गाभा:
परवा मला 'छूकर मेरे मन को' या गाण्याबद्द्ल ऐकले की हे गाणे (कविता) रविंन्द्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे या गाण्याची गोष्ट मोठी रंजक आहे.
रविंन्द्रनाथ टागोर दररोज सकाळी फ़िरायला जात असत तेव्हा एक वेडसर दिसणारा माणुस येउन त्यांच्या छातीला हात लावुन म्हणत असे " काही तरी आहे इथे" आणि निघुन जात असे। असा क्रम बरेच दिवस चाले. पुढे रविंन्द्रनाथ टागोर यांना नोबेल पुर्स्कार जाहिर झाला ...त्यादिवशी सकाळी पुन्हा तो वेडसर दिसणारा माणुस येउन त्यांच्या छातीला हात लावुन म्हणाला..."आज काहीतरी मिळाले".....
त्यावरुन रविंन्द्रनाथ टागोर यांनी कविता लिहिली 'छूकर मेरे मन को'....वस्तुत: हि कविता अप्रकाशितच राहिली.नंतर "य़ाराना" ह्या चित्रपटामध्ये वापरली गेली.... जाणकार यावर प्रकाश टाकतील अशी अपेक्षा...
परंतु गुगलुन पाहिले असता कवि चे नाव सापडत नाही.।
प्रतिक्रिया
18 May 2013 - 2:53 pm | इनिगोय
त्या वेडसर माणसाचा आयडी काय्ये म्हणे? :P
(कृ ह घ्या..)
19 May 2013 - 12:08 am | पैसा
गाणं अंजानच्या नावावर आहे. पण गाण्याची चाल रवीन्द्रसंगीतावरून चोरली आहे.
19 May 2013 - 12:10 am | प्यारे१
रविन्द्रनाथ हिंदी लिहायचे? अर्थात वरील शक्यता नाकारता येत नाहीच्च.