डाल रस्सम

Primary tabs

Mrunalini's picture
Mrunalini in अन्न हे पूर्णब्रह्म
13 Feb 2013 - 12:06 am

साहित्यः

तुर डाळ - १/२ वाटी
मुग डाळ - १/२ वाटी
टोमॅटो - १
कडिपत्ता - ४-५ पाने
धणे - १/२ चमचा
जिरे - १/२ चमचा
काळी मिरी - १/२ चमचा
मोहरी - १ चमचा
हिंग - १/२ चमचा
चिंचेचा कोळ - १ चमचा
हळद - १/४ चमचा
लाल तिखट - १ चमचा
तेल / तुप - १ चमचा
कोथिंबीर सजावटीसाठी
मिठ चवीनुसार

पाकॄ:

१. तुर डाळ व मुग डाळ धुवुन, १/२ तास भिजवुन ठेवावी.
२. कुकर मधे भिजवलेली डाळ व चिरलेला टोमॅटो लावुन, ४-५ शिट्ट्या होऊ द्याव्या.
३. कुकर झाल्यावर, डाळ व टोमॅटो mash करावे. त्यात २ कप पाणी टाकुन mix करुन १/२ तास बाजुला ठेवावे. त्यामुळे डाळ खाली बसुन, रस्सम साठी डाळीचे पाणी मिळेल.
४. तव्यावर जिरे, धणे व काळे मिरे भाजुन, त्याची पुड करुन घ्यावी.
५. कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी, कडिपत्ता, हिंग, हळद, लाल तिखट व भाजुन केलेली पुड टाकुन परतुन घ्यावे. त्यात डाळीचे पाणी ओतावे.
६. पाण्याला उकळी आल्यावर त्यात चिंचेचा कोळ व चवीनुसार मिठ टाकुन ३-४ मिनिटे उकळु द्यावे.
७. कोथिंबीरने सजवुन गरमा गरम रस्सम पिण्यासाठी तयार आहे.
८. रस्स्म तुम्ही साध्या भातासोबत खाऊ शकता किंवा सुप म्हणुनही पिऊ शकता.
९. आवडत असल्यास तुम्ही रस्समला वरुन परत मोहरी व कडिपत्त्याची फोडणी देऊ शकता.

gj

ih

प्रतिक्रिया

पैसा's picture

13 Feb 2013 - 12:11 am | पैसा

मर जावां!

अत्रुप्त आत्मा's picture

13 Feb 2013 - 12:19 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/big-drooling-smiley-emoticon.gif

या असल्या थंडीत रस्सम हवेच! छान फोटू आणि रेसिपी.

चिंतामणी's picture

13 Feb 2013 - 6:07 pm | चिंतामणी

या असल्या थंडीत रस्सम हवेच! छान फोटू आणि रेसिपी.

कुठल्या हिल स्टेशनवर आहेस सध्या????

अहो चिंतुकाका, आम्ही वर्षातले सहा महिने हिलस्टेशवरच असतो. :)

खादाड_बोका's picture

13 Feb 2013 - 11:45 pm | खादाड_बोका

आणी आज रात्री एक ईंच स्नो पडनार आहे.. आमच्या ईकडे डी सी ला :(

हो ना.... इथे स्लोवाकिया मधे पण काल पासुन स्नो-फॉल चालु आहे.

शुचि's picture

13 Feb 2013 - 2:02 am | शुचि

छान.

स्पंदना's picture

13 Feb 2013 - 4:38 am | स्पंदना

रस्सम ! रस्सम!!

स्मिता चौगुले's picture

13 Feb 2013 - 8:39 am | स्मिता चौगुले

छानच..

पिंगू's picture

13 Feb 2013 - 11:43 am | पिंगू

हाय हाय.. मार डाला.. रस्सम म्हणजे जीव की प्राण.

- पिंगू

त्रिवेणी's picture

13 Feb 2013 - 2:17 pm | त्रिवेणी

रस्सम मध्ये मी डाळ तशीच ठेवत होते(म्हणजे रस्समच्या नावाखाली मी फोडणीचे वरणच करत होते तर).
पाकृ छान

पैसा's picture

13 Feb 2013 - 2:19 pm | पैसा

रसम थोडे दाट आवडत असेल तर थोडी डाळ चांगली घोटून घालतात.

दिपक.कुवेत's picture

13 Feb 2013 - 2:20 pm | दिपक.कुवेत

थंडित रस्सम पीण्याची मजा काहि औरच....

bharti chandanshive१'s picture

13 Feb 2013 - 5:02 pm | bharti chandanshive१

पाककृती आणि फोटो दोन्ही छान

सानिकास्वप्निल's picture

13 Feb 2013 - 5:43 pm | सानिकास्वप्निल

स्वादिष्ट रस्सम!!

सुरेख फोटो :)

प्रभाकर पेठकर's picture

13 Feb 2013 - 6:05 pm | प्रभाकर पेठकर

रस्सम मध्ये हळद नको (मला तरी आवडत नाही). (ताज्या दळलेल्या) काळीमिरीचा झणका आणि कोथिंबीरीचा स्वाद, टोमॅटो-चिंचेचा आंबटपणा म्हणजे अगदी रस्समचा प्राण म्हणायला हरकत नाही.

ताज्या मेदूवड्यांवर गरमागरम रस्सम ओतून खाण्यात जाम मजा येते.

सुनील's picture

13 Feb 2013 - 6:24 pm | सुनील

पाकृ छान फोटोही झकास.

दोन शंका आहेत -
१) तयार रसम पावडर वापरली तर वरीलपैकी कोणते मसाल्याचे पदार्थ वगळावे लागतील?
२) रसम करून झाल्यानंतर उरलेल्या डाळीचे काय करता येईल?

धन्यवाद पाकृ आवडल्याबद्दल.
मी रस्सम पावडर कधी वापरली नहिये. पण बहुतेक ती वापरल्यास जिरे, धणे आणि काळि मिरीची पुड वगळावी लागेल.
आणि उरलेल्या डाळीचा दाल्-फ्राय करु शकता... किंवा त्यातच मिठ,लाल तिखट,गरम मसाला व गव्हाचे पीठ टाकुन त्याची कणिक मळायची. त्याचे पराठे करायचे.. हे डाल पराठे पण मस्त लागतात.

सुनील's picture

13 Feb 2013 - 10:42 pm | सुनील

उरलेल्या डाळीचा दाल्-फ्राय करु शकता

छान. एका कुकरात दोन पदार्थ ;)

तव्यावर जिरे, मोहरी व काळे मिरे भाजुन, त्याची पुड करुन घ्यावी. मोहरीच्या पुडीने कडवटपणा येईल असे वाटते.

अरे हो... धन्स... चुकुन लिहले :)
चुक सुधारली गेली आहे.

स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्लर्प्
वाफाळता भात + त्यावर हे असलं गरमागरम रस्सम = ब्रम्हानंदीटाळी.

अभ्या..'s picture

14 Feb 2013 - 2:15 am | अभ्या..

आता बल्लवाचार्यांचीच ब्र्ह्मानंदी टाळी लागते. मग आम्ही तर काय?
मस्त आणि एकदम शिंपल पाकृ बद्दल मॄणालिनीतै तुमचे आभार. :)
फोटोतले प्रेझेंटेशन विशेषच आवडले. एकदम टेम्प्टींग.

पाकृ आवडल्या बद्दल सगळ्यांचे धन्यवाद.. :)

५० फक्त's picture

14 Feb 2013 - 7:49 am | ५० फक्त

लई भारी धागा अन रस्सम, अशा पातळश्या रसमात १०-१२ इडल्या टाकाव्यात अन ते खात खिडकीत बसावं, ते खाउन झाल्यावर खिडकीतुन खाली पडलो तरी बेहत्तर.

क्रान्ति's picture

14 Feb 2013 - 9:40 am | क्रान्ति

रस्सम तर भारीच आहे, शिवाय दाल-पराठा हा प्रकार खासच.

पियुशा's picture

14 Feb 2013 - 3:36 pm | पियुशा

वॉव !

धनुअमिता's picture

15 Feb 2013 - 1:18 pm | धनुअमिता

खुपच छान आहे

बालगंधर्व's picture

18 Feb 2013 - 9:48 pm | बालगंधर्व

चान फोटो अहे. रेसिपि अव्ड्लि.