जुने सिनेमे... नव्या काळात

स्मिता.'s picture
स्मिता. in काथ्याकूट
19 Feb 2013 - 8:14 pm
गाभा: 

तसा चर्चाविषय शीर्षकातच उघड होतोय. सध्या येणार्‍या हिंदी (तसंच इंग्रजी आणि मराठी) चित्रपटांचा दर्जा बघता मी जुने चित्रपट बघण्याचा सपाटा लावला आहे. मला कधी सत्यदर्शी, सामाजिक चित्रपट आवडतात तर कधी मनाला फक्त विरंगुळा देणारे मनोरंजक चित्रपट बघावेसे वाटतात. कोणता चित्रपट बघायचा हे ठरवलेलं नसेल तर मी जुन्या काळी हिट्ट झालेले किंवा गाणी बघून उत्सुकता वाटलेले चित्रपट शोधून बघते. हेतू एकच की एकेकाळी चित्रपट बहुसंख्य लोकांना आवडला होता म्हणजे त्यात थोडं तरी मनोरंजन-मूल्य असेल नाहीतर किमान गाणी ऐकून तरी समाधान मिळेल. थोडक्यात काय तर, 'राउडी राठोड' सारखे चित्रपट पाहून करमणूक तर सोडाच पण जी मनस्वी चिडचिड होते ती तरी नक्कीच होत नाही.

कालच देव आनंदचा 'ज्वेल थीफ' पाहिला, आवडला. तो काळ, तेव्हाची सामान्य जनतेची आवड, उपलब्ध तंत्रज्ञान यांचा विचार करता तो मला आताच्या काळातल्या अनेक चित्रपटांपेक्षा उजवा वाटला. त्यातली गाणी आणि स्टारकास्ट ही सर्वात मोठी जमेची बाजू असली तरी चित्रपटाचे कथानक, त्याचा वेग, त्यातले रहस्य, क्लायमॅक्स सगळंच खूप छान जमवलंय. प्रेक्षकांना अगदीच बाळबोध समजून रहस्य फक्त चित्रपटांच्या पात्रांपुरतीच मर्यादित आहेत असंही नाही आणि 'रेस' छाप दर १० मिनिटाला एक ट्विस्ट असंही नाही. एक रहस्य चित्रपटाच्या पूर्वार्धात तयार होते आणि उत्तरार्धात त्याची होणारी उकल अशी साधी-सरळ कथा आहे. आतापर्यंत तश्या कथानकाचे अनेक हिंदी/मराठी आणि काही इंग्रजी चित्रपट, मालिका बघतल्या असूनही काल हा चित्रपट बघताना मला तो पुरेसा मनोरंजक वाटला.

तसाच आणखी आवडलेला जुना चित्रपट म्हणजे 'कोहरा'. हा चित्रपट मी पाहिला 'ये नयन डरे डरे' या गाण्यामुळे चाळवल्या गेलेल्या उत्सुकतेमुळे! तो पाहिल्यानंतर मी स्वतःच्याच उत्सुकतेला शाबासकी दिली एवढा मला आवडला. योगायोगाने तोही एक रहस्यपटच निघाला पण इथे त्याचा विचार करण्याचा मुद्दा एवढाच की ब्लॅक अँड व्हाईट माध्यमातूनही तो चित्रपट एवढा परिणामकारक होतो म्हणजे याच्या दिग्दर्शक आणि एकूणच टीमने त्यावर भरपूर कष्ट घेतले आहेत. पुढे कुठल्यातरी मराठी संस्थळावरच वाचलं की तो 'रेबेका' या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारीत आहे आणि कथानक एवढं तगडं असल्याने चित्रपट चांगलाच झाला. मी मात्र या मताशी जरा असहमत आहे. अनेक चांगल्या कादंबर्‍यांची चित्रपटांनी वाट लावलेली आपण पूर्वीपासून आतापर्यंत बघत आलोय.

कादंबरीतून चांगली कलाकृती बनलेला एक जुना इंग्रजी चित्रपट म्हणजे 'गॉन विथ द विंड'. ही भली मोठी कादंबरी वाचत असतानाच त्यावर आधारीत चित्रपट मला बघायला मिळाला. हा चित्रपटदेखील व्यावसायिक म्हणता येईल या गटातला असला तरी त्यातून पुरेपूर मनोरंजन तर होतेच शिवाय ज्या काळातलं कथानक आहे त्या काळात चित्रपट आपल्याला घेऊन जातो. तो बघून झाल्यावर मी उरलेली कादंबरीदेखील पूर्ण केली नाही. संपूर्ण कथानकाला फारसे महत्त्वाचे नसलेले बरेच प्रसंग चित्रपटात गाळले असले तरी चित्रपटाला एक स्वतंत्र कलाकृती म्हणून बघाताना कुठेही त्यांची उणीव भासत नाही. हा चित्रपट मी चार वेळा पाहिला आणि कादंबरीची सिक्वेल म्हणून वेगळ्या लिखिकेने लिहिलेली 'स्कारलेट' वाचून काढली. स्कारलेटवरही चित्रपट किंवा मालिका निघाली असावी म्हणून मी जालावर शोधाशोध केली असता जे काही सापडलं ते एकढं गंडलेलं होतं की ते पाहिलंही नाही आता त्याचे तपशीलसुद्धा आठवत नाहीत.

चित्रपट हे माध्यम परिणामकारक होण्याकरता निव्वळ चांगल्या कथेचीच गरज नाही तर त्या सोबतच एक सुंदर कलाकृती निर्माण करण्याकरता जीव ओतून काम करणारी टीम असायला हवी असं वाटतं. कथानक, गाणी कोठूनतरी कॉपी केलेले असले तरी माझी अजिबात हरकत नसते. मी वर दिलेल्या दोन्ही हिंदी चित्रपटांची प्रेरणा बाहेरचीच आहे (ज्वेल थीफ बद्दल खात्री नाही) पण त्याचं भारतीय रुपांतरण खूप छान जमलंय. परकीय कथानके, गाण्यांच्या चाली उचलताना त्याला भारतीय अभिरुचीला साजेसं बनवण्याची प्रतिभा तरी सो-कॉल्ड कलाकारांनी दाखवावी ही अपेक्षा अवाजवी असावी असं वाटत नाही. चित्रपटात अभिनय म्हणजे कोठल्यातरी युरोपिअन लोकेशनवर, लेटेस्ट फॅशनचे कपडे घालून हिंग्रजीतले संवाद वाचल्यासारखे म्हणणे नाही की धारावीच्या गल्लीतला किंवा एखाद्या वेश्यावस्तीतला एखादा अतिरंजित भडक प्रसंगही नाही. असो, थोडं विषयांतर झालं. तर, चित्रपट क्षेत्रात कुठल्या गोष्टी काळाच्या ओघात टिकाव धरतात आणि कुठल्या गोष्टींची लोकप्रियता क्षणभंगुर असते यावर चर्चा करायला आणि वाचायला आवडेल. तसेच तुम्हाला आवडलेल्या जुन्या काळी प्रदर्शित झालेल्या आणि नव्या चित्रपटांपेक्षा सरस वाटणार्‍या मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपटांबद्दल वाचायला आवडेल.

प्रतिक्रिया

पैसा's picture

19 Feb 2013 - 10:02 pm | पैसा

जुन्या काळच्या चित्रपटांचा प्लस पॉइंट म्हणजे त्यातली गाणी. १९५० ते १९७० पर्यंतच्या चित्रपटात सुंदर गाणी आणि सशक्त व्यक्तिरेखा असलेल्या नायिका बघायला मिळत असत. अमिताभच्या काळात अशा नायिका आणि गाणी इतिहासजमा झाली. आताच्या खानावळींमधे तर चांगले शोधावेच लागते.

जुन्या जमान्यातल्या कालातीत गोष्टी म्हणजे गाणी आणि नायिका असं मला वाटतं. त्या काळात थोड्या वाद्यांतून उत्तम संगीत निर्माण करणारे अनेकानेक संगीतकार झाले. तसेच लता, आशा, मन्नाडे, रफी, मुकेश आणि किशोरकुमार असे गायक झाले. नायिका तर सहजच लक्षात राहण्यासारख्या. आठवा, मधुबाला, वहीदा, मीनाकुमारी, वैजयंतीमाला, अगदी हेमामालिनी सुद्धा!

बहुतेक जुन्या शिनेमांकडेच वळावे लागणार असे दिसत आहे. परवा स्पेशल सव्वेस शिनेमाच्या आधी नव्या येऊ घातलेल्या हिम्मतवाला नावाच्या चित्रपटाची झलक दाखवली. त्यात अजय देवगण नसून राक्षसगण असल्यासारखा देवळातल्या घंटा घेऊन मारामारी करताना दाखवलाय. गुंडांना जडशीळ घंटेचा फटका बसूनही ते म्हणावे तितके जखमी दाखवले नव्हते. वैतागच आला.

फारएन्ड's picture

20 Feb 2013 - 4:24 am | फारएन्ड

याला सिनेमॅटिक उत्क्रांतीच म्हणायला पाहिजे. इतके दिवस कसलेही फटके बसून काहीही न होणारे हीरो आल्याने व्हिलन्समधेही त्याचा सामना करणार्‍या पेशी ई. तयार होउ लागल्या असाव्यात :)

दादा कोंडके's picture

20 Feb 2013 - 6:29 pm | दादा कोंडके

गुंडांना जडशीळ घंटेचा फटका बसूनही ते म्हणावे तितके जखमी दाखवले नव्हते. वैतागच आला.

तुम्हाला वायोलन्स आवडतो असं दिस्तैं!

बाकी जुन्या हिंदी चित्रपटांमधे माझा ऑल टाईम फेवरीट 'कथा' आहे. पण्णासदा बघून झालाय तरी कंटाळा येत नाही.

हुप्प्या's picture

19 Feb 2013 - 10:51 pm | हुप्प्या

संगीत व पटकथा तर आहेच. पण हिंदी वा उर्दू भाषेचे सौंदर्य खुलवणारे संवाद हेही जुन्या काळच्या सिनेमांचे वैशिष्ट्य. संवाद लेखक उत्तम साहित्यिक असले पाहिजेत. आणि नट नट्या हिंदी/उर्दु भाषेत वाढलेल्या त्यामुळे संवाद उत्तम पद्धतीने सादर करु शकायचे. ऐतिहासिक, सामाजिक सगळ्या प्रकारच्या सिनेमातील संवाद हे अत्यंत श्रवणीय होते.

हिंदीबद्दल कुठला न्यूनगंड न बाळगता शक्य तितक्या शुद्ध भाषेतले संवाद आजकाल फार दुर्मिळ झालेत.
शिकवण्या लावून कामचलाऊ हिंदी बोलणारे तारे आणि तारका डोके पिकवतात. बहुतेक संवाद हे कधी एकदा हिंदी सोडून इंग्रजीत शिरतो आहे अशा प्रकारे उरकलेले वाटतात.
१९७० मधे सिनेमात आलेली आंग्लाळलेली झीनत अमानही आजच्या तुलनेत खूपच चांगले हिंदी बोलायची.
मात्र हिंदीवर प्रभुत्व असणारे अमिताभ, जया भादुरी यांचे पुत्ररत्न हिंदी बोलू लागले की ऐकवत नाही. तीच गोष्ट बर्‍याचशा तारकापुत्रांची. तशात अर्धभारतीय नट्या सिनेमात शिरल्यापासून तर आनंदच आहे!

संवादाचं भाषादारिद्रय सोडा पण हिंदी चित्रपटातील गाणी हिंदीत असावी ही माफक अपेक्षा पण पूर्ण होत नाही आता. बहुतेक हिंदी चित्रपटातील गाणी पंजाबी किंवा इंग्रजीत का असतात कोण जाणे :-(

धागाकर्तीने उल्लेखल्याप्रमाणे 'ये नयन डरे डरे' असो की 'मोरा गोरा अंग लई ले' असो की 'निगाहें मिलाने को जी चाहता है' अशी साधी पण सौष्ठवपूर्ण भाषा असलेली गाणी तर .... जाने दो.

चित्रगुप्त's picture

19 Feb 2013 - 11:09 pm | चित्रगुप्त

छान विषयावरील छान लेख.
१९५०-१९७० काळातील सिनेसंगीत तर अगदी खासच. आता एकदम आठवलेला सिनेमा म्हणजे 'आम्रपाली' हा १९६६ मधे प्रथम प्रदर्शित झाला, तेंव्हा 'ए' असल्याने बघता आला नव्हता. वैजयंतीमालाचे अतिभव्य कट-आउट सिनेमागृहावर लागले होते, ते बघायला मुद्दाम जायचो. यातली गाणी आणि वैजयंतीमालाची नृत्ये फारच सुंदर. चाळीसेक वर्षांनंतर अलिकडे तो बघितला. गाण्यांसाठी तरी बघावा, असा हा चित्रपट. यातील भानु अथ्थैय्या यांची वेशभूषा फार गाजली होती.
गाण्यांसाठी बघण्याचे आणखी सिनेमे, म्हणजे ओपी नय्यर यांच्या संगीताचे. 'ये रात फिर ना आयेगी', 'मेरे सनम' 'कश्मीर की कली' 'संबंध' 'एक मुसाफिर एक हसीना' 'फिर वही दिल लाया हुं' 'सावन की घटा' 'हमसाया' 'किस्मत'वगैरे...

तुमचा अभिषेक's picture

19 Feb 2013 - 11:35 pm | तुमचा अभिषेक

सध्या झोप आल्याने एवढेच बोलेन,
मात्र दबंगछाप सलमानपट बनत आहेत याचे कारण आपणच पब्लिक मायबाप जे त्याचा सिनेमा आला रे आला की ढोलताशांच्या गजरात दिंड्यापताका नाचवत सिनेमागृहामध्ये झुंडीने हजेरी लावत आहोत.

मान्य, आपण कदाचित त्यात नसू.
मी स्वता गेल्या सहामहिने वर्षभरात थिएटरमध्ये "बर्फी", "बालक पालक", आणि "स्पेशल छब्बीस" तसेच लॅपटॉपवर "ओ माय गॉड" अन "विकी डोनोर" बस एवढेच ४-५ चित्रपट पाहिले.
याव्यतीरीक्त केबल किंवा चॅनेलवर लागलेला एकही चित्रपट बघण्यात वेळ नाही घालवला.
हो, अगदी शाहरुख खान आवडीचा असूनही त्या दिवशी केबलवर लागलेला "जब तक है जान" नाही पाहिला. ;)

पण जर बहुसंख्य चित्रपटरसिकांची आणि आपली आवड भिन्न असेल तर हा आपलाच दोष नाही का..!!

स्मरणरंजन आवडलं.

गेल्याच आठवड्यात भाचीला जुने चित्रपट (इतकंच नव्हे तर काही जुने कलाकारही!) माहीत नसल्याची खंत वाटून तिला दाखवण्याच्या मिषाने लागोपाठ ५-६ चित्रपट पाहिले, बरेचसे इतक्या वर्षांनंतरही तितकेच प्रभावशाली वाटले.

काही उदाहरणें म्हणजे धर्मेंद्र-संजीवकुमारचा सत्यकाम, विनोद खन्नाचा इम्तिहान, संध्या-महिपालचा नवरंग, राजेश खन्नाचा बावर्ची, संजीवकुमारचा अंगूर, वगैरे.

पण त्याच ओघात 'सदाबहार संजीवकुमारचा म्हणजे चांगलाच असणार' या अपेक्षेने आधी न पाहिलेला 'ऐयाश' हा चित्रपटही पाहिला, नसता पाहिला तर बरं झालं असतं असं वाटलं. असाच अपेक्षाभंग झाला देव आनंदचा बात एक रात की पाहून, सचिनदेव बर्मन यांची गाजलेली गाणी, विशेषतः मन्ना डे यांच्या आवाजातली 'किसने चिल्मनसे मारा' ही कव्वाली, यांच्या आ़कर्षणाने चित्रपट पहाणं सुरू केलं, पण पूर्ण नाही पाहू शकलो.

आणखी 'नक्की पहायचे' अशा यादीत पुन्हा एकदा कोशिश, परिचय हे आहेत.

जुने चित्रपट ते जुनेच. नवीन कितीही टेक्नॉलॉजी आणि काय काय आलं तरी जुन्याचा साधेपणा, तरीही आपली छाप सोडण्याची कला नव्यांना नाही जमायची. ब्लॅक अँड व्हाईट काळ तर वाह. काय ते संगीत, साधेपणा, फालतूचा मेलोड्रामा नाही, सरधोपट हाणामार्‍या नाहीत, सगळंच भारी. कित्येक दशकं झाली तरी ते चित्रपट, त्यातले कलाकार, कथा, संगीत सगळंच डोक्यात घर करून आहेत.

मला प्रचंड आवडलेले काही जुने चित्रपट म्हणजे - आर पार (१९५४, गुरू दत्त, गीता दत्त), जाल (१९५२, देव आनंद, गीता बाली), आणि बंदिनी (१९६३, नूतन, अशोक कुमार, धर्मेंद्र) अप्रतिम.. :)

तिमा's picture

20 Feb 2013 - 10:29 am | तिमा

तिसरी मंजिल व इत्तेफाक या सिनेमांतही रहस्य चांगले ठेवले आहे. मला इतर आवडलेले काही जुने चित्रपटः तेरे घरके सामने,गाईड , अनुपमा,खामोशी,बुढ्ढा मिल गया,अनोखी रात्,देवदास्,चितचोर आणि अमोल पालेकरचे बहुतेक सगळे, श्याम बेनेगलचे सगळे, भुवन शोम, इत्यादि. मराठीतले: लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर, पाठलाग, मानिनी, पहिली मंगळागौर, ब्रँडीची बाटली, दामुअण्णांचे चिमणरावांचे सर्व, सांगते ऐका, सामना व सिंहासन, मधुचंद्र, इत्यादि.

अक्षया's picture

20 Feb 2013 - 10:31 am | अक्षया

जुने चित्रपट सर्वाथाने छान असायचे. खुप वेळ देऊन मनापासुन बनवले जायचे.
कथा, कलाकार, संगीत, अभिनय सगळ्याच गोष्टिंवर बारकाईने लक्ष दिले जायचे.
आताही असे चित्रपट असतात पण फारच कमी.
पुर्वी वर्षातुन एक किंवा फार तर दोन चित्रपट यायचे पण कायमचे आठवणीत रहायचे.
आता आठवड्याला एक किंवा त्यापेक्षा जास्त चित्रपट येतात आणि तितक्याच लवकर लोक विसरुनही जातात.

अक्षया's picture

20 Feb 2013 - 10:41 am | अक्षया

हमदोनो, चलती का नाम गाडी, पडोसन, मधुमती, बावर्ची, अंगुर, खुबसुरत, गोलमाल, अनकही, इजाजत, सिलसीला, यादी बरीच मोठी आहे खरे तर..

परिकथेतील राजकुमार's picture

20 Feb 2013 - 10:49 am | परिकथेतील राजकुमार

लेखन आवडेश. एकदम मनापासून उतरलेली कळकळ जाणवली.

बाकी नवंनवे चित्रपट सतत पाहात राहावेत. त्यामुळे आपण आधी शिव्या दिलेला चित्रपट किती छान होता ह्याची जाणीव होत राहते.

स्मिता.'s picture

20 Feb 2013 - 2:30 pm | स्मिता.

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. अनेक प्रतिसादांतून आमच्या पिढीली माहिती नसलेली चांगल्या जुन्या चित्रपटांची नावं कळत आहेत.

-----

कदाचित माझ्या लेखनातून जुने ते सर्वच सोने असा सूर निघत असावा असे जाणवले. त्याकरता स्पष्टिकरण द्यावसं वाटतंय की जुने सर्वच चित्रपट चांगलेच असतात असा माझा हट्ट नाही. अर्थातच तेव्हाही रटाळ किंवा हुकलेले चित्रपट निघतच होते. परंतु त्यांच्या दरम्यान जे काही चांगले चित्रपट आलेत त्यांच्यावर सर्व कलाकारांनी दीर्घकाळ मेहनत घेवून शक्य तेवढं पर्फेक्शन आणण्याचा प्रयत्न केलेला रसिकांना लगेच जाणवतो.
त्याच्याशी तुलना करता आज ज्या चित्रपटांना आपण 'उत्तम', 'मूव्ही ऑफ द मिलेनियम' असे म्हणवून मिरवतो त्यांच्यावर एवढी मेहनत घेतलेली जाणवत नाही. किंबहुना बर्‍याच वेळा प्रेक्षकांना ग्राह्य धरल्यासारखं वाटतं.

बाकी पराच्या सल्ल्याशी १०१% सहमत!

सानिकास्वप्निल's picture

20 Feb 2013 - 5:07 pm | सानिकास्वप्निल

हे मात्र खरं आहे की जुने सिनेमे आजही तितक्याच आवडीने बघीतले जातात, निदान मला तरी जुने सिनेमे जास्त आवडतात. शम्मी कपूर ह्यांचा तीसरी मंजिल हा मला सर्वात जास्त आवडलेला सिनेमा तसेच बिमल रॉय ह्यांचा बंदिनी असो किंवा इतर चित्रपट जसे नया दौर, मुघल-ए-आझम,सी.आय.डी, दो बीघा जमीन, शोले, आराधना, आंधी, अनामिका, चुपके-चुपके, सारांश, अर्थ, यह वादा रहा, सदमा, इजाजत,गुड्डी, आणी असेच बरेच चांगले चित्रपट कायम लक्षात राहतील.

पूर्वीच्या चित्रपटांमध्ये आशय,मनोरंजनासोबत ,सुमधूर संगीत असायचे, उत्तम, सहज अभिनय केलेले उत्तम कलाकार असायचे. असे नाही की हल्ली चित्रपट चांगले नसतात , काही निवडक सिनेमे जसे लगान, तारे जमीन पर, थ्री इडियट्स, स्वदेस, विकी डोनर, ओह माय गॉड, इंगिल्श विंगल्श, टेबल नं २१, स्पेशल २६, गँग्स ऑफ वासेपूर, कहानी हे सिनेमे आवडून जातात. भंपक, भपकेपणा, रटाळ, टुकार,एखाद्या बाम किंवा गोंद विक्रीची जाहिरात करणारे फालतू आयटम साँग कथानकात गरज नसताना मध्येच घुसवलेले दबंगछाप सिनेमे बघण्यात आता रस उरला नाही. वर्षभरात जर २०-२५ सिनेमे येत असतील तर त्यात ४-५ चित्रपट बघणेबल असतात. हल्ली शंभर कोटीच्या गोष्टीच लोकं जास्त करतात, मग त्यात काहीही दाखवले तरी चालेल ... अगदी कंटाळा आलाय त्या गाड्या, ट्रक उडवणारी स्टंट्स बघून.

मराठी सिनेमा ही आता चांगले विषय घेऊन येऊ लागले आहे हरीश्चंद्राची फॅकट्री, बालगंधर्व, पांगिरा, भारतीय, रींगा रींगा, काकस्पर्श, मसाला, वन रुम किचन , शाळा, सारखे चित्रपट मनाला आवडून जातात.

हल्ली बॉलीवुड मध्ये नवीन अर्थपूर्ण सिनेमे फार कमी चांगले येत असल्यामुळे मी माझा मोर्चा हॉलीवुड चित्रपटांकडे वळवला आहे :)

प्रसाद१९७१'s picture

20 Feb 2013 - 5:12 pm | प्रसाद१९७१

जुने सिनेमे चांगलेच पण त्या ढोलमटोल, ४ मुलांच्या आया नायिका म्हणुन बघवत नाहीत. काही तंत्रज्ञान ( Find & Replace ) वापरुन हल्लीच्या कत्रिना, करिना, शिल्पा, अनुष्का ह्यांना त्या जुन्या सिनेमात घालता येणार नाहीत का?

श्री गावसेना प्रमुख's picture

20 Feb 2013 - 5:28 pm | श्री गावसेना प्रमुख

काही आढावु आयडी ना ( Find & Replace ) वापरुन रिप्लेस नाही का करता येणार.

सांजसंध्या's picture

20 Feb 2013 - 6:01 pm | सांजसंध्या

जुने सिनेमे तुम्हाला आवडत असतील तर राजेश खन्ना, नंदा जोडीचा इत्तेफाक चुकवू नका. राजेश खन्नाचेच आनंद, बावर्ची पहा हे सुचवावेसे वाटतात, पन पाहीले असण्याची शक्यताच जास्त. पृथ्वीराज कपूर - मधूबाला- दिलीपसाबचा मुघल-ए-आझम हा ऑल टाईम ग्रेट पाहणं मस्टच. प्यासा पाहिला नसेल तर लिस्टीत अ‍ॅड करा. कागज के फूल ची गती संथ आहे, पण गुरूदत्तची शैली आवडली तर साहब बिबी और गुलाम देखील आवडण्याची शक्यता आहे. दिलीपसाब यांचाच दास्तान हा देखील वेगळा सिनेमा आहे. या चित्रपटावरून दो अन्जाने हा अमिताभ - रेखाचा सिनेमा बनवला गेलाय. दास्तान उजवा वाटला.
देवसाब यांचा उल्लेख झालाच आहे तर गाईड चुकवून चालणार नाही. आर के नारायणन यांच्या कादंबरीवर बेतलेला हा सिनेमा दर वेळी काहीतरी वेगळा अर्थ उलगडून दाखवतो. हम दोनो आता रंगीत आहे. गाणी सुरेखच. त्या काळी वेगळं असलेलं कथानक आता कितपत आवडेल सांगता येत नाही. पण पीरीयड फिल्म म्हणून पाहील्यास नक्कीच वेळ चांगला जाईल.
(मला देखील जुन्या सिनेमांची आवड आहे )

सांजसंध्या's picture

20 Feb 2013 - 6:09 pm | सांजसंध्या

खूपच जुना असलेला कृष्णधवल जागृती हा सिनेमा आवडला तो कथानकातील प्रामाणिकपणा आणि कळकळ. त्या काळात हाताळण्यात आलेला हा विषय आज थ्री इडीयटस मधे पुन्हा हाताळावासा वाटतो यातच सगळं आलं. अर्थात जातकुळी वेगळी आहे हे आलंच. असित सेन यांचा खामोशी हा वहिदा रहमान - राजेश खन्ना जोडीचा चित्रपट काळाच्या कितीतरी पुढचा आहे. शक्ती सामंता दिग्दर्शित राजेश + खन्ना शर्मिला जोडीचा अमर प्रेम हा कादंबरीवर बेतलेला नायिकाप्रधान चित्रपट आजही डोळ्यात पाणी आणतो. आताच्या काळात अशी सरधोपट ट्रीटमेंट हास्यास्पद वाटण्याची शक्यता आहे.

जुने ते सोने .. अगदी खरं आहे.
.. पण नविन सुद्धा काही चांगले चित्रपट आहेत . उदा. बर्फी आणि नुकताच पाहिलेला एबीसीडी (एनीबडी कॅन डान्स)
मराठीतील देवबाप्पा, लाखाची गोष्टं पण चांगले आहेत.

चित्रपटांच्या नावांसाठी धन्यवाद .
माझे पप्पा अजुनहि जुनेच चित्रपट बघतात .. नविन खुप मोजकेच .
त्यांच्यासोबत गेल्या आठवड्यात वेळ काढुन तीन चित्रपट बघितले .
अमोल पालेकरचा ' दो लडके दोनो कडके ' बहुतेक हेच नाव होतं .
दुसरा देव आनंद चा ' देस परदेस ' आणि शबाना आझमीचा ' मंडी '
मंडी अर्धाच पाहिला .
पण मला जुनी गाणी ऐकायला फार आवडतात .. खास करुन मराठी .
अरे हो ' केला इशारा जाता जाता ' हा चित्रपटहि पाहिला लस्ट थर्स्डे ला
बाकि धागा छान लिहिला आहे .

सस्नेह's picture

20 Feb 2013 - 10:35 pm | सस्नेह

कथानक अन सादरीकरणाबाबत बोलायचं तर 'पिंजरा' सर्वोत्कृष्ट.
बाकी राज कपूरचे बरेचसे चित्रपट विशेषतः 'श्रीचारसोबीस' अजून पहायला आवडतात.

अभ्या..'s picture

22 Feb 2013 - 3:02 pm | अभ्या..

त्यातल्या त्यात मान अवघडली असेल तर (म्हणजेच हॅण्डल लॉक किंवा अजय देवगण झाला असेल तर) 'पिंजरा' अवश्य पहावा. एखाद्या गाण्यावर संध्याप्रमाणे मान हलवून बघावे. लगेच मोकळे. नो डायक्लोफेनॅक पॅरेसिटेमॉल.

खटासि खट's picture

20 Feb 2013 - 11:33 pm | खटासि खट

चांगला बाफ. छान वेळ गेला.

अर्धवटराव's picture

21 Feb 2013 - 1:58 am | अर्धवटराव

गाणि, सेट्स, थोरले कपूर साहेब आणि ति अप्सरा मधुबाला... ऑस्सम.
ते दिलीप साहेब (निदान त्यांच्या मिशा) वगळले असते तर चित्रपट अजुन जास्त आवडला असता.

अर्धवटराव

खटासि खट's picture

22 Feb 2013 - 1:47 pm | खटासि खट

प्यासी चुडैल पाहिला का ?

स्मिता.'s picture

22 Feb 2013 - 2:53 pm | स्मिता.

सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे पुन्हा एकदा आभार. या धाग्याच्या निमित्ताने माझी 'वॉचलिस्ट'च तयार झाली आहे.

तर्री's picture

22 Feb 2013 - 3:47 pm | तर्री

लेखन आवडले.
मला राजेश खन्ना चा 'द ट्रेन ' आवडला होता. एक बऱ्यापैकी जमलेला रहस्यपट आहे. हंसा वाडकर यांच्या आत्मचरित्रावर आधारित , स्मिता पाटील ची मुख्य भूमिका असलेला एक उत्कृष्ट सिनेमा पहिला होता ( नाव आठवत नाही ) अर्धसत्य आणि जुना आक्रोश ही आवडेल. सभ्य चावटपणा असलेला "शौकीन" तर अफलातून आहे. निखळ विनोदी चित्रपट म्हणून सत्ते पे सत्ता चांगला आहे.

अप्रतिम's picture

23 Feb 2013 - 8:40 am | अप्रतिम

स्मिता पाटीलचा तो चित्रपट-'भूमिका'.श्याम बेनेगलांचे 'मंथन','निशांत,'अंकुर' तसेच गोविंद निहलानींचे 'आक्रोश,' 'अर्धसत्य' पहाव्यात अशाच.कॊणे एके काळी महेश भट च्या हातुन ’अर्थ’,’सारांश’ असे चित्रपट सुंदर चित्रपट तयार झाले असतील यावर आज विश्वास बसत नाही.

अप्रतिम's picture

23 Feb 2013 - 8:40 am | अप्रतिम

स्मिता पाटीलचा तो चित्रपट-'भूमिका'.श्याम बेनेगलांचे 'मंथन','निशांत,'अंकुर' तसेच गोविंद निहलानींचे 'आक्रोश,' 'अर्धसत्य' पहाव्यात अशाच.कॊणे एके काळी महेश भट च्या हातुन ’अर्थ’,’सारांश’ असे सुंदर चित्रपट तयार झाले असतील यावर आज विश्वास बसत नाही.

मागच्याच आठवड्यात सहज तूनळी चाळताना देव-आनंदचा गुरूदत्त निर्देशित 'सी-आय-डी' पाहिला. (देव आनंद काय चिकना दिसतो त्यात!)
घरोंदा, बावर्ची, किंवा हृषिकेश मुखर्जींचे साधे सरळ चित्रपट बघताना आजकाल असे चित्रपट का निघत नाहीत असं राहून राहून वाटत राहतं.

फिरंगी's picture

22 Feb 2013 - 9:23 pm | फिरंगी

Godfather Part I,II & II जरूर पहा.
सुंदर अभिनय ---- १५० मार्क्स मार्लन ब्रॅंडो ला .....
त्या आधी मारियो पुझो लिखीत पुस्तक वाचा.
वाचले असेल तर छान .....

नसेल तर नवीन आनंद मिळेल.

काही वर्षांपूर्वी आलेला In pursuit of Happiness हा विल स्मिथचा चित्रपट पण खूप सुंदर..