गॅलेक्सी Y प्रो वर मराठी कसे लिहावे?

नानबा's picture
नानबा in काथ्याकूट
10 Apr 2013 - 12:11 am
गाभा: 

अँड्रॉईडचा जमाना आल्यापासून त्याचे आकर्षण होतेच, परंतु त्या आधी हातात ब्लॅकबेरी असल्यामुळे क्वेर्टी किबोर्ड वाल्या फोनची सवय होती. त्यामुळे क्वेर्टी किबोर्ड असलेल्या फोनची बरीच शोधाशोध केल्यानंतर सॅमसंग गॅलेक्सी Y प्रो हा फोन सापडला. परंतु यात मराठी अथवा देवनागरी लिपीत लिहीता येत नाही. बाकी अँड्रॉईड फोन्स साठी प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले अनेक देवनागरी फोनेटिक किबोर्ड्स आहेत. पण माझ्या फोन मध्ये डिव्हाईस किबोर्ड असल्याने मला त्या किबोर्डस ना वापरता येत नाही. बरेच प्रयत्न करून झालेत, कस्टम लोकल वापरून सिस्ट्म भाषा हिंदी केली, पण त्यानेसुद्धा काहीही फरक पडला नाही.

तरी कोणी अँड्रॉईड गुरू याबाबतीत मदत करू शकेल काय?

हे आमचं डबडं - सॅमसंग गॅलेक्सी Y प्रो
a

प्रतिक्रिया

कुलभूषण's picture

10 Apr 2013 - 11:43 am | कुलभूषण

असाच डब्बा आमचाही आहे...काही पर्याय असेल तर सुचवावे...

पैसा's picture

14 Apr 2013 - 6:42 pm | पैसा

Google Hindi Input किंवा दुसरे कोणते देवनागरी transliteration असलेले कीबोर्ड्स चालतात का बघा.
UKeyboard Beta हा एक सापडला.

विवेक वाघमारे's picture

23 Nov 2013 - 2:43 am | विवेक वाघमारे

आधी हा मल्टीलिंग कीबोर्ड इंस्टॉल करा आणि मग त्याचे हे मराठी प्लगीन इंस्टॉल करा. झटपट मराठी आणि इंग्रजी टायपिंगला चांगले आहे. फक्त यामधे 'अॅ' हा स्वर नाही. त्याऐवजी अँ वापरावा लागतो.
मी स्वतः हेच वापरतो. शरमेची गोष्ट हि आहे कि उपलब्ध असेलेल्या १०-१२ मराठी कीबोर्ड पैकी हाच एक चांगला आहे (गुगल-हिंदी पेक्षा) आणि हा एका जपानी कंपनीच्या ब्रँडखाली आहे, भारतीय नाही.

तुमचा अभिषेक's picture

26 Nov 2013 - 11:16 am | तुमचा अभिषेक

मी पण मल्टींलिंग कीबोर्ड केलाय इन्स्टॉल, पण त्यावर हात बसला नसल्याने त्रासदायक आहे.
माझा फोन सॅमसंग गॅलक्सी ग्रँड