पौष्टिक कटोरी चाट

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
13 May 2013 - 11:34 am

णमस्कार लोक्स,

कसं चाललय? चाट हा बहुतेकांच्या आवडिचा प्रकार. ह्या प्रकारात जरा नविन काय हे बघण्यासाठि जालमोहिम हाती घेतल्यावर 'कटोरी चाट' हा जरा वेगळा प्रकार पाहिला. फोटो पाहिल्यावर करुन बघायची खुमखुमी काय स्वस्थ बसुन देत नव्हती. पण मुळ पाककॄतीमधे बटाट्याच्या कच्च्या किसाची कटोरी दिली होती आणि ती करणं जsssssरा तापदायक आहे. शिवाय त्यात चटण्या/दहि पडल्यावर खाताना कदाचीत सगळा लगदा होउ शकतो म्हणुन हि शक्कल लढवली. अशीच मैद्याची सुद्धा कटोरी करु शकतो पण मैद्या पेक्षा हेल्दि ओट्स केव्हाहि चांगले नाहि का? ह्या शिवाय नाचणी, ज्वारी-बाजरीच्या पीठाची पण कटोरी करु शकता. बघा तर मग....

तयार कटोर्‍या:

Katoris

कटोरी चाट:

Chat

साहित्यः
अ. कटोर्‍यांसाठि:
१. ओट्स/ओटॅमील - १.५ कप
२. पालक प्युरी - १/२ कप
३. हिरवी मिरची/कोथिंबीर पेस्ट - २ चमचे (लहांनासाठि मिरच्यांच प्रमाण कमी ठेवा)
४. चवीनुसार मीठ
५. तळण्यासाठि तेल
६. नैवेद्याच्या छोट्या वाट्या - ३ ते ४. नसतील तर आता कसं करु? हि चींता मनातुन काढुन टाका. बिनधास्त मिसळणाच्या डब्यातील वाटया वापरा (फक्त त्या स्टीलच्या असतील हि काळजी घ्या)

ब. चटण्या:
१. आंबट/गोड चटणी साठि: चिंच, खजुर, चवीनुसार मीठ/गुळ - चींचेचा कोळ, वाफवलेले खजुर मिक्सर मधे मुलायम वाटुन घ्या. त्यात चवीप्रमणे गुळ/मीठ घालुन गोड चटणी तयार करा
२. तिखट हिरव्या चटणी साठि: मुठभर कोथिंबीर/पुदिना, २-३ हिरवी मिरची आणि पेरभर आलं घेउन मिक्सर मधे गरजेपुरतं पाणी टाकुन मुलायम वाटुन घ्या
३. तिखट लाल चटणी साठि: सुख्या लाल मिरच्या गरम पाण्यात भिजत ठेवा. थोड्या वेळाने मिक्सर मधे गरजेपुरतं पाणी टाकुन मुलायम वाटुन घ्या. मी हि चटणी केली नाहि कारण मला वरील दोन चटण्या पुरल्या.

क. सारण/स्टफिंगः
१. उकडलेले बटाटे चौकोनी चीरुन - २ मध्यम
२. बारीक चीरलेला कांदा / टोमॅटो - १ प्रत्येकि
३. मोड आलेले वाफवलेले मुग - १/२ कप
४. कच्ची कैरी - १/२ बारीक चीरलेली

ड. ईतर पण महत्वाचे:
१. फेटलेलं दहि
२. बारीक नॉयलान शेव
३. चाट मसाला
४. डाळिंबाचे दाणे - मुठभर (ऑप्शनल; नसले तरी चालतील)

कॄती:
अ. कटोर्‍यांसाठि:
१. ओट्स/ओटॅमील मिक्सर मधे भरडसर वाटुन घ्या.
२. पालकाची पाने स्वच्छ धुवुन एक ५ मि. पाण्यात उकळा व नंतर लगेच गार पाण्यात घाला. थोड्या वेळाने गरजेपुरतं पाणी घेउन मिक्सर मधे मुलायम प्युरी बनवुन घ्या.
३. आता एका बाउल मधे वाटलेले ओट्स, पालक प्युरे, हिरवी मिरची/कोथिंबीर पेस्ट, १ पळि तेल आणि चवीनुसार मीठ घाला. गरजेप्रमाणे पाणी घालुन गोळा मळा (जास्त घट्ट अथवा सैल नको). हे पीठ लवकर सुकतं म्हणुन प्रत्येक वेळि लाटि घेताना जरा तेलाचा हात लावुन मळुन घ्या.
४. कढईत तेल तापत ठेवा.
५. आता मळलेल्या पिठामधुन लिंबाएवढा गोळा घेउन पुरी सारखा लाटा. लाटलेल्या पुरीला फोर्कने/सुरीने हलकेसे टोचे मारा जेणेकरुन नंतर कटोर्‍या तळताना पुरीसारख्या फुगणार नाहित.
६. आता लाटलेल्या पुरी मधे नैवेद्याची वाटि ठेवुन बाजुच्या सर्व कडा एकत्र करा. अतिरिक्त पीठ आतल्या बाजुला जमा होईल ते हाताने किंवा सुरीने कापुन घ्या. अशा सर्व वाट्या तयार करुन घ्या.
७. तापलेल्या तेलात पीठ ज्या बाजुने लावलय त्या बाजुने सर्व वाट्या एक एक करुन तळुन घ्या. एका वेळि एकच तळा आणि आच अगदि मंद असु द्या म्हणजे कटोर्‍या आतपर्यत तळल्या जातील आणि कच्च्या राहणार नाहित.
८. तळताना हलक्या हाताने तेल गोलाकार फिरवा म्हणजे कटोर्‍या सर्व बाजुने सारख्या तळल्या जातील.
९. हलकासा गोल्डन कलर आला कि वाट्या काढुन टिश्यु पेपर वर काढा जेणेकरुन अतिरिक्त तेल शोषलं जाईल. कटोर्‍या काढायची घाई करु नका. वाट्या पुर्ण थंड झाल्या कि कटोर्‍या अलगद सुटतील.
१०. कटोर्‍या पुर्ण थंड झाल्या कि हवाबंद डब्यात भरुन ठेवा. ह्या नुसत्याहि चहाबरोबर छान लागतात. वरील तळण प्रकरण नको असेल तर ओव्हन मधे बेक करुन घ्या.

चाटसाठि:
११. स्टफिंगसाठिचं दिलेलं सर्व साहित्य एका बाउल मधे एकत्र करा.
१२. सर्विंग डिश/प्लेट मधे तयार कटोर्‍या ठेवा. त्यात एक ते दिड चमचा तयार स्टफिंग भरा.
१३. आता वरुन चिमुटभर चाट मसाला भुरभुरा.
१४. आता अनुक्रमे त्यावर गोड, दोन्हि तिखट चटण्या, फेटलेलं दहि घाला.
१५. वरुन नायलॉन शेव आणि डाळिंबाचे दाणे घालुन चाट कटोर्‍या सर्व करा.

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

13 May 2013 - 12:21 pm | सौंदाळा

मस्त प्रेझेन्टेशन,
दही न घालता खावुन बघण्यात येईल.
नुसते कटोरे हादडयला पण मज्जा येईल.

प्रचेतस's picture

13 May 2013 - 12:56 pm | प्रचेतस

हायक्लास!!!!!!!!!!!!!!
जबरदस्त प्रेझेन्टेशन.

कटोरी चाट खायला आज वंदनला जावे लागणार असे दिसतेय.

मोदक's picture

21 May 2013 - 11:51 pm | मोदक

भारी!!!!!

वल्लीशेठ - आता हे वंदन कुठे आले?? काय राव तू पण.. मी चिंचवडात रहात असताना असले काही बोलला नाहीस.

बोपोडीला आहे. खडकीबाजारच्या दिशेने आत वळतो त्याच रस्त्यावर. चौकापासून अर्ध्या मिन्टावर.

मुक्त विहारि's picture

13 May 2013 - 12:58 pm | मुक्त विहारि

झक्कास...

प्यारे१'s picture

13 May 2013 - 1:04 pm | प्यारे१

अरे.... छानच.
(इनो, इनो)

सुहास झेले's picture

13 May 2013 - 1:09 pm | सुहास झेले

जबरदस्त..... प्रचंड भारी. चाट पडलो :) :)

स्पंदना's picture

13 May 2013 - 2:32 pm | स्पंदना

मी पण चाट पडले.
घरात कपकेक्सचा ट्रे आहे. त्यात घालुन करुन पहाता येइल अस वाटतय, पण ओव्हनमध्ये या कटोर्‍या कडक होतील ना खुसखुशीत व्हायला काय कराव?

दिपक.कुवेत's picture

13 May 2013 - 3:58 pm | दिपक.कुवेत

आपुन के पास ओव्हन रेह्ता तो नक्किच बताता जी. कोई हेल्प करेगा क्या जी?

प्रभाकर पेठकर's picture

13 May 2013 - 1:10 pm | प्रभाकर पेठकर

हम्म्म्म! थोडी लांबलचक पाककृती आहे पण 'चाट' म्हंटल्यावर स्वस्थ तरी कसे बसावे? करून पाहीन.

विसोबा खेचर's picture

13 May 2013 - 1:18 pm | विसोबा खेचर

............!!!!!!!!!!!!!!!!!

धनुअमिता's picture

13 May 2013 - 2:01 pm | धनुअमिता

मस्त. खुप छान. आवडले.

सहिच... करुन बघायला पाहिजे.. घरात सगळ सामान आहेच.

पौष्टीक आणि देखणी पाककॄती !!
खुपच आवडली.. :)

कटोर्‍या भारीच आहेत. आयडिया आवडेश.. :)

सानिकास्वप्निल's picture

13 May 2013 - 10:24 pm | सानिकास्वप्निल

झकास चाट दिसत आहे :)
मला बास्केट/ कटोरी (बटाट्याचा कीसाचे) चाट आवडतं पण त्याल छान पर्याय दिल्याबद्द्ल धन्यवाद.
फोटो, सादरीकरण जबरदस्त .... +१
फक्त मी टार्ट मोल्ड वापरून बेक्ड कटोरी करेन असा विचार करतेय :)

पैसा's picture

13 May 2013 - 10:28 pm | पैसा

खासच!

रेवती's picture

14 May 2013 - 6:10 am | रेवती

भारी प्रयोग आहे.

जुइ's picture

14 May 2013 - 6:32 am | जुइ

चेन्नईत असताना अडयार आनंद भवन येथे हे खुप खाले आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

14 May 2013 - 7:18 am | लॉरी टांगटूंगकर

कालच गेलेलो :). फार जळजळ झाली नाही. :) :)

निवेदिता-ताई's picture

14 May 2013 - 10:22 am | निवेदिता-ताई

कटोर्‍या भारी झाल्यात

आश's picture

14 May 2013 - 10:50 am | आश

एकदम जबरदस्त रेसीपी. फोटो तर बढीया

nishant's picture

14 May 2013 - 10:53 am | nishant

एकदम सोलिडि लगरेलि है पाक्रु... ;)

जयवी's picture

14 May 2013 - 6:40 pm | जयवी

क्या बात !!
जबरी पेशन्स आहे तुझा !!
प्रेझेंटेशन का तो जवाब नही :)

दिपक.कुवेत's picture

15 May 2013 - 1:12 pm | दिपक.कुवेत

असाच लोभ ठेवा!

jaypal's picture

15 May 2013 - 1:36 pm | jaypal

खुपच छान. स्टफिंग मधे व्हेज अथवा नॉनव्हेज वापरायला भरपुर स्कोप आहे (उदा.खिमा,झिंगे,स्विट्कॉर्न, ई.)

करुन बघणार.

अत्रुप्त आत्मा's picture

21 May 2013 - 10:27 pm | अत्रुप्त आत्मा

फोटू क्र-१ >>> लग्नातलं रुखवतावर ठेवलेलं ताट

फोटू क्र-२>>> लग्नातल्या ताटावरचं रुखवत ;)

हल्ली त्या(ही) जेवणात ही असली स्टाटंरं असतात. :)

बाब्बो ! जीभ चाटवली गेली आहे ! लाळ लाळ लाळ...

priya_d's picture

23 Nov 2015 - 7:25 am | priya_d

नमस्कार!

कोणी ओवन मधे करुन पाहिल्या का ह्या कटो-या? खुसखुशीत झल्या का?