गाभा:
तर मंडळी आज एजून एक योध्दा धारातिर्थी पडला शहिद झाला ( आमच्यात आला)
कस काय झाले आपल्या धमुचे लग्न?
कोण कोण मिपाकर जमले होते?
लग्ना आधीचा मिसळ कट्टा कसा झाला?
धमु आणि धमी ने कुठले उखाणे घेतले?
आणि इथे फोटो कोण देणार ?**** वृतांत कोण लिहिणार?****
बाकी बरेच प्रश्न आहेत ते धमुला नंतर विचारेन ;)
प्रतिक्रिया
8 Jul 2008 - 7:51 pm | आनंदयात्री
हे घे वृत्तांताचे स्टार्टर .. मेन कोर्स तात्यांकडुन ..
9 Jul 2008 - 2:42 pm | नंदन
सही. नंबर ४ तर अफलातून :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
8 Jul 2008 - 7:54 pm | प्राजु
चला थोडक्यात का होईना वृतांत समजला. तात्या, आता सविस्तर कधी लिहिताय?? आणि फोटोही टाका... बघू तरी धम्या त्या लग्नाच्या शाही वस्त्रात दिसतो कसा ते??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Jul 2008 - 7:59 pm | वरदा
सॉलीड उत्सुकता आहे...तात्या टाका बरं का लवकर व्रुत्तांत्...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
8 Jul 2008 - 8:11 pm | विसोबा खेचर
आत्ताच अंमळ दमून, थकून भागून पुण्याहून आलो आहे. थोडा श्वास तरी घेऊ द्या. कामधंद्याची काही कामे अजून करायची बाकी आहेत तेवढी करतो अन् फोटू टाकतो. नीलकांताने मला अजून काही फोटू पाठवायचे बाकी आहेत, त्यांचीही वाट पाहतो आहे.
जाता जाता, सख्या गटणेचा एक किस्सा सांगून जातो...
हा सख्या गटणे म्हणजे अंमळ वल्लीच आहे. हे पोरगं मध्यमउंचीचं, काळंसावळं परंतु स्मार्ट अन् तरतरीत चेहेर्याचं आहे. एकमेकांशी परिचय सुरू होता. आमचे डॉ प्रसाद दाढे हा अगदी सरळ मनाचा अन् सज्जन माणूस. तो मोठ्या आत्मीयतेने सख्या गटणेला आपली ओळख करून देऊ लागला -
"नमस्कार. मी डॉ प्रसाद दाढे!"
आता यावर सख्या गटणेने दिवे ओवाळावे अशी डॉक्टरांची अपेक्षा नक्कीच नव्हती. परंतु काहीतरी पोझिटिव्ह रिसपॉन्स तरी सख्याकडून नक्कीच अपेक्षित होता. परंतु सख्या कसला!
"बरं बरं!" असा इतका थंड रिस्पॉन्स सख्याने दिलान की जणू काही "हो का? आपण डॉ दाढे का? मग मी काय करू??" असंच त्याला म्हणायचं असावं!
वर म्हटल्याप्रमाणे डॉ दाढे बिचारे पडले सज्जन अन् साध्या स्वभावाचे. सख्याकडून इतका थंड रिस्पॉन्स येईल अशी त्यांना अपेक्षाच नव्हती. त्यामुळे सख्याच्या त्या "बरं बरं!" ने डॉक्टरांचा चेहेराच पडला, ते थोडे खजील झाल्यासारखे वाटले अन् त्यावर मी अन् मास्तर खो खो हसलो!
अंमळ गंमतीशीरच प्रकार घडला तो! :)
असो,
बाकी, फोटू टाकीन तेव्हा थोडीफार कॉमेन्ट्री करीनच... :)
आपल,
(मराठी आंतरजालीय धुरंधर) तात्या.
8 Jul 2008 - 8:17 pm | आनंदयात्री
>>"बरं बरं!" असा इतका थंड रिस्पॉन्स सख्याने दिलान की जणू काही "हो का? आपण डॉ दाढे का? मग मी काय करू??" असंच त्याला म्हणायचं असावं!
=)) =)) =))
8 Jul 2008 - 8:17 pm | मुक्तसुनीत
ये तो सिर्फ ट्रेलर हुवा ! मेन पिक्चर का इंतजार है !! :-)
8 Jul 2008 - 8:43 pm | कुंदन
कदाचित डॉ नी , सख्या पक्षीनिरीक्षण करण्यात गर्क असताना ओळख करुन दिली असेल .....
8 Jul 2008 - 8:18 pm | प्रकाश घाटपांडे
तात्यानु लई दमलाय ; तव्हा "श्रमपरिहार " होउन जाउं द्या!
प्रकाश घाटपांडे
8 Jul 2008 - 8:19 pm | विजुभाऊ
बरे झाले रे गटण्या तू तिथे आलास ते... तुझ्या वात्रटलिखाणामुळे सगळे मीच "सखाराम गटणे " नावाने लिहितोय असे म्हणत होते
तुझा फोन आला तेंव्हाही तात्या मला हेच म्हणत होता
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
8 Jul 2008 - 8:24 pm | केशवसुमार
तो गटणे होता की विजूभाऊंनी गल्लीतला कोणी तरी धरून आणला होता.. स्वत। वर संशय नको म्हणून?
मला अजून डाऊट आहे..
(सावध)केशवसुमार..
8 Jul 2008 - 8:29 pm | मुक्तसुनीत
सखाराम गटणे = लखोबा लोखंडे = विजुभौ शा .......! =))
8 Jul 2008 - 8:38 pm | टारझन
>>"बरं बरं!" असा इतका थंड रिस्पॉन्स सख्याने दिलान की जणू काही "हो का? आपण डॉ दाढे का? मग मी काय करू??" असंच >>>>त्याला म्हणायचं असावं!
दाढे गटण्याच्या शत्रुपक्षातले तरं नव्हे ? :?
फोटु पटकन चढवा (स्वगत : एक वेळ धमू नसला चालेल पण, गुलाबजाम सज्जित थाळी बघायला मिळावी हा नेक हेतू)
जामूनप्रेमी) कु ख
http://picasaweb.google.com/prashants.space
8 Jul 2008 - 9:25 pm | विसोबा खेचर
(स्वगत : एक वेळ धमू नसला चालेल पण, गुलाबजाम सज्जित थाळी बघायला मिळावी हा नेक हेतू)
बाबारे, मला मिपाकरांची काळजी आहे बर! :)
धम्याच्या लग्नातला मेनू सर्व मिपाकरांना मिळावा या हेतूने 'आजची खादाडी' या सदरात फोटू टाकण्याकरता 'वाढलेल्या सबंध पानाचा फोटू काढ' असं मी मुद्दामून यात्रीला की कुणाला तरी सांगितलं होतं!
आता लवकरच तो फोटू मुखपृष्ठावर टाकतो म्हणजे सगळ्यांना त्याचा आस्वाद घेता येईल.. :)
तात्या.
8 Jul 2008 - 9:41 pm | टारझन
>>>बाबारे, मला मिपाकरांची काळजी आहे बर!
मला ही धम्याला बघायची अतुरता लागली आहे... माझा वाईट हेतू नव्हताच! भावना प्रकट करण्यात चुक झाली...
जाहीर माफी !!
फोटो बघण्यास (धम्या-धमीचे) ऊतावळा ) कु ख
http://picasaweb.google.com/prashants.space
8 Jul 2008 - 9:42 pm | टारझन
>>>बाबारे, मला मिपाकरांची काळजी आहे बर!
मला ही धम्याला बघायची अतुरता लागली आहे... माझा वाईट हेतू नव्हताच! भावना प्रकट करण्यात चुक झाली...
जाहीर माफी !!
फोटो बघण्यास (धम्या-धमीचे) ऊतावळा ) कु ख
http://picasaweb.google.com/prashants.space
8 Jul 2008 - 9:18 pm | शितल
बरे झाले रे गटण्या तू तिथे आलास ते... तुझ्या वात्रटलिखाणामुळे सगळे मीच "सखाराम गटणे " नावाने लिहितोय असे म्हणत होते
लै भारी
पण गटाण्याला बघुन तुमच्या वरचा सशय कमी झाला असे म्हणायचे आहे का.
9 Jul 2008 - 10:37 am | पावसाची परी
हा हा हा हा
सगळ्यान्निच छान लिहिलय
10 Jul 2008 - 2:08 am | अन्या दातार
उत्तम चालले आहे.
स्वगतः च्यायला, काहीतरी काम काढून पुण्याला धमुच्या लग्नाला जायला हवं होतं