गाभा:
मंडळी,
ज्यांना कोडी आवडत नाहीत त्यांनी वैतागू नका! किंवा ज्यांना कोडी आवडतात त्यांनी आनंदीही होऊ नका कारण मिसळपावावर कोडी घालण्याचा माझा मानस नाही. एक प्रश्न गेले दोन दिवस सतावतो आहे. उत्तर मिळाल्यास अवश्य नमूद करा.
मनोगताच्या सदस्यांना मनोगती म्हणतो.
उपक्रमाच्या सदस्यांना उपक्रमी आणि मायबोलीच्या सदस्यांना मायबोलीकर.
मिसळपावाच्या सदस्यांना काय म्हणावे?
मिसळपावकर - काहीतरीच काय?
मिसळपावी - कै च्या कैच!
कश्टमर - अरे बापरे!
तुम्ही सुचवा.
प्रतिक्रिया
16 Sep 2007 - 5:09 pm | विसोबा खेचर
आहे खरा कूटप्रश्न! च्यामारी काय म्हणावं बरं?? :)
जसं नाट्यकर्मी, रंगकर्मी असतं तसं मिसळकर्मी चालेल? :)
बाय द वे, 'मिसळपावकर' ठीक वाटत आहे. 'मिसळपाववाले' पण बरं वाटतंय!
असो, लोकशाही पद्धतीनेच काय ते ठरू द्या आणि होऊ द्या बारसं!:)
आपला,
मिसळपाववाला!
16 Sep 2007 - 5:06 pm | आजानुकर्ण
काल सतावत होता. मिसळकर्मी, मिसळधर्मी चालेल.
16 Sep 2007 - 5:09 pm | कौटील्य
मिसळ खात मिसळणारा तो मिसळ्या
16 Sep 2007 - 5:13 pm | प्रियाली
मिसळ्या मस्त! पण त्याचे स्त्रीलिंगी रुप काय?
मिसळकर्मीही बरं आहे पण नेहमीचं आहे. काहीतरी झक्कास येऊ दे.
अरे देवा! कोणीतरी बायकांना मटकी आणि पुरुषांना फरसाण असे नाव नाही ना सुचवणार. :(
16 Sep 2007 - 5:13 pm | आजानुकर्ण
स्त्रियांना मिस असे म्हणता येईल. ;)
ह.घ्या.
16 Sep 2007 - 5:15 pm | प्रियाली
मिस म्हणायला तशीही कधीच हरकत नसावी स्त्रियांची.
मिस. प्रियाली. ;-)
16 Sep 2007 - 5:14 pm | प्रकाश घाटपांडे
'गिर्हाईक' या शब्दाला अनेक छ्टा आहेत. हित बी 'गिर्हाईक 'तिथ बी 'गिर्हाईक'. पन हित 'बसनं' वायल 'तित 'बसनं' वायल, समदी गिर्हाईक सार्की न्हवं.
प्रकाश घाटपांडे
16 Sep 2007 - 5:18 pm | सहज
आहे खरा कूटप्रश्न.
खरी ओळख तर खवय्ये आहे पण नाव काय? हं
मिसळपाववर येणार्या चायनीज मूलीला काय म्हणाल?
मिसली
16 Sep 2007 - 5:19 pm | आजानुकर्ण
मसली
;)
16 Sep 2007 - 5:20 pm | प्रियाली
सर्वांना मिळून काय म्हणावे?
मसल्स आणि मिजल्स की मिसाईल्स? :)))
17 Sep 2007 - 2:19 am | नंदन
सहज यांनी सुचवलेला 'खवय्या' माझ्याही डोक्यात आला होता. मिसळधर्मीही चालू शकेल.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
17 Sep 2007 - 1:34 pm | सागर
माझे काही पर्याय
मिसळ-पावभक्त
मिसळ-पावकरी {यात मिसळचा रस्सा पण येतो}
मिसळ-पावे
मिसळ-पावी {अगदी मनोगती श्टाईल}
मिसळपाव्या
मिसळा-पावा {मिसळ-पाव वर एकत्र या आणि पुण्यवान व्हा .......कसे :)}
तूर्तास इतके पुरे. अजुन काथ्याकूट करायला लागेल त्यावेळी अजून डोके खाजवायला लागेल.
- (मिसळ-पाव भक्त) सागर
17 Sep 2007 - 2:02 pm | चित्तरंजन भट
मिसळू कसे वाटते?
17 Sep 2007 - 2:53 pm | जुना अभिजित
आमचे एक गुर्जी व्हते मिसाळ म्हणून. त्येनी खरंतर येक मिसळीच हाटेल टाकलं असतं तर झ्याक चाललं असतं.
आजून काही मिसळलेली नावे
मिसळोजी, मिसळाबाई, मिसळावती, मिसळपंत
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला
17 Sep 2007 - 3:04 pm | प्रकाश घाटपांडे
अधिकृत पणे केली तर ती "मिसळ" अनाधिकृत पणे केली तर ती 'भेसळ'
प्रकाश घाटपांडे
17 Sep 2007 - 4:41 pm | उग्रसेन
वर्मावर बोट ठूनारे मिसळवर्मी.
17 Sep 2007 - 6:04 pm | धनंजय
काय म्हणता सर लोकं? हां - म्याडमांची सरमिसळ ही भेसळ नाही. ती स्पेशल.
18 Sep 2007 - 2:47 pm | झकासराव
मिसळ खाउ
हे कस आहे? :)
19 Sep 2007 - 10:31 am | टग्या (not verified)
अगदी समर्पक!
(अवांतर: खूप विचार केला पण 'मिसळणाचा डबा' या काहीच्या काहीच पर्यायापुढे बुद्धीची झेप जात नव्हती...)
19 Sep 2007 - 1:15 pm | आवडाबाई
चालेल?
19 Sep 2007 - 2:56 pm | प्रियाली
मिसळप्रेमी सहीच! साधं सोपं आणि सुटसुटीत.
19 Sep 2007 - 3:36 pm | टीकाकार-१
ओर्कुत ग्रुप सारखा मिसळ प्रेमिन्चा ग्रुप वाट्तो आहे! :)
19 Sep 2007 - 4:15 pm | झकासराव
ला माझा संपुर्ण पाठिंबा
आमच्या तालुक्याची समदी मत "मिसळ प्रेमी " वरच.
19 Sep 2007 - 4:25 pm | अप्पासाहेब
मिसळ्श्री ! मिसळ्पावी ! मिसळ्जन ! मिसळोबा !
19 Sep 2007 - 4:25 pm | आजानुकर्ण
मिसळस्त्री
19 Sep 2007 - 6:37 pm | विसोबा खेचर
वा! वरील सर्व प्रतिसाद वाचून,
मिसळीचे गोंधळी गं आई मिसळीचे गोंधळी...ऽऽऽ आहाऽऽऽ
मिसळीचा गोंधळ मांडिला गं आम्ही मिसळीचे गोंधळी...ऽऽऽ आहाऽऽऽ
आई अंबाबईच्या नावानं..ऽऽ चांगभलं..ऽऽऽ,
ज्योतिबाच्या नावानं..ऽऽ चांगभलं..ऽऽऽ,
मिसळीच्या नावानंऽऽऽ उदो उदो!
असं म्हणावंसं वाटलं आणि धन्य झालो...
आपला,
तात्या सरपंच!
22 Sep 2007 - 10:22 pm | वाचक्नवी
मिसळपावर, मिसळारू, मिसळबाज, मिसळगीर, मिसळनीस, मिसळ्भाई, मिसळभैय्या, मिसळेन्द्र(नाथ), मिसळगीर, मिसळनवाज, मिसळमंत, मिसळमंद, मिसळपंत, मिसळशौकी(न), मिसळमुरारी, मिसळखान, मिसळमिजाज, मिसळपसंद..--वाचक्नवी
22 Sep 2007 - 11:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वच नावे खास आहेत. कधीतरी स्वाक्षरीत वापरण्यासाठी चांगली आहेत.
मिसळपावर,मिसळनवाज,मिसळपंत,मिसळमंद,आणि मिसळमुरारी ही नावे आम्ही खरेदी केली आहेत, इतरांनी वापरण्यापूर्वी आमची परवानगी घ्यावी :)
ता.क. मिसळप्रेमी उत्तम नाव आहे.
प्रा.डॉ.मिसळनवाज
23 Sep 2007 - 10:15 pm | वाचक्नवी
वरच्या प्रतिसादात स्त्रीलिंगी नावे थोडी कमी पडली, म्हणून इथे देत आहे:
मिसळबी, मिसळभाभी, मिसळखानम, मिसळखातुन, मिसळदीदी, मिसळवहिनी, मिसळकाकू, मिसळआजी, मिसळीबेन, मिसळमाई,
मिसळेश्वरी(देवी), मिसळेन्द्राणी, मिसळकौर, मिसळकुमारी, मिसळप्रिया(ली?).
एक उभयलिंगी: मैसळीय किंवा पावमैसळीय.--वाचक्नवी
23 Sep 2007 - 10:31 pm | लिखाळ
वा..या बद्दल
एक नाव सुचले होते ते तात्यांना सांगावे असे मनात होते पण कितपत बरे आहे याचा अंदाज नसल्याने कळवले नाही.
आता हा चर्चाविषय दिसल्याने सोय झाली. :)
मला खादाड असे नाव सुचले :) उभयलिंगी लागू आहे :)
वाक्यात उपयोग - ५ खादाड आले आहेत, खादाड लिखाळ मिसळपावावर भटकतात :)
(सहज यांनी सुद्धा खवय्ये असे सुचवले आहेच.)
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
23 Sep 2007 - 11:49 pm | विसोबा खेचर
एक नाव सुचले होते ते तात्यांना सांगावे असे मनात होते पण कितपत बरे आहे याचा अंदाज नसल्याने कळवले नाही.
आता हा चर्चाविषय दिसल्याने सोय झाली
धन्यवाद लिखाळराव, कळवलेत ते बरे झाले. आपली सुचवण पंचायत समितीच्या कानावर घालतो! :)
(आमाला येथेही पावर नाय! :)
31 Oct 2007 - 12:01 pm | देवदत्त
अहो...
मिसळकर कसे वाटते
देवदत्त
(अर्जुनाचा शंख)
31 Oct 2007 - 6:40 pm | प्राजु
मी सांगू का?...
पुण्यात जसे जोशी वडेवाले आहेत ना.... तसेच..
मिसळकर पाववाले...
काय कसे वाटते..? :)
प्राजु.(मिसळकर पाववाली)
3 Nov 2007 - 7:07 pm | तो
मिसळखोर, मिसाळलेले, धुसमिसळे
4 Nov 2007 - 3:35 am | प्रियाली
मस्तच! म्हणजे वादावादी झाली तर पिसाळलेलेही म्हणता येईल. ;-)
4 Nov 2007 - 5:06 am | बेसनलाडू
समस्त सदस्यांचे स्वभावविशेष लक्षात घेता (मस्तीखोर, दंगेखोर सारखे )मिसळखोर जास्त सयुक्तिक वाटते ;)
(मिसळखोर)बेसनलाडू
4 Nov 2007 - 7:09 am | विसोबा खेचर
हे तीनही शब्द मला अतिशय आवडले! :)
आपला,
('एक नंबरचा हरामखोर' च्या चालीवर 'एक नंबरचा मिसळखोर!) तात्या.
11 Jan 2009 - 7:58 pm | सखाराम_गटणे™
मिसळ वारकरी कसे आहे?
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
12 Jan 2009 - 8:07 pm | सुहास.
प्रियालीताइशी सहमत
12 Jan 2009 - 8:24 pm | व्यंकु
मिसळेश्वर आणि मिसळेश्वरी कसं वाट्ट?
12 Jan 2009 - 8:53 pm | नितिन थत्ते
मिपाच्या साइट ला हॉटेल म्हणतो. पुण्याच्या अनेक खाणावळीत मेंबरांना पॅसेंजर म्हटले जाते. तसे आपणही म्हणायला हरकत नाही.
12 Jan 2009 - 9:24 pm | झुमाक्ष (not verified)
हा शब्द चुकीचा आहे!
'कूट' हे दाण्याचे, फार तर तिळाचे वगैरे. मिसळीचे कोणी कूट करते काय?
आणि प्रश्नाचे? काहीतरीच!
- झुरळ मारणारा क्षत्रिय.
15 Nov 2011 - 12:58 pm | रविंद्र गायकवाड
आता हा जुना धागा वर काठला म्हाणुन हानु नका.
मिसळपाव चा सदस्य तो असेल तर 'पाव' आनि ती असेल तर 'मिसळ'
ह्य दोन शब्दांवर अर्थ अनर्थांचे बरेच वादंग होतील..
चला एक काडी टाकून बघतो..
मिसळ आणि पाव यांनी एकत्र येऊन सोशल नेट वर्किंग ला झणझणीत पणा आणला असे म्हणू हवे तर.
पाव. रविंद्र गायकवाड.
तो असेल तर पावतो. आणि ती मिसळते...
15 Nov 2011 - 5:14 pm | शाहिर
हेच बेस्ट वाटते
28 Oct 2015 - 1:33 pm | असंका
'मिपाकर' हे आता मान्य आहे नाही? सगळ्यात आधी कोणी वापरला हा शब्द?
15 Nov 2011 - 6:06 pm | योगप्रभू
कंच्याबी गावात जो द्येव आसतुया त्यो 'बा' आसतुया म्हंजी पिंपळोबा, रोकडोबा, म्हसोबा, शिंग्रोबा.
आन ज्या देव्या आसत्यात त्या येकतर 'आई' आसत्यात न्हायतर 'बाई' आसत्यात म्हंजी सटवाई, भेकराई, मंगळाई तसंच जोगुबाई, काळुबाई
तवा आपुनबी इथल्या बाप्यास्नी 'मिसळोबा' आन बायास्नी 'मिसळाई' किंवा 'मिसळाबाई' आसं म्हनलं तर?