कर्नाटक च्या जनतेने कोंग्रेस ला स्पष्ट बहुमत दिले आहे. सत्ताधारी भा.ज.प. आणि दोन प्रादेशिक पक्ष सत्ते पासून संपूर्ण बाजूला राहणार आहेत. भाजप चे दक्षिणायन रोखले गेले आहे की संपुष्टात आहे आहे ते पुढच्या ५ वर्षात स्पष्ट होईल. कुमारस्वामी हया अत्यंत संधीसाधू नेत्याला सत्ता स्थापनेमध्ये कोणतेही स्थान उरलेले नाही हे चांगले झाले. येडडीच्या गर्वाचे घर बेचिराख झाले आहे. निर्नायकी कॉंग्रेसचे विजयाबद्दल आणि येडडीचे भाजपा ला कर्नाटकात कमकुवत करण्याबद्दल अभिनंदन.
ही निवडणूक भ्रष्टाचाराच्या मुद्यावर लढवली गेली होती असे म्हणतात. तसे असते तर काँगेस चा विजय अशक्य होता.
काँगेस मध्ये भाराष्टाचार हा वरिष्ठ नेत्यांना स्वीकारार्ह आहे तर भाजपा मध्ये स्वीकारार्ह नाही. भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नितीन गडकरी आणि येडीयुरप्पा या दोनही नेत्यांना पद-भ्रष्ट करण्यात अडवाणी यांची निर्णायक भूमिका होती. भ्रष्टाचारा बद्दल वाजपेयी आणि अडवाणी हया जेष्ठ नेत्यांनी कधीही तडजोड केलेली नाही. दुर्दैवाने आज अडवाणी यांची पक्षावरची पक्कड कमी झाली आहे. भ्रष्ट आणि मुजोर येडीयुरप्पा यांना हटवण्यात झालेली अक्षम्य दिरंगाई हया निकालांच्या रुपाने दिसली आहे. येडीयुरप्पा यांनी कानडी जनतेला गृहीत धरून राजकारण केले. जनतेला असे गृहीत धरणे हे भाजप च्या पराभवाचे आणखी एक महत्वाचे कारण मानायला हवे.
कानडी जनतेने विद्यमान भ्रष्ट सरकारला नाकारून कॉंग्रेसला कौल दिला आहे. ज्या पद्धतीने केंद्रात भ्रष्टाचाराची साथ पसरली आहे ती पाहता कानडी जनतेला अजून ५ वर्षे आर्थिक गैरव्यवहारापासून मुक्ती मिळेल असे दिसत नाही .
गेल्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये संवेदनशील सरकारे परत विजयी झाली आणि असंवेदनशील सरकारे बदलली गेली. हया वर्षीच्या पहिल्या निवडणुकीने सत्तांतर घडवले आहे. आता वर्ष अखेर होणाऱ्या निवडणुकांचे काय होते त्याची उत्सुकता लागून राहील. लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका त्या बरोबर (पूर्वीच ?) होतील असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. आपल्याला काय वाटते ?
प्रतिक्रिया
8 May 2013 - 9:50 pm | आशु जोग
जोशी भाजपचे हितचिंतक दिसताहेत
नाही साहजिक आहे ते.