साहित्यः
१ वाटी तूरीची डाळ स्वच्छ धुवून २०-२५ मिनिटे भिजवून ठेवणे
१ टोमॅटो बारीक चिरलेला
२ टेस्पून अख्खे शेंगदाणे
२ टेस्पून गुळ (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
५-६ कोकम पाकळ्या
१ टीस्पून बारीक चिरलेले आले
१/२ टीस्पून हळद
१-१/२ लाल तिखट
१-१/२ टीस्पून धणे-जीरेपूड
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून मेथीदाणे
१/२ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून हींग
१ दालचिनीची काडी तुकडे करुन
३-४ लवंगा
कढीपत्ता
१ लाल सुकी मिरची
मीठ चवीप्रमाणे
चिरलेली कोथींबीर
पाकृ:
कुकरच्या भांड्यात भिजवलेली तूरीची डाळ घ्यावी, त्यात चिरलेला टोमॅटो, आले व शेंगदाणे घालून कुकरला ५-६ शिट्ट्या काढून डाळ मऊसर शिजवून घ्यावी.
शिजवलेली डाळ जरा घोटून घ्यावी व गरजेप्रमाणे पाणी घालून गॅसवर उकळायला ठेवावी.
त्यात आता हळद, लाल तिखट व धणे-जीरेपूड घालून चांगली उकळी काढावी.
उकळ आली की त्यात कोकमं, गुळ व चवीप्रमाणे मीठ घालावे व शिजवावे.
वरुन कोथींबीर घालावी.
बुट्टीत बटर किंवा साजूक तूप गरम करावे व त्यात दालचिनी,लवंगा घालून हलके परतावे.
त्यात मोहरी व मेथीदाणे घालावे.
मोहरी तडतडली की त्यात जीरे, हींग व कढीपत्ता घालून फोडणी करावी.
लाल सुकी मिरची घालून तयार फोडणी शिजवलेल्या डाळीवर ओतावी.
१० मिनिटे डाळ झाकण लावून तशीच ठेवावी म्हणजे फोडणीचा स्वाद त्यात उतरेल.
गरम-गरम आंबट -गोड-तिखट अशी गुजराथी डाळ वाफाळत्या भाताबरोबर किंवा जीरा-राईसबरोबर सर्व्ह करावी.
नोटः
गुजराथी लगन नी डाळ्मध्ये काहीजण सुरण व खारकेचा वापर करतात.
जर तुम्ही ह्याचा वापर करणार असाल तर सुरण व खारीक दोन्ही कुकरला वाफवून घ्या व डाळ उकळत असताना त्यात घालून शिजवा.
प्रतिक्रिया
20 Feb 2013 - 5:43 am | मोदक
पाककृती आ व ड ली.
:-)
20 Feb 2013 - 7:02 am | रेवती
उद्या परवामध्येच ही डाळ करून बघणार. नुकताच हा प्रकार खाऊन पाहिला होता पण कृती माहित नव्हती. डाळ केल्यावर इथे कळवीनच. लगन डाळीत जसे सुरण घालतात तसे केळेही घालतात अशी मजेशीर माहिती समजली आहे.
चित्रफीत नेहमीप्रमाणेच चांगली आलीये. बरेच धन्यवाद. :)
20 Feb 2013 - 5:19 pm | सानिकास्वप्निल
हो जैन लोकं सुरणाऐवजी कच्च्या केळ्याचा वापर करतात :)
धन्यवाद
20 Feb 2013 - 6:36 pm | रमेश आठवले
जैन आहारात कंदमुळे वर्ज्य आहेत. त्यामुळे मसाला डोश्यामध्ये सुद्धा बटाट्याऐवजी केळ्याची भाजी वापरतात . काही हॉटेलात जैन डोसा मिळतो.
20 Feb 2013 - 9:41 am | पैसा
सानिकाकडून आणखी एक मस्त पाकृ! व्हिडो बघून प्रत्यक्ष बोलत असल्यासारखं वाटतं ते मस्तच!
20 Feb 2013 - 9:58 am | अक्षया
नक्कीच करुन बघणार. धन्यवाद :)
20 Feb 2013 - 10:38 am | स्मिता चौगुले
मस्तच... आजच करुन बघते .. :)
20 Feb 2013 - 11:08 am | परिकथेतील राजकुमार
पण पित्तकारक असल्याने जपूनच खावी. ;)
गुजरातनिवासी
परा
20 Feb 2013 - 4:11 pm | चिंतामणी
त्यात अमसुल आहे.
ते फक्त चवीसाठी नसून पित्तशामक म्हणुनसुद्धा वापरले आहे.
20 Feb 2013 - 4:13 pm | परिकथेतील राजकुमार
मग त्याने आम्लपित्त होणार.
पण पित्त होणारच. ;)
20 Feb 2013 - 4:29 pm | स्मिता.
गूळ आणि आमसुलं असल्याने नाही होणार पित्त. तू खाल्लेल्या डाळीत आमसुल नसेल ;)
@सानिका: पाकृ नेहमीप्रमाणे मस्तच. आपल्या आमसुल-गूळाच्या आमटीचंच व्हेरिएशन वाटतंय.
20 Feb 2013 - 11:13 am | क्रान्ति
छान खमंग पाकृ. आणि ती प्रत्यक्ष करताना पाहण्याची मजा काही वेगळीच :) नक्की करून बघणार.
20 Feb 2013 - 12:07 pm | दिपक.कुवेत
करुन बघणार.
20 Feb 2013 - 12:31 pm | सस्नेह
रोजच्या आमटीपेक्षा बदल.
याला दाल फ्राय म्हणता येईल का ?
20 Feb 2013 - 12:36 pm | मृत्युन्जय
मस्तच. अजुन काय प्रतिक्रिया देणार वेगळी प्रत्येकवेळेस :)
20 Feb 2013 - 12:37 pm | मदनबाण
वा... :)
20 Feb 2013 - 12:46 pm | धनुअमिता
खुपच छान..... करुन बघणार
20 Feb 2013 - 1:50 pm | जयवी
ए मस्त दिसतेय गं....... नक्की करुन बघेन :)
20 Feb 2013 - 1:59 pm | ऋषिकेश
मस्तच! करून बघायचे ठरवले आहे
20 Feb 2013 - 2:31 pm | त्रिवेणी
आजच करणार
20 Feb 2013 - 2:42 pm | सुहास झेले
नेहमीप्रमाणे अप्रतिम पाककृती.... :) :)
20 Feb 2013 - 3:55 pm | अभ्या..
घंगाळे भरुन भात, बादलीभर दाळ. ब्येस्ट एकदम. लै आवडले.
20 Feb 2013 - 4:14 pm | चिंतामणी
आत्तापर्यन्त फोटोतुन तुझे प्रेझेंटेशन बघत होतो. आज विडो पाहून खल्लास झालो.
___/|\___
पाकृ आंणी प्रेझेंटेशन दोन्हिही मस्त.
(आज प्रतिसाद बदलला आहे याची नोंद घेशिलच)
20 Feb 2013 - 4:42 pm | अविनाशकुलकर्णी
विडो टाकल्याने एकदम प्रोफेशनल टच आला ..
प्रेझेन्टेशन व पदार्थ आवडला
20 Feb 2013 - 5:24 pm | निवेदिता-ताई
अतिशय सुंदर
20 Feb 2013 - 11:06 pm | शुचि
बहु सरस छे.
21 Feb 2013 - 3:45 am | Mrunalini
मस्त दिसतिये डाळ... नक्की करुन बघेल.. :)
21 Feb 2013 - 8:58 pm | प्रभाकर पेठकर
गुजराथी आणि मराठी पाककृतीत, चवीत बरंच साम्य असतं. फोडणीत लवंग ही गुजराथी खासियत आहे. ह्यात शेंगदाण्याऐवजी कधी कधी काजू तुकडे आणि बेदाणे, खास करून डाळ्-ढोकळीत, वापरण्यात येतात. फार मस्त चव असते. असो.
पाककृती आणि चित्रफित मस्तच आहे. अभिनंदन.
22 Feb 2013 - 4:42 pm | सुप्रिया
व्हिडियो मस्तच्. मी काल रात्री केली होती. सुंदर झाली.
22 Feb 2013 - 5:02 pm | jaypal
पेशकश. ईडो, फोटो आणि पाक्रु. सगळच अफलातुन
22 Feb 2013 - 6:37 pm | प्यारे१
आयला!
हे व्हिडोज कधीपासून सुरु झालं?
मस्तच!
22 Feb 2013 - 10:00 pm | खादाड_बोका
26 Feb 2013 - 9:58 pm | अत्रन्गि पाउस
भाइ वा!!!