गाभा:
ताजमहाल कसा बांधला, ?
तो वेदकालीन आहे काय ? @)
गेली दोनशे वर्षे ताजमहालविषयी अनेक दंतकथा पसरल्या आहेत. त्या सर्वांत एक ब्रह्मवाक्य मात्र कायम असते, ते म्हणजे `बांधकामासाठी २० हजार माणसे २२ वर्षे सतत काम करत होती.' आज ही गोष्ट जगातील सगळया अबालवृद्धांना ठाऊक आहे. साहजिकच प्रश्न पडतो की, हे आकडे आले कोठून
ब-याच दिवसापूर्वी मला एक इ-मेल आला होता, त्यात ताजमहालाबद्दल बरेच काही लिहिले होते, त्याला छायाचित्रांची जोड होतीच. असेच इ-मेल्स ब-याच जणांना गेली असतील, त्यात पुरातत्व खात्यातील लोकसुद्धा असतील... मलासुद्धा असा प्रश्न पडतो की जर इतके सबळ पुरावे असतीलच तर मग ते प्रकाशात का येत नाहीत? कोणी संशोधक यात का लक्ष घालत नाहीत?? हिन्दुत्ववादी संघटना कुठे गेल्या????
प्रतिक्रिया
10 Jul 2008 - 5:06 pm | विजुभाऊ
ताजमहाल हे एक हिन्दु मन्दीर होतेम्हणे. त्यात काही खोल्या लोकांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
बाबरी मशीद पाडणारे शूर वीर आणि त्याना त्या वेळी पाठिशी घालणारे याना बहुतेक ही माहिती नसावी.
असो.राजकारण आणि सत्तकारण यासाठे जनसामान्याना भुरळ पाडुन वापरणार्या लोकाना याचे सोयरे सूतक नसते.
आणि सोयीचा इतिहास समजावणारे इतिहासकार हे गाडले गेलेले मुडदे सोयीने उकरून काढतात आणि पुन्हा गाडगात
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
10 Jul 2008 - 8:11 pm | अन्या दातार
अधिक माहितीकरता पु. ना. ओक यांचे ताजमहाल हे तेजोमहालय आहे हे पुस्तक वाचा. त्यात अनेक प्रश्नांचा उहापोह केला आहे.
आपला,
(वाचक) अन्या दातार
मी इथे मुळातच फार कमी वेळ असतो, त्यामुळे दुसर्या शाखेची गरजच नाही
10 Jul 2008 - 8:23 pm | सुनील
अन्या दातार - अधिक माहितीकरता पु. ना. ओक यांचे ताजमहाल हे तेजोमहालय आहे हे पुस्तक वाचा. त्यात अनेक प्रश्नांचा उहापोह केला आहे.
विजुभाऊ - सोयीचा इतिहास समजावणारे इतिहासकार हे गाडले गेलेले मुडदे सोयीने उकरून काढतात आणि पुन्हा गाडगात
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
10 Jul 2008 - 8:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ताजमहाल कसा बांधला, ?
तो वेदकालीन आहे काय ?
इतिहासातील घोडचुका यात चुकलेली संशोधनपद्धत या तिस-या प्रकरणात पु. ना. ओकांनी, औरंगजेबाने शहाजहानास जे पत्र १६५२ मधे लिहिले आहे त्यात शहाजहानाने ताजमहाल बांधला नसल्याचे खुद्द मोगल दरबारात पुरावा असतांना इतिहासकार चूक लिहितात असे त्यांचे म्हणने आहे. त्याच बरोबर पाच हजार स्त्रियांचा जनानखाना बाळगणारा शहाजहान मुमताझच्या प्रेताखातर एवढी सुंदर व भव्य वास्तू बांधणे शक्यच नाही असे म्हणतात.
त्यामुळे वरील प्रश्नांची उत्तरे आपल्याला काही नक्की सांगता येणार नाही बॊ :(
10 Jul 2008 - 10:10 pm | ऋषिकेश
कोणी बांधला.. कस बांधला हे प्रश्न निरर्थक आहेत...
पण आपण त्या असामान्य वास्तुची वाट लावत आहोत हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
11 Jul 2008 - 12:16 am | प्राजु
हृषिकेशच्या मताशी १००% सहमत आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Jul 2008 - 9:04 am | ध्रुव
पण आपण त्या असामान्य वास्तुची वाट लावत आहोत हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे!
+1
--
ध्रुव
11 Jul 2008 - 11:53 am | रम्या
कोणी बांधला.. कस बांधला हे प्रश्न निरर्थक आहेत...
हे कसे काय बुवा? स्पष्टीकरण मिळाले तर बर होईल. हे प्रश्न निरर्थक आहेत हे तुमचं वैयक्तिक मत आहे का?
मिपावर अनेक जण अनेक प्रश्न उपस्थित करत असतात. त्यावर चर्चा ही होत असते. निलेश आबांनी असाच एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर चर्चा होणं सहाजिक आहे. पण चर्चेचा विषयच निरर्थक आहेत हे तुम्ही कसं काय म्हणू शकता?
12 Jul 2008 - 12:34 pm | विसोबा खेचर
पण आपण त्या असामान्य वास्तुची वाट लावत आहोत हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे!
सहमत आहे!
12 Jul 2008 - 5:13 pm | विकास
पण आपण त्या असामान्य वास्तुची वाट लावत आहोत हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे!
अगदी सहमत! पण त्याचबरोबर अजून अनेक गोष्टींची पण...
12 Jul 2008 - 12:04 pm | अर्चिस
अगदि बरोबर. कितीही वाद घातले तरीही काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. अशा वेळी उगीचच मेंदुचा भुगा करण्यापेक्षा त्या वास्तुचे जतन कसे करता येईल ह्याचा विचार करणे आणि त्यानुसार पावले उचलणे हेच जास्त उचित आहे.
(ताजमहालप्रेमी) अर्चिस
13 Jul 2008 - 10:51 pm | वेताळ
पण आपण त्या असामान्य वास्तुची वाट लावत आहोत हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे!
काय वाट लावली आहे. ?