कणिक चकली

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in पाककृती
3 Jul 2008 - 1:26 pm

:P साहित्य--दोन वाट्या कणिक,एक डावभर लोणी,एक चमचा जिरे,मीठ्,हळद,तेल,पाव चमचा तिखट
कृति--प्रथम कणिकेत लोणी ,जिरे,चवीपुरते मीठ्,हळद, तिखट घालावे. नंतर पाणी घालून पुरीइतके घट्ट पीठ भिजवावे.तो कणकेचा गोळा एका पात्तळ फडक्यात बांधून कुकरमधून वाफवून घ्यावा. गोळा पुन्हा चांगला मळून घ्यावा. नंतर चकल्या पाडून तळाव्यात. ह्या चकल्या अतिशय खुसखुशीत लागतात.
वि.सू.-लोणी जास्त झाल्यास चकली तळणे अशक्य होते.

प्रतिक्रिया

स्नेहश्री's picture

3 Jul 2008 - 5:24 pm | स्नेहश्री

यात कणिक ऍवजी तान्दुळाचे पीठ वापरुन बघा. आणि हळ्द घालू नका.मस्त कुरकुरीत लागतात.

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

प्राजु's picture

3 Jul 2008 - 5:36 pm | प्राजु

नाहीतरी दिवाळीच्या वेळेला आम्हाला अमेरिकेत भाजणी मिळतच नाही. कणकेच्या चकल्या मस्त होतील. धन्यवाद या पा.कृ. बद्दल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

4 Jul 2008 - 9:03 am | विसोबा खेचर

बरी वाटते आहे पाकृ!

आपला,
(पारंपारिक भाजणीच्या चकल्यांचा प्रेमी) तात्या.

अभिता's picture

6 Jul 2008 - 1:53 am | अभिता

खायलापण छान लागते.एका मैतरणीकडे खाल्ली होती.

वरदा's picture

7 Jul 2008 - 11:34 pm | वरदा

तात्या खरं आहे...भाजणीची खमंग चव वेगळीच लागते...
प्राजु मी भारतातून भाजणी आणून फ्रीज मधे ठेवते...१-१.५ वर्ष टिकते मस्त....

पण भाजणी बनवायला बराच त्रास घ्यावा लागतो ही पा क्रु झटपट आहे हे खरं....

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

खादाड_बोका's picture

8 Jul 2008 - 10:21 pm | खादाड_बोका

ईथे अमेरिकेत भाजणी मिळ्त नाही. त्यावर अत्यन्त सोपा उपाय आहे.

मला तर स्वप्नातही भुक लागते.... ;)

सुरेखा's picture

7 Aug 2008 - 3:06 pm | सुरेखा

खुप छान आहे चकलि पण चुकुन लोणी जास्त झाले तर काहि पर्याय आहे का?
लवकरच करून बघेल.
धन्यवाद.