वाढणी:
२-३ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:
४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
३०० मिली दुध, ४-५ टेबल स्पून साखर, ४ ब्राऊन ब्रेडच्या स्लाईसेस, ३ अंडी,
२ टेबल स्पून ड्रिंकिंग चॉकोलेट अथवा कोको, १/२ टीस्पून व्हॅनिला इसेन्स,
क्रमवार मार्गदर्शन:
ब्रेडचे लहान लहान तुकडे करून घ्यावेत. अंडी फोडून फेटून घ्यावीत व त्यात व्हॅनिला इसेन्स घालावा. दुध गरम करून त्यात साखर घालावी. साखर विरघळली कि त्यात ड्रिंकिंग चॉकोलेट अथवा कोको घालून चांगले ढवळून घ्यावे. गॅस बंद करून त्यात फेटलेली अंडी आणि ब्रेडचे तुकडे घालून नीट ढवळावे. पुडींग मोल्डला तूप लावून मिश्रण त्यात घालावे. मोल्ड फॉईलने बंद करून प्रेशर कूकर मध्ये शिट्टी काढून ठेवून ३०-४० मिनिटे अथवा पुडींग स्पॉंजी होईतो वाफवावे. नीट थंड झाल्यावर पुडींग डिमोल्ड करावे. सर्व्ह करण्याआधी तासभर फ्रिजमध्ये ठेवावे आणि मग क्रिम घालून सर्व्ह करावे.
माहितीचा स्रोत:
इंटरनेट
अधिक टीपा:
फ्रेश क्रिम ऐवजी चॉकलेट सॉस किंवा कॅरॅमल सॉस वापरू शकता.
प्रतिक्रिया
9 Jul 2008 - 2:38 pm | गिरिजा
मस्तच आहे! पुडिंग लई आवडतं आपल्याला..
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------