आतापर्यंत खूप नाही पण थोड्याफार संस्थळांचा अनुभव नक्कीच गाठीशी धरुन आहे. असे साधारण लक्षात आले की प्रत्येक संस्थळाचा एक बाज आहे, वैशिष्ट्य आहे.म्हणजे बघा काही संस्थळे बाळबोध तर काही टवाळ काही अभ्यासू तर काही शिष्ठ व्यक्तीमत्वाची आहेत्आ बाज मुख्यत्वेकरुन त्यात्या संस्थळावरील सदस्यांच्या लिखाणातून, लेख , प्रतिक्रिया वगैरे बौद्धीक ठशातून आलेला आहे. "अ कंपनी इझ अॅज गुड अॅज पीपल इन अ इट" च्या चालीवर संस्थळांना देखील सदस्यांनी दिलेला आकार, रुप मिळालेले दिसते.
मिपावर आले तेव्हा मिपा जितकं आवडलं त्याच्या शतपटींनी अधिक आता आवडत आहे. आपुलकीची भावना सखोलच होत गेलेली आहे.अभ्यासू लेख, वात्रट प्रतिक्रिया, चर्वितचर्वण करणारे काथ्याकूट, भावस्पर्शी कविता व ललीत, खमंग पाककृती यातून खूप समृद्ध झाले आहे.
माझ्याकरता मिपा फक्त "इंटेलेक्चुअल एक्स्टेन्शनच" नाही तर अतीव आपुलकीचे स्थान आहे. किंबहुना ते तसे नसते तर मी इथे आलेच नसते. "शुचिमामी" हे संबोधन कॉइन करणार्याचे खरं तर अनेक आभार.
एवढं पुराण लावण्याचं कारण - हे ऐकायला आवडेल की मिपा तुमच्याकरता काय आहे आणि तसे का आहे? तसेच मिपा अधिकाधिक वेलकमिंग/वॉर्म होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? (आम्ही डायरी लिहीत नाही हे उत्तर चालणार नाही ;) )
अजून एक मुद्दा - खरड फळा व सदस्यातील परस्पर संबंध हे मिपाचे शक्तीस्थान आहेच पण अन्य कोणती शक्तीस्थाने आहेत?
मिपा का आवडते
गाभा:
प्रतिक्रिया
21 Feb 2013 - 3:17 am | श्रीरंग_जोशी
मिपा आवडते पण का आवडते हे शब्दांत लिहिता येणे जरा अवघड आहे...
21 Feb 2013 - 3:22 am | उपास
पण थोडं महत्त्वाच कारण आहे, की मिपावर त्या अॅड्स नाहीत, त्यामुळे कंपनीतून एक्सेस करायला काहीच आडकाठी येत नाही. तसं जर नसतं तर इथला वावर निश्चितच कमी झाला असता हे नक्की!
(निलकांता पुढे मागे जाहिराती घ्यायचा विचार नाही ना रे बाबा...) ;)
21 Feb 2013 - 3:26 am | शुचि
उपास तुम्ही "पृथ्वी" राशीचे सिसता . अगदी प्रॅक्टीकल बोललात म्हणून विचारले :)
बर्याच संस्थळांवर अॅडस नाहीत की. व्हाय मिपा? भावनिक पैलू असेलच की.
21 Feb 2013 - 4:07 am | कपिलमुनी
अशा भावनेशी मिळता-जुळता आहे ..म्हणून मिपा आपलासा वाटतं !!
21 Feb 2013 - 4:38 am | आनन्दिता
आम्ही नवमिपाकर हाउत. एकदा असच आंतरजाल चाळता चाळता मिपा समोर आलं. मी पहिला लेख वाचला तो यकुचा "अशात काय पाह्यल?" तो लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचुन या संस्थळावर काहीतरी वेगळं आणि दर्जेदार वाचायला मिळतय याची खात्री पटली.. मग काय अधाशासारखं मिपा वाचायला सुरु केलं. पण दुर्दैवाने पुढच्याच धाग्यात यकुविषयीची 'ती' बातमी समजली. अन त्याच्याबद्दल काहीही माहित नसताना ही काळजात चर्र झालं. यकु च्या जाण्याने हळवे झालेल्यांच्या प्रतिक्रिया वाचुन लक्षात आलं की इथे भावनिक नातीही जपली गेलीयेत.
मिपाकर व्हायच्या आधी इथलं बरचसं जुनं लिखाण वाचायचा छंदच लागुन गेला.मोकलाया दाहि दिश्या वाचुन झालेली हहपुवा आजही आठवते.
प्रचंड सुंदर, अभ्यासु लेख आणि तितक्याच भारी प्रतिक्रीया,चेष्टा-मस्करीचं वातावरण, (तेवढ्याच तोडीची वादावादी सुद्धा) हे मिपाचं सगळ्यात हवंहवंस वाटणार रुप आहे.
21 Feb 2013 - 7:02 am | चौकटराजा
मी मिपावर का आलो. तर योगायोग हे उत्तर. इथे आल्यावर बाकी ठिकाणी सदस्य का झालो नाही तर- माझा चेष्टेखोर पण विचारघन स्वभाव .चौकटराजा हे नाव का घेतले तर येथील अनेक आयडी चे लेख पाहिल्यावर वाटले " यार... आपण तर येक्दम माठ" म्हणून मतिमंद क्यारेक्टरचे नाव घेतले "चौकटराजा". एकूणच सोशल नेटवर येण्याचा माझा हेतू समानधर्मा सापडविणे हा आहे. कारण अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजांनंतर प्रेम कौतुक व करमणूक या मानसिक गरजाही तितक्याच महत्वाच्या. इथे जे रमतात त्यांचे शेजारी पक्के भिक्कार आहेत असे समजावे काय? असो सगळ्यांचे नसेल माझे तरी तस्से आहे. इथे न आवडणारी गोष्ट म्हणजे धागा काय यापेक्षा कुणाचा याचे महत्व जास्त आहे.धागा याचाच अर्थ एकाच विषयाला वाहिलेले लेखन. काही वेळेस मूळ लेखनापेक्षाही प्रतिसाद चांगले असले तरी मूळ लेखनाचीच दखल घेण्याची बर्याच जणांची प्रवृती दिसते. असे आंतरजालावर इतरत्र दिसत नाही. कारण धागा ( थ्रेड) ही कल्पना तिथे
उत्तम रुजली आहे. तशी इथे नाही.
21 Feb 2013 - 8:23 pm | शुचि
या वाक्यावर तर टाळ्या व्हायला हव्यात.
21 Feb 2013 - 7:04 am | सहज
१) मिपाच्या आद्य संस्थापकाच्या भाषेत म्हणायचे झाले तर "साला आपले पहीले संस्थळ प्रेम आहे मिपा" (मालकांचे मनोगत होते) :-) इथेच लै भारी लोक भेटले जे चांगले मित्र बनले.
२) तशी मी पण दोन चार मसंस्थळे पाहीली आहेत त्यात मिपाचे वैशिष्ट्य म्हणजे मिपा अक्षरशा शाळेसारखे आहे. थट्टा, मस्करी, विविध गुणदर्शन तसेच मेरीटवाल्या व विशेष नैपुण्य्वाल्या पोरांची अधुन मधुन भारी कामगिरी. सगळे एक छत्राखाली. शाळेप्रमाणे येथेही दरवर्षी नवे विद्यार्थी येतात. पाच वर्षात जुनी बॅच माजी विद्यार्थ्यांची होते. ते देखील आपुलकीने अधुन मधुन येत असतात. जिथे दरवर्षी नवे लोक येउन किमान तीन चार वर्षे योगदान देतात त्या संस्थळाची भरभराट नियमीत होत रहाणार.
21 Feb 2013 - 7:34 am | Nile
आम्हाला मिपा पहिल्यापासून आवडण्याचे कारण म्हणजे इथले संपादक! ;-)
(पळा!!!)
21 Feb 2013 - 9:21 am | नाना चेंगट
सल्लागारांना विसरु नका... :)
21 Feb 2013 - 11:31 am | अभ्या..
आणि तांत्रिक समिती?
फक्त प्रॉब्लेम आले तरच आठवते का? ;)
21 Feb 2013 - 6:25 pm | छोटा डॉन
नान्या, नाईल्या आणि परा असल्याने मला मिपा आवडते.
- छोटा डॉन
21 Feb 2013 - 8:10 am | अत्रुप्त आत्मा
21 Feb 2013 - 8:38 am | श्री गावसेना प्रमुख
22 Feb 2013 - 12:06 pm | पक पक पक
येस्स्स्स !! यहिच बोलता हय... :)
21 Feb 2013 - 8:26 am | तर्री
१. मिपा व्यतिरिक्त मी इतर कोणत्याही मराठी चावडी वर जात नाही. मिपाशी "एकनिष्ठ " ह्यातच सगळे आहे.
२. मिपा मला पूर्वीच्या "अमृत " मासिका सारखे भासते - ज्ञान आणि मनोरंजन.
३. "मुक्त " पणे "व्यक्त" होताना भान सोडून चालत नाही. लिहिताना बोलताना सदस्यांच्या विचार , विवेक , हजरजबाबी पणा , विनोद , वाचन ,उत्खनन सामर्थ्य , नारदीय काडी सारक सामर्थ्य ह्यांचे भान ठेवावे लागते.
४. नाडी पासून माडी पर्यन्त आणि खादी पासून खादाडी पर्यन्त सगळे विषय गुण्या-गोविंदाने "हाताळले" जातात.
21 Feb 2013 - 8:25 pm | शुचि
पूर्वी मी देखील असाच विचार करत असे पण मग चार संस्थळे/फेसबुक ग्रुप पाहीले व वाटले बरे झाले आपली आवडनिवड परत अधोरेखित झाली.
21 Feb 2013 - 8:26 am | शिद
21 Feb 2013 - 8:40 am | मनीषा
मिपा हे मिपा आहे.
21 Feb 2013 - 8:51 am | शैलेन्द्र
मिपा का आवडते, हा फार कठीण प्रश्न आहे. त्यामुळे पास..
21 Feb 2013 - 9:11 am | नाखु
मी मिपावर फक्त "दोनदाच" येतो एकदा "मिपा पहायला नको अस्ते तेव्हा" आणि "एक्दा मिपा बघायचे असते तेव्हा"
हा.का.ना.का.
21 Feb 2013 - 9:21 am | पैसा
एखादी गोष्ट आवडायला काही खास कारण लागते का!
21 Feb 2013 - 9:21 am | मदनबाण
मला इथला मोकळेपणा फार आवडला ! :)
उगाच हुच्चभ्रुपणा करणारी,आपणच लै भारी लिहतो,ज्ञानाचा माज असणारी मंडळी इथे फार कमी असुन (काही टोणगे सगळीकडेच असतात,त्याला पर्याय नाही. ;)) मोकळेपणे विचार करु शकणारी आणि तितक्याच मोकळेपणाने लिहणारी व प्रतिसाद देणार्या मंडळींची संख्या जास्त असल्याने मला इथे यावेसे वाटते.
आज ५ वर्ष झाली मी इथे येत आहे,या काळात मी या संकेस्थळामुळे बरेच काही शिकलो,आणि अजुनही शिकतो आहे,तसेच असंख्य विषय देखील इथेच वाचायला मिळाले.अनेक उत्तम लोक मला या संकेस्थळामुळेच मिळाले.
21 Feb 2013 - 9:41 am | अजया
मिपा म्हणजे नावाला साजेलशी तिखट, खमंग तर्रिदार मिसळ आहे! एकदा खाल्लीतरी परत परत खाविशी वाट्णारी! कुरकुरेची जाहिरात आहे ना,'तेढा है पर मेरा है' तसाच काहीतरी मिपाबद्दल वाटत. मिपासदस्यांचा वात्रट्पणा, अभ्यासुपणा,त्यांचे फोटो,त्यांची भटकंती, पाककृती, अनेक विषयांवरचे अभ्यासू लेखन , त्यांच्या एकमेकांच्या आणि संपादकांच्या कुरापती काढणे हे आमच्यासारख्या टंकाळा करून पॉपकॉर्न खात झाडावर बसणार्यांचे मनोरंजन असते. पण त्याहीपालिकडे जाऊन मिपा आता व्यसन बनले आहे! इथे दिवसभरात येऊन गेल्याखेरीज करामत नाही हेच खरे!
21 Feb 2013 - 11:04 am | क्रान्ति
सासुरवाशीण मुलीला माहेर का आवडते, किंवा लहान मुलांना आजोळ का आवडते त्याच कारणासाठी मिपा आवडते. :)
21 Feb 2013 - 11:26 am | सस्नेह
मिसळ-पाव का आवडतो हे कसं बॉ सांगावं ? खाऊनच बघा ना !
21 Feb 2013 - 11:26 am | बॅटमॅन
मिपावर जो दंगा घालता येतो त्यासाठी आवडते. अन्य कुठे इतका दंगा होत असेल असे वाटत नाही.
21 Feb 2013 - 11:55 am | परिकथेतील राजकुमार
४८० वाचने आणि फक्त २३ प्रतिसाद ?
शुचिमामी तू आता 'मिपा का आवडत नाही' असा धागा काढून बघ. ;)
आपदग्रस्तांनी 'मिपाला आम्ही का आवडत नाही' असा धागा काढण्यास देखील हरकत नाही.
21 Feb 2013 - 12:05 pm | अभ्या..
येतील रे. शुचिमामी आता ब्लॉक बस्टर धागे काढण्यात पटाइत झालीय.
बादवे मामी हे संबोधन वातीवळू खाष्ट काकू पेक्षा जास्त ग्लॅमरस आणि यंगर आहे. ;)
21 Feb 2013 - 12:19 pm | रानी १३
मिपाचा व्यसन लागले आहे.....:):)
21 Feb 2013 - 12:24 pm | जयवी
मिपावर यायला आवडतं.......कारणं शोधली नाहीत कधी. पण खूप आवडतं इतकं मात्र नक्की.
इथे सगळ्यात मज्जा प्रतिसाद वाचतांना येते :)साहित्य, काव्य, कला, पाकृ..... हे लिहिणारा अगदी मनापासून लिहितो आणि त्यावर प्रतिसादक त्याहूनही आकांताने लिहितात. कधी कधी मूळ लेखन राहतं एका बाजूला मात्र प्रतिसाद अफलातून येतात. फुल्टू टाइम पास :)
21 Feb 2013 - 12:27 pm | तुमचा अभिषेक
मराठी माणसे फार भावनिक असतात, त्यामुळे कोणताही समूह त्यांना तेव्हाच आवडतो जेव्हा तेथील लोकांशी त्यांचे भानविक बंध जुळतात. बाकी दर्जेदार लिखाण, ग्यानी सभासद, उपयुक्त माहितीचा खजाना वगैरे वगैरे या गोष्टी त्यानंतर आल्या.
हे जनरल स्टेटमेंट झाले, तुर्तास मिपावर नवीनच असल्याने धाग्यावर नो कॉमेंटस.. :)
21 Feb 2013 - 8:26 pm | शुचि
खरं आहे.
21 Feb 2013 - 2:02 pm | चिगो
मिपाची ओळख अगदी योगायोगाने झाली. एका ग्रुपवर टाकलेली लोकमान्य टिळकांवरील कविता मिपावरची आहे, हे कळल्याने इकडे वळलो, आणि इकडचाच झालो. (अगदी, बायको मिपाला "सवत" मानते, इतका.. ;-)) मला मिपाचा मोकळेपणा आणि दंगा आवडला, भावला.. मीही कदाचित तसाच आहे म्हणून. वर सहजराव बोललेयत, तसं मिपा आपल्या शाळेसारखं आहे.. इथं खोड्या निघतात आणि साथही मिळते.. आयुष्यात कधीही प्रत्यक्ष न भेटलेले मित्र मिपावर "भाड्या" बोलू शकतात, आणि मला ते आवडतं ह्यातचं आलं की सगळं..
आणखी एक कारण म्हणजे मिपामुळे "दुसर्याने दखल घेण्याजोगं आपण लिहू शकतो" हा विश्वास मिपाने दिला.. खरंतर माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात मला जे एकमेव व्यसन असल्याचं जाणवलं, ते "मिपाव्यसन"..
21 Feb 2013 - 2:15 pm | मन१
आवडतं की नै ठाउक नै.
आंजाला (विशेषतः मिपाला) लै शिव्या घालत असलो तरी मिपाशिवाय करमत नै.
21 Feb 2013 - 2:18 pm | सुमीत भातखंडे
शब्दात नाही सांगता यायचं...पण मिपाशिवाय करमत नाही हे मात्र खरं
21 Feb 2013 - 2:41 pm | इरसाल
मला मिपा आवडते मी इथे खालील बाबी बघायला येतो.....
१.काही लोक एकदम छान कथा लिहीतात.
२. काही जणांचे ऐतिहासिक ज्ञान अतिशय प्रगल्भ आहे त्याने फायदा होतो.
३. नवीन नवीन गोष्टी पहायला मिळतात.
४.फुकटात परदेशातील नजारे बघु शकतो.
५.वेगवेगळे पदार्थ कसे बनवता येतात ह्याचे ज्ञान प्राप्त होते.
६. नवीन कंपु तयार होतानाच जुन्या कंपुला कसा कुंपणाबाहेर करतो ते पहायला मिळते.
७.स्वतःच्या कंपु बरोबर ४/२ सहली झाल्या कि मग पितळ उघडे पडल्यावर कंपु तुटतो मग तिथला स्कोर मिपावर सेटल होताना जळफळणारे ते
८.कुठे तारा जुळल्यावर परत मनमुटाव होवुन विरुद्ध पार्टीचे धाग्यावर शिमगा साजरा करणे किंवा त्याला मिपावरुनच काल बाह्य करण्याचा प्रयत्न करणे हे पहायला मजा येते.
९. अधिकार्यांना हाताशी धरुन आपल्यावरच लाल रंगाचा डबा खाली करुन घेणार्यांना अनुभवायला
१०.स्वतःची शिंग मोडुन वासरात घुसायचा प्रयत्न करणार्यांना बघायला.
११.मिपावर अधिकार पद नाही मिळाले म्हणुन मिपाला जिथे-तिथे झोडपायचा प्रयत्न करणार्यांना बघायला
१२.जेव्हा बघावे तेव्हा पेप्रातला शब्द उचलुन मिपावर गोंधळ घालणार्यांना बघायला
१३.आपले तयार लेख्/कविता वगैरे मिपावर टाकुन फक्त त्याच दिवशी आजुबाजुच्या १/२ धाग्यांवर प्रतिसाद देवुन पुन्हा फक्त आप्ले लेख्/कविताच टाकायला उगवणार्यांना
१४. झिलकर्यांना बघायला.(आपल्या कंपुचा धागा आहे ना कसाही पोहचवा त्याला ५० पार)
१५.समस्त मिपाकरांना आपल्या वडिलांचे लहान भाउ बनवु बघणार्यांना
१६. लोकांना जिलब्यापाडु म्हणता म्हणता स्वतःच एक जिलेबीचा साचा बनणार्यांना
१७.नवीन कुणी स्वतःच्या राखीव कुंपणात घुसत असेल तर त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न करणारे.
१८.काही नवीन सदस्य, जुन्या सदस्यांची कृपादृष्टी राहुन त्यांनी आप्ल्या धाग्याला खराब करु नये म्हनुन जे काय फंडे आजमावतात ...
१९.नवीन आल्या आल्या मिपावरील कोणाचे उपद्रवमुल्य जास्त आहे त्याच्या खरडवहीत नमन करायला जाणारे.
२०.खरडवही उचक्पाचक करुन दुसरीकडे हनुमानगिरी करणारे पहायला.
.
.
.
.
.क्रमशः
21 Feb 2013 - 2:45 pm | इरसाल
आमचं फकस्त आब्जरवेशन हाये. फुकाफुकी आमचा कोनताच डायरेक संमंध नाय.
कळावे, लोभ र्हावु द्या.
कुंथलगिरीकर इरसाल
21 Feb 2013 - 2:51 pm | दादा कोंडके
सहमत! :)
21 Feb 2013 - 11:00 pm | आदूबाळ
सर्वात हिट्ट प्रतिसाद!
28 Feb 2013 - 1:19 am | जेनी...
कळतात बरं टोमणे इरसाल काका :-/
21 Feb 2013 - 2:46 pm | ऋषिकेश
ह्म्म आवन नावड म्हैत नाही.. इथे सतत येत रहावंसं वाट्टं खरं!
21 Feb 2013 - 4:50 pm | अनन्न्या
पण आता सवय झालीय सावकाश चव चाखायची!! अनेक वेगवेगळ्या विषयांची माहिती एकत्र मिळते तेही आपल्या भाषेतून!! मराठी इतकाच मिसळपावही आवडतो, झणझणीत तरीही चविष्ट.
21 Feb 2013 - 4:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
कठिण प्रश्ण आहे... प्रश्न "मिपा आवडते का? असा असता तर... म्हणजे पटकन "हो" म्हणून मोकळे होता आले असते.
आता आठवत नाही पण कोणीतरी मिपाच्या एका धाग्याची लिंक दिली म्हणून इथे आलो होतो... धागा तर छान होताच पण त्याच्यावरच्या धमाल प्रतिक्रिया वाचून माझी जी अवस्था झाली त्यावरून पहिल्यांदा मिपातच वाचलेल्या "हहपुवा" चा अर्थ काय हे विचारायची अजिबात गरज पडली नाही. सहाजिकच इतर धागेही (अर्थात प्रतिसादांसकट हेसांनल... हे "हेसांनल" ही मिपावरूनच उचलेले आहे !) चाळले आणि सरते शेवटी, "याअगोदर इतके केव्हा हसलो होतो हे खरच आठवत नाही बॉ !" ही जाणिव झाली. मिपा का आवडले याचे उत्तर याच्यातच आहे.
पण सतत मिपावर फेरी मारायची सवय लावली ती अभ्यासू / विनोदी / वात्रट / गंभीर / इ. लेखांनी आणि त्याच्यावर आलेल्या तेवढ्याच अभ्यासू / विनोदी / वात्रट / गंभीर / इ. प्रतिक्रियांनी... अर्थात ज्याप्रकारचा लेख आहे त्याप्रकारच्याच प्रतिक्रिया असतील अशी खात्री देता येत नाही... उलट, त्या तशा नसतील याची पुरेपूर खात्री देता येइल ;). किंबहुना "लेख शेर तर प्रतिसाद सव्वाशेर" असे होण्यासाठीच काही लेख लिहिले जातात असा आमचा ग्रह झाला आहे... पण त्याला आमची अजिबात हरकत नाही. कारण हहपुवा झाल्यामुळेच नाही का आम्ही मिपाच्या गळाला अडकलो ? ;)
21 Feb 2013 - 5:09 pm | अविनाशकुलकर्णी
मला मिपा आवडते
मला मिपा तले काथ्याकुट हे सदर आवडते.
व मला सारखे नव नवे विषय सुचत असतात चर्चे साठी.
कळावे लोभ असावा
अकु
21 Feb 2013 - 5:29 pm | तिमा
लहानपणापासून एक व्रात्य मुलगा माझ्यात दडून आहे. मला लाभलेल्या शाळांमधे या व्रात्यपणाला खतपाणी मिळाले. पुढे, शिक्षण संपल्यावर नोकरी करताना असे व्रात्य मित्र गुपचूप शोधावे लागायचे. नोकरीच्या निमित्ताने , अपडाऊन करताना तर भरपूर मस्ती करायला मिळाली. पण नंतर हे व्यसन झाले. अचानक एक दिवस 'मिपा' चा शोध लागला आणि मला माझे जुने मित्र परत मिळाल्याचा आनंद मिळाला. प्रतिक्रिया हे प्रमुख आकर्षण. त्याशिवाय इथे अत्यंत ज्ञानी व्यक्ती आहेत हे अनेक लेख वाचून समजले. उत्कृष्ट कविता लिहिणारे भेटले. एक मोठ्ठा खजिनाच मिलाल्यासारखे वाटले.मग, रोजची फेरी हा एक अनिवार्य भाग झाला. आता मिपा सोडणे कधीही शक्य नाही, हे कळून चुकले आहे.
21 Feb 2013 - 8:22 pm | शुचि
आवडला.
21 Feb 2013 - 5:55 pm | प्रसाद१९७१
कुठेतरी वेळ घालवायची जागा पाहिजे ना म्हणुन मिपा वर. उगाचच खोटे कशाला बोला.
21 Feb 2013 - 6:06 pm | अभ्या..
मिपा मला लै आवडतं कारण अजून इथे कोणी मला वाकडं बोललेलं नाही.
सुरुवातीलाच मी येथे लवकर रुळल्याचे सर्टिफिकेट मिळाले. तसा मी पण सभ्य असल्याने तशीच समानशील मंडळी इथे भेटली. थोडा कलेला वाव पण मिळाला. एकूणच वेळ कसा जातो हे कळत नाही. मग असतो इथंच. :)
21 Feb 2013 - 6:17 pm | परिकथेतील राजकुमार
कशाला असले फालतू प्रतिसाद देतो रे ?
मान ना मान, मै तेरा मेहमान.
उगाच कुठल्यातरी लोकाच्या जाहिर नोटीशीला ठिगळे जोडणे म्हणजे कला ?
आता फिटली का रे हौस ? ;)
21 Feb 2013 - 6:22 pm | अभ्या..
=)) =)) =)) =)) मज्जा आली
असले प्रतिसाद देणार असशील तर अजून खरडेन. ;)
22 Feb 2013 - 12:09 pm | पक पक पक
असले प्रतिसाद देणार असशील तर अजून खरडेन
नको त्ये लैच कापड फाड्त... ;)
21 Feb 2013 - 6:08 pm | प्रसाद१९७१
अभिव्यक्तीची फार च हौस तुम्हाला अभ्या...
21 Feb 2013 - 6:14 pm | अभ्या..
जिथं पुरवली जाती तिथेच हौस करतो भौ आपण.
नको तितं नाक खुपसायला जातच नाही. ;)
21 Feb 2013 - 6:45 pm | शुचि
सर्वच प्रतिसाद आवड्ले. क्रांती यांचा तर सर्वात आवडला.
21 Feb 2013 - 7:56 pm | लीलाधर
णरका लाम थेई धविनाना लाली लायराक ववा तोळमि. ळेमुत्या पामि झेमा णिआ मी चापामि :))
22 Feb 2013 - 9:47 am | चौकटराजा
झुता तप्रीसाद चावून सहून सहून रुपेवाट लाझी !
( विय षाभा णुकाला पिमावर तेय सएल रत न्याते झाम्याशी पंसर्क रकावा !)
22 Feb 2013 - 2:53 pm | प्रभाकर पेठकर
कौचट्जारा हासेब,
लमा तेये इत षाभा. झाम्या रतूणणपाची डोकगँल्वेज हेआ ही. ताआ व्हेतडी क्रॅप्टिस हानी. णप सिवरलेलो हानी.
पूख विदसांनी चावताना जमा लाई.
नध्यदाव.
22 Feb 2013 - 8:00 pm | चौकटराजा
चावून नध्य लाझो वुबा !
22 Feb 2013 - 2:26 pm | श्री गावसेना प्रमुख
म्हालातु डरंए च लेत वहय का?
21 Feb 2013 - 7:58 pm | ५० फक्त
माताय, स्पर्धा होती काय, उत्तम प्रतिसादाची, बोलायचं ना एकदा तरी, असलेले नसलेले सगळे आयडि वापरुन किमान १०-१२ तरी द्वणीय प्रतिसाद टाकले असते.
21 Feb 2013 - 8:22 pm | शुचि
हाहा :)
21 Feb 2013 - 8:11 pm | रेवती
असा धागा पूर्वी येऊन गेलाय म्हणून मी नाही सुरु केला. ही शुचीमामी (शब्द पराकडून हिसकावून घेतला आहे, आभार नंतर मानण्यात येतील) शतकी धागे काढते, कोणत्याही विषयावरचे. मला मात्र मते गोळा करावी लागतात. ह्या! याच कारणासाठी मला मिपा आवडत नाही. ;)
21 Feb 2013 - 8:21 pm | शुचि
होय रेवती असा धागा येऊन गेला आहे पण नवीन लोकांच्या भवनांना वाट करून देण्याकरता पुनरप्रकाशन :D
21 Feb 2013 - 8:31 pm | रेवती
अगं, मग मला सांगायचस तरी! ;)
तुझा धागा आला की मग सुचतं मला!
21 Feb 2013 - 8:32 pm | रेवती
अगं, मग आधी सांगायचस तरी! ;)
तुझा धागा आला की मग सुचतं मला!
21 Feb 2013 - 8:41 pm | स्मिता.
मागे एका पाकृच्या धाग्याची आम्ही शंभरी करून दिली होती हे एवढ्यात विसरले जाईल असे वाटले नव्हते! ;)
21 Feb 2013 - 11:17 pm | रेवती
छे छे! विसरले नाहीये. तेवढा एकच सुखाचा धागा आला होता. मी नंतर नको नको म्हणत असताना तुम्ही सगळ्यांनी आग्रहाचा एक, माहेरचा एक असं म्हणत प्रतिसाद (भरवले) दिले होते मुरांब्याच्या धाग्यावर! पण ना शुचीमामीची बातच और आहे. ;) सगळे ग्रह, तारे, पुस्तके, देवदेवता, स्तोत्रे काहीही असू देत हीची शेंचुरी ठरलेली. ;)
21 Feb 2013 - 8:18 pm | स्पा
चान चान धागा
21 Feb 2013 - 8:22 pm | शुचि
:-/
21 Feb 2013 - 8:26 pm | दादा कोंडके
या स्मायली बरोबर स्पाकाका म्हणायचं राहिलं का? ;)
21 Feb 2013 - 10:46 pm | स्पा
यो शुची मामी
:)
21 Feb 2013 - 8:36 pm | नानबा
मला मिपावर काय आवडतं?? ह्म्म्म्म्म.. एक तर इकडे असणारा मनमोकळेपणा, वय, स्थळ कशाचंही बंधन न ठेवता मुक्तपणे चालणारा संवाद, गंभीर धाग्यांवरही येणार्या वात्रट प्रतिक्रिया आणि त्यांवर मनमुराद हसून मिळणारा निखळ आनंद... :)
21 Feb 2013 - 8:53 pm | दादा कोंडके
म्हणजे मुक्त, स्वैर, स्वच्छंदी... म्हणा की. ;)
21 Feb 2013 - 8:57 pm | यशोधरा
कारणं शोधली नाहीत, अगदी आधीही मिपावर होते, मध्यंतरी बरेच काळ वाचनमात्र होते, पण मिपा सोडून कधी गेले नाहीये. :)
21 Feb 2013 - 9:10 pm | प्रभाकर पेठकर
व्यक्त होता येतं, पाककृत्या देता/घेता येतात,
21 Feb 2013 - 9:15 pm | प्रभाकर पेठकर
वेळ मिळत नसल्याने इतर संस्थळांचा (मनोगत वगळता, तिथूनच तात्यांनी ओढून इथे आणून सोडलं) अनुभव नाही. मिपासदस्य झाल्यापासून वेळ फारच कमी पडतो आहे. अजून एक राहिलंच, आपण किती म्हातारे झालो आहोत हे मिपावर॑ कळतं, आरसाच म्हणाना.
21 Feb 2013 - 9:10 pm | जातवेद
जेव्हा दिवसभर काम करुन मेंदुचा भुगा होतो, तेव्हा आम्ही मिपा चा रस्ता पकडतो.
21 Feb 2013 - 9:31 pm | अग्निकोल्हा
म्हणुन येतो.
21 Feb 2013 - 11:01 pm | अधिराज
मिपावर कसे अगदी घरच्यासारखे वातावरण आहे, म्हणून हवेहवेसे वाटते.
22 Feb 2013 - 12:13 am | सूड
पूर्वी इथे बरेच चांगले चांगले लेख वाचायला मिळायचे (आता तितकेसे नसतात), लहर आली की एखादं विडंबन टाकता येतं, भटकंतीचे लेख वाचायला मिळतात, मध्येच सुरु होऊन मध्येच बंद पडलेल्या कोकणी क्लासेसमुळे थोडीफार कोकणी समजू लागली आणि ग्रूपमधल्या एका गोंयकाराबरोबर कोकणीत तोडकंमोडकं बोलता येऊ लागलं, शुचिमामींचे टाईमपास धागे, क्रांतितै/ मिकाच्या कविता, वल्लीची जुन्यापुराण्या गोष्टींची माहिती देणारे लेख, धन्याचं एखादं बोधप्रद काव्य, गणपा/सानिकास्वप्निलच्या रेशिप्यांचे फोटु बरंच काय काय. (शुचिमामी, इतकी कारणं पुरे की पाणी टाकून वाढवू थोडं ;))
22 Feb 2013 - 12:49 am | शुचि
पुरे रे! मस्त!!
22 Feb 2013 - 12:35 am | कवितानागेश
मला मिपा आवडते.
कारण इथे परीकथेतील राजकुमार आहे, ;)
शिवाय पैसापण आहे! :P
22 Feb 2013 - 12:50 am | शुचि
भारी आहेस ग तू माऊ.
22 Feb 2013 - 1:37 am | अग्निकोल्हा
गुड वन.
22 Feb 2013 - 2:44 pm | स्मिता.
हे बाकी अगदी खरं हां!
22 Feb 2013 - 12:07 pm | सुहास..
चुनिन्दा दोस्तोंसे मतलब है,
कुछ जिन्दगी की तलब है,
गैर-आजमी है सवालसे तेरे,
आना, न आना, गैरमतलब है.
:)
22 Feb 2013 - 6:54 pm | शुचि
वा!
22 Feb 2013 - 12:33 pm | अमोल केळकर
आपला फक्त मिपाच माहित आहे. :)
22 Feb 2013 - 12:36 pm | यशोधरा
मायबोलीवरही तुमच्या पोस्टी पाहिल्याचं आठवतं आहे.
22 Feb 2013 - 1:16 pm | बाबा पाटील
भंगार नाद आहे राव,सगळ्या कामधंद्याची वाट लागतीय्,परत वरुन या मिपापाई पाटलीनीच्या शिव्या पन खाव्या लागतात,"आग लाव तुझ्या मिपाला" म्हणुन.....
22 Feb 2013 - 1:34 pm | लॉरी टांगटूंगकर
बऱ्याच गोष्टी बघण्याचा नवा चष्मा इथे मिळाला,
आमच्या शाळेत कवितांचे चोथा ग्रहण चालायचं, आधीच कविता या प्रकाराशी भयानक वाकडं होते,
आमच्या मास्तरनी पारवा कवितेचा केलेला चुरा अजून लक्षात आहे. एक पारवा आहे , तो धर्माशालेवर बसलाय , आणि ठणाणा करतोय......
१० पैकी ४ चे आयएमपी मधले प्रश्न वाचून जायचो.१० वि संपल्यानंतर असले काही परत नाही म्हणून खुश झालेलो, इथे जरा थोडे फार वाचल्यानंतर कविता पण आवडायला लागल्या... कळतातच असे नाही पण व्ह्यू नक्की बदलला...
पाककृती बघून थोडे प्रयत्न करावे म्हणले, पण माझ्या एन्ट्री नंतर चांगले होत असेलेले पदार्थ बिघडायला सुरुवात झाली. आणि माझी स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. घरी कोणी नसताना काही प्रयत्न झाले .त्यात एकदा उत्तपा बनवायला घेतला आणि त्याचा भुर्जी सदृश्य पदार्थ बनला असे बरेच प्रयोग झाले.
असं बरंच काही ....
22 Feb 2013 - 1:39 pm | खटासि खट
इथे येऊन आमचा आदर वाढिस लागत आहे. मिस पूजा पवार यांचे विचार वाचण्यास मिळत आहेत.
22 Feb 2013 - 2:01 pm | इरसाल
त्यांचे लग्न आहे म्हणे. आणी तो अ वरुन नाव सुरु होणार्या एका आयडीचा डुआयडी आहे म्हणे.
28 Feb 2013 - 1:22 am | जेनी...
इरसाल काका ' अ ' वरुन ' अभ्या ' तर नै ? ;)
=))
28 Feb 2013 - 1:24 am | जेनी...
खट्टु काका .. तुमच्या वाढलेल्या आदराला मी नित्यनेमाने खतपाणि घालीन असे
आपणास वचन देते :)
सो नायिसोफ्फ्यु खट्टु काका ;)
22 Feb 2013 - 1:50 pm | प्रसाद गोडबोले
माझ्या मते प्रत्येक संस्थळाचे प्रोज आणि कॉन्स असतात ....त्याच्याविषयी इथे बोलायला हरकत नसावी असे वातते म्हणुन बोलत आहे
पुढील सगळी वैयक्तिक मते आहेत : राग नसावा :
मनोगत वर प्रत्येक गोष्ट संपादक स्कॅन करुनच पोस्ट करतात अर्थात एक्क्ष्ट्रीम गव्हर्नन्स आहे आता ह्यामुले उगाचच बाष्कळ लेखन तिथे कधीच पहावयाला मिळाले नाही पण ह्याचीच दुसरी बाजु की जवळपास तुमच्या प्रत्येक लेखनावर संपादकांचा प्रतिसाद असतो " व्याकरण तपासुन पहा " ...एकदम शाळेत असल्यासारखे वाटते ...भाषाशुध्दीबाबतीत मनोगत एकदम कट्टरपंथीय पुणेकर आहे.
मायबोली वर पब्लिक इन्टरूकश्न प्रचंड आहे ...पण तसेच प्रचंड बाश्कळपणाही आहे ...खूप जण चांगले मित्र आहेत ...पण प्रचंड कंपुबाजी असल्याने इतर जणांशी मिक्स होण्यात लईच प्रॉब्लेम येतो ...ह्या संकेतश्तळाचे सर्वात भारी वैशिष्ट्य तुम्ही स्वतःचे लेखन अप्रकाशित करु शकता . आणि ह्या शळाचे (माझ्यामते )सर्वात वाईट वैशिष्ट्य की हे गांधी आणि गांधी घराण्याविषयी अजिबात टीका खपवुन घेत नाही . सदर लेखच नव्हे तर आय डी ही डीलीट केला जातो .
आता सर्वात महत्वाचे मिपा का आवडते
नुकताच मिपावर आलो आहे ( ज्यामाणसाचे लेखन वाचुन मिपावर आलो त्याचा उल्लेख जाणिवपुर्वक टाळत आहे :( ). अजुन तरी कंपुबाजी निदर्शनास आलेली नाहीये . येथील संपादक लगेच रीप्लाय करतात.
आणि सगळ्यात महत्वाचे की मी काढलेल्या एका धाग्यावर अनेक लोकांचे उत्तमोत्तम लेखनाचे धागे मिळाले आहेत त्यामुळे ४-५ महीने तरी वाचनाची मज्जा .!!
तोवर बघुया काही कॉन्स सापडतात का ते !!
22 Feb 2013 - 2:26 pm | चैदजा
गिरीजा ताई/दादा शी सहमत.
तुम्ही सगळे माझे रोजच्या दादर ते ठाणे प्रवासातील सोबती आहात. कित्येक वेळा विनोदी लेख/प्रतिसाद वाचल्यावर जोरात हसल्यशिवाय राहवत नाही, तर काही लेख वाचुन डोळ्यातुन जास्त पाणी येऊ नये म्हणुन मोबाईल बंद करावा लागतो.
22 Feb 2013 - 2:51 pm | ५० फक्त
तुमचं ठीक आहे, तुम्ही मोबाईल बंद करता, पण ज्यांच्या डोळ्यातील आसवांच्या महापुरामुळे ऑफिसचे किबोर्ड वाहुन जातात किंवा खराब होतात त्यांनी काय करावं.
23 Feb 2013 - 9:10 pm | चैदजा
खि़क.
ऑफिसचेच किबोर्ड वाहुन जातात ना ? डोळे खराब होत नाही ना ?
मग ठीक आहे.
22 Feb 2013 - 2:30 pm | श्री गावसेना प्रमुख
वरील सर्व लोकांचे सर्व अनुभव खरे असावेत हे ग्रुहीत धरतो,
22 Feb 2013 - 2:36 pm | इशा१२३
मिपा वाचायला लागले आणि व्यसनच जडले कि मिपाचे...
22 Feb 2013 - 3:03 pm | नि३सोलपुरकर
एका शब्दात सांगायचे झाल्यास मी म्हणेण की मला मिपा आवडतो तो तो "प्रगल्भ " आहे म्हणुन.त्याला माहीत आहे कुठे सुरुवात करायची आणी कुठे थांबायचे (त्याला : इथले सं.मं ,लेखक ,प्रतिसादक)
बाकी जसे मिसळ पाव खाल्यानंतर इतर काही खाण्यास भुक उरत नाही...तसेच मिपावर आल्यानंतर पोट भरुन जाते.
22 Feb 2013 - 3:50 pm | kanchanbari
रोज त्याच जेवनाचा कंटाला येतो हो म्हणुन मिपा चाखत असतो :)
22 Feb 2013 - 4:33 pm | भावना कल्लोळ
वाचनाची आवड आहे, त्यातून ऑफिस मध्ये नेट चा स्वैर वापर असल्याने फावल्या वेळेत मराठी वाचनासाठी चा शोध शुरू झाला आणि गुगल वरून मिपा ची ओळख झाली, मिसळपाव नावाचे संकेत स्थळ असू शकते हेच कुतूहल वाटले आणि मग सर्वाचे लेख, कविता वाचून मी पण मिपाची " Fan " झाले....... हो आता सदस्य पण आहे.
22 Feb 2013 - 4:37 pm | किसन शिंदे
धागा असाही द्विशतक गाठणार आहेच. आमचा आपला १०० व्या साठी हातभार. ;)
22 Feb 2013 - 4:45 pm | jaypal
जुन्या नाक्यावर आल्यासारख वाटत. फुल्ल टु दंगा, मस्ती आणि प्रतीसादांची दबंगगीरी.अजुन बरच काही .........अव्यक्त.
खुप सारे खरे आणि व्हर्चुअल मित्र (साला "भोचक" आणि "यक्कु" अचानक चटका लावुन गेले :-()
22 Feb 2013 - 5:03 pm | यशोधरा
झाले शतक शुचि! :)
22 Feb 2013 - 5:54 pm | प्यारे१
ह्या शुचिच्या तर....!
सगळ्या गोष्टी का अशा बोलून दाखवायच्या असतात का? आमच्या सार्ख्या सगळ्या संस्थळांवर वावरणार्या लोकांनी काय करायचं?
बाकी मराठी आंजा (किंवा एकंदरित च आंजा) म्हणजे स्वतःच स्वतःच्या (म्हणजे कुणी कुणाच्या वीचारु णये) बडवून घेण्याचा एक सं(हे संपादकीय देखील असू शकतं)क्शीण प्रयत्न आहे असं णमूद करु इच्च्चितो.
22 Feb 2013 - 6:58 pm | शुचि
अरे आपण आपलं तुणतुणं वाजवायचं नाही तर कुणी रे? तसही मिपा गुणाचं आहेच्च्च!!!
22 Feb 2013 - 11:35 pm | पिवळा डांबिस
मिपा का आवडते?
इथल्यासारखे हलकट दोस्त नाहीतर आणखी कुठे मिळणार?
नांवं घेत नाही कारण त्या चोरांना नक्की माहिती आहे ते कोण आहेत ते!!!
:)
फड गप्पांचा रंगात आला,
फड गप्पांचा, रंगात आला,
तुज्या मिपाला लागंल कोल्हा रं,
तुज्या मिपाला लागंल कोल्हा!!!!
:)
27 Feb 2013 - 1:22 pm | नक्शत्त्रा
ी नाही सांगणार जा........................
सगळ्यांनी सगळे सांगितले.........माज्या साठी काहीच नाही शिलक ठेवले.
27 Feb 2013 - 5:12 pm | रश्मि दाते
सहज आले होते मिपा वर अन नाद लाग्ला मिपाचा कारणे सगळि देउन झाली आहेत सर्वांची.
28 Feb 2013 - 3:27 am | टपरी
मिपा खरतरं लेखांना मिळणाऱ्या प्रतिसादांमुळे आवडते .एकमेकांची जी खिल्ली उडवली जाते ती खरंच वाचण्यासारखी असते.