गाभा:
ह्या प्रसिद्ध कवनाची चाल ठाउक आहे का? असल्यास कृपया इथे अपलोड करावी...
भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य ! विबुधमान्य सार्वभौम भूवरा ! ॥
नयधुरंधरा, बहुत काळ तूंचि पाळ ही वसुंधरा ॥
शोभविशी रविकुलशी कुलपरंपरा ॥ध्रु।॥ नयधु।॥
संतत तव कांत शांत राजतेज जगिं विलसो ॥
धर्मनीति शिल्पशास्त्र ललितकला सफल असो ॥
सगुणसागरा, विनयसुंदरा ॥१॥ नयधु।॥
नीतिनिपुण मंत्री तुझे तोषवोत जनहृदंतरा ॥
सदा जनहृदंतरा ॥
राजशासनीं प्रजाहि विनत असो शांततापरा ॥
असो शांततापरा ॥२॥नयधु.॥
समरधीर वीर करुत कीर्तिविस्तरा ॥
पुत्र पौत्र सुखवुत तव राजमंदिरा ॥
सौख्यपूर्ण दीर्घ आयु भोग नृपवरा ॥३॥नयधु.॥
भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य ! विबुधमान्य सार्वभौम भूवरा ! ॥ नयधु.॥
प्रतिक्रिया
5 Mar 2013 - 3:26 pm | संजय क्षीरसागर
याचं आता काय आलं?
5 Mar 2013 - 3:31 pm | नाना चेंगट
कोण पंचम जॉर्ज?
5 Mar 2013 - 3:38 pm | संजय क्षीरसागर
जॉर्ज म्हणजे फर्नांडिस. त्या दोघांनी पहिल्यांदा गाण्याचा क्लास लावल्यावर म्हटलेला राग भूप असावा.
5 Mar 2013 - 3:50 pm | संजय क्षीरसागर
लकडीकी काठी, काठीपे घोडा या गाण्याची चाल फिट होईल. एक कुतुहल म्हणून विचारतो, लंडनच्या राणीसमोर म्हणायचंय का? तसं असेल तर नीट चाल लावा बरं का.
5 Mar 2013 - 6:25 pm | चित्रगुप्त
"भो पंचम जॉर्ज" ही प्रार्थना पूर्वी शाळेत रोज म्हणावी लागतसे ऐकले आहे. मलादेखिल तिची चाल कशी होती, हे जाणून घ्यायचे आहे.
पंचम जॉर्ज यांचे व्यक्तिचित्रः


पंचम जॉर्ज यांचे आगमन ज्या निमित्ताने भारतात झाले, तो १९११ चा दिल्ली दरबार. जॉर्ज आणि चुलत भाऊ रशियाचे झार निकोलस द्वितीय
5 Mar 2013 - 7:13 pm | १.५ शहाणा
भो पंचम जॉर्ज" ही प्रार्थना पूर्वी शाळेत रोज म्हणावी लागतसे आसे मि पण एक्ले आहे आई कडुन.............
6 Mar 2013 - 9:53 am | अत्रन्गि पाउस
...........
17 Jun 2015 - 4:09 pm | फोटोप्रशांत
हो … माझा मित्र अनंत भार्गव लिमये ( वय वर्षे ९३ ) याच्या आवाजात...
परन्तु ही `फाईल ' एम पी ३ आहे. ती एथे अप लोड कशी करायची ?
17 Jun 2015 - 4:53 pm | आदूबाळ
साऊंडक्लाऊडवर अपलोड करून येथे लिंक द्या.
19 Jun 2015 - 9:31 am | अत्रन्गि पाउस
?
24 May 2015 - 11:14 pm | चित्रगुप्त
चाल कशी आहे, याबद्दल तर उत्सुकता आहेच, हे कवन कुणी केले, याबद्दलही आहे.
17 Jun 2015 - 4:51 pm | सूड
जॉर्जकाकांना याचा अर्थ माहित होता का?
17 Jun 2015 - 5:20 pm | पद्मावति
मी ही हे ऐकले होते की स्वातंत्र्यापूर्वी ही कविता म्हणायला लागायची शाळेत. पण फक्त हि पहिली ओळ माहीत होती. तुमच्यामुळे पूर्ण कविताच कळली. मला वाटतं की हाच पंचम जॉर्ज भारतात आला असतांना जन गण मन पहिल्यांदा गायलं होतं, बहुतेक..नक्कि माहिती नाही.
17 Jun 2015 - 9:11 pm | चिगो
गुलामांच्या प्रार्थनांमधे जर खरंच शक्ती असती, तर अजुनही भारतावर इंग्रजांचे राज्य असते..
बघा ना, अगदी 'सूर्यवंशी'च बनवला त्याला..
अगागागा.. ज्याने कुणी हे भाटगीत रचले, त्याला त्रिवार दंडवत..
17 Jun 2015 - 10:08 pm | कंजूस
अपलोड ?
मी रेकॅार्ड केलेला खंड्या पक्षाचा आवाज vocaroo dot com या साइटवर अपलोड करून त्याची लिंक
डाइरेक्ट लिंक इथे आहे.