पाकिस्तान तरणार का?

lakhu risbud's picture
lakhu risbud in काथ्याकूट
8 May 2013 - 2:14 pm
गाभा: 

तारेक फ़तह फाळणीच्या वेळी भारतातून यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थलांतरित झाले त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला.शिक्षण पूर्ण झाल्यावर पत्रकार म्हणून काम करण्यास सुरवात केली परंतु त्यांच्या सेक्युलर दृष्टीकोना मुळे आणि धर्मांध प्रवृत्तींना विरोध केल्यामुळे त्यांना आधी सौदी अरेबिया आणि नंतर कॅनडा मध्ये स्थलांतरित होणे भाग पडले
त्यांची Chasing a Mirage: The Tragic Illusion of an Islamic State आणि
The Jew Is Not My Enemy: Unveiling the Myths that Fuel Muslim Anti-Semitism
हि पुस्तके प्रसिद्ध आहेत.या पुस्तकांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
याच कारणांमुळे पाकिस्तान मधून कॅनडा मध्ये स्थलांतरित झालेले जे अनेक विचारवंत जसे डॉ बलंद इक़्बाल ,ताहीर गोरा आदि.कॅनडामधून पाकिस्तान आणि मध्य पूर्वेतील घडामोडींवर भाष्य ,चर्चा करणारी Rawal TV नावाची वृत्तवाहिनी आहे.त्या वाहिनीवरील bilatakalluf(ताहीर गोरा )आणि password(डॉ बलंद इक़्बाल)या कार्यक्रमामध्ये will pakistan survive विषयावर तारेक फतह यांनी जे विचार मांडले आहेत त्यांची काही झलक

>>>पाकिस्तानचा जन्म ज्या द्विराष्ट्र सिद्धांत (two nation theory) मुळे झाली तो सिद्धांतच कमकुवत आणि खोट्या पायावर उभा आहे ,हिंदुस्ताना शिवाय जगात मुसलमानांसाठी जगात चांगली भूमी नाही(फाळणीपूर्व अखंड भारत),इराण ,तुर्कीस्थान आणि अरब देश पाकिस्तान आणि तेथील मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे लेखतात.
>>>G.M Sayyad आणि इतर अनेक नेते ज्यांच्या मुळे पाकिस्तान बनला त्यांनीच कबुल केले कि हि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती .
>>>पाकिस्तानामुळेच अल कायदा आणि तालिबान चा जन्म झाला ,9-11 चे हल्ले झाले ,भारतात 26-11 झाले. 1971 च्या लढाईमध्ये पाकिस्तान नावाचा देश समाप्त झाला,हा आत्ता कोणतातरी दुसरा प्रदेश आहे ज्याला पाकिस्तान हे नाव दिले गेले .
>>>इम्रान खान facist प्रकारच्या मनोवृत्तीचा आहे त्याला तेथील मूलतत्ववाद्याचा पाठींबा आहे
cult worship प्रकारची प्रवृत्ती भयानक आहे तो त्याचा पद्धतीने वागत आहे ज्या प्रमाणे हिटलर,मुसोलिनी वागले.खोटारडेपणा यांच्या रक्तातच आहे त्यांना आपण खोटे कधी बोलतोय हे पण कळत नाही.
>>>मुशर्रफ हा तर comedian आहे
>>>पाकिस्तानात कोणतीही विधायक संस्था नाही ज्या आहेत त्यांचा उद्देश एकच,कमी वेळात जास्तीत जास्त पैसा मिळवायचा आणि कॅनडा मध्ये पासपोर्ट(विकत घेऊन)स्थायिक व्हायचे,१ कोटी रुपयामध्ये पाकिस्तानात तुम्ही कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकता अगदी अणुबॉम्ब सुद्धा.
>>> हुसेन शहीद सुऱ्हावर्दी (त्या वेळचे बंगाल चे मुख्यमंत्री)जे पाकिस्तानचे पंतप्रधान होण्यास योग्य होते (कारण पाकिस्तानमध्ये बंगाल सर्वात मोठा प्रांत होता )त्यांना पाकिस्तानात येण्यास बंदी घातली. मोहम्मद अली जीनांना या फुटीरतावादा साठी हैद्राबाद संस्थांन च्या माध्यमातून इंग्रज सुमारे सहा लाख रुपये महिना देत होते,नंतर या लोकांनी मोहम्मद अली जीनांना आजारपणात अशा ठिकाणी पाठवले जिथे डॉक्टर उपलब्ध नाही,अर्थातच मरण्यासाठी.
>>>डरपोक पाकिस्तान आर्मी जनरल फक्त आपल्या बायकांना आणि सैन्याला,निष्पाप बलोच,बंगाली मारू शकतात भारतीय सैन्यापुढे नेभळटपणे शरण येतात.जो पाकिस्तानात ठीकठाक उर्दू,इंग्लिश बोलू शकतो लोक त्याला सुशिक्षित समजतात.
>>>मी एक भारतीय आहे ज्याचा जन्म पाकिस्तानात झाला माझे सर्व पूर्वज भारतीय आहेत.
तुम्ही जरी आत्ता पाकिस्तानी,बांगलादेशी,श्रीलंकन किवा नेपाली असा परतू आपण सगळे अशोका च्याच भूमी चे पुत्र आहोत,आम्ही दारा-शुकोह चे वंशज आहोत.आपली मुळे अशा पंजाब मध्ये आहेत जिथल्या सर्वात मोठ्या नेत्याला (रणजितसिंह) ला एका पाताळयंत्री माणसाने औरंजेबाने मारले.भारतातील मुसलमानांना हे सांगण्याचा पर्याय आहे कि आपण दारा-शुकोह चे नाही तर औरंगजेबाचे वंशज आहोत.ज़े औरंगजेबाला मानतात ते पाकिस्तान या कल्पनेवर विश्वास ठेवतात.आम्ही दारा-शुकोह चे वंशज मानतात आहोत जे माणुसकी,इस्लामी विचारधारा,बुले शाह,अमीर खुस्रो यांना मानतात.
>>>मी स्वतः कसूर (पाकिस्तानातील एक शहर ) मधील एक जमीनदार आहे पण असे मानतो कि लाहोर आणि कसूर हि रामाच्या लव आणि कुश मुलांची शहरे आहेत,ज्यातून पाकिस्तान्यांनी हिंदूंना हुसकावून लावले.
>>>ब्रिटन आणि अमेरिका यांच्या सोव्हिएत रश्या आणि कम्युनिस्टांना ला रोखण्याच्या (भीतीच्या) धोरणातून पाकिस्तानचा जन्म झाला आहे.इस्लाम च्या हक्काची भूमी म्हणून नाही.
>>>पाकिस्तानला शिव्या देणारे त्यांच्याच लष्कराच्या अधिकाऱ्यांची मुले आहेत जे कॅनडा आणि अमेरिका च्या विसा साठी प्रयत्न करतात.
>>>( अशा विचारसरणीचे) भारत आणि पाकिस्तानमधील मुसलमान अशा अरबस्तानाच्या शोधात आहेत जिथला अरब म्हणतो आमच्याकडे येऊ नको.जो त्यांच्यावर (थुंकतो)हाकलतो ते त्याच्या मागे जातात आणि जे त्यांच्याकडे प्रेमाचा हात देतात त्यांना ते शत्रू म्हणतात.
>>>ज्या प्रांतात मुसलमानांना स्वातंत्र्य (भारत)आहे ते यांचे दुश्मन आहेत आणि जिथे त्यांना स्वातंत्र्य नाही(चीन आणि अमेरिका) हे यांचे दोस्त आहे.
>>>पाकिस्तानला वाचवण्याचा एकच मार्ग आहे लष्कराला पूर्णतः कमी करणे कॅनडा सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या कितीतरी पट आहे तरीही या देशांकडे लष्कर नाही,भारत पाकिस्तानवर कधीही हल्ला करणार नाही,त्यांना असे काही करायचे असते तर त्यांनी १९७१ च्या युद्धातच तसे केले असते.

पूर्ण मुलाखतीची लिंक

आणि password या डॉ बलंद इक़्बाल host असणाऱ्या कार्यक्रमाची लिंक

आणि Ex-Pakistan Air Force Air Vice Marshal अबिद राव यांच्या मते पाकिस्तानने विनंती जरी केली भारताला कि आमच्या वर ताबा मिळवा तरी भारत त्याला नकार देणार.

पाकिस्तानमधील सामान्य जनता भारता बद्द्ल काय विचार आणि का करते ते या मुलीच्या बोलण्यातून समजेल. विषेतः शेवटपर्यंत पाहिल्यावर.

पाकिस्तानी वृत्तवाहिन्या आणि सामान्य जनता कशी भारताच्या विचाराने पछाडलेली आहे ते या दुव्यावरून कळेल कार्यक्रमात नेहमी भारताच्या बद्दल चर्चा असते

अवांतर:जर व्हिडीओ उतरवून घ्यायचे असतील तर हे त्यासाठी उत्तम आहे

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 May 2013 - 3:33 pm | मुक्त विहारि

नियमाप्रमाणे कटू.

अग्निकोल्हा's picture

8 May 2013 - 6:27 pm | अग्निकोल्हा

भारत पाकिस्तानवर कधीही हल्ला करणार नाही... हे त्याच एकमेव वाक्यच पुरेसं आहे, त्याचा वास्तववादी द्रुश्टीकोन स्पश्ट करायला.

पैसा's picture

8 May 2013 - 6:31 pm | पैसा

अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत!

पिंपातला उंदीर's picture

8 May 2013 - 6:31 pm | पिंपातला उंदीर

१ कोटी रुपयामध्ये पाकिस्तानात तुम्ही कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकता अगदी अणुबॉम्ब सुद्धा.

अंबानी आणि टाटा याना सांगून पाकिस्तानचे सगळे अणू बॉम्ब विकत घ्यावेत का? नाही एक मोठा प्रश्न नाहीसा होईल ; )

अनिरुद्ध प's picture

8 May 2013 - 7:15 pm | अनिरुद्ध प

सध्या आपल्या देशातील स्थिती एव्हडी विदरक आहे की ही तुलना कितीहि चान्गली असली तरी सद्य परिस्थितीत दोन्ही देश एकाच माळेचे मणी आहेत असे वाटते,त्यातल्या त्यात भारताची बाजु थोडी उजवी आहे हेही नसे थोड्के.

lakhu risbud's picture

8 May 2013 - 11:22 pm | lakhu risbud

परिस्थिति विदारक आहे हे सत्य, पण ही परिस्थिति लोकनियुक्त
सरकार बदलू शकते हा विश्वास अणि हि स्थिती भारतातच आहे.
दोन्ही देश एकच माळेचे मनी म्हणणे जरा अतिशयोक्त वाटत नाही का ?
तारेक फतेह यांचे दोन्ही व्हिडीओ पाहिल्यावर याची खात्री पटेल.

नाही आपण माझे अर्धे वाक्य घेतलेत्,मी पुढे असेही लिहिले आहे की भारताची बाजु थोडी उजवी आहे.पण सद्य स्थितीतील लोकनियुक्त सरकार कडुण ही अपेक्शा करणे हाच मोठा विनोद आहे,आणि जनतेचा कौल कुणाच्या बाजुने जातो यावर हे अवलम्बुन असते.

भारत पाकिस्तानवर कधीही हल्ला करणार नाही...

हा हा हा! कोणी सांगितलं तुम्हाला? असो.

बाकी लेखातील अनेक तपशील रोचक आहेत तर काही निराधार आहेत. चालायचेच! असो.

lakhu risbud's picture

9 May 2013 - 11:26 am | lakhu risbud

आपला इतिहास हेच सांगतो,हल्ला करायचा असता तर कारगिल,संसदेवरील हल्ला,मुंबई २६-११ तेव्हांच केला असता. केला नाही याला आपले तेव्हाचे निर्णय न घेण्याचा क्षमता नसणारे नेतृत्व नसून पाकिस्तानवर हल्ला करून भारता साठी अमेरिके प्रमाणे अफगाणिस्तान किवा इराक तयार न करणे हा विचार असू शकत नाही का ? तसेच तेल समृद्ध मध्य पूर्व देशांना न दुखावणे (कारण पाकिस्तानी लगेच इस्लाम खतरेमे अशी आरोळी ठोकून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणार).भारताचा विरोध पाकिस्तानला नसून पाकिस्तानातील भारत विरोधी शक्तींना आहे. आधीच अंतर्गत यादाविसारखी स्थिती कायम असते तेव्हा हल्ला करून त्या सगळ्यांना एकत्र आणण्यात काय अर्थ आहे ? तो देश तिथल्या अंतर्गत कारणांमुळेच खिळखिळा झालेला आहे आणि तुटु शकतो .पहिल्यांदाच तिथे लष्कराने लोकनियुक्त सरकारला एवढ्या दीर्घ काळासाठी सत्तेवर राहून दिले आहे,कदाचित माध्यमांच्या सहज उपलब्धते मुळे जगात काय चालले(विशेषतः भारतात ) आहे ते तिथल्या सामान्य जनतेला लगेच कळते त्यामुळे असेल म्हणा परंतु लष्कराला सत्तांतर सहज शक्य वाटले नसावे.११ मे ला होणाऱ्या निवडणुकांमधून नवाझ शरीफ यांच्या मुस्लिम लीग ला सत्ता मिळाली तर परिस्थिती मध्ये सुधारणा होणार अशी आशा.

:) अहो मग वाक्य आतापर्यंत केला नाही असे हवे. यापुढे / कधीही करणार नाही कशावरून?

पिंपातला उंदीर's picture

9 May 2013 - 10:54 am | पिंपातला उंदीर

+११११११११ आपल्याला ऐकायला आवडतात अशा गोष्टी इथे आहेत म्हणून हा लेख आवडण्याची शक्यता जास्त : )

साहेब हा लेख कोणी संघीय/सेना कार्यकर्त्याने लिहिलेला नाहीये तर ज्याचा जन्म आणि शिक्षण पाकिस्तानात झाले त्यांनी लिहिलेला आहे.आणि त्यामुळेच हे मुद्दे वेगळे ठरत नाहीत का?

आशु जोग's picture

10 May 2013 - 12:09 am | आशु जोग

लेख कोणी संघीय/सेना कार्यकर्त्याने लिहिलेला नाहीये

उगाच सेना कार्यकर्त्याला संघाच्या बरोबर बसवू नका...

सेना हा राजकीय पक्ष आहे. म्हणूनच त्यात अनेक दुर्गुण आहेत.
ती चर्चा आत्ता नाही करत.

पाकिस्तान विरोध हा दोन्ही गटांकडे सारख्याच तीव्रतेचा मुद्दा आहे त्या अनुषंगाने म्हंटले होते. संघाला आणि शिवसेनेला एकाच तराजूत तोलल्याने राग आला असल्यास क्षमस्व.

आशु जोग's picture

12 May 2013 - 12:20 am | आशु जोग

पाकमधील वारकर्‍यांचा फोटो

पाहूनच लक्षात येतय हे लोक पारमार्थिक असले पाहीजेत..

lakhu risbud's picture

12 May 2013 - 5:57 pm | lakhu risbud

पाकिस्तानात ८० टक्क्यांपेक्षा जास्त अभूतपूर्व असे मतदान झाले आणि तेही दहशतवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता. तिथल्या जनतेला लोकशाही आणि बदलत्या काळाचे संकेत आत्ता कळाले म्हणायचे.इतर राजकारण्यांच्या तुलनेत मवाळ आणि पुरोगामी दृष्टी असणार्या नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गट(पीएमएल-एन) पक्षाकडे सत्ता येणार.
चला आता शेजाऱ्याच्या घरात शांतता येण्याची लक्षणे असल्याने तो आता आपल्याला पण शांतपणे जगू देवो हीच अपेक्षा !