अखंड तांदळाचे दाणे घेऊन त्यांस तेल व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या अक्षता, किंवा अक्षदा. यांचा रंग हळदकुंकू लावल्यामुळे पिवळा वा लाल होतो. हिदू विवाहपद्धतीत महाराष्ट्रात विवाह लागताना वधूवरांवर अक्षदा टाकतात...
मात्र पंजाब कश्मिर मधे मात्र फुलांच्या पाकळ्याचा अक्षदा म्हणुन उपयोग केला जातो..
मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी जोंधळे (ज्वारी) वापरतात तांदळाच्या ऐवजी. असे पण वाचनात आले.
अक्षदा ह्या आशीर्वाद / शुभेच्छा पर असतात. फलो फुलो .. भरभराट होवो या अर्थाने .. धान्यरुपी अक्षदा टाकण्यामागील गर्भित उद्देश्य हाच असतो की तुम्ही बहरा .. जमिनीत धान्य पेरले म्हणजे एकाचे अनेक उगवतात .. तसेच तुम्ही बहरा अशा शुभेच्छा त्यामागे असतात असे म्हटले जाते. त्यादृष्टीने धान्यरुपी अक्षदा अधिक संयुक्तिक ठरतात...असाहि एक सुर आहे.
महर्षी अण्णा कर्व्यांच्या पत्नी बयाबाई कर्वे लग्नसराईच्या काळात कार्यालयातून फिरायच्या आणि अक्षता वेचायच्या....
लोकांनी विचारल्यावर सांगायच्या की माझ्या मुलींसाठी भात होईल याचा...
त्यावेळेला लोक हसायचे पण बयाबाई नेटाने ते काम करत राहिल्या आणि आपल्या आश्रमातील अनाथ महिलांचे पोट भरत राहिल्या .....
आपण हि अक्षदा ऐवजी फुलांच्या पाकळ्याचा वर्षाव हि पद्धत स्विकारावी का?
प्रतिक्रिया
25 Apr 2013 - 9:13 am | श्री गावसेना प्रमुख
आपण हि अक्षदा ऐवजी फुलांच्या पाकळ्याचा वर्षाव हि पद्धत स्विकारावी का?
धान्य वाया जावु नये हाच उद्देश असेल तर मुठभर अक्षदा देण्यापेक्षा चिमुट भर दिल्या तरी काम भागत...
काही लोक्स मुठभर अक्षदा घेवुन त्या अक्षदांचा वापर वधु वरांवर वर्षाव करण्याऐवजी एकमेकांवरच वर्षाव करण्यासाठी करतात.
26 Apr 2013 - 8:11 am | रुस्तम
आम्ही लग्नात हेच धंदे करतो. ह्याला मार त्याला मार. नवरा मुलगा मित्र असेल तर त्यालाच टार्गेट करणार.
25 Apr 2013 - 9:17 am | तुमचा अभिषेक
या अक्षता हॉलमध्ये सर्वांना वाटायची गरज नसते, कारण त्यांनी फेकलेल्या नवरा-नवरीपर्यंत पोहोचत तर नाहीत. त्यापेक्षा स्टेजवरच्या किंवा पहिल्या रांगेतील काही लोकांनाच द्या आणि तांदूळ वाचवा.
29 Apr 2013 - 2:23 pm | rupali5678@yahoo.com
अगदि बरोबर...
25 Apr 2013 - 10:09 am | राही
अक्षता म्हणजे अक्षत (अखंड, न तुटलेले, कण्या नव्हेत ते)असे काहीही. उत्तर हिंदुस्थानात लग्नात फुलांचा वर्षाव होतो पण मुलगी सासरी जाताना पाठीमागे धानाची[धान म्हणजे भातपीक,आता सडलेले(कांडलेले)तांदूळ.]उधळण करीत जाते.पूर्वी नवर्यामुलीच्या भुवयांच्या वरती कुंकुम धनुष्याकृती रेखून त्यावर तांदुळाचे दाणे लावून सजवीत.(हा मान गावातल्या काही विशिष्ट स्त्रियांचा असे-जसा देवदास चित्रपटात एक विधी दाखवलेला आहे)कार्याचे निमंत्रण करताना नारळ-तांदूळ देऊन आमंत्रण करीत. निमंत्रणकर्त्याबरोबर नारळ-तांदुळाचे ओझे वागवणारा एक गडीच सोबतीला असे.लोकही निमंत्रणाचा नारळ स्वतःकडे ठेवून घरातला नारळ निमंत्रणकर्त्याच्या हातात देत अथवा जोडीने आले असतील तर सवाष्णीची कापड-नारळ्-तांदुळांनी ओटी भरीत.कित्येक ठिकाणी निमंत्रणाच्या अक्षतातलेच तांदूळ जपून ठेवून पुढे लग्नात उधळायची पद्धत असे. थोडक्यात म्हणजे तांदुळाचे महत्त्व पूर्वीच्या काळी खूप होते. या प्रथांमागे निश्चितच काही अर्थ होता असणार. अलीकडे या सर्वच प्रथा नष्ट झाल्या आहेत किंवा प्रतीक रूपाने नाममात्र उरल्या आहेत. धान्याचा किंवा कुठल्याही वस्तूचा एक कणही वाया जाऊ नये हे खरेच पण या छोट्याश्या उधळपट्टीवर लक्ष्य केंद्रित करण्यापेक्षा तीच शक्ती जेवणावळींमध्ये फुकट जाणार्या अन्नाविरोधात जनजागृतीसाठी वापरावी असे वाटते. बरेच वेळा हे अन्न उरतेही. मग ते टाकून द्यावे लागते. हे टाळण्यासाठी R.S.V.P.पद्धत प्रत्येकाने अंमलात आणावी. यामुळे नक्की किती माणसे हजर असणार आहेत हे आधी कळू शकेल आणि तेव्हढेच अन्न शिजवले जाउ शकेल.आणखीही उपाय आहेतच. पण उपाय करताना 'पेनी वाइझ, पाउंड फूलिश्'असे होऊ नये.
25 Apr 2013 - 10:26 am | मी_आहे_ना
अगदी संयत प्रतिसाद... आता काही लोक म्हणतील की २ महिन्यांनी असणार्या लग्नाचे R.S.V.P. कसे सांगणार, पण काही प्रमाणात का होईना नक्की उपयोग होईल.
26 Apr 2013 - 12:53 pm | चिगो
राहींचा आणखी एक सह्ही प्रतिसाद.. नेहमीप्रमाणेच, आवडला..
26 Apr 2013 - 2:20 pm | मूकवाचक
+१
25 Apr 2013 - 10:42 am | संजय क्षीरसागर
घरातल्यांच्या लग्नापासून सुरूवात करा. नो देणी-घेणी आणि बुफे जेवण. कमालीचे पैसे आणि वेळ वाचतो शिवाय सगळ्यांना सगळ्यांशी निवांत बोलता येतं, तुफान मजा येते.
25 Apr 2013 - 11:39 am | तुमचा अभिषेक
खरंय.. पण..
मी स्वतः केले होते रजिस्टर्ड लग्न. माझे चार मित्र आणि तिच्या दोन बहिणी. पुरेसे नटून गेलो, साईन ठोकली, बाहेर तलावाजवळ काही फोटो काढले आणि जवळच्या एका चांगल्याश्या हॉटेलात सहभोजन...
पण...
घरच्यांनी नंतर पुन्हा त्याच मुलीशी माझे रीतीरिवाजानुसार अन थाटामाटात लग्न लावलेच.. :(
25 Apr 2013 - 11:56 am | गणामास्तर
.
हे मात्र लै बेक्कार झाले बघा अभिषेकराव.. ;) (हलके घ्या :) )
25 Apr 2013 - 11:07 pm | तुमचा अभिषेक
हलकेच घेणार हो, मुळात तुम्ही जे शब्द बोल्ड केले त्याच शब्दांसाठी मी पुढे हे :( असे तोंड केले होते.
बाकी अभिषेकराव नको हो.. अगदीच अभ्या किंवा अबड्या म्हणवत नसेल तर अभिषेकच बोला... उगाच फार मोठे झाल्यासारखे वाटते.. माझ्या मॅरीटल स्टेटसवर जाऊ नका.. बालविवाह झालाय माझा.. :)
25 Apr 2013 - 12:23 pm | संजय क्षीरसागर
अन थाटामाटात लग्न लावलेच..
त्याच मुलीशी लावलं हे समाधान!
25 Apr 2013 - 12:31 pm | पिलीयन रायडर
काही लग्नात जेव्हा मुला-मुलीला भेटायला जातो तेव्हा चिमुट्भर अक्षता घेऊन त्यांच्या डोक्यावर टाकतात. म्हणजे रीत खर्या अर्थाने पाळुन होते आणि अपव्ययही होत नाही.
25 Apr 2013 - 12:38 pm | बॅटमॅन
मी पुण्यात काही महिन्यांमागे एका लग्नाला गेलो होतो तेव्हा फक्त पुढच्या रांगेतील लोकांना अक्षता दिल्या होत्या. ही पद्धत पुणेभर पसरली आहे की नाही ते माहिती नाही पण चांगलेच आहे असे काही असेल तर.
25 Apr 2013 - 6:24 pm | शुचि
अक्षदा की अक्षता???
मुलं समोरच्याच्या टाळक्यातच जास्त फेकून मारतात त्या अक्षता. मुलांना अजिबात देऊ नयेत :(
25 Apr 2013 - 11:04 pm | तुमचा अभिषेक
च्याच्या की चीच्या ?? ;)
बाकी मी अजूनही असे करतो, एखादाच गिर्हाईक पकडायचा आणि त्याचे सारे केस भरून टाकायचे.
25 Apr 2013 - 11:07 pm | शुचि
अभिषेक मी देखील =))
द्या टाळी!!!!
25 Apr 2013 - 11:11 pm | तुमचा अभिषेक
हा हा.. हो ना... सगळ्यात जास्त मजा तर तुळशीच्या लग्नाला यायची.. तिथे तर असे किडे करायचे फुल्ल लायसन्सच असायचे.. पण गेली ती मजा..
25 Apr 2013 - 11:14 pm | शुचि
लहानपणी आम्ही दाराला कडी घालून बेल वाजवून पळायचो. कसली धमाल यायची. व्रात्यपणा खूप करायचो. सार्वजनिक फोनवरुन १०० नंबरवर पोलीसांना फुकट फोन करुन कविता ऐकवणं. १०१ फायरब्रिगेडला फोन करुन "आग लागली आग लागली" म्हणणे व विचारले असता "पापडाला" म्हणून फोन ठेऊन देणे वगैरे :)
25 Apr 2013 - 11:20 pm | शुचि
पण मांजरीच्या शेपटीला लवंगीची लडी लावण्याचा दुष्ट्पणा नाही केला हां. तो काही मुलं करायची बॉ.
25 Apr 2013 - 11:42 pm | तुमचा अभिषेक
हे बरंय.. मुली करतील तो खट्याळपणा आणि मुले करतील तो दुष्टपणा..
बाकी मांजरीच्या शेपटीला लंवंगीची लडी हे खरेच दुष्टपणा या सदरात मोडू शकते..
तरी आम्ही दोन चतुर एकाच दोरीच्या दोन टोकांना बांधून त्यांची मजा बघणे या लेवलचा क्रूर प्रकार केलाय लहाणपणी..
अवांतर - या मिसळपाव वर अश्या अवांतर पोस्ट चालतात ना? नवीन आहे म्हणून विचारले.
25 Apr 2013 - 11:45 pm | शुचि
बाप रे! मीही काही दुष्टपणे केले आहेत. :( चिमण्यांची पिल्ले पाडून त्यांचे पालनपोषण करण्याचा निष्फळ प्रयत्न. ती पिल्लं झुरून झुरून मरायचीच. काँग्रेस गवताचा झाडोरा घेऊन फुलपाखरांना धोपटणे. व जखमी झाल्यावर पकडणे वगैरे
25 Apr 2013 - 11:49 pm | तुमचा अभिषेक
मला वाटते आता थांबायला हवे इथेच नाहीतर हेच विचार घेऊन झोपलो तर आतापर्यंत मारलेले सारे पाल-उंदीर-झुरळ आज भूत बनून स्वप्नात येतील..
तसाही टाईम झालाच आहे, मॅचही संपलीय.. तर शुभरात्री शब्बाखैर खुदा हाफिज..
25 Apr 2013 - 11:46 pm | शुचि
इतकेही नवीन नाही आहत बरं का. वेड पांघरुन पेडगावला :)
25 Apr 2013 - 11:53 pm | तुमचा अभिषेक
अहो खरेच... मी माझ्या काही पूर्वप्रकाशित कथा इथे टाकल्या आणि त्याला आलेले प्रतिसाद वाचलेत बस्स.. किंवा आणखी दोनचार इकडचे तिकडचे लेख..
पण चर्चा कश्या चालतात हे नाही चाळले.. असा कोणाशी रीप्लाय रीप्लाय खेळायची ही सुरुवातच आहे..
25 Apr 2013 - 11:08 pm | स्मिता.
नवरा-नवरीसहीत सर्व आमंत्रितांच्या डोक्यावर तडातडा बसणार्या अक्षतांचं खरोखर काहितरी करायला हवं. शक्यतो आमंत्रितांनी नवरा-नवरीची भेट घेतांनाच आशीर्वाद किंवा शुभेच्छा द्याव्या असं वाटतं.
एका कानडी लग्नांत एक पद्धत पाहिली. नवर्या मुलीचे जोडलेले दोन्ही हात नवर्या मुलाच्या हातात देवून त्यांना समोरासमोर बसवतात. त्यांच्या हाताखाली एक मोठ्ठे भांडे ठेवलेले असते (त्याच्या कडांचा नवरा-नवरीला हाताच्या आधाराकरताही उपयोग होतो) आणि एका ताटात अक्षता असतात. मग सगळी आशीर्वाद देणारी वयाने मोठी मंडळी एकएक करून त्यांच्याजवळ जातात. नवरा-नवरीच्या हातावर घोटभर दूधाचं पाणी घालतात आणि ताटातून चिमूटभर अक्षता त्यांच्या डोक्यावर टाकतात किंवा डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात. बरोबरीची किंवा वयाने लहान मंडळी फक्त शुभेच्छा देतात.
इथेही अन्नपदार्थाचा अपव्यय आहे पण प्रमाण कमी असावे असे वाटते. आणि सगळ्यांच्या डोक्यावर बसणारा मारा वाचतो हे ही काय कमी?
25 Apr 2013 - 11:34 pm | बिपिन कार्यकर्ते
तुम्ही हिंदूंनाच सांगा बदलायला! हिंदूद्वेष्टे कुठले!
26 Apr 2013 - 1:27 am | मुक्त विहारि
मी तरी, अजून बरेच काही वाचायच्या तयारीत आहे. मन खंबीर करा.
बाकी,
"गणपतीला जानवे कुणी घातले?" ह्या सवालाचा जबाब कुणी दिला का हो?
27 Apr 2013 - 4:26 pm | पुष्कर जोशी
मेलो
26 Apr 2013 - 8:37 am | क्लिंटन
याविषयी माझा अनुभव लिहितो. माझ्या लग्नाच्या वेळी मला स्वतःला कोणतेही धार्मिक विधी अजिबात नको होते आणि एक सही ठोकून लग्न उरकायचे होते मला.मंत्र म्हणणारे आणि त्याबद्दल दक्षिणा घेणारे कोणीही माझ्या अगदी डोळ्यासमोरही नको असते.पण लग्न म्हटले की सगळ्यांची मते आली.आणि एका सहीव्यतिरिक्त मी आणखी काही करणार नाही यावर कायम राहून इतरांना दुखाविणे हे पण मला श्रेयस्कर वाटले नाही. मग शेवटी यातून मार्ग निघाला ज्ञानप्रबोधिनी पध्दतीचा.आमचे लग्न लावायला ज्ञानप्रबोधिनीच्या एक साठीच्या आसपास वयाच्या स्त्री आल्या होत्या.त्यांनी फालतू फापटपसारा न करता तासा-दीडतासात सगळे विधी संपविले.
दुसरे म्हणजे विशेषतः सध्याच्या दुष्काळाच्या काळात (इतर वेळीही पण दुष्काळाच्या काळात विशेषतः) लग्नासाठी अक्षता म्हणून तांदूळ वेस्ट करणार्यांवर फौजदारी गुन्हाच भरायला हवा असे मला वाटते.
26 Apr 2013 - 8:44 am | श्री गावसेना प्रमुख
माझ्या मते साधा तांदुळ वापरण्यापेक्षा बासमती वापरला तर ...अत्तराची गरजच नाही पडणार
26 Apr 2013 - 11:36 am | मालोजीराव
हात तिच्या….वाटलं व्हाईट हाउस मध्ये लग्न झालं असेल तुमच ;)
29 Apr 2013 - 11:55 am | शिल्पा ब
दिड तासात? लकी बॉ तुम्ही ! आमचं दोन दिवस काय काय कंटाळवाणे विधी चालले होते. संपता लग्न संपेना. कारणं माहीती नाहीत नुसतंच आंधळेपणे सगळं प्राचीन फॉलो करायचं. वैताग मेला !
29 Apr 2013 - 12:07 pm | क्लिंटन
आणि कारणे माहित असली तरी दोन दिवस हा प्रकार सहन करायचा म्हणजे अतीच झाले की :(
26 Apr 2013 - 9:16 am | प्रकाश घाटपांडे
मी माझे नोंदणी पद्धतीने लग्न केल्याने या प्रकारातुन वाचलो आहे. पण इतर लग्नांना उपस्थित रहाताना फक्त ४ अक्षता घेतो व एकेके दाणा टाकून खुप टाकल्याचा आव आणतो. अन्नाची नासाडी करणार्यांना मनातून तीव्र शिव्याशाप घालतो.
28 Apr 2013 - 8:18 pm | क्लिंटन
लग्नांमध्ये माहित नाही पण अकुकाकांनी एखादा धागा काढला आणि ते मुळच्या चर्चाविषयाची पिंक टाकून पळून गेले नाहीत आणि चर्चेत भाग घेतला असे कोणी दाखवून दिले तर मात्र त्या मिपाकरावर मात्र पुष्पवृष्टी करण्यात यावी असे जरूर वाटते.
29 Apr 2013 - 6:49 am | शुचि
हाहाहा! मी तर म्हणेन सोन्याची फुले उधळा :)
29 Apr 2013 - 11:58 am | अभ्या..
सोन्याची फुले पणतू झाल्यावर असतेत ना शुचि?
29 Apr 2013 - 3:01 pm | महेश हतोळकर
डील करायचं का?
तुम्ही चर्चेत भाग घ्या, ताई सोन्याची फुलं उधळतील, मी वेचतो.
आपण वाटून घेऊ.
29 Apr 2013 - 5:12 pm | राही
मजेत चाललेल्या धाग्यावर गंमतरहित प्रतिसाद देणे जिवावर आल्याने आता सर्वात शेवटी पुन्हा लिहीत आहे. जर एक दीड किलो तांदूळ अक्षतांसाठी विकतच घेतले नाहीत तर तेव्हढे तांदूळ दुकानातच रहातील.गरजू व्यक्तींकडे पोचतीलच असे नाही. त्याऐवजी हे(प्रत्येकी दीड किलो) तांदूळ एके ठिकाणी दानरूपात गोळा होण्याची व्यवस्था असावी. आणि लग्नसराईच्या शेवटास एका शहरात जमलेले हे दीडशे क्विंटल तांदूळ योग्य त्या ठिकाणी पाठवून देण्याचीही व्यवस्था असावी. लाह्याहोमात जाळलेल्या लाह्या,ओतलेले तूप याबाबतही विचार व्हावा.खरे तर लग्नासाठी म्हणून घेतलेल्या अनेक वस्तू पुन्हा वापरल्या जात नाहीत. उदा. मुंडावळ्या, टोप्या,वगैरे. त्यांच्याही रीसाय्क्लिंग ची व्यवस्था असावी.(एके ठिकाणी जमा करणे आणि पुन्हा वापरणे वगैरे)
बाकी जेवणावळी, वस्त्रेप्रावरणे,विजेची रोषणाई अशा थाटमाटासह धूमधडाक्यात लग्ने साजरी करण्यास कुणाची हरकत नसावी.
30 Apr 2013 - 8:39 am | अर्धवटराव
लग्न.
जर लग्नसंस्थाच विसर्जीत झाली, तर ना रहेगा बांस, ना बजेगी बासुरी. हाय काय नाय काय.
अर्धवटराव
1 May 2013 - 11:25 pm | संजय क्षीरसागर
त्यापेक्षा अक्षता वाया गेलेल्या परवडल्या.
1 May 2013 - 11:33 pm | बॅटमॅन
यग्ज्याक्टली!!! लग्न बिग्न कैपण नसताना प्राण्यांची समाजव्यवस्था कोट्यवधी वर्षे तगलीच की.
2 May 2013 - 9:03 pm | क्लिंटन
बरोबर आहे. एकाच जोडीदाराबरोबर आयुष्यभर राहणे म्हणजे पुरूषप्रधान संस्कृतीचे देणे आहे. इतकेच नव्हे तर ९७% की साडे सत्त्याण्णव टक्के प्राण्यांमध्ये एकाच जोडीदाराबरोबर आयुष्य काढत नाहीत.त्यांना कुठे लग्नाची गरज भासते!! बरोबर आहे. लग्नबिग्न सबकुछ झूट आहे.
2 May 2013 - 7:39 pm | विसोबा खेचर
दंडवत...!