हे छायाचीत्र १९९३ मध्ये प्रसिध्द छायाचित्रकार केविन कार्टर यांनी उपासमारी आणी कुपोषणाने ग्रासलेल्या इथियोपियाच्या एका आयोद नामक गावात काढला होता. येथे दिलेले छायाचित्र हे एका इथियोपियन (स्त्री) बाळाचे छायाचीत्र आहे, जी रांगत-रांगत आपल्या आई-वडिलांच्या झोपडीत जाण्याचा प्रयत्न करत आहे.. आणी जिचे आई-वडील उदरनिर्वाहाची सोय करण्यासाठी जंगलात गेले आहेत. भुकेने त्या बाळाला अगदी बेचैन करून टाकले आहे.. त्या बाळावर पाळत ठेवत एक गरुड बसले आहे आणी तिच्या मरणाची वाट पहात आहे. केविन कार्टर यांनी खूप वेळ या दृश्याचे निरीक्षण केले आणी आपल्या कॅमेरात बंदिस्त केले. त्यानंतर त्यांनी त्या गरुडाला तिथुन हुसकून लावले.
तसे त्यांनी या छायाचित्राशिवाय इथियोपियातील इतर संकटांची देखील छायाचित्रे काढली होती परंतु त्यांना हे छायाचीत्र विशेष वाटले.. नंतर केविन यांनी हे छायाचीत्र 'न्युयोर्क टाइम्स' ला विकले.. आणी हे छायाचीत्र सर्वप्रथम २६ मार्च १९९३ च्या 'न्युयोर्क टाइम्स' मध्ये प्रसिद्ध झाले. आणी छायाचित्राबरोबरच्या ओळी होत्या "metaphor for Africa’s despair"-"आफ्रिकेच्या नैराश्याची लक्षणे"
केविन यांना या छायाचित्रासाठी प्रतिष्टीत आणी मानाचा असा 'पुलित्झर' पुरस्कार मिळाला.. हे छायाचित्र प्रकाशित झाल्यानंतर हजारो-लाखो लोकांनी केविन कार्टर यांच्यावर या इथीयोपिअन बाळाबद्दल हजारो अक्षरशः प्रश्नांचा भडीमार केला.. आणी त्यांच्यावर आरोप लावण्यात आले कि त्यावेळी त्यांना त्या रांगणाऱ्या बाळाला वाचवण्याऐवजी तिचे छायाचित्र काढणे श्रेयस्कर वाटले. पण त्या लोकांना हे ठाऊक नव्हते कि त्या वेळी इथियोपियामध्ये अनेक संसर्गजन्य रोग पसरले होते आणी पत्रकारांनी जखमी किंवा आजारी इथियोपियाच्या नागरिकांपासून कटाक्षाने दुर रहावे. असा आदेश यु.नो ने दिला होता. आणी म्हणूनच केविन कार्टर त्या बाळाला उचलून कडेवर घेऊ शकले नाहीत.
केविन कार्टर त्या प्रतिष्टीत आणी मानाचा असा 'पुलित्झर' पुरस्काराचा आनंद बिलकुल नाही घेऊ शकले.. त्यांना सतत त्या इथीयोपियन बाळाची आठवण येत राहीली.. लोकांच्या प्रश्नांच्या भडिमारामुळे त्यांना बेचैन वाटू लागले. त्यांना त्यांचे मन खात राहिले कि त्यांनी त्या बाळाला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले नाहीत.. आणी हेही नाही पहिले कि ते बाळ जिवंत आहे कि नाही.. याच अपराधी भावनेने आणी सत-सत् विवेक बुद्धीमुळे ते एकलकोंडेपणाच्या दरीत लोटले गेले.. आणी हे छायाचीत्र 'न्युयोर्क टाइम्स' मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तीन महिन्यानंतर त्या महान छायाचित्रकाराने आपला जीवन प्रवास संपवला.
प्रतिक्रिया
12 May 2013 - 12:36 am | मोदक
केविन कार्टर यांनी खूप वेळ या दृश्याचे निरीक्षण केले आणी आपल्या कॅमेरात बंदिस्त केले. त्यानंतर त्यांनी त्या गरुडाला तिथुन हुसकून लावले.
या बद्दल एका डॉक्युमेंट्रीमध्ये वेगळी माहिती मिळाली होती. डॉक्युमेंट्रीबद्दल फारसे आठवत नाहीये. सापडली की सांगेनच!
त्यांना सतत त्या इथीयोपियन बाळाची आठवण येत राहीली..
"सुदान" मध्ये घेतला गेला होता तो फोटो.
आणी हे छायाचीत्र 'न्युयोर्क टाइम्स' मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तीन महिन्यानंतर त्या महान छायाचित्रकाराने आपला जीवन प्रवास संपवला.
बरोब्बर १ वर्ष चार महिने आणि एक दिवसांनी केवीन कार्टरने आत्महत्या केली.
अवांतर -
विकीच्या सौजन्यानुसार केवीन यांची सुसाईड नोट..
"I am depressed ... without phone ... money for rent ... money for child support ... money for debts ... money!!! ... I am haunted by the vivid memories of killings and corpses and anger and pain ... of starving or wounded children, of trigger-happy madmen, often police, of killer executioners ... I have gone to join Ken if I am that lucky."
या आधी सुचवलेले बदल थोडेफार प्रमाणात या लेखामध्ये उतरले आहेत - पुढील लिखाणास मनापासून शुभेच्छा!!
12 May 2013 - 10:13 pm | यशोधन वाळिंबे
अधिकच्या माहितीकरिता धन्यवाद.. :-) शक्य असेल तर त्या माहितीपटाचा दुवा येथे द्यावा..!
12 May 2013 - 3:11 am | इनिगोय
जालावर आणि विकिवर hooded vulture असा उल्लेख आहे. फोटोत दिसतंय ते गिधाड. गरुड नव्हे.
भाषांतर करताना तपशील बदलले जाऊ नयेत याची काळजी घ्या.
12 May 2013 - 10:16 pm | यशोधन वाळिंबे
अधिकच्या माहितीकरिता धन्यवाद.. :-)
12 May 2013 - 10:05 pm | शैलेन्द्र
चान चान.. नवीनच माहिती मिळाली, धन्यवाद..
12 May 2013 - 10:17 pm | यशोधन वाळिंबे
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. :-)
13 May 2013 - 6:08 am | स्पंदना
एकुण धागा तुम्ही काढलाय अन माहिती बाकी सगळेजण देताहेत अस दिसतय.
बाकि हाती राहिला धन्यवाद. तो तर तुम्ही देताहातच. देत रहा.
13 May 2013 - 10:20 am | मोदक
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. :-)
13 May 2013 - 10:24 am | आदूबाळ
ते "र..र..रिप्लायचा" राहिलं की...
13 May 2013 - 12:14 pm | इरसाल
धन्यवादाबद्द्ल धन्यवाद.
धन्यु. आव्जो हं, खाना खाके जाना हं !
13 May 2013 - 1:15 pm | प्यारे१
कुपोषण आणी उपासमारी अशा भयंकर गोष्टी जगातुनच नाहीशी व्हाव्या हीच आशा बाळगून ....
- असेच म्हणतो. सहमत प्यारे
इथिओपिया असो सुदान असो की मेळघाट, गिधाड असो की गरुड की माणूस वरचे चित्र बदलत नाहीये हे खरे दुर्दैव.
- सुन्न प्यारे.
धन्यवाद देणार तुम्ही, मग मी तुम्हाला आभारी म्हणणार त्यापेक्षा आत्ताच आपले धन्यवाद पोचले असं म्हणून आभार जाहीर करतो.
- आपातैचा भाव ;) प्यारे
13 May 2013 - 10:10 pm | दशानन
जेव्हा एखादा चांगला विषय नवोदित / कमी अभ्यास / विचार न करता केलेल्या लेखनामुळे मरतो तेव्हा मला खूप वाईट वाटते. थोडा अभ्यास करून तो विषय चांगला फुलवला असतात तर एक चांगला लेख वाचण्यास मिळाला याचा आनंद नक्कीच मिळाला असता असे राहून राहून वाटते.
14 May 2013 - 8:20 am | इनिगोय
अगदी सहमत.
वर मोदकने नोंदवलेले आणि इतरही तपशील चुकले आहेत, हे विकिचं पान पाहिलं की लक्षात येतं. या ढोबळ चुका टाळणं सहज शक्य होतं.
हे छायाचित्र खूपच गाजलेलं आहे. आणि केविन कार्टरची शोकांतिकादेखील. त्यामुळे आत्ता हा लेख प्रकाशित करण्यामागचा उद्देश लिहायला हवा होता. तिथली या छायाचित्राच्या वेळची आणि नंतरची/सध्याची स्थिती यावरही लिहिता आलं असतं.
किंवा छायाचित्रणाखेरीज अन्य कारणांनी प्रसिद्ध झालेले छायाचित्रकार ही थीम घेऊन लिहिता आलं असतं.
किंवा मग अशाच बहुचर्चित प्रकाशचित्रांचा आढावा घेता आला असता.
बहुधा लेखातून वाचणाऱ्यापर्यंत नेमकं काय पोचवायचं आहे, हे निश्चित न झाल्याने असं झालं असावं..
यशोधन, तुम्ही इथले प्रतिसाद पाॅझिटिव्हली घेता, हे तुमच्या लेखनातून दिसतं, म्हणून इतकं लिहिलं आहे. तुमच्या पुढील लेखनास शुभेच्छा. लिहित रहा.
14 May 2013 - 9:21 am | श्रीरंग_जोशी
याखेरीज इथे वाचनाचाही आनंद घ्या. आवडत्या विषयांच्या धाग्यावर विचार व्यक्त करा. जमल्यास चर्चांमध्ये सामिल व्हा.
विचारांचे खिडक्या-दरवाजे उघडा. ज्ञानाची, चांगल्या कल्पनांची नवी नवी दालने आपोआप खुली होतील, नवी क्षितिजे खुणावू लागतील.
पुढील वाटचालीस शुभेच्छा!!
14 May 2013 - 10:59 am | मोदक
विचारांचे खिडक्या-दरवाजे उघडा. ज्ञानाची, चांगल्या कल्पनांची नवी नवी दालने आपोआप खुली होतील, नवी क्षितिजे खुणावू लागतील.
श्रीयुत धन्या वाकडे (दवणे पाटील) यांच्या विचारमौक्तिकाच्या प्रतिक्षेत...
14 May 2013 - 12:09 pm | प्यारे१
दवणे असतील तर पाटील नाहीत नि पाटील नक्कीच दवणे 'नसतात'.
बाकी सहमत. ;)
14 May 2013 - 12:48 pm | मोदक
ओ तुम्ही गपा हो..
श्रीयुत धन्या वाकडे (दवणे पाटील) यांच्या विचारमौक्तिकांच्या शिंपल्यांचा उष:काल सुर्योदय होण्याआधीच...
(पुढचे सुचले की लिहीतो!)
14 May 2013 - 11:55 am | यशोधन वाळिंबे
@ aparna akshay, जरूर.. :-)
@ आदूबाळ, चूकभूल देणे घेणे.. :-)
@ प्यारे१, काहीच शिल्लक ठेवलं नाही प्यारे.. :-)
@ दशानन, इनिगोय, पुढच्या लेखात नक्की प्रयत्न करेन.. :-)
@ श्रीरंग_जोशी, जरूर.. :-)
14 May 2013 - 2:03 pm | आदूबाळ
ये बात, यशोधनबुवा! असाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवा! :)
14 May 2013 - 2:18 pm | मन१
कोई रोटी भी न दे सका
उस भूखे बच्चे को
तस्वीर उस भूखे की
मग लाखो कमा गयी!
14 May 2013 - 2:21 pm | गणपा
फार लांब कशाला जायचं आपल्याच देशात अर्धपोटी उपाशी तोंडें कमी नाहीत त्यातुन उद्भवणारे भुकबळी.
पण त्यावर उपाय काय?
आजच फेसबुकवर खालीली चित्रफीत पहाण्यात आली.
14 May 2013 - 2:26 pm | मोदक
धन्स रे गणपा.
शेवट शेवट धूसर झाल्याने दोनदा ही चित्रफीत बघावी लागली.
__/\__