सह्याद्रीचे सर्वोच्च टोक : कळसूबाई

अमितसांगली's picture
अमितसांगली in भटकंती
6 Jul 2013 - 1:44 am

यावर्षीच्या मान्सूनला सुरुवात झाली आणि आम्ही पंधरा दिवसाला किमान एक याप्रमाणे सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या गड-शिखरांवर चढाई करण्याचे ठरविले. चार महिन्यांपासून कोणत्याही प्रकारच्या शारीरिक कष्टापासून खंडीभर दूर असूनही आम्ही पहिल्यांदा सह्याद्रीच्या शिरोमणीलाच वंदन करून छत्रपतींच्या पदस्पर्शाने व पराक्रमाने पावन झालेल्या स्वराज्याची भटकंती करण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे आम्ही पहिल्यांदा कळसूबाई सर करण्याचे ठरविले.

ठिकाण : कळसुबाई

समुद्र सपाटीपासून उंची : १६४६ मी.(५४०० फूट)

जवळील गाव : बारी

जिल्हा : नाशिक

जवळील प्रेक्षणीय स्थळे : भंडारदरा धरण, रांधा धबधबा, अगस्त्य ऋषी आश्रम, रतनगड, हरिश्चंद्र गड

जाण्याचे मार्ग:

१. पुणे - चाकण - मंचर - नारायणगाव - ओझर -ओतूर -ब्राम्हणवाडा -कोतूळ -राजूर -बारी (एकुण अंतर:१७५ किमी)

२. पुणे - चाकण - मंचर - नारायणगाव - संगमनेर (राष्ट्रीय महामार्ग :एकुण अंतर: १४० किमी) - अकोले - राजूर - बारी (राज्य महामार्ग : एकुण अंतर : ७५ किमी)

आम्ही पहिल्या मार्गाने गेलो होतो. नारायणगाव पर्यंत राष्ट्रीय महामार्ग (पुणे-नाशिक) आहे. नारायणगाव-बारी हा राज्य महामार्ग आहे. जास्त पाऊस नसेल तर पहिला मार्ग हा चांगला पर्याय आहे.

आम्ही सकाळी ४.३० वाजता स्वारगेटवरून निघालो होतो. जवळपास ६च्या सुमारास आम्ही नारायणगाव येथे पोहचलो. नारायणगावहून नंतर तीन तासांनी म्हणजे ९.३० च्या दरम्यान आम्ही बारी येथे पोहचलो. संपूर्ण नाशिक जिल्हा हा गड-किल्ल्यांनी वेढलेला असल्याने एकूणच सह्याद्रीचे अतिशय मनोहारी रूप बघण्यास मिळते.

बारी गावामध्ये एक मंदिर आहे तिथे तुम्ही गाडी ठेऊ शकता. तसेच दोन-तीन ठिकाणी घरगुतीच अल्पोपहाराची सोय आहे. मार्गदर्शकाची गरज असल्यास तुम्हाला स्थानिक लोकांकडून मदत मिळू शकते आणि हो परत आल्यावर जेवण हवे असल्यास जातानाच सांगून जाण्यास विसरू नका (टीप: आम्ही उपाशीच परत आलो). वर पाण्याची सोय नसल्याने पाणी व खाण्याचे साहित्य नेण्यास विसरू नका. ट्रेकिंगचा मार्ग हा खडकाळ रस्ता, पायऱ्या आणि खडा लोखंडी जिना याप्रकारचा असून साधारणतः सरासरी ५ तास वेळ लागतो. कळसुबाईला जाण्याचे निश्चित झाल्यानंतर आम्ही जी माहिती एकत्र केली होती किंवा जे ब्लॉग वाचले होते तिथे जास्तकरून फक्त लोखंडी जिन्याचे फोटो होते व बाकीच्या मार्गाविषयी जास्त माहिती नव्हती. पण कळसुबाई चढताना सुमारे ४००० फूट खडकाळ रस्ता (राजगड इतका), ६०० फूट लोखंडी जिना व जवळपास ७००-८०० फूट पायऱ्या एवढे अंतर कापावे लागते. लोखंडी जिन्यावरून पाय घसरू नये यासाठी चांगले बूट अत्यावश्यक आहे.

मी व माझी बायको
मी व माझी बायको...

.
इंद्रधनुष्य...

.

.

.

.

.
माझा मित्र अर्पित मिश्रा व मी....

.

.

.
लोखंडी जिना....

.

.

.

.
खेकडा स्पॉट: या ठिकाणी अशा प्रकारचे अनेक खेकडे आढळतात....

.

बारीक पाऊस व दाट धुक्यामुळे आजूबाजूच्या रस्त्याचा किंवा शिखराच्या उंचीचा नेमका अंदाज येत नव्हता. येणारे - जाणारे लोक एकमेकांना विचारून रस्ता बरोबर असल्याची खात्री करून घेत होते. वर्षाची पहिलीच ट्रेकिंग असल्याने चढताना चांगलीच धाप लागत होती. अंदाजे ४००० फूट उंचीवर असताना परत येणाऱ्या एका ग्रुपने कळस फक्त १० मिनिटांच्या अंतरावर असल्याचे सांगितले. आमच्यात परत नवा उत्साह संचारला व नेटाने चढायला लागलो पण शेवटचा जिना काही मिळेना. सुमारे २० मिनिटांनी अजून एक ग्रुप भेटला व अजून त्यांनी देखील अजून १० मिनिटांची चढाई असल्याचे सांगितले. त्यानंतर १५ मिनिटांनी देखील अजून नक्की किती अंतर कापायचे आहे याचा अंदाज येईना. रस्ता बरोबर आहे याची खात्री होती पण शेवटचा जिना काही केल्या दिसेना. शेवटी सुमारे २० मिनिटांनी आम्हाला शेवटचा उंच लोखंडी जिना दिसला व सुटकेचा निश्वास टाकला.

शेवटचा जिना साधारणता १०० मी. उंचीचा एकदम खडा जिना आहे. जिन्याखाली असताना देखील आपण जवळपास ५००० फूट उंचीवर असतो पण वातावरणात जास्त काही बदल जाणवत नाही. पण जसे तुम्ही जिना चढून वर जाता त्याच क्षणी तुमच्या तोंडातून वाक्य निघते: याचसाठी केला अट्टाहास तेही जग जिंकल्याच्या अविर्भावात. एकदम दाट धुके व प्रचंड जोरात हवा. वाऱ्याचा वेग एवढा होता कि एकवेळ ८० किलो वजनाचे आम्ही दोघेही उडून जातोय कि काय असा वाटत होते. स्वर्गाहुनी सुंदर रम्य असे ते सह्याद्रीचे विलोभनीय दर्शन.

.
जन्नत: ५४०० फूट उंचीवर असलेले मंदिर....

.
स्वर्गाहुनी सुंदर: प्रचंड जोरात हवा व दाट धुके....

.

.

.

.

.

.

.

जवळपास ५ तासानंतर म्हणजे २ च्या सुंमारस आम्ही बारी येथे परतलो. जेवणाची ऑर्डर दिली नसल्याने फक्त चहा व अल्पोपहार घेउन ३ वाजता परत पुण्याकडे प्रयाण केले. नंतर परत ५ तासाच्या प्रवासानंतर म्हणजे ८ वाजता पुण्यात परतलो. अंदाजे १० तासांचा प्रवास व ५ तास ट्रेकिंग केल्यानंतर येताना हेच जाणवत होते कि: फट गयी है यार.........

प्रतिक्रिया

जॅक डनियल्स's picture

6 Jul 2013 - 3:32 am | जॅक डनियल्स

माहिती चांगली.
तुमचे अरेंज म्यारेज लव्ह म्यारेज? तसा पहिला फोटो बघून समजत नाही, म्हणून विचारले.

कवितानागेश's picture

6 Jul 2013 - 8:09 am | कवितानागेश

मस्त.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2013 - 9:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी...!

-दिलीप बिरुटे

धन्या's picture

6 Jul 2013 - 9:08 am | धन्या

छान प्रवासवर्णन.

काही फोटोंमध्ये तुम्ही नाही हे जरा खटकलं. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2013 - 4:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>. काही फोटोंमध्ये तुम्ही नाही हे जरा खटकलं.
मलाही थोडं खटकलं.

-दिलीप बिरुटे

अमितसांगली's picture

6 Jul 2013 - 5:06 pm | अमितसांगली

भा.पो...

टक्कू's picture

6 Jul 2013 - 10:52 am | टक्कू

सुन्दर वर्णन ! सही आहे! इथे जायचंय एकदा... पण स्वतःचा वेळ आणि मित्रांचा मेळ यांचा खेळ कधी रंगेल याचा नेम नाही....

असो... छान फोटो..मस्त!

वा फार छान झाला आहे लेख अमित सांगली साहेब

balasaheb's picture

6 Jul 2013 - 4:37 pm | balasaheb

खुप मस्त

अभ्या..'s picture

6 Jul 2013 - 4:39 pm | अभ्या..

ब्येस्ट
बादवे युनिकॉर्नचे अ‍ॅव्हरेज काय पडले हो?

अमितसांगली's picture

6 Jul 2013 - 5:05 pm | अमितसांगली

४० च्या आसपास....

अभ्या..'s picture

6 Jul 2013 - 5:08 pm | अभ्या..

व्वा वा, भलत्याच एफीशिअंट आहेत ब्वा युनिकॉर्नवैनी.

पैसा's picture

6 Jul 2013 - 5:19 pm | पैसा

मस्त वर्णन आणि फोटो!

दिपक.कुवेत's picture

7 Jul 2013 - 11:13 am | दिपक.कुवेत

हि बायको आहे होय तरीच म्हटलं "चार महिन्यांपासून कोणत्याही प्रकारच्या शारीरिक कष्टापासून" दुर कसे राहिलात :P :D. असो मस्त प्रवास वर्णन आणि छान फोटो.

छान .एखादा बारी गावाचा वरून काढलेला फोटो ?

कोणाही नवख्याला मार्गदर्शक लेखन.
अय्य्या तुम्ही छाऽऽन दिसताय अस म्हणयचा मोह टाळला आहे.
यु स्पॉटेड खेकडा? अस ही म्हणनार नाही.
पण तरीही या सगळ्याच्या पलिकडे जाउन तुम्ही बरीच माहीती जी बाकिच्या लोकांना बरी पडेल ती दिली आहे.
कळसुबाई चढणे तस अवघड मानल जात ते तुम्ही पार पाडलत या बद्दल मनःपुर्वक अभिनंदन. धुक्याचे, खेकड्यांचे अन क्षितीजावर रेंगाळलेल्या इंद्रधनुचे फोटो आवडले.

किसन शिंदे's picture

8 Jul 2013 - 7:07 am | किसन शिंदे

फोटो मस्त आले आहेत सगळे, वर्णनही छान लिहलंय.

यशोधरा's picture

8 Jul 2013 - 7:44 am | यशोधरा

मस्त लिहिलं आहे. :)

सर्वच फोटो अप्रतिम आणि माहिती पूर्ण . तिथे जाण्याचा बेत करण्यार्याना या लेखाचा आणि फोटोचा नक्कीच उपयोग होइल.