ही पाककृती मी युके गुडफुड चॅनलच्या चायनीज फुड इन मिनिट्स मध्ये पाहीली होती, बनविण्यास सोप्पी आहे :)
साहित्य:
२०-२५ किंग प्राँस साफ करुन, दोरा काढून घेतलेल्या
१ अंडे
५ टेस्पून टोमॅटो केचअप (आबंटपणा व आवडीनुसार कमी-जास्तं)
१ टेस्पून बारीक चिरलेले आले
१ टेस्पून बारीक चिरलेला लसूण
२ लाल मिरच्या बारीक चिरून (थाय स्वीट चिलीज)
बारीक चिरलेली कांद्याची पात
४-५ टेस्पून कॉर्नफ्लोअर (मुळ पाककृतीत बटाट्याचे पीठ वापरले होते)
१ टेस्पून तिरफळं (Sichuan peppercorns , आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१/२ टीस्पून पांढरी मिरपूड
मीठ चवीनुसार
१ टेस्पून साखर ( सॉफ्ट ब्राऊन शुगर असेल तर ती वापरावी)
१/२ टेस्पून लिंबाचा रस
पाकृ:
एका बाऊलमध्ये अंडे, कॉर्नफ्लोअर, थोडेसे मीठ व मिरपूड एकत्र करुन घ्यावे.लागेल तरचं पाणी घालावे.
कढईत तेल तापत ठेवावे.
मिश्रणात मोठी कोळंबी (किंग प्राँस) बुडवून ,तेलात सोडून हलक्या सोनेरी रंगावर तळावी.(कॉर्नफ्लोअरचे आवरण खूप जाड ठेवू नये )
दुसर्या बाऊलमध्ये टोमॅटो केचअप, मीठ, साखर, मिरपूड व कॉर्नफ्लोअर एकत्र करावे. त्यात थोडे पाणी घालून पातळ मिश्रण बनवावे.

वोकमध्ये तेल गरम करुन त्यात तिरफळं घालावे व परतावे.
त्यात बारीक चिरलेली मिरची, आले व लसूण घालून चांगले परतावे.
तयार केलेला टोमॅटो सॉस त्यात घालून सतत ढवळावे.
सॉस दाट होत आला की त्यात वरून चिरलेली कांद्याची पात व लिंबाचा रस घालून एकत्र करावे.

सर्व्हींग बाऊलमध्ये तळलेल्या कोळंब्या घेऊन त्यावर हा सॉस ओतावा.
मी सर्व्हींग डिशमध्ये थोडा भात घेतला, त्यावर तळलेल्या कोळंब्या ठेवून त्यावर तयार सॉस ओतला.
चिरलेल्या कांद्याची पात वरुन थोडी घालावी.

तुम्ही Sichuan Sweet & Sour Prawns हे साध्या भाताबरोबर, न्युडल्सबरोबर किंवा नुसते स्टार्टर म्हणून गरम सर्व्ह करु शकता.
प्रतिक्रिया
8 Apr 2013 - 5:03 pm | दिपक.कुवेत
क्लास फोटो आणि पाकॄ. भाताबरोबर छान लागेल अस दिसतय.
8 Apr 2013 - 5:38 pm | पैसा
पण आमच्या घरच्या मंडळींना चिनी पद्धतीचे मासे वगैरे आवडत नाहीत त्यामुळे फोटो छान आहेत इतकंच म्हणते!
8 Apr 2013 - 5:53 pm | सुहास झेले
खल्लास... सादरीकरण नेहमीप्रमाणे झक्कास :) :)
8 Apr 2013 - 6:20 pm | शिद
झकास्स्स्स्स्स्स्स्..... तों.पा.सु.
8 Apr 2013 - 7:01 pm | मी_देव
सुपर.. प्राँस म्हणजे जीव की प्राण.. अप्रतिम फोटोज.. :)
8 Apr 2013 - 7:29 pm | रेवती
देवाऽऽऽ....
बाकी सगळा नेहमीचाच प्रतिसाद.
8 Apr 2013 - 9:16 pm | सस्नेह
मस्त फोटो व छान पाकृ.
एकेकाळी कोळंबी आवडती होती...सध्या मात्र गवताळ झाले आहे...
8 Apr 2013 - 10:29 pm | Mrunalini
यम्म्म्म्म्म्म्म....... प्रॉन्स म्हणजे वीक पॉईंट.. :)
9 Apr 2013 - 12:19 am | अत्रुप्त आत्मा
हे कोळं बी म्हणजे काजुसारखच दिसतय... देवा,हा मासा असा कसा? =))
9 Apr 2013 - 12:42 am | प्रभाकर पेठकर
सुंदर देखणी पाककृती.
पण एवढुश्श्या भाताने/कोळंबीने काय होणार? प्रमाण दुप्पट घ्यावे लागणार.
9 Apr 2013 - 12:47 am | अभ्या..
मस्त मस्त प्रेझेंटेशन.
9 Apr 2013 - 9:55 am | स्पंदना
मश्तु!
9 Apr 2013 - 11:12 am | साऊ
मलाही आवडतात कोळंबी. करुन पहायला हरकत नाही.
9 Apr 2013 - 1:03 pm | कच्ची कैरी
मलाही कोळंबी खुपच आवडते म्हणुन ही रेसेपी नक्की ट्राय केली जाईल :)
11 Apr 2013 - 12:20 pm | शुचि
ख-त-रा फोटो,
11 Apr 2013 - 12:59 pm | मुक्त विहारि
ह्यावेळी भारतातील मुक्काम वाढवावा लागेल.
सोत्रिंचे समर स्पेशल आणि ह्या पा.क्रु.
आयला!!! काय मस्त काँबिनेशन असेल नाही?
17 Apr 2013 - 1:17 pm | गौरीबाई गोवेकर
फोटो छान. पण चिनी चवीचा अंदाज नसल्याने कसे लागत असेल असा विचार करतेय! तरी तोंपासू च.....(नविन शब्द शिकले )