दम आलू काश्मिरी

Primary tabs

रेवती's picture
रेवती in अन्न हे पूर्णब्रह्म
1 May 2013 - 7:18 am

मंडळी, सध्या या विभागात आपण काश्मिरी पदार्थांचा आस्वाद घेत आहोत. 'दम आलू काश्मिरी' हा पदार्थ देण्याचे ठरवले तेंव्हा पदार्थाची जी चव जिभेवर होती त्यापेक्षा मूळ पदार्थ वेगळ्याप्रकारे कसा केला जातो हे लक्षात येण्यासाठी बर्‍याच पाककृती जालावर व पुस्तकात पाहिल्या. मूळ 'दम आलूच्या' अगदी जवळ जाणारी कृती शेफ संजीव कपूर यांची आहे. त्यात गरजेनुसार थोडेफार बदल करून कृती येथे देत आहे.

साहित्य: छोटे बटाटे ४०० ग्रॅम, १ टेबलस्पून बडीशेपेची पूड, १ टेबलस्पून काश्मिरी मिरचीचे तिखट, एक टीस्पून सुंठपूड, मध्यम वाटीभर दही, २ वेलदोडे, तीन लवंगा, इंचभर दालचिनीचा तुकडा, ४ मिरे, फोडणीसाठी शहाजिरे व हिंग, मीठ, बटाटे तळण्यासाठी तेल, पाणी.

कृती: बटाटे न फुटतील असे उकडून घ्यावेत. तळणी तापत घालावी. बटाटे सोलून तळून घ्यावेत. आता कढईत फोडणीसाठी अगदी चमचाभर तेल घ्यावे. शहाजिरे व हिंगाची फोडणी करावी. चमचाभर पाणी घालावे म्हणजे फोडणी जळणार नाही. नंतर तिखट, अख्खे मसाले, बडीशेपेची पूड, सुंठपूड घालून परतावे. वाटीभर दही घालून तेल सुटेपर्यंत परतावे. मीठ घालावे. आता त्यात दोन कप पाणी घालून उकळी येऊ द्यावी. नंतर तळलेले बटाटे सोडावेत. झाकण ठेऊन १५ मिनिटे मध्यम आचेवर भाजी उकळू द्यावी. चविष्ट दम आलू काश्मिरी तयार आहे.

a

टीपा: १) मूळ कृतीमध्ये ५०० ग्रॅम बटाटे घेतले आहेत, जे मसाल्याच्या मानाने मला जास्त वाटले म्हणून येथे ४०० ग्रॅम घेतले आहेत.
२)दही थोडे जास्त घेऊन चव आवडली म्हणून मूळ कृतीपेक्षा जास्त घेतले आहे.
३)बटाटे घातल्यानंतर १५ मिनिटे उकळणे आवश्यक आहे. त्याने चव जास्त चांगली आली. तळलेल्या बटाट्याचे तेल भाजीत येते व भाजी तेलकट वाटते म्हणून फोडणीसाठी तेल थोडे कमी घ्यावे.
४)गोल बटाटे मिळत असल्यास वापरावेत. मला ते मिळाले नाहीत. मोठ्या बटाट्यांच्या फोडी करूनही आपण वापरू शकतो.

प्रतिक्रिया

मनोज श्रीनिवास जोशी's picture

1 May 2013 - 7:41 am | मनोज श्रीनिवास जोशी

काश्मिरी पदार्थ गोड गोड असतात असा एक समाज आहे त्यामुळे ही पाकृ जरा हटके वाटली.आवडली.

श्रीरंग_जोशी's picture

1 May 2013 - 7:45 am | श्रीरंग_जोशी

दम आलू बरेचदा विवाह सोहळ्यांतील स्वरूची भोजनात खायला मिळतात. पण मोठ्या प्रमाणात बनत असल्यामूळे बरेचदा उकडलेल्या बटाट्यासारखी चव लागते म्हणून मला कधी फारशी आवड निर्माण झाली नाही.

सदर पाकृ मात्र रोचक दिसत आहे. फोटो बघून तोंडाला पाणी सुटले.

प्रभाकर पेठकर's picture

1 May 2013 - 9:58 am | प्रभाकर पेठकर

वॉव! अतिशय चविष्ट पाककृती आणि आकर्षक छायाचित्र. अभिनंदन.

दम आलू काश्मिरीच्या अनेक पाककृती आहेत. माझी पद्धत थोडी वेगळी आहे. पण आता ही पाककृतीही नक्कीच शिकून घेईन.

सुहास झेले's picture

1 May 2013 - 10:03 am | सुहास झेले

मस्त...तोंडाला झरे फुटले :) :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2013 - 10:28 am | अत्रुप्त आत्मा

लै आवडती डिश हाय....मस्त :)

मी पण वाचलेय कॄती पण बटाटा फारसा आवडत नाही घरच्याना! आणि त्याला मीठ वगैरे लागेल का असे वाट्ते. बाकी तुझी भाजी बघून करण्याचा मोह होतोय!

विसोबा खेचर's picture

1 May 2013 - 11:04 am | विसोबा खेचर

सुरेख...!

सस्नेह's picture

1 May 2013 - 11:07 am | सस्नेह

लहान बटाटे बाजारात खूपदा पाहिलेत पण त्याचं काय करायचं माहित नव्हतं . आता दम आलू करून बघते.
या भाजीला ग्रेव्ही जास्त दिसत नाही. आमच्याकडे ग्रेव्हीच जास्त लागते.

त्रिवेणी's picture

1 May 2013 - 11:18 am | त्रिवेणी

अजून पर्यन्त खाल्ली नाही पण आता सुट्टीत करून बघणार.

दिपक.कुवेत's picture

1 May 2013 - 11:27 am | दिपक.कुवेत

छान आहे कि सोपी, सुटसुटित आणि पटकन होणारी पाकॄ. असं एकलय कि तळलेले आख्खे बटाटे ग्रेव्हित घालण्याआशी फोर्कने टोचे मारुन सोडावेत जेणेकरुन मसाला/ग्रेव्हि पार आतपर्यत मुरते.

प्रभाकर पेठकर's picture

1 May 2013 - 12:52 pm | प्रभाकर पेठकर

फोर्कने टोचे मारुन सोडावेत

बरोबर. बटाटे तेलात न तळता तुपात तळल्यास जास्त चांगली चव येते. तळण्याआधी फोर्कने टोचे मारावेत आणि तळताना मधे मधे पाण्याचा हबका मारावा म्हणजे तुप आत शिरुन बटाटा आंत पर्यंत 'तळला' जाऊन जास्त चविष्ट होतो.

दीपा माने's picture

30 May 2013 - 6:48 am | दीपा माने

अगदी हेच म्हणते.

गणपा's picture

1 May 2013 - 12:53 pm | गणपा

तळलेले आख्खे बटाटे ग्रेव्हित घालण्याआशी फोर्कने टोचे मारुन सोडावेत जेणेकरुन मसाला/ग्रेव्हि पार आतपर्यत मुरते.

असेच म्हणतो.
फोटो टेंम्टींग आहे आणि पाकृ ही सुटसुटीत, मस्त :)

रामदास's picture

1 May 2013 - 1:17 pm | रामदास

र्‍हायले असतील .तशी रवतीतै टोचे मारण्याला विसरण्यातली नाहीयै !!

इरसाल's picture

3 May 2013 - 2:17 pm | इरसाल

तीन जेष्ठ आणी श्रेष्ठ लोक टोचे मारायला सांगत आहेत हे पाहुन जीव गुदमरला.

इरसाल's picture

1 May 2013 - 12:22 pm | इरसाल

बटाटा म्हणजे जीव की प्राण,कुठल्याही भाजीत, पदार्थात अवढच काय मटण्/चिकन मधेही टाकतो.
माझ्या मुलीला आवडणारी एक छोटीशी रेसेपी.

बटाटे किसुन घ्यावे, नॉनस्टिक पॅन मधे थोडेसे बटर टाकुन सगळ्या तळाला लागेल असे फिरवावे.मग त्यात हे किसलेले बटाटे टाकुन त्यावर चवीनुसार मीठ टाकुन झाकण ठेवावे. व्यवस्थित शिजले की झाकण काढावे वरची बाजु फिक्कट पांढुरकी व खालील बाजु सोनेरी व कुरकुरीत होते खाण्याअगोदर त्यावर पिझ्झावर टाकतो ते ओरॅगअ‍ॅनो टाकुन खावे.

स्पंदना's picture

1 May 2013 - 12:24 pm | स्पंदना

व्वाह!!
अग सांगायच राहिले, तुझी मेथीगोळे करुन पाहिली अगदी मस्त झाली. एक मिपाकर फॅमीली होती नेमकी त्या दिवशी. सगळ्यांना आवडली. आता हे पण करुन पहाते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2013 - 12:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

करायला साधा सोपी पण दिसायला सुरेख आणि खायला चटकदार पदार्थ दिसतोय ! चव घेतलीच पाहिजे !!

सर्वसाक्षी's picture

1 May 2013 - 1:28 pm | सर्वसाक्षी

दमदार पाककृती

मस्त कलंदर's picture

1 May 2013 - 2:08 pm | मस्त कलंदर

मस्त दिसताहेत दम आलू. मी कोणतीही पाकृ करताना तिचे चार-पाच प्रकार वाचते आणि मला जे पटेल ते तसे फ्युजन करते. मी एके ठिकाणी बटाटे तळण्याऐवजी मायक्रोवेव्ह मध्ये टोचे मारून वफवून घेतले तरी चालतील असं लिहिलं होतं. तो प्रकारही चवीला चांगला झाला होता.

मस्त्च रेवती.... एकदम सही दिसतायत दम आलु... मला बटाटा जास्त आवडत नाही, त्यामुळे कधी करुन नाही बघितली आणि कधी खाल्ली पण नाहिये. फोटो बघुन एकदा ट्राय करायला पाहिजे वाटते. :)

अभ्या..'s picture

1 May 2013 - 3:00 pm | अभ्या..

अरेवा रेवतीतै. मस्तच.
अशी बिनकांद्याची अन गवताळ रेशिपी आली की मन असं भरुन येतं की बस्स. :)
लै भारी एकदम. धन्यवाद.

चविष्ट पाककृती.फोटो मस्त आहे.

फटू अन वर्णन तितकेच चविष्ट!!!! लय भारी.

एक तद्दन अज्ञानी प्रश्नः ह्या डिशचे नाव दम आलू आहे, बर्‍याचदा आलू का दम या नावानेही बटाट्याची भाजी मिळते. तिच्यात अन हिच्यात नक्की फरक काय असतो म्हणे?

पैसा's picture

1 May 2013 - 6:09 pm | पैसा

सोपी सुटसुटीत पाकृ. काश्मिरी पदार्थांमधे बडिशेप आणि सुंठपूड असे सौम्य मसाले असतात आणि ते पदार्थ अतिशय चविष्ट असतात.

आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद मंडळी!
मनोज जोशी, उपहारगृहात मिळणारा दम आलू जरा गोडसर आणि ग्रेव्हीवाला असतो. ही भाजी तयार झाल्यावर तुम्हाला पडले ते सगळे प्रश्न मलाही पडले पण चव छान, मसालेदार होती.

दिपकजी, पेठकरकाका, गणपा, बटाटे तळण्याआधी फोर्कने टोचून घेतात पण हे बटाटे अगदी छोटे होते म्हणून तसेच तळले.

श्रीरंगपंत, या मसाल्यात ५०० ग्रॅम बटाटे घातले असता भाजी बेचव लागली, म्हणून त्याचे प्रमाण बदलून ४०० ग्रॅ. केले. दही थोडे वाढवले.

बॅटमॅन, आलू का दम हे नाव पहिल्यांदाच ऐकते आहे. ही भाजी शाही करण्याची एक पद्धत आहे. त्यात थोडे मोठे बटाटे उकडून, पोखरून, आत नटस् व खव्याचे/पनीरचे सारण भरतात.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार. रामदासांचे स्पेशल आभार. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे धाग्याला शोभा आलीये. ;)

बॅटमॅन's picture

1 May 2013 - 6:18 pm | बॅटमॅन

माहितीकरिता धन्यवाद :) मी खाल्लेला आलू का दम म्हंजे स्टफ्ड बटाटा नव्हता. तुम्ही दिलेल्या डीटेलनंतर लक्षात आले.

सानिकास्वप्निल's picture

1 May 2013 - 6:19 pm | सानिकास्वप्निल

छानचं दिसातायेत दम आलू .
मला बटाटा खूप आवडतो व पाकृ पण सोप्पी दिसतेय त्यामुळे ह्या पध्दतीने करून बघेन.
फोटो ही सुरेख गं :)

खादाड's picture

1 May 2013 - 6:30 pm | खादाड

आज कामगार दिवसाच्या निमीत्ताने करुन पाहुन खाण्यात आला !! छान जमला !!

प्यारे१'s picture

1 May 2013 - 6:36 pm | प्यारे१

छान सोपी रेसिपी.

मस्त रेशिपी!!!

धन्यवाद्स.

धनुअमिता's picture

2 May 2013 - 12:25 pm | धनुअमिता

तोंपासु...........
कधी केली नाही, पण आता करुन बघणार.फोटो हि खुप सुंदर आहे.

सूड's picture

2 May 2013 - 3:02 pm | सूड

मस्तच !!

परिकथेतील राजकुमार's picture

2 May 2013 - 3:10 pm | परिकथेतील राजकुमार

किती छान.

मस्त रेसिपी. दम आलू हे आवडतेच. आता या तर्‍हेनेही करून बघेन.

खादाड अमिता's picture

5 May 2013 - 10:09 pm | खादाड अमिता

सोपी क्रुति आहे! धन्यु!

रेवक्का सांच्याला जेवायला ये. दम आलु बनवल्यात.

रेवती's picture

14 May 2013 - 11:02 pm | रेवती

अपर्णा, धन्यवाद. सर्व प्रतिसादकांचे आभार.

प्रकाश घाटपांडे's picture

30 May 2013 - 8:40 am | प्रकाश घाटपांडे

हे दम म्हणजे नेमकी काय भानगड आहे हो. दम बिर्यानी ऐकलय.

प्रभाकर पेठकर's picture

30 May 2013 - 9:07 am | प्रभाकर पेठकर

पदार्थाला 'दम देणे' म्हणजे पातेल्यावर झाकण ठेवून त्यावर जड वजन ठेवून अथवा झाकण कशाने तरी (जसे: कणीक) घट्ट बंद करून अगदी मंद आंचेवर, आंत कोंडलेल्या वाफेवर, पदार्थ शिजविणे.

प्रकाश घाटपांडे's picture

30 May 2013 - 9:14 am | प्रकाश घाटपांडे

बर्‍याच वर्षांचे अज्ञान दूर झाले. म्हणल की विचाराव एकदा. फार तर काय होईल लोक अज्ञानाला हसतील मनातल्या मनात.
आत्ताच एक प्यांपलेट आले होते पेपर सोबत त्यात होम डिलिव्हरीत पाठवायच्या अगोदर दम लावून पाठवली जाईल असे लिहिले होते.

मदनबाण's picture

30 May 2013 - 3:13 pm | मदनबाण

दमा दम मस्त काश्मिरी ;)

(काश्मिरी पुलाव प्रेमी) :)

कवितानागेश's picture

30 May 2013 - 3:30 pm | कवितानागेश

ही पाकृ वाचायची राहून गेली होती. चान आहे.
( मी फक्त वाचूनच समाधान मानते! करणार कोण??!)