहे ...मुत्सद्दीपणाचा कहर नमुना आहे ...हिंसेने जितके धर्म दडपुन टाकण्याचा प्रयत्न केला गेला ते धर्म आज जगात टिकुन आहेत...आणि हिंसा करणारे लयाला गेले आहेत ....हिंदुंनी बौधांची हिंसा केलीच नाही ... उलट बुध्दालाच आपल्यात सामावुन घेतले अन बौध्द धर्मच नामशेष झाला ...जीनीयस !!!

असो . थोडा अजुन काथ्या बाकी आहे तो दुसर्‍या प्रतिसादात कुटतो

प्रसाद गोडबोले's picture

9 Jul 2013 - 11:09 pm | प्रसाद गोडबोले

विजु भाऊ ,

गीतेत म्हणलं आहे
" न बुध्दीभेदं जनयेद अज्ञानाम् कर्मसंगिनाम् |
जोषयेत सर्वकर्माणि विद्वानयुक्तः समाचरन ||"

जाणकार माणसाने जे लोक अज्ञानाने श्रधेने कर्म करीत आहेत त्यांच्या मनात बुध्दीभेद निर्माण करु नये. उलट आपण स्वतःच ती कर्मे विद्वान मनुष्याप्रमाणे करावीत ( आणि आदर्श घालुन द्यावा)
आपल्याला वारीचा प्रापंचिक भौतिक परिणामांची( शेती ची कामे थंडावणे , शासन यंत्रणेवर ताण ब्लाह ब्लाह ) इतकतीच काळजी आहे तर आपण स्वतः वारीत सहभागी व्हा अन हे सारे कसे टाळता येईल ह्यावर प्रयत्न करा , शासन यंत्रणेवर ताण पडु नये म्हणुन वारकरी स्वयंसेवक नेमा , त्यांच्या कडुन कार्य करुन घ्या , शेतीच्या कामांबाबर काय समस्या येतात ते जाणुन घ्या त्यावर काम करा तर तुम्ही खरे हिंदुधर्मसुधारक ... उगाचच आपल्या मताची पिंक टाकणे ह्यात काही कौशल्य नाही .
बिचारे भोळे भाबडे भाविक विठुमाऊलीच्या प्रेमाने ओढीने वारीला जात आहेत त्या बिचार्यंच्या मनात संभ्रम करुन काय गम्य आहे ( उलट अशा श्रध्दातुन मोकळे सुटलेले अन ज्ञानाची पातळी न गाठलेले लोक समाजासाठी फार धोकादायक असतात हे मी पैजेवर सांगु शकतो )

आता लास्टली मला ह्यात बोलायचा किती अधिकार आहे ? काहीच नाही
पण अजुन थोडं कन्फुजन आहे
तुकाराम महाराज म्हणतात " भले तरी तरी देवु कासेची लंगोटी नाठाळाचे माथी काठी हाणु " ह्याचे अनुकरण करावे की " तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे "
ह्यातलं नक्की काय करावं ?
कन्फ्युजन क्लीयर होईल तेव्हा भोळ्या भाबड्या लोकांच्या मनात संभ्रम निरमाण करण्याच्या ह्या नाठाळपणा बद्दल डोक्यात काठी घालायला येवु किंव्वा प्रतिसाद द्यायचे बंद करु .... :P

अधिकार नसता लिहिले | क्षमा केली पाहिजे ||

विजुभाऊ's picture

10 Jul 2013 - 3:18 am | विजुभाऊ

कोण निशिध्द मानतं ? कर्मयोग ह्या पुस्तकात स्वामी विवेकानंद बुध्दाला हिंदु कर्मयोगाचा आदर्श मानतात ! आणि इतिहासाच्या संदर्भात बोलायचे झाले तर बुध्दाला अवतार मानणे ही एक क्लासिकल खेळी आहे ...मुत्सद्दीपणाचा कहर नमुना आहे ...हिंसेने जितके धर्म दडपुन टाकण्याचा प्रयत्न केला गेला ते धर्म आज जगात टिकुन आहेत...आणि हिंसा करणारे लयाला गेले आहेत ....हिंदुंनी बौधांची हिंसा केलीच नाही ... उलट बुध्दालाच आपल्यात सामावुन घेतले अन बौध्द धर्मच नामशेष झाला ...जीनीयस !!!
गिरीजा तै आपल्या उत्तराबद्दल धन्यवाद.
फक्त आपल्यासाठी काही नोंदी : बुद्धा पाखंड सांगुन अधर्म्यांंचा नायनात केला. त्याने पाखंड सांगितले म्हणुन ते वाचू नये. असे म्हण्टले जाते.
विवेकानंदानी हिंदू धर्मातील भोंगळपणाबद्दल जे काही सांगितले ते मात्र आपन सोयीस्करपणे विसरताय. हिंदु धर्मातील सोवळे ओवळे/ पली डाव्या हातात धरावी की उजव्या हातात धरावी असले भोंगळ काथ्याकूट वगैरे बद्दल विवेकानंदानी बरेच काही सांगितलेले आहे ( संदर्भः कर्मयोग: विवेकानंद)
हिंदुधर्माविषयी काहीही बोला सगळं खपवुन घेतलं जातं ...सब चलता है... you are not accountable for what you say . आणि म्हणुनच असं काही बोलायचं आपण धाडस करु शकता .इतर धर्मात असता तर हे धाडस केले असते का ? आणि केले असते तर किती काळ जगला असता ? खरे तर बहुतेक सगळे धर्म हे कालबाह्य झालेले आहेत. मी स्वतः धर्म मानत नाही. माझ्या घरात बहुतेक धर्मातील लोक आहेत.त्यामुळे तथाकथीत धर्माचरण आम्ही कोणीच करत नाही. एखाद्या धर्मावर टीका केली म्हणजे त्याबद्दल अकाउंटॅबिलीटी नसते या निष्कर्षावर तुम्ही कशा आलात ते कळत नाही.
असो.
तुम्ही लिहीताना एकाच वाक्यात बौद्ध तत्वज्ञानाला चांगले म्हणता आणि त्याचवेळेस "हिंदुंनी बौधांची हिंसा केलीच नाही ... उलट बुध्दालाच आपल्यात सामावुन घेतले अन बौध्द धर्मच नामशेष झाला ...जीनीयस !!! " तो धर्म नामशेष केल्याबद्दल तथाकथीत हिंदू धर्मीयाना जिनीयस म्हणत त्यांची पाठ थोपटता. यातला भोंगळपण तुमच्या लक्षात येतोय का.
आर्य जीवन पध्दती+ सनातन संस्कृती + वैदिक तत्वज्ञान = हिंदु धर्म
या व्याख्ये नुसार आपण आज कोणत्याचप्रकारे आर्य जीवन पद्धती आचरत नाही ( उदा यज्ञात पशुंचे बळी देणे वगैरे)
सनातन संस्कृती: हे नक्की काय प्रकरण आहे सांगाल काय?
वैदीक तत्वज्ञान : हे कधीच कालबाह्य झाले. वैदीक तत्वज्ञानातील एखादे तत्वज्ञान कळाले तर बरे होईल. निदान इथल्या लोकानातरी माहीत होईल.
"आर्य जीवन पध्दती+ सनातन संस्कृती + वैदिक तत्वज्ञान = हिंदु धर्म "
एकीकडे हिंदू हा धर्म नाही. ती जीवन पद्धती आहे असे साम्गता.
क्त आपण जे बोललात त्याबद्दल " कारणे दाखवा " नोटीस बजावण्यात येईल ... सो फतवा कोणीही काढु शकेल ... आणि तुम्हाला उत्तर द्यावे लागेल . आणि तुमच्या उत्तरावरुन लोक तुमच्या विषयी मत बनवतील आणि कसे वागायचे ते ठरवतील ... इन शॉर्ट वाळीत टाकण्याचा अधुनिक प्रकार अशी माझी व्हिजन आहे हिंदु फतव्याबद्दल.
थोडक्यात हे झुंडशाहीचे समर्थन झाले. मग काय फरक उरतो तुमच्या व्याख्येत आणि "खाप पंचायतीच्या" निर्णयात.
अवांतर :आज हिंदुंना कधी नव्हती इतकी जनजागृतीची गरज आहे
चुकीच्या चालीरीतीबद्दल अवाक्षरही बोलायचे नाही. मात्र जनजागृती हवी. हे कसे काय जमवणार बॉ.
तुमच्या बहुतेक वाक्यांसाठी एक प्रश्न विचारायचे धाडस करतो.
तुम्ही सनातन प्रभातच्या ठाण्यातील कार्यकर्त्या आहात का हो?

विजुभाऊ's picture

10 Jul 2013 - 3:22 am | विजुभाऊ

सो फतवा कोणीही काढु शकेल ... आणि तुम्हाला उत्तर द्यावे लागेल . आणि तुमच्या उत्तरावरुन लोक तुमच्या विषयी मत बनवतील आणि कसे वागायचे ते ठरवतील ... इन शॉर्ट वाळीत टाकण्याचा अधुनिक प्रकार अशी माझी व्हिजन आहे हिंदु फतव्याबद्दल.
मुद्द्यांचा प्रतीवाद करता आला नाही की गुद्द्यांचा आधार घेतला जातो हे पुन्हा एकदा सिद्ध केलेत. धन्यवाद.

प्रसाद गोडबोले's picture

10 Jul 2013 - 11:06 am | प्रसाद गोडबोले

विवेकानंदानी हिंदू धर्मातील भोंगळपणाबद्दल जे काही सांगितले ते मात्र आपन सोयीस्करपणे विसरताय.

अहो विवेकानंदांनी हिंदुधर्मासाठी अवाढव्य कार्य केलय म्हणुन त्यांना बोलण्याचा अधिकार आहे टीका करण्याचा अधिकार आहे! आपलं काय योगदान आहे धर्मासाठी वारीसाठी ? आपण जर धर्माच्या उत्थानासाठी जराही काही कार्य करीत असाल तर बोला टीका करा अवगुण हटवण्यासाठी प्रयत्न करा... "उगाच अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी सुधारावी ह्यावर बोलताना आपण पुणे म्युनिसिपाल्टीत उंदीर मारायचा कामावर आहोत हे विसरुन जाण्यातला" प्रकार नको.

एखाद्या धर्मावर टीका केली म्हणजे त्याबद्दल अकाउंटॅबिलीटी नसते या निष्कर्षावर तुम्ही कशा आलात ते कळत नाही.

तुम्ही तुमच्या विधानांची अकाऊटॅबीलीती घेत आहात ? वा वा ...आता आपण वारी परंपरेतील गुणदोष घालवण्यासाठी काय कार्य केलेत ? ह्या धाग्याची वाट पहात आहे .

तो धर्म नामशेष केल्याबद्दल तथाकथीत हिंदू धर्मीयाना जिनीयस म्हणत त्यांची पाठ थोपटता. यातला भोंगळपण तुमच्या लक्षात येतोय का.

मी बौध्द तत्वज्ञानाला कुठे चांगले म्हणालो ? मलातरी माझ्या प्रतिसादात असे काही वाक्य दिसत नाही . बुध्द माणुस म्हणुन भारी होता पण त्याचे तत्वज्ञान मुळातच खंडीत आहे अपुर्ण आहे ज्ञानेश्वर माऊलीही त्याला गणेशाच्या तुतलेल्या दाताची उपमा देतात ....

काय फरक उरतो तुमच्या व्याख्येत आणि "खाप पंचायतीच्या" निर्णयात.

माझ्या व्याखेत हिंसेला जागा नाहीये हे सोयीस्कर रित्या विसरलात . इतर धर्माचा स्वतंत्र पर्सनल लॉ बोर्ड आहे मग हिंदुंचा का नसावा ?

चुकीच्या चालीरीतीबद्दल अवाक्षरही बोलायचे नाही. मात्र जनजागृती हवी. हे कसे काय जमवणार

बोला की . चुकीच्या चालीरीतींबद्दल . कोण नाय म्हणयत ... पण आधी आरशात पहा स्वतःच तेवढा अधिकार आहे का हे विचारुन पहा ? आपले धर्माला काय योगदान आहे आणि आपण काय बोलतो काय करतो ह्याचा ताळमेळ घातलेला दाखवा . अहो तुकाराम महाराजांनी , कबीरांनी टीका केलीच की अनिष्ट रुढींवर पण त्यांचा अधिकार होता . सावरकर म्हणाले की गाय फक्त उपयुक्त पसु आहे . अहो पण त्याचा बोलण्यचा अधिकार होता , धर्माला योगदान होतं ?
आपलं काय योगदान आहे ते दाखवा आधी ... मग बोला .... आणि खरं सांगतो , आपलं सिग्निफिकन्ट योगदान असेल धर्माला आणि मग आपण टीका करीत असाल अन दोष हटवण्याचा प्रयत्न करीत असाल तर आम्ही तुम्हालाही लोटांगण घालुच .
( पण एकुणच असं काही आहे असेल वाटत नाही )

वैदीक तत्वज्ञान : हे कधीच कालबाह्य झाले.

ओके .आपली जाण कळाली. ह्या वाक्यावरुन आपल्याविषयी मत बनवत आहे . पुढे बोलण्यात काही अर्थ नाही .

अवांतर : मी सनातन प्रभात , आर एस एस , विहिंप , बजरंग दल , वारकरी संप्रदाय , धारकरी संप्रदाय ह्या कोणाशीही संबंधीत नाही . सध्या एका कट्टर मुस्लिम देशात रहात आहे आणि त्रयस्थपणे हिंदुधर्माचा तुलनात्मक अभ्यास करीत आहे .

अभ्या..'s picture

10 Jul 2013 - 12:20 pm | अभ्या..

ब्येस्ट गिरीजाभौ.
सही भिडलायत

स्पा's picture

10 Jul 2013 - 12:56 pm | स्पा

सहमत

विजुभाऊ's picture

10 Jul 2013 - 7:47 pm | विजुभाऊ

पण एकुणच असं काही आहे असेल वाटत नाही )

<

वैदीक तत्वज्ञान : हे कधीच कालबाह्य झाले.

ओके .आपली जाण कळाली. ह्या वाक्यावरुन आपल्याविषयी मत बनवत आहे . पुढे बोलण्यात काही अर्थ नाही .

हा हा हा. हेच उत्तर अपेक्षीत होते.
वैदीक तत्वज्ञान नक्की काय आहे ते सांगता येत नाही. त्यामुळे पुढे बोलन्यात अर्थ नाही ही शुद्ध पळवाट झाली.
चालायचे.........
धर्माला योगदान द्यायचे म्हणजे काय ते समजुन सांगाल का. म्हणजे मलादेखील कळेल की काय करायला हवे.
सावरकरानी :गाय हा उपयुक्त पशू आहे : असे सांगितले होते ते मानायचे मात्र गोमुत्र्/गोमय हे श्रेष्ठ ही श्रद्धा ठेवायची.
गाईच्या पोटात ३३ कोटी देव आहेत ही श्रद्धा पुढच्या पीढी कडे सोपवायची हा दुटप्पीपणा राखायचा.
या वरून मी असे म्हंणणार नाही की " या वरुन तुमची जाण कळली पुढे बोलण्यात अर्थ नाही "
कारण मी तुमच्या चुकीच्या मताला देखील जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. असो.
तथाकथीत वैदीक परंपरेचे अभिमानी इतरानी मांडलेल्या मुद्द्यांचा प्रतिवाद करता येत नाही असे कळाल्या नंतर बोलण्यात अर्थ नाही अशी पळवाट शोधतात हा अनुभव मला नेहमीच येतो. तुम्ही अपवाद नाही.
असो...........
चुकीच्या मतांचा दुराग्रह ठेवणार्‍यांशी चर्चा करण्यात मलाही स्वारस्य नाही.......

प्रसाद गोडबोले's picture

10 Jul 2013 - 11:55 pm | प्रसाद गोडबोले

अहो कसली आलीये पळवाट ? तुमच्या एकन एक प्रस्नाचे उत्तर देतो ... वैदीक धर्मावर गच्चम व्याख्यान देतो हवं तर...
अहो पण तुम्ही इम्प्लिमेन्टेशन करणार आहात काय ? फील्ड मधे उतरुन काम करणार आहात काय ? वारीला जाऊन जनजागृती करणार आहात काय ?
तशी ग्यॅरंटी देत असाल तर बोला... सगळ्या प्रश्णांची उत्तरे देतो.

उगाचच नुसतं इन्टलेक्चुअल मास्टर्ब्युशन करण्यात काय अर्थयं ?

विजुभाऊ's picture

11 Jul 2013 - 6:46 pm | विजुभाऊ

गिरीजा तै/भाऊ
माझी तयारी आहे. वैदीक धर्मावर किंवा त्याच्यावर डोळस अभ्यासू विवेचन वाचायला आवडेल. कोणी पटवून दिले तर ते अमलात आणायची इच्छा आहे. प्रश्नाना वाटाण्याच्या अक्षता न लावता त्याचे नीट उत्तर मिळाले तर कोण्या मुमुक्षुला आवडणार नाही.

जनजागृती चे म्हणाल तर त्यासाठी कायम तयार आहे.
मी अभाविप साठी कॉलेजात असताना फील्ड वर्क केले आहे.
अनिसं साठीही काम केले आहे.

विजु भाऊ,
कोलेजात असताना,बहुतेकानी फिल्ड्वर्क केले आहे,त्याचा ईथे काय सम्बन्ध्?,मुद्दा असा आहे की आपण एकदाही वारीत भाग न घेता,फक्त पुण्यात घाण झाली म्हणुन प्रथा बन्द कर्ण्याचा सल्ला देत आहात्,म्हणुन मी आप्ल्याला आधी सन्गितले की आपण आधी वारीचा ईतिहास तपासा आणि अभ्यास करावा मग आप्ल्याला हिन्दु धर्मा विषयी अधीक माहिती मिळेल्,मी कोणी तज्ञ नाही परन्तु आपण जेव्हा धागा सुरु केला तेव्हा मला आपल्या वारी बद्दल्च्या ज्ञाना बद्दल शन्का आली म्हणुन मी आपल्याला अभ्यास करुन लिहायला हवे असे उत्तर दिले होते ते आपण दुर्ल्क्षीत केले .

मी जनजागृतीचे काम करायला तयार आहे हे साम्गण्यासाठी कॉलेजात असताना फील्डवर्क केले आहे हे सांगितले.
मला वारी बद्दल ज्ञान नाही हे मी अगोदरच सांगितलेले आहे. पुण्यातच नव्हे तर मी जो रस्ता पाहीला तो सातारा- पंढरपूर रस्ता अक्षरशः ओपन टॉयलेट झालेला असतो.
शासनयंत्रणेवर अनाठायी ताण येतो. सर्वसामान्य पोलीसामवर ताण येतो. इत्यादी गोष्टीमुळे मी ही प्रथा आता बंद करुया असे म्हणालो होतो.
एखादी प्रथा पूर्वी चाम्गली होती पण तीचा उद्देश कालबाह्य झाला त्यामुळे अनुचित गोष्टी घुसल्या. त्याचा समाजाला त्रास होतो. धार्मीक गोष्ट म्हणून सर्वसामान्य त्या विरोधात बोलु शकत नाहीत्.अशा कालबाह्य प्रथा बंद कराव्यात असे माझे म्हणणे होते. त्यासाठी वारीचा अभ्यासक असलेच पाहिजे असे नाही. वारीच्या अभ्यासापेक्षाही ;गणेशोत्सवात बिचार्‍या रस्त्यावरच्या हवालदारांचे हाल तुम्हाला समजले तर त्यांची दया येईल.

हे तुम्ही कुठल्या अभ्यासा॑वरुन ठरवले?गेली जवळ्पास ७०० वर्षे चाललेली परम्परा कोणीहि कोणावर ही कसल्याही प्रकाराची सक्ति न करता चालु आहे ते सुद्धा अग्दि शिस्तबद्ध पद्धतिने,तसेच बहुतेक वारकरी हे स्वताच्या खर्चने जातात्,सरकार त्यन्च्यासाठी प्रवास फुकट करण्यास परवान्गी देत नाहीत.
धार्मीक गोष्ट म्हणून सर्वसामान्य त्या विरोधात बोलु शकत नाहीत्.अशा कालबाह्य प्रथा बंद कराव्यात असे माझे म्हणणे होते.
हे तुम्हाला कोनि सनगितले या वारी भाग घेणारे हे सर्वसामान्यच असतात.
आणि तुम्हाला अभ्यासक व्हायला कोणी सान्गत नाही आहे.फक्त आपण धागा सुरु करताना आपल्याला एखाद्या गोष्टीचे जुजबी माहिती पण न घेता स्पोटक विधाने करणे हे अधीक घातक आहे.

गिरीजा तै एक व्यक्ती म्हणून तुमच्या बद्दल पूर्ण आदर बाळगुन आहे तरी ही
उगाचच नुसतं इन्टलेक्चुअल मास्टर्ब्युशन करण्यात काय अर्थयं ?
मला वाटते तुम्हाला या मास्टरबेशन या शब्दाचा अर्थ समजत असावा. मित्रांसोबत असताना हे वाक्य गम्मत म्हणून एकदम भन्नाट आहे. मात्र या इथे मला ते आक्षेपार्ह आहे.
एखाद्या विषयावर नीट माहिती देणे याला तुम्ही तो शब्द वापरत असाल तर मात्र अवघड आहे. इतक्या खालच्या थराला जाऊन कोणाशी बोलायची मला इच्छा नाही.
तुमची लेव्हल कळाली असे म्हणायचे नाही पण मनात मात्र तो विचार आल्याशिवाय राहीले नाहे.

वर म्हणताय भन्नाट वाक्य खाली म्हणताय आक्षेप हाय. तुमचे दोन आयडी आहेत, की तुम्ही दोन आयडींमध्ये विभागले गेला आहात? ;)

- हे अवांतर आहे.

कवितानागेश's picture

12 Jul 2013 - 3:08 pm | कवितानागेश

कदाचित सध्या त्यांना सगळ्या भन्नाट गोष्टींनाच आक्षेप घ्यायचाय... ;)
-हेदेखिल अवांतरच आहे.

बन्या बापु's picture

9 Jul 2013 - 6:33 am | बन्या बापु

विजुभौंशी सहमत नसलो तरी, त्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टीनं, मूलभूत सोयी-सुविधा / अत्यावश्यक मुद्द्यावर काही सुचले ते असे:

- वारी सारखेच हज यात्रा दरसाल होत असते. तेथील व्यवस्थापन गुण आपण वारीसाठी लागू करू शकतो का ? शासनाचे व्यवस्थापन विषयक नक्की धोरण ते काय ? जाणून घेण्यास उस्तुक आहे. राज्यशासन आणि केंद्रशासन हज यात्रेकरूंना येण्याजाण्यासाठी तिकिटे काढून देतात.. किमानपक्षी आमचे माळकरी चालत जातात तर त्यांना मुलभुत सुविधा मिळू नयेत का ?

- वारी प्रमाणे मुंबईत महानिर्वाण दिवस आणि नागपूर येथे चैत्यभूमीवर दसर्याला साजरे केले जाणारे धम्म चक्र प्रवर्तन दिन ह्याबाबत काय करायचे ? लक्ष्मीनगर येथे राहणारे नातलग सांगतात की लोक प्रात:विधीसाठी वाटेल तिथे बसतात आणि नागपूरचा संडास करून जातात.
मग इथेही तोच नियम लावायचा की भीमशक्ती पुढे बोलायचे नाही ?

ह्यावर कहर म्हणून रेल्वे / एसटी ह्या शासकीय परिवहन मंडळांना फुकट प्रवास करणार्याचा भुर्दंड बसतो तो वेगळाच !

तुकोबाराया / माउली ज्या वारीत पांडुरंगाच्या ध्यानात दंग झाले तेवढी वारी बरी खुपते आपल्याला ? हे म्हणजे हिरवा चालतो, निळा चालतो, पण भगवा कुठे दिसला की हाण दगड असेच झाले.

प्रभाकर पेठकर's picture

9 Jul 2013 - 11:31 am | प्रभाकर पेठकर

ह्यावर कहर म्हणून रेल्वे / एसटी ह्या शासकीय परिवहन मंडळांना फुकट प्रवास करणार्याचा भुर्दंड बसतो तो वेगळाच !

ह्याही पुढे म्हणजे छगनराव भुजबळांनी सर्व वारकर्‍यांच्या गाड्यांना सर्व 'टोल' माफ केला आहे.

हे म्हणजे हिरवा चालतो, निळा चालतो, पण भगवा कुठे दिसला की हाण दगड असेच झाले.

सर्वांना एकच बंधनकारक नियम लावा.

बन्या बापु's picture

9 Jul 2013 - 12:02 pm | बन्या बापु

पेठकर काका,

टोलमाफी करणे आणि दरडोई रु ७०,००० सवलत देणे ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
विकीपेडीयाला प्रमाण मानले तर २००५ -२०१० ह्या वर्षांमध्ये रु 28,917.7 million इतका खर्च हज यात्रेसाठी आला आहे.

"मुळात एकाला एक आणि दुसर्याला दुसरा असा न्याय का ?" हा प्रश्न आहे. फुकाचे बोल आहेत म्हणून फक्त हिंदू परंपरेला दुषणे देत बसा असे का ?

क्रिस्ती लोकांचे vatican city हे प्रमुख धर्मस्थळ. त्यावर दर साली $355.5 million इतके पैसे खर्ची पडतात.पंढरपूर सुधारणेसाठी किती पैसे खर्ची पडले आणि कुठे पडले ह्याचा हिशेब कुठेही उपलब्ध नाही.

मराठमोळी माणसाची पंढरी ( मराठी माणसाची vatican city ) चर्चेत आली की घाण, व्यवस्थापन, शासन यंत्रणेवर पडणारा ताण, काय करायचे असल्या रूढी घेऊन वैगेरे आठवतं का लगेच ?

बाकीचे ते डोळस आणि आम्ही तेवढे अंधश्रद्ध, अडाणी हा सूर आवडला नाही. आणि वैयक्तिक निषेद नोंदविला आहे.

बाकी चालू दे. शेवटी आपण मराठी माणसे....

प्रभाकर पेठकर's picture

9 Jul 2013 - 7:24 pm | प्रभाकर पेठकर

"मुळात एकाला एक आणि दुसर्याला दुसरा असा न्याय का ?"

त्याला विरोध आहेच. माझ्या प्रतिसादातील 'सर्वांना एकच बंधनकारक नियम लावा.' हे विधान तुमच्या कडून वाचायचे राहून गेले आहे असे दिसते.

मी तर ह्या पुढे जाऊन म्हणेन फक्त वारकर्‍यांनाच टोल माफीची सवलत का? आमच्या शेजारचे म्हातारे काका-काकू दरवर्षी शिर्डीला जातात, कोणी वारी व्यतिरिक्त इतर वेळी पंढरीला जातात, जैन त्यांच्या देवाला भेटायला जातात, महाराष्ट्रातील इतर खेडोपाड्यातून आणि शहरांमधूनही मुंबई-पुण्यात गणपती दर्शनासाठी हजारो-लाखो लोकं येत जात असतात, प्रत्येक जाती-धर्मातील लोकं त्यांच्या त्यांच्या गावच्या देवांच्या उरुसाला जात असतात सर्वांनाच टोल माफी करा. एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला दुसरा असे का?

क्रिस्ती लोकांचे vatican city हे प्रमुख धर्मस्थळ. त्यावर दर साली $355.5 million इतके पैसे खर्ची पडतात.पंढरपूर सुधारणेसाठी किती पैसे खर्ची पडले आणि कुठे पडले ह्याचा हिशेब कुठेही उपलब्ध नाही.

तसा आग्रह सरकारकडे धरा. राज्यकर्ते (सत्ताधारी आणि विरोधक) दोघेही एक मुखाने मान्यता देतील $355.5 million एवढे मोठ्ठे कुरण मिळणार असेल तर ते नाही कशाला म्हणतील? शेतकर्‍यांना कर्जमाफी स्वरूपात नाही दिले ६५००० कोटी? किती पोहोचले कर्जात बुडालेल्या शेतकर्‍यापर्यंत? किती आत्महत्या रोखल्या गेल्या?

मराठमोळी माणसाची पंढरी ( मराठी माणसाची vatican city ) चर्चेत आली की घाण, व्यवस्थापन, शासन यंत्रणेवर पडणारा ताण, काय करायचे असल्या रूढी घेऊन वैगेरे आठवतं का लगेच ?

शेजारच्याच्या घरात काय घाण आहे ह्या पेक्षा माझ्या घरात काय आणि किती घाण आहे ती कशी स्वच्छ करता येईल ह्या विचारांनी मी व्यथित होतो.

बाकीचे ते डोळस आणि आम्ही तेवढे अंधश्रद्ध, अडाणी हा सूर आवडला नाही.

'बाकीचे अंधश्रद्ध आहेत तर आम्ही का नसावे?' हा सूर मलाही आवडला नाही.

बौद्धिक चाचणी प्रश्न पहिला -

रिकाम्या जागा भरा.

१) वारी
२) सिंहस्थ
३) ..??
४) ..???

कवितानागेश's picture

9 Jul 2013 - 11:05 am | कवितानागेश

जुन्याजुन्या घाणेरड्या रुढी सुरु ठेवनार्‍या जुन्या धर्माचा निषेध!
जुने सगळे लाथाडून टाकणार्‍या नवीन धर्माचा निषेध!
या दोन्हीत सामिल होणार्‍यांचा 'क्रांतीकारकांचा' निषेध!
हे सगळे नुसतं बघत बसणार्‍या सामान्य माणसांचा निषेध!
सगळा गोंधळ सुरु असूनही शाबूत असलेल्या भारत सरकारचा निषेध!
...
...
....
.....
जाउ द्या ना.
आपण किर्तन करु..
जय जय राम कृष्ण हरी|
जय जय राम कृष्ण हरी|
जय जय राम कृष्ण हरी|
जय जय राम कृष्ण हरी|

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jul 2013 - 11:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरकारी यंत्रणेवर ताण पडतो, गर्दी, सुविधांचा अभाव,पर्यावरण, आरोग्य, याबाबतीत समस्या निर्माण होतात हे जर मान्य असेल माणिक वर्मा यांनी गायलेले 'अमृताहुनी गोड नाम तुझे देवा' हे ऐकेन म्हणतो....!

-दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

9 Jul 2013 - 11:45 am | प्रभाकर पेठकर

किंवा 'कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी....' हे गाणं ऐकत बसावं.

इश्वर चराचरात भरून आहे. त्याला शोधण्यासाठी, भेटण्यासाठी देवळात का जावे लागावे??

शेतकर्‍याच्या शेतात धान्य पिकतं. ते विकत घेऊन खायचं कशाला? बघूनच पोट नाही का भरणार? नद्या, तलाव भरुन वाहतात ( कधी कधी) ते न पिताच तहान भागते का हो? हवा आहेच की अवतीभवती, श्वास कशाला घ्यायचा? घरं बांधून का रहायचं वगैरे वगैरे. त्याचप्रमाणे चराचरात देव भरुन असला तरी वारीला जातात. समाधान मिळतं. जीव हरखतो. विठूमाऊली भेटते. पुढल्या वर्षाची उस्तवारी करायचं बळ देते.

सार्वजनिक स्वच्छतेचा मुद्दा अमान्य नाहीच पण माशी नाकावर बसते म्हणून नाक कापाल का?

माशी नाकावर बसते म्हणून नाक कापाल का?

बाकी काही असो उपमा आवडल्या गेली आहे. एकदम पर्फेक्ट =))

बाळ सप्रे's picture

9 Jul 2013 - 1:08 pm | बाळ सप्रे

एकाच वेळी जास्त लोक कमीत कमी जागेत जास्त वेळ राहिली की घाण ही होणारच. सर्वांना इतक्या सोयी पुरवणे practically impossible आहे.. पेठकर काकांचा हिशेब पाहून अंदाज येइलच..
मग ती वारी असो, हज असो, महापरीनिर्वाणदिन असो की कुंभमेळा असो.. त्या त्या देशातील स्वच्छ्तेच्या सवयींप्रमाणे थोड्या कमी जास्त प्रमाणात पण घाण ही होणारच.. त्यावर उपाय एवढाच.. Top down approach म्हणजे गर्दी टाळणे, bottom up approach व्यक्तिगत पातळीवर स्वच्छतेची पातळी वाढवणे.. एखादा मनुष्य/ समाज आपल्या स्वच्छतेच्या सवयी इतक्या लगेच बदलु शकत नाही.. त्यामुळे पहिला उपाय त्यातल्या त्यात सोयीस्कर..

यात अस्वच्छता मान्य करुन नुसतच सरकारी यंत्रणेकडून स्वच्छतेची अपेक्षा करणं आणि यंत्रणेला दोष देणं आणि आपण मात्र घाण करत राहणं पटत नाही.. वारकरी/वारीचे गोडवे गाणारे लोक यांच्याकडून याबाबतीत काही उस्फुर्त प्रयत्न झाले तर नक्कीच स्वागतार्ह आहे..

विजुभाऊ's picture

9 Jul 2013 - 5:31 pm | विजुभाऊ

@ गिरीजा तै..... तुमच्या उत्तराची वाट पहात आहे.
किंवा इतर कोणी मला हिंदू धर्म ( रुढी/रीती वगळून) म्हणजे काय या बद्दल माहिती देईल का.
हो उगाच कोणी रूढी म्हनजे धर्म नव्हे असे म्हणायला नको

अर्धवटराव's picture

10 Jul 2013 - 9:27 pm | अर्धवटराव

अहो, मिपावर नवखे आहात कि काय. आयला... पेण्टागॉनमधे बसुन विचारताय कि गल्फवॉरबद्दल माहिती कुठे मिळेल ते.

अर्धवटराव

अनिरुद्ध प's picture

9 Jul 2013 - 7:33 pm | अनिरुद्ध प

आपण वारिला केव्हा गेला होता? कुठून आणि कसे म्हणजे कुठ्ल्या पालखी/दिन्डि बरोबर गेल होतात ते तर सान्गा.

मी वारीला गेलो नाही पण त्या दरम्यान वारी निघालेल्या रस्त्याने जाण्याचा योग आला. त्यावेळेस रस्त्याचा संडास झालेला पाहिला.
पालखी दिंडी या उद्योगात लोक फुकट वेळ घालवतात असे मला वाटते.
शिवजयंती च्या दिवशी ठीकठीकाणाहून गडावरून वाजतगाजत शिवज्योती आणल्या जातात. आणि चौकाचौकात मांडल्या जातात. उपक्रम वाईट नाही. पण त्यातील किती कार्यकर्त्याना शिवाजी महाराजांची युद्धनिती अभ्यासलेली असते?

मी वारीला गेलो नाही पण त्या दरम्यान वारी निघालेल्या रस्त्याने जाण्याचा योग आला. त्यावेळेस रस्त्याचा संडास झालेला पाहिला. >>>>
ग्रेट !! _/\_

वारी नसताना मुबंईत कित्येक रस्त्याचा संडास झालेला दाखवु तुम्हाला ? ...असो ....केवळ सात एक दिवसाच्या त्रासासाठी वारी बंद करणे ही थोडे टोकाचे वाटत नाही का ? ( मी दर वर्षी थोडे का असेना वारीत चालतो, दिघी ते फुलेनगर... मेंटल कॉर्नरच्या चौकात स्वागत स्टेज असतो...याचा एक फायदा असा ही आहे की कोणी चुकले-माकले तर अनॉउन्स करायला ....या वर्षी या रस्त्यादरम्यान १२ संशयित धरले होते, त्यातील दोन जण सराईत निघाले १० भुरटे ...फुलेनगर ला दरवर्षी मोफत जेवण असते मंडळाकडुन, अर्थात ते आमच्याच एका मंडळा कडुन नसते, मंडळाची सर्व पोरे येतात चालत, सांगायची गोष्ट अशी की जो कचरा या रस्त्यावर होतो, ती महापालिकेच्या कर्मचार्‍यांसह साफ करण्याची जबाबदारी विश्रांतवाडी आणि फुलेनगरची मंडळे उचलतात, मुद्दाम म्हणुन सांगतो त्यातील अर्ध्याच्या वर मंडळे ही जयभीम आहेत !! आता काय म्हणाल ? अर्थात पुर्ण वारीत मंडळाला हे अशकय आहे. आणि हे सर्वच ठिकाणी चालते. कुठे कमी तर कुठे जास्त. ) तुम्ही मला माहीत नाही कुठल्या रस्त्यावरून आणि कधी गेलात.....कदाचित " हडपसर " साईड असेल. तर मग मात्र ईतकेच सांगणे आहे की जरा तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा ही अभ्यास करा. वारी कितीही मोठी असली तरी सरकारी यंत्रणा राबतेच, पण ती सर्व ठिकाणी कितपत सोयी देवु शकते ? कश्या प्रकारे देवू शकते ? याचा ही थोडा अभ्यास ठेवावा. उगा काहीतरी लिहायचे आणि जाती-पातीतला तेढ पेटवायची हे किमान तुमच्या सारख्यांकडुन अजिबात अपेक्षित नव्हते विजुभाऊ !!

बाकी धन्यवाद

पालखी दिंडी या उद्योगात लोक फुकट वेळ घालवतात असे मला वाटते. >>>
वैयक्तीक मत !! त्यामुळे नो कमेंट्स...

त्रिवेणी's picture

10 Jul 2013 - 3:50 pm | त्रिवेणी

सुहास दा याच्याशी सहमत. मी सुध्दा याच रोड्वर रहाते. काही वारकर्याचा स्वयपाकही होतो या रस्त्याच्या बाजुला. फक्त एक गोश्त खट्कते वारकर्याची ती म्ह्णजे भुक नसेल तरी खायला घेणे आणि अर्धे अन्न रस्त्यावर टाकून देणे. खरच वारी गेल्यावर सध्याकाळी ६.३० वाजता खुप स्वच्य होता.

पिंपातला उंदीर's picture

9 Jul 2013 - 7:47 pm | पिंपातला उंदीर

अनेक शतक एखादी प्रथा चालू आहे म्हणून त्यात सर्व गोष्टी आलबेल आहेत असे मानने योग्य ठरणार नाही. वारीत अनेक अनिष्ट गोष्टी घडतात आणि अनेक अनिष्ट प्रथा शिरल्या आहेत हे मान्य न करण्यात काही अर्थ नाही. वारीचे ते काही दिवस म्हणजे सर्वसामान्य वारकर्‍याला पिचून काढणार्‍या दैनंदिन प्रश्नापासुन दूर राहण्याची पण एक संधी असते असा तर्क वाद कुठेतरी वाचला होता (तातपुरता पलायन वाद?). या विषयावर कलाम नामा या साप्ताहिकाआने एक सुंदर स्टोरी केली आहे. मी अंक वाचला. ऑनलाइन अपलोड झाला आहे की नाही कल्पना नाही

A

शारापोव्हाला जास्त लागलं तर नाही ना?
'नाजूक' दिसते हो खूप . दुपारच्या चहा बिस्कीटानंतर काही खाल्लेलं नाहीये मी. असाच उपास करावासा वाटतोय.
काय बातमी काये नक्की? जरा सांगा बरं सविस्तर.

मोदक's picture

9 Jul 2013 - 11:49 pm | मोदक

http://kalamnaama.com/wimbldonch-gavat-petal/

डिस्क्लेमर - वरचा आहे तोच एकमेव फोटो आहे बातमीमध्ये - आणखी फोटो नाहीयेत. ;-)

मालोजीराव's picture

10 Jul 2013 - 2:24 pm | मालोजीराव

वरचा आहे तोच एकमेव फोटो आहे बातमीमध्ये - आणखी फोटो नाहीयेत.

हो ना राव…आख्या मासिकात तेव्हडच बघणीय होतं !

पाषाणभेद's picture

11 Jul 2013 - 4:05 am | पाषाणभेद

अन किसनराव, शिर्षक देखील चमत्कारीक आहे.

मोदक's picture

12 Jul 2013 - 7:44 pm | मोदक

कोण किसनराव?

मालोजीचा डुआयडी आहे का..?

मदनबाण's picture

10 Jul 2013 - 11:57 am | मदनबाण

अरे विठ्ठला ! माझ्या कांदापोव्हाला काही जास्त गंभीर दुखापत तर झाली नाही ना ! ;)
बाकी पोव्हीण पडली पण स्टाईल मधे हो ! ;)

प्रकाश घाटपांडे's picture

9 Jul 2013 - 9:44 pm | प्रकाश घाटपांडे

ही बघा लिंक कलमनामा

संजय सोनवणी ह्या माणसाचे नेहमीचेच ट्यांण ट्याण ट्यांण वाचायचे असेल तर हा लेख वाचा.
महाराष्ट्राची मूळ संस्कृती शैव होती पण वैदिक लोकांनी त्यात आपले देव कसे घुसडले, जुन्या काळच्या संताना कसले नॉलेजच कसे नव्हते, विठोबा हा खरा शिवच कसा आहे वगैरे वगैरे वगैरे नेहमीचेच ट्यांण ट्याण ट्यांण चालू. (पुलंच्या मधू मलुष्टेशी असणारे साम्य म्हणजे योगायोग समजा!)

त्यात वारीतील गैरप्रकार ह्याविषयी फारच थोडे लिहिले आहे.
असाच जर टाका अतीप्राचीन काळापर्यंत भिडवायचा म्हटला तर इस्लाम, मक्का मदिनेतील पूज्य स्थाने, ख्रिस्ती धर्मातील रुढी, ख्रिसमस वगैरे सगळ्या धार्मिक प्रकारांचे मूळ हे तिथल्या स्थानिक संस्कृतीत आहेत. तिथले पूर्वीचे धर्म ,त्यातील रुढी जो नवा धर्म त्याज्य मानतो पण गुपचूप त्यातल्या अनेक बिनबोभाट स्वीकारतो हे सगळीकडे होत आले आहे. त्याविरुद्ध इतकी बोंब का मारायची?

आतिवास's picture

9 Jul 2013 - 10:57 pm | आतिवास

सहमत आहे असं म्हणायला मला आवडलं असतं; पण ...
परवाच मला कुणीतरी म्हणत होतं की मराठी संकेतस्थळांवर लोक उगाच काहीबाही लेख आणि प्रतिसाद लिहित बसतात हा शक्तीचा अपव्यय आहे; देशात हजारो गावांत वीज नसताना केवळ करमणुकीसाठी इतका काळ इंटरनेट (आणि पर्यायाने वीज) वापरणं बंद करायला हवं ....

त्या व्यक्तीशीही सहमत व्हायला मला आवडलं असतं; पण .....

हुप्प्या's picture

10 Jul 2013 - 12:03 am | हुप्प्या

मग लाखो लोक उपाशी आहेत म्हणून जेवण बंद, लाखो लोक बेकार आहेत म्हणून नोकरीधंदे बंद करून घरी बसा असेही करायचे का?

आतिवास's picture

10 Jul 2013 - 9:03 am | आतिवास

:-)
मुद्दा एवढाच की तर्कच चालवायचा म्हटलं की अशी(ही)विधानं समोर येऊ शकतात.

(बहुतेक माझ्या आधीच्या प्रतिसादातला उपरोध पुरेसा स्पष्ट झाला नाहीये ..)

यशोधरा's picture

10 Jul 2013 - 11:31 am | यशोधरा

झालाय ;)

खरेतर सार्याच वारकर्यांना विठुमाऊलीचे दर्शन होत नाही. बरेच लोक कळसाला हात जोडून परत येतात.
देवाच्या दर्शनाची ओढ जितकी खरी तितकीच आस असते सत्संगाची ही ! वारीबरोबर अनेक सत्पुरुषांचा आणि वैष्णवांचा सहवास मिळतो.. त्याची ही ओढ आहेच की! तुकाराम महाराज म्हणतात , न लगे मुक्ती आणि संपदा , संतसंग देई सदा ! मुक्तीपेक्षाही संतसंग महत्वाचा आहे. आणि या समाधनासाठी सार्या गैरसोयी पत्करून लोक येतात आणि पुढेही अनेक शतके येतील !! असले कितीही धागे निघाले तरीही...
आणि गैरसोय तुम्हाला वाटते हो ! तो वैष्ण्व आत्मानंदात मस्त आहे !

विटेकर's picture

10 Jul 2013 - 1:15 pm | विटेकर

फ्याशन आहे सध्या हिन्दूना नावं ठेवण्याची !
धागा काढ्णाराला काय हो , कंपनीच्या पैशाने फुकट इन्टर् नेट आहे , कळ बडवायला लागणार्या वेळाचा पगारही चालू आहे ( तसे ज्यांचे नाही त्यांना __/\__)
.. मग टाका एक मताची पिन्क... डिवचा हिंदूना ,, त्यांना कोणी वाली नाही तेव्हा आपला सल्मान रश्दी अथवा तस्लइमा नसरीन होणार नाही नक्की .. !

विजयभौ..
साखरेची गोडी सांगून समजत नाही .. ती खावी लागते.
एकदा वारीला या आणि मग पाडा जिल्ब्या !

असो.. तुम्हाला नाही कळ्णार ती. त्याला नशीब असावे लागते. ते उजाड्ण्याची वाट पहा .. तोपर्यण्त चालू द्या.
मोठे व्हा ! असे म्हण्तो आणि थांबतो.

माझ्या मते ( मी हिंदू असल्याने माझेच मत बरोबर आहे असा माझा अजिबात आग्रह नाही ) खालील बाबी हिंदू धर्माची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील.
१. कर्माचा सिद्धांत
२. पुनर्जन्म
३. अन्तिम सत्य एकच आहे . ( GOD IS ONE and not GOD ARE ONE )

या प्रत्येक मुद्द्याचा ऊहापोह करता येईल पण तो अनेक्वेळा येथे झाला आहे. हे सारे मुद्दे परस्परपूरक आणि एकमेकांत कमालीचे गुंतलेले आहेत. या वरील तीन बाबींना केन्द्रीभूत ठेऊन उभी राहीलेली सर्वंकष जीवन पद्धती म्हणजे हिंदू जीवन पद्धती ! म्हणजे Hinduness (and NOT Hinduism, Hindu is not"ism" , it's way of life)

वरील तीन गोष्टी अनिवार्य तर पुढील काही गोष्टी पुष्टयर्थ:
१. चार वेद
२. चार पुरुषार्थ
३. चार आश्रम
४. चार वर्ण
या आणि अशाच संलग्न बाबींवर हिंदू समाज बेतलेला आहे. त्यामध्ये कमालीची विविधता आणि टोकाची लवचिकता आहे. आणि म्हणोनच तो काळाच्या कसोटीवर ठामपणे उभा आहे.
"युनान-ओ-मिस्र-ओ-रोमा सब मिल गये जहाँ से
अब तक मगर है बांकी नामो-निशान हमारा"
बाकी विस्तार करण्याची फार आवश्यकता नाही, आणि जरूरीप्रमाणे मिपांकर भर टाकतीलच.

विजुभाऊ's picture

10 Jul 2013 - 10:27 pm | विजुभाऊ

धन्यवाद निदान काही बाबी तरी सांगितल्यात.

वरील तीन गोष्टी अनिवार्य तर पुढील काही गोष्टी पुष्टयर्थ:
१. चार वेद
२. चार पुरुषार्थ
३. चार आश्रम
४. चार वर्ण

चारही सोडा निदान एक तरी वेद अभ्यासणारे कितीजण आपल्या आसपास असतात ( प्रत्येक मुसलमान /ख्रिश्चन / शिख निदान आयुश्यात एकदा तरी कुरान्/बायबल्/गुरुबानी या ग्रंथाचा काही भाग तरी अभ्यासतात. असो.
चार पुरुषार्थ ही नवी टर्म ऐकतोय. थोडे विस्ताराने सांगा की. वेगळा धागा टाका. खरेच जाणुन घ्यायला आवडेल.
चार आश्रम. हे मान्य. पण काळानुसार यात बरेच बदल झालेत.
चार वर्णः कर्मानुसार वर्ण हे मान्य असायला हरकत नाही. मात्र त्यातील कर्म हा घटक मुख्य असला तरच. पण हल्ली नव्या शिक्शण पद्धतीमुळॅ थोडे बदल होत आहेत.

विटेकर's picture

11 Jul 2013 - 9:56 am | विटेकर

वेदांचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही . बहुतेक संतानी तो केलेला नाही. हिंदू मान्यतेप्रमाणे, मोक्ष मिळवणे हे नरदेहाचे ( स्त्री देहाचे पण! उगाच मारामारी नको) अंतिम ध्येय आहे. तोच ४ था आणि अंतिम पुरुषार्थ आहे.
आणि त्यासाठी वेद अभ्यासण्याची अजिबात गरज नाही. ( आम्हां न कळे ज्ञान ..हा अभंग आथवावा) तुम्ही ही या घटा -पटा च्या भानगडीत पडूच नका.
वेदांचे सार चार महावाक्यात सांगितळे आहे. mahaavakye
त्याचे मला समजलेले सार असे की, सर्वांभूती एकच अंतरात्मा वास करत आहे आणि ही सारी मायिक सॄष्टी ही त्या परमात्म्याची लीला आहे. हे ध्यानात घेऊन केलेले व्यवहार त्या मोक्षाप्रत नेतात. ( म्हणजे नेत असावेत , मला अजून अनुभव यायचा आहे पण माझी तशी श्रद्धा आहे. तुमची असावी असा माझा आग्रह नाही )
धर्माच्या चौकतीत राहून अर्थ आणि कामाचा विवेकी उपभोग ( म्हणजे अभाव ही नव्हे आणि प्रभाव ही नव्हे ) मोक्षाप्रत नेतो असे धर्म शास्त्र सांगते. या चौकटीत राहण्यासाठी म्हणून चारी आश्रम (1. व्रह्मचर्य आश्रम 2. ग्रहस्थ आश्रम 3. वानप्रस्थ आश्रम 4. संन्यास आश्रम) आणि चार वर्ण !
कालौघात या मूलभूत संकल्पना जर विवेकाने अंगिकारल्या नाहीत तर केवळ कर्मकांडाच्या बजबजपुरीलाच धर्म म्हणले जाते, मूल संकल्पनेला मालीन्य येते, आणि मग सगळा गोंधळ होतो. ( हे ही भगवंताला माहीत आहे म्हणून तोच म्हणतो ..यदा यदा ही धर्मस्य.. आणि येथे धर्माला ग्लानि येते असे म्ह्तले आहे , धर्म कधीच "नाश " पावत नाही)
धर्म शब्दाची व्याख्याच मुळी " जे धारण करतो ते" अशी असल्याने हा सारा आचरणाचा आणि अंगिकारण्याचा विषय आहे. चर्चेचा आणि अभ्यासाचा नाही.( अशी माझी धारणा आहे ( स्मायली ))

मैत्र's picture

11 Jul 2013 - 11:52 am | मैत्र

बहुतेक जण वेदाभ्यास करत नाहीत इतकंच काय बहुतेकांना त्यात काय आहे याबद्दलही कल्पना नसते.
पण इतरधर्मीय करतात तो बरेचदा अभ्यास नसून "पठण" असते. तुमच्या वाक्याचा अर्थ मुस्लिम, शीख, ख्रिश्चन धर्मीय प्रत्येक मनुष्य धर्मार्थाचा आणि वचनांचा अभ्यास करतो असा होईल. हे मान्य करणे अवघड आहे.

चार पुरुषार्थ ही नवी टर्म ??? -- विजुभाऊ मी विटेकर काकांप्रमाणे तुम्हाला वेदसार सांगण्याइतका काही अभ्यास केलेला नाही पण चार पुरुषार्थ ही संज्ञा / संकल्पनाच नवी वाटते आहे तर त्यावर माहीतीशिवाय विधाने करणे तुम्हाला स्वतःला योग्य वाटते का?

आता वारीचा प्रश्न - प्यारे यांचे किंवा सुहासचे उत्तर पटते. त्यावर सुधारणा करा, मार्ग काढा, लोकप्रबोधन करा हा दृष्टिकोन न ठेवता पुण्यात घाण होते आणि एक दिवस रहदारीची गैरसोय होते म्हणून वारीच बंद करा हा विधानाला आधार नाही.

मैत्र's picture

11 Jul 2013 - 12:08 pm | मैत्र

पण याचा अर्थ स्वतः काही केल्याशिवाय या गोष्टी मांडूच नयेत असा अजिबात होत नाही.
तुम्ही वारीत गेला नाहीत किंवा त्यात सोयी सुधारणा करण्यासाठी स्वतः काही आजवर केले नाही म्हणजे तुम्ही जे चूक आहे त्याला चूक म्हणू शकत नाही हे मुद्दे आधारहीन आहेत.
त्यामुळे तुम्हाला तुमचे मत मांडण्याचे तात्विक स्वातंत्र्य आहे (असे माझे मत आहे.) जिथपर्यंत तुम्हाला अनुभव आहे अस्वच्छतेचा / गैरसोयींचा / गवशा लोकांचा.
वारी न समजता त्यात सहभागी न होता - वारी निरर्थक आहे आणि बंद करावी याला आधार नाही कारण त्यात तुम्हाला (मलाही) गम्य नाही / अनुभव नाही.
वारीमुळे इतरांना होणार काही त्रास आणि वारीचे उद्दिष्ट / त्यातला आनंद या दोन वेगळ्या गोष्टि आहेत.
गँगरिनच्या उदाहरणात तो अवयव निकामी झालेला असतो म्हणूनच काढला जातो.
तुम्ही पूर्ण अवयव सडला आहे / निकामी आहे. त्यावर उपचार करून जखम / आजार बरा करून तो नीट उपयोगात आणावा अशा परिस्थितीच्या पलिकडे गेला आहे असं एकतर्फी विधान करताय.
कोणाला काही आजार झाला तर त्या आजारावर उपाय करतात / दर वेळी अवयव काढून टाकणे हाच उपाय नाही केला जात.
हाच काथ्याकूट वारीतून उद्भवणारे उपद्रव इथूनच सुरु करून ते कसे टाळता येतील आणि हीच चर्चा वारी सुधारण्यासाठी काय करता येईल अशी मांडली असती तर विषय भलतीकडे गेला नसता.
(यात वैयक्तिक आरोप / शेरेबाजी नाहीत असं मला वाटतं.)

खल्लास प्रतिसाद! पूर्ण सहमत. मलाही बहुतेक असेच काहीसे म्हणायचे होते.

विजुभाऊंची मतं काहीशी पटली. मात्र सरसकट वारी बंद करा हे म्हणणं चुकीचंच आहे. त्याबद्दल विजुभाउंचा तीव्र निषेध.

मात्रः

हिंदुत्वाचा अभिमान आपण बाळगत असू तर त्यात कालानुरुप होणारे, येणारे बदल स्वीकारले गेले पाहिजेत नि दोष काढले गेले पाहिजेत. कसं करता येईल हे सकारात्मकरित्या पाहिलं जाणं आवश्यक आहे.

तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार (उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणाम तृतीया प्रतिमापूजा, तीर्थयात्रा अधमाधम) तीर्थयात्रा गौण साधनामध्ये गणली गेली असली तरी ती साधकाच्या दृष्टीने असल्यानं आधी साधक होणं अपेक्षित आहे.

वारीचे उद्देश नेमके काय आहेत, असतात नि आज काय स्थिती आहे त्याचा उहापोह नक्कीच झाला पाहिजे. हिंदु धर्मामध्ये अधमात अधम व्यक्तीला सुधारण्याची संधी आहे. तशीच अत्यंत वरच्या दर्जाच्या साधक व्यक्तीला मोक्ष मिळवून देण्याची संधी देखील आहे. त्यामध्येच वारी हा एक अतिशय चांगला मार्ग मुख्यत्वे भक्तिमार्गाचा आधार घेणारांकरता आहे. वारी करण्याचा उद्देश सर्वांबरोबर भेदाभेद विसरुन चालणं व्हावं, १५ दिवस चार कपड्यात राहता, खाता यावं थोडक्यात आपण वेगळे कुणी आहोत हा अहंकार विसरुन, सर्व परिस्थितीत सम चित्त अवस्थेत राहता यावं हा आहे. वारीमध्ये वेगवेगळ्या स्तरावरच्या साधकां चं नि सामान्यानंचं देखील कौन्सिलिंग होतं. तकलादू नात्यांच्या युगात आजही वारीला एखादा आपल्या आईवडलांची काळजी वाहत नेतो तेव्हा ते नक्कीच कौतुकास्पद असतं.

आज वारीचा इव्हेन्ट झालाय. 'वारीमध्ये मी' ही मानसिकता त्रास देते. त्यातून वारीला आज आलेली सूज काही अंशी त्रासदायक आहे हे देखील नक्की मात्र सूज उतरवण्यासाठी आवश्यक प्रयत्न होणं आवश्यक आहे.

याबरोबर पूर्वापार चालत आलेला आत्यंतिक सहिष्णूता हा दोष आज आपल्यामध्ये शिरला आहे हे नक्कीच नि त्यातून मिळेल त्यात जमवून घ्या ही चुकीची मानसिकता निर्माण झालेली आहे. त्यातून घाण खपते, कचरा स्विकारला जातो इ.इ. गोष्टी घडतात. आपल्याकडं व्यवस्थापनाची नि विशेषतः कचरा व्यवस्थापनाची बोंब असतेच. त्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली गेली पाहिजेत हे नक्कीच आहे. तरीही....

प्रत्येक गोष्टीच्या आपापल्या अधिक उण्या बाजू असतात त्यात अधिक बाजू जास्त असतील तर उण्याबाजू कमी करत करत अधिकांकडं आणखी चांगलं कसं होईल ह्याकडे लक्ष देणं जास्त सयुक्तिक.

प्रभाकर पेठकर's picture

10 Jul 2013 - 4:23 pm | प्रभाकर पेठकर

मुद्द्यांचे खंडण करताना अनेकांना विजुभाऊंवर वैयक्तिक हल्ला करण्याचा मोह आवरलेला नाही. हे हिन्दू धर्मातल्या सहिष्णुतेचे लक्षण नाही. अनेक प्रतिसाद वाचताना वाईट वाटते. नेटवर धागा टाकताना, सलमान रश्दी किंवा तस्लिमा नसरिन सारखे फतव्यांना आपल्याला सामोरे जावे लागत नाही म्हणून 'काहीही' धागा काढणं, हिन्दू धर्माला दूषणे देणे असा धागाकर्त्याने फायदा घेतला आहे असे सुचविताना प्रतिसाद देतानाही कांही प्रतिसादकर्त्यांनी 'त्याच' सत्याचा फायदा घेतला आहे.

हज यात्रेसाठी प्रत्येक देशातून किती भाविकांनी यावे ह्यावर नियंत्रण असते. कोणीही उठला आणि हज यात्रेला गेला असे होत नाही. माझ्या अल्पमाहिती नुसार सौदीतील काबा परिसरात फक्त ९९,९९९ माणसेच असतात तसेच पंढरीच्यावारीला, चैत्यभूमीच्या यात्रेला प्रत्येक शहरातून, खेड्यातून किती भाविकांनी सहभाग घ्यावा ह्यावर कांही नियंत्रण असावे का? असा विचार मनांत येतो.

वरचा, प्यारे १ ह्यांचा प्रतिसाद १००% पटला नाही तरी ९०% पटतोच. एक संयमीत प्रतिसाद असेच म्हणावे लागेल.

अर्धवटराव's picture

10 Jul 2013 - 9:38 pm | अर्धवटराव

विवेकाला नाकं मुरडुन कुठलीच समस्या सुटणार नाहि.

अर्धवटराव

विजुभाऊ's picture

10 Jul 2013 - 10:35 pm | विजुभाऊ

पेठकर काका. मी इथे नेहमीच संयमीत भाषेत प्रतिसाद देत असतो. कधीच कोणावर वैयक्तीक टीका करीत नाही. दुर्दैवाने इथे उत्तर देताना काही लोक तुमची बुद्धी कळली /बोलण्यात अर्थ नाही/ अकाउंटॅबिलिटी वगैरे बोलतात.
आरशात पहा वगैरे बोलले....... असो. ज्याची त्याची मती.
मला मी केलेल्या कोणत्याही विधानाबद्दल मुद्देसूद खंडन करता येते. इतरानी केलेली टीकादेखील मी स्वीकारतो. फतवा काढायचा असेल तरी हरकत नाही. नाहीतरी आदर्श पुरूष रामाने फतवा ( आदेश) काढून शंबुकाचा वध केला होताच की खालच्या जातीत जन्म होउन देखील वेद ऐकल्याबद्दल. असो.....
अवांतर : धर्मातील सुधारणेबद्दल मी काय आराधना करावी म्हणजे त्याबद्दल बोलण्यास पात्र ठरेन.
अतीअवांतरः विद्रोही तुकारामानी धर्माबद्दल जे अभंग लिहीले आहेत ते गिरीजा तै/बै/मावशी यानी अभ्यासले असतील अशी अपेक्षा करतो

अर्धवटराव's picture

11 Jul 2013 - 1:22 am | अर्धवटराव

म्हणजे विद्रोही तुकाराम या लेखप्रपंचाची गंगोत्री आहे होय... मग ठीक आहे.

अर्धवटराव

प्रभाकर पेठकर's picture

11 Jul 2013 - 1:55 am | प्रभाकर पेठकर

धर्मातील सुधारणेबद्दल मी काय आराधना करावी म्हणजे त्याबद्दल बोलण्यास पात्र ठरेन.

कुठल्याही कार्यात 'सिंहाचा वाटा' असतो तसाच 'खारीचाही' असतो. जे आणि जितके आपल्याला जमेल ते आणि तितके करीत राहावे. कांहीच न करण्यापेक्षा कांहीतरी पोटतिडीकीने केले आहे हेच महत्त्वाचे. खूप लांबच्या प्रवासाची सुरुवातही 'पहिले पाऊल' पुढे टाकण्यातून होत असते. असो.

तुम्ही सूज्ञ आहात, हतोत्साहित होऊ नका.

विटेकर's picture

11 Jul 2013 - 10:04 am | विटेकर

भावना पोचल्या.
मिपांवर केलेल्या चर्चा वैयक्तिक न घेण्याइतके प्रगल्भ आपण असायला हवे ना?
नांव जरी विजुभौचे घेतले असले तरी माझा आक्षेप त्या आणि तशा प्रकारच्या प्रव्रुत्तीवर आहे.
भले तरी देऊ कासेची लंगोटी....
I hope I am loud & clear ! ( smily )

प्रभाकर पेठकर's picture

11 Jul 2013 - 1:59 pm | प्रभाकर पेठकर
मिपांवर केलेल्या चर्चा वैयक्तिक न घेण्याइतके प्रगल्भ आपण असायला हवे ना?

म्हणजे वैयक्तिक विधाने वैयक्तिक पातळीवर घेणार्‍यांची 'बुद्धी प्रगल्भ नाही' असे एक 'लेबल', आडून आडून, वैयक्तिकरित्या लावले की आपली प्रगल्भता अनायसे सिद्ध होते. व्वा....व्वा....आवडले.

पण आम्ही अडाणी आणि अप्रगल्भ बुद्धीवालेच ठीक आहोत.

विटेकर's picture

11 Jul 2013 - 2:08 pm | विटेकर

You are free to draw any inferences the way you want !

प्रभाकर पेठकर's picture

11 Jul 2013 - 2:33 pm | प्रभाकर पेठकर

आपणांस आहे मरण! म्हणोन राखावें बरवेपण!!

पेठकर काका,
आपल्या विवेका बद्दल शतषा नमन प्रत्यक्षात आपण अतिप्रगल्भ बुद्धिचेच आहात असे मी समजतो.

कवितानागेश's picture

11 Jul 2013 - 12:59 am | कवितानागेश

धाव पाव विठू आता....

पिंपातला उंदीर's picture

12 Jul 2013 - 9:54 pm | पिंपातला उंदीर

फारच अवखळ आणि अल्लड बुवा : )

कवितानागेश's picture

12 Jul 2013 - 11:59 pm | कवितानागेश

बुवा,
इथे तुम्हाला काय काय म्हणतायत बघा!!

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2013 - 2:19 am | अत्रुप्त आत्मा

का...य?...काय म्हणताsssssत??? =))

पण तसं काहि फार वाइट्टं म्हणत नैय्येत!!! :p

प्रसाद गोडबोले's picture

11 Jul 2013 - 2:13 am | प्रसाद गोडबोले

बाकी काही म्हणा वारी बद्दल ...पण हा काथ्याकुट वाचताना हा अभंग पुन्हा वाचनात आला

भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥धृ॥
पौर्णिमेच्या चंद्राचे कोरे जीवन, तैसे माझे मन वाट पाही ॥१॥
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटूली पंढरीसी ॥२॥
भुकेलिया बाळा अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची ॥३॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा ॥४॥

दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटूली पंढरीसी .... डोळ्यात पाणी आणलंत तुकोबा ..... कधी भेट होईल आता ... देव जाणे :(

पौर्णिमेच्या चंद्राचे कोरे जीवन, तैसे माझे मन वाट पाही ॥१॥

'पौर्णिमेच्या चंद्रा चकोरे जीवन' असं असावं.
चकोर हा कल्पित पक्षी 'फक्त' पौर्णिमेचं चांदणं पिऊन जगतो असं मानलं जातं. उत्कट भक्तीतून पांडुरंग भेटीची तळमळ निर्माण होणारे तुकाराम महाराज काय अथवा 'देवाच्या सख्यत्वासाठी, पडाव्या जीवलगांच्या तुटी' म्हणणारे समर्थ काय.... नतमस्तक. बास्स्स्स.

पाषाणभेद's picture

11 Jul 2013 - 4:12 am | पाषाणभेद

वारीला पासपोर्ट/ टोकन सारखे कागदपत्र लागू करावेत जेणे करून अश्रद्ध, अजाण, अहिंदू, अवैचारीक, अविवेकशील, अज्ञानी, अंतस्थः, अतिरेकी आदींना आपोआप आळा आणण्याचे काम होईल.

राही's picture

11 Jul 2013 - 3:07 pm | राही

चर्चेतली काही विधाने अगदीच तर्कविसंगत. ''हिंदुधर्मासाठी कोणी काय केले आहे म्हणून त्याने टीकेचा 'अधिकार' आपल्याकडे घ्यावा" हे म्हणजे तुम्ही अंडे घातले आहे का, घातले असेल तरच त्याचा आकार,रंग चव इ.वर टीका करा- इतपत बाळबोध. समीक्षकांनी टीका करू नये कारण त्यांनी कधी कथा-कादंबरी लिहिलेली नसते या विधानासारखेच. बाकी वारीतल्या सहभागी लोकांच्या संख्येवर मर्यादा असावी हे अगदी पटण्यासारखे. प्रत्येक दिंडीला माणसांचा कोटा ठरवून द्यावा. कुंभमेळ्यात गंगेच्या काठी विस्तृत जागा उपलब्ध असते म्हणून सुव्यवस्था राखतातरी येते. तशीच त्र्यंबकेश्वरी राखताना गोंधळ माजतो. पंढरपूरसारखे गाव एकावेळी लाखभर लोकांना सुव्यवस्थितपणे सोयी पुरवू शकेल. त्यानंतर चंद्रभागा प्रदूषणग्रस्त होईल आणि हे प्रदूषण पार उजनी, गाणगापूर, कृष्णेपर्यंत पोचेल. गाणगापूरला भीमा-अमरजा संगमाचे गढूळ पाणी पवित्र म्हणून विकले जाते. पंढरपूरयात्रेवेळी पाचसहा लाख लोकांचे सांडपाणी त्यात मिसळले जाते. आता उजनीमुळे कदाचित प्रदूषण कमी झाले असेल कारण उजनी आणि जायकवाडी धरणे क्वचितच ओसंडून वहातात त्यामुळे धरणाच्या वरल्या अंगाचे पाणी नदीच्या खालच्या प्रवाहात पोचतच नाही; हा मुद्दा सोडला तरी एवढ्या प्रचंड संख्येने माणसांनी एकत्र येणे हे आपत्तीला आमंत्रण आहे. त्यातून आपली देवळे कोंदट, प्रदक्षिणामार्ग अरुंद, बाहेरचे रस्ते अरुंद. टपर्‍यांनी भरलेले. जमाव बेशिस्त, सतत ढकलाढकली चाललेली. पुजारीवर्ग आपापापल्या यजमानांना सशुल्क सत्वर दर्शन घडवण्याच्या लगबगीत. एखादी भीषण दुर्घटना केव्हाही घडू शकेल अशी परिस्थिती. केवळ श्रद्धेच्या नावाखाली हे सर्व चालू रहावे काय? बर्‍याच वर्षांपूर्वी एकदा शिरडीच्या भक्तनिवासात स्वच्छतागृहाचा संपूर्ण मजला मैल्याने भरून ते ओघळ जिन्यावरून खालपर्यंत आलेले पाहिले तेव्हापासून तिथे जावेसे वाटलेले नाही.
'शास्त्राभ्यास नको,श्रुती पढू नको, तीर्थासि जाउ नको' यासारखी अनेक संतवचने आहेत. पण लक्षात कोण घेतो?

पिंपातला उंदीर's picture

11 Jul 2013 - 5:47 pm | पिंपातला उंदीर

+१११११११

सध्या दर्शना साठी चान्गली सोय आहे शेगाव तसेच तिरुपती च्या धर्तिवर्,याची नोन्द घ्यावी.