कधी सकाळचा गजर वाजून सांगतो की, "उठा, आवरा, ऑफीसला जा... " आणि आपले मात्र ढिम्म हलायचे मन नसते. इत्तके मस्त स्वप्न पडत असते की ते सोडून ऑफीसला जायचे म्हणजे कैच्याकैच असे वाटावे. ऑफिसमध्ये फोन करून सुट्टी घ्यावी आणि असेच अनादीअनंत काळासाठी आपण आपल्या स्वप्नात रममाण व्हावे अशी अनावर इच्छा होते. फोन करायलाही स्वप्नातून बाहेर पडवत नाही. स्वप्नात मन रमवावे वाटत असतानाही का कोण जाणे मनाचे अर्धेअधिक लक्ष मात्र त्या मेल्या पुढेपुढे सरकणाऱ्या काट्यासोबत टिकटिक करत फिरत राहते. जी दोलायमानता शेवटी असह्य होऊन तिरीमिरीत उठून आवरून ऑफिसला जावेच लागते. अख्खा दिवस मग काही मनाजोगते म्हणून घडत नाही किंवा घडले तरी त्यात मजा अशी वाटत नाही.. ते स्वप्न.. ते स्वप्न पूर्ण पहायला मिळाले असते तर मस्त झाले असते असे वाटत राहते पण ते नक्की काय होते ते मात्र आठवत नाही त्यामुळे एक वेगळीच विरहभावना मनात उभी रहाते.
असे काही होते का तुम्हासोबतही? की मीच एकटी वेंधळी आहे असे चमत्कारीकसे काही आज अनुभवणारी? अशा परिस्थितीत नक्की काय केले तर ही विरहभावना टाळता येऊ शकते?
प्रतिक्रिया
8 Jul 2008 - 7:49 pm | प्राजु
मला तर बर्याच वेळेला असे होते. स्वप्न बघायची सवयच वाईट. तरी मी रोज रात्री स्वतःच्या मनाला आणि मेंदूला निक्षून सांगते की बाबांनो.. आज तरी स्वप्न नका बघू. पण नाही !!! काही ना काही होतच आणि स्वप्न पडत. पण सकाळच्या अलार्मच्या त्या कर्कश्श आवाजासोबत बिचारं स्वप्न पळून जातं आणि पुन्हा कधी तेच स्वप्न पुन्हा भेटत नाही... कारण तिथे रिकॅप किंवा रिपिट ची सोय नाही.. आणि रिकॅप साठी किंवा रिपीट साठी स्वप्न काय होतं नक्की ते आठवायला तरी नको का??? ते ही नाही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Jul 2008 - 7:55 pm | विजुभाऊ
याला वेंधळी म्हणता येणार नाही.......स्वप्ने पाहुन अस्वस्थ होणारे लोकच ती साकार होण्यासाठी झटतात
स्वप्ने पाहायला हवीच्....जे स्वप्ने पहातात तेच त्याना साकार करु शकतात
एका जिजाऊ ने स्वप्नं पाहिले...ते पाहुन त्या अस्वस्थ झाल्या......आणि त्यातुन साकारला एक कालातीत योद्धा / जाणता राजा
स्वप्न प।हाणे हे महत्वाचे.....स्वप्नांचा पाठपुरावा करणे हे त्याहुन जास्त महत्वाचे...
::::::::श्री श्री श्री डाम्बीसकाकांच्या मते स्वप्नखुळं सांगणारा विजुभाऊ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
9 Jul 2008 - 2:03 pm | विजुभाऊ
स्वप्ने ही आर ई एम या अवस्थेत असतान पडतात. आर ई एम झोप ही शरीराला अत्यावश्यक गोष्ट आहे.
तुमचे आर ई एम झोपेचे वेळापत्रक नीट साम्भाळले तर अर्धवट स्वप्ने पडत नाहीत.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
9 Jul 2008 - 2:12 pm | नीलकांत
मी पडलो की ठार झोपतो... स्वप्नं अशी सहसा पडत नाहित. मात्र सकाळी उठावसं मला सुध्दा वाटत नाही. थोडा वेळ.... थोडा वेळ असं करीत लो़ळत पडतो...
नीलकांत