मोगरा सरबत

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in पाककृती
11 Jul 2008 - 6:43 pm

नमस्कार,
साहित्य :
पाव किलो मोगर्‍याच्या ताज्या कळ्या,
५ लिटर पाणी ,
अर्धा किलो साखर , चिमूटभर मीठ.

कॄति :
मोगर्‍याच्या कळ्या थंड पाण्यात स्वच्छ धुवून घेणे.
५ लिटर पाणी उकळण्यास ठेवा , चांगले उकळले की त्यात साखर घालून अजुन २० मि. उकळवावे.
चिमूटभर मीठ घालून पाणी गाळून घ्यावे.पूर्णं थंड झाल्यावर त्यात मोगर्‍याच्या कळ्या घालून झाकण ठेवून २ तास ठेवावे.
परत एकदा पाणी ५ मि. उकळवून घ्यावे ( फुलं काढून घेउन )
थंड झाल्यावर परत एकदा फुलं त्यामधे घालून अजून २ तास ठेवावे.
नंतर फुलं काढून टाकावी आणि गाळून एका बाटलीत भरुन फ्रीजमधे ठेवावे.
सर्व्ह करते वेळेस १ : २ भाग थंड पाणी मिक्स करून सर्व्ह करावे.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

11 Jul 2008 - 7:17 pm | यशोधरा

अरे वा, मस्तच आहे!!
करुन बघायला हव!

मदनबाण's picture

11 Jul 2008 - 7:20 pm | मदनबाण

हा एक भन्नाट प्रकार दिसतो..
आरएनडी करुन पाहण्यास काही करकत नसावी..
जोशी साहेब हा प्रकार तुम्ही कधी करुन पाहिलात्?आणि तुम्हाला हे असं करुन पाहव असं कसं सुचल ???

(पेरु सरबत प्रेमी)
मदनबाण.....

श्रीयुत संतोष जोशी's picture

12 Jul 2008 - 6:20 am | श्रीयुत संतोष जोशी

नमस्कार,
जोशी साहेब हा प्रकार तुम्ही कधी करुन पाहिलात्

बर्‍याच वेळा.
आणि अगदी असंच सेम टू सेम गुलाबाचं सरबत सुद्धा करता येईल.
फक्त चांगल्या प्रतीचे आणि सुवासिक गावठी गुलाबाच्या पाकळ्या हव्यात.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

प्राजु's picture

11 Jul 2008 - 7:21 pm | प्राजु

गुलाब शरबत पता है भाय.. य कोनसा नया शरबत है...
जे काही आहे ते नाव वाचूनच थंड आणि शांत वाटतंय... मस्त रेसिपी. भारतात आले की काय काय करायचे याची लिस्ट सुरू झाली.. ;)

स्वगत : अगं गधडे, येऊन आठवडा तरी झाला का तुला?? लगेच नविन यादी काय करते आहेस??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

12 Jul 2008 - 10:07 am | विसोबा खेचर

गुलाब शरबत पता है भाय.. य कोनसा नया शरबत है...

हे काय प्राजू, तू बंबई हिंदी कधीपसून सुरू केलंस? :)

जे काही आहे ते नाव वाचूनच थंड आणि शांत वाटतंय... मस्त रेसिपी.

हेच म्हणतो.

अभिनंदन संतोषराव! अजूनही अश्याच काही अनवट पाकृ येऊ द्यात..

तात्या.

मिना भास्कर's picture

8 Nov 2008 - 6:44 am | मिना भास्कर

#:S
पण इथे मोगरा वासालाही मिळत नाही. सरबत दुर राहीले.