कोबी पराठा.

Primary tabs

स्पंदना's picture
स्पंदना in अन्न हे पूर्णब्रह्म
16 Jan 2013 - 2:55 am

लहाणपणी "कोबी" अन त्याची भाजी हे एक माझ्या नाकासाठी छळवादी प्रकार होते. का कुणास ठाउक पण कोबी काही माझी लहाणपणाच्या आठवणीतली,"रम्य, चविष्ट,तों.पा.सु." भाजी नाही. मग वयाने मोठ व्हाव लागल, अन पानात पडेल ते मुकाट खाण हे रितीला धरुन मान्य कराव लागल. तरीही, कोबी असला की मी दही-साखर, तिळकुट, तोंडी लावणे, यावर जास्त भर देत शक्यतो कोबी शेवटपर्यंत राखुन ठेवत असे.
मग झाल लग्न; अन रोजच्या," आज काय करायच?" या प्रश्नाबरोबर टिफीन फ्रेंडली भाजी म्हणुन मला या"गड्ड्याला" शरण जावं लागल. पण हार मानतानाही ती अशी पुर्णपणे मानली तर; मेरी तो नाक कट जायेगी। म्हणुन मग त्यातुन अनेक पळवाटा शोधायच काम अगदी,"जनहित मे जारी" या तत्वावर मी सुरु केलं. अन त्यातुनच वेगळ्या प्रकारच्या पराठ्याचा जन्म झाला.

बघा! तुम्ही लोकं ना? बोलताच फार बाई! पण आज मी काहीही जास्त बोलणार नाही आहे हं मंडळी. आज निव्वळ पाककृती!!

तर घ्या साहित्य:-/

अर्धा कोबी
१ टीस्पून हळद
१ टीस्पून ओवा
१ टेबलस्पून धना पावडर
१ टेबल स्पून लाल तिखट
१ हिरवी मिरची बारिक कापून ( नुसती गोल न कापता चॉप करुन घ्या)
कोथिंबीर अंदाजे चार काड्या बारिक चिरुन
चवी नुसार मिठ
कणिक दोन कप.

तेल अन तूप समप्रमाणात मिक्स करुन.( १ टेबलस्पून तेल अन १ टेबलस्पून तूप बस होइल साधारण)

कृती:-/

कोबी खिसुन घ्या . खरतर किसल्यावर कोबीला फार पाणि सुटत म्हणुन अगदी जमेल तेव्हढा बारिक कापुन घ्या. त्यात हळद मिठ मिरची धनापावडर अन तिखट मिसळा . ओवा हातावर घेउन तंबाखु जसा मळतात तसा हातावर चोळुन मिक्स करा.( यामुळे फ्लेवर रिलिज होतो. नाहीतर ओवा कुटुन घातला तर पराठा कै च्या कै तिख्खट होइल. पहिलाच सांगुन ठेवते)

mixture

आता कणिक भिजवुन घ्या. आता मी सांगितल नाही म्हणुन त्या कणिकेला बिन तेला-मिठाची मारु नका. सगळ व्यवस्थीत करा. एक छोटा गोळा घेउन तो पोळपाटावर लांबट लाटुन घ्या. या पोळीच्या अर्ध्या भागात कोबीचे सारण निट पसरवुन उरलेला अर्धा भाग त्यावर निट कव्हर करुन पुन्हा एकदा हलक्या हाताने लाटुन घ्या.
stuffing

तव्यावर थोडेसे तेल तूपाचे मिश्रण पसरवुन हा तयार पराठा दोन्ही बाजुने छान खरपूस भाजुन घ्या.

roasting
नुसत्या तूपाने पराठा कडक होतो, अन तेलावर भाजल्यास हवा तसा खमंगपणा येत नाही म्हणुन मी तेल अन तूप मिक्स करुन लावते.
ready

तयार आहे लाजवाब कोबीचा पराठा. थोड लोणी अन लोणच्या बरोबर सर्व्ह करा.

तर मंडळी आजच जा जा जा झणी, बाजारी।
घेउन या कोबी, पराठ्यासाठी।
अन तो "गड्डा" आणल्यावर, आता याला कसा कापू? असा दुष्ट विचार मनात न आणता, अपर्णावर विश्वास ठेवा अन मजेत खिसायला सुरु करा. काय?.

__/\__
अपर्णा

प्रतिक्रिया

शुचि's picture

16 Jan 2013 - 2:57 am | शुचि

अगं अपर्णा मी ही मधे केलेला. पण कोबीला पाणी सुटतं ना त्यातच पीठ भिजवून. बाकी साहीत्य हेच. :)

दुष्ट गड्ड्याला अशा प्रकारे किसायची कल्पना छान आहे. मलापण कोबीचा विलक्षण तिटकारा होता, आता तो थोडा कमी झाला आहे इतकेच.

बाकी पराठेदा जवाब नही..

- पिंगू

पैसा's picture

16 Jan 2013 - 10:06 am | पैसा

मुलांना कोबी खायला लावायची मस्त युक्ती आहे!

प्रचेतस's picture

16 Jan 2013 - 10:24 am | प्रचेतस

छानच झालाय पराठा.

सस्नेह's picture

16 Jan 2013 - 10:29 am | सस्नेह

मसालेदार साहित्यामुळे कोबीचा स्वाद चांगला झाला असणार.
एक (दुष्ट) शंका. स्ट्फ केल्यावर करंजीसारखा आकार परत वर्तुळासारखा कसा काय झाला ब्वा ?

स्पंदना's picture

17 Jan 2013 - 2:53 am | स्पंदना

अग लाटण दाखवल की भले भले वळणावर येतात, तो पराठा क्या चिज है?

थोडक्यात मी स्टफ केलेला पराठा परत हलक्या हाताने लाटते. थोडा ओलसर असतो. पण एकदा चव घेतलीस तर यु विल टॉलरेट एनिथिंग.

धनुअमिता's picture

16 Jan 2013 - 11:25 am | धनुअमिता

खुप छान दिसतोय पराठा.

जयवी's picture

16 Jan 2013 - 11:35 am | जयवी

अरे वा....मस्त !!

रमेश आठवले's picture

16 Jan 2013 - 12:06 pm | रमेश आठवले

नुसत्या तूपाने पराठा कडक होतो, अन तेलावर भाजल्यास हवा तसा खमंगपणा येत नाही म्हणुन मी तेल अन तूप मिक्स करुन लावते.
- ही उपयुक्त सूचना मला व माझ्या सौ. ना नवी वाटली . धन्यवाद.
इतर प्रकारचे परोठे , थालीपीठ आणि तत्सम पदार्थांसाठी पण उपयोगी पडेल का ?

स्पंदना's picture

17 Jan 2013 - 2:56 am | स्पंदना

नुसते थालीपिठ अन तस्तम पदार्थ नव्हे, तर मी चक्क मसाले भात भाजताना पहिला तेलात अन मग नंतर वरुन भरपुर तुप घालुन भाजते. केवळ तुपातला मसालेभात सुद्धा नंतर थोडा थंड झाला की कडक चांबट वाटतो, तो तेलामुळे नाही वाटत.

स्मिता.'s picture

16 Jan 2013 - 2:46 pm | स्मिता.

पराठा तर अगदी मस्त दिसतोय. करून बघायला हवा.

ज्योति प्रकाश's picture

16 Jan 2013 - 4:19 pm | ज्योति प्रकाश

उद्याच्या न्याहारीचा मेनू फिक्स्.कसा झाला ते केल्यावर व मिळालेल्या कॉमेंटवर अवलंबून.

अनन्न्या's picture

16 Jan 2013 - 4:43 pm | अनन्न्या

कोबीचे कण मधे येऊन तो तुट्त नाही? कोबी कच्चा आहे म्हणून विचारले. बाकी तुम्ही केलेला पराठा तुटलेला दिसत नाहीय. तरी पण शंका!!
दिसतोय मात्र झकास!

नाही. कोबी चिरताना थोडा लांबट अन बारिक चिरायचा.
मला खरच हा प्रॉब्लेम नाही आला. कधी कधी गडबडीत बारिअकच पण चौकोनी असाही कापला गेला, पण पराठा नाही असा कोबीवर येउन तुटला. थोडा ओलसर होतो, तेव्हढ मॅनेज करायच. म्हणुन तर मी पराठा पोळीसारखा गोळा भरुन नाही करत, लांबट लाटुन मग भरते.

दिपक.कुवेत's picture

16 Jan 2013 - 4:46 pm | दिपक.कुवेत

चला आता कोबी लगेच आणुन करायला हवा....पराठे हा प्रकारच खुप मनपसंत आहे...सकाळि दाबुन हाणले कि दुपारच्या जेवणापर्यत बघायला नको. तेल/तुप आणि ओव्याची आयडिया मस्त.

खुपच मस्त.. कोबी पराठा आणि फ्लॉवरचा पराठा म्हणजे अगदी weak point आहे माझा.. जाम आवडतात. उद्याच कोबी आणुन हा पराठा केला पाहिजे.

त्रिवेणी's picture

16 Jan 2013 - 6:49 pm | त्रिवेणी

“तेल + तूप” टीप सांगितल्याबद्दल धन्यवाद.
कोबी लंहानपणा पासूनच आवडता.

सानिकास्वप्निल's picture

16 Jan 2013 - 6:59 pm | सानिकास्वप्निल

मी किसलेला कोबी जरा शिजवून घेते आणी मग कोबीचे सारण भरून पराठा बनवते.

अशा प्रकारे करुन बघीतला पाहिजे.

दादा कोंडके's picture

16 Jan 2013 - 7:19 pm | दादा कोंडके

पण कोबी इतका उग्र वास फक्त कोबी खाउन दिलेल्या ढेकर*लाच येत असावा.

*माझ्या कल्पनेच्या सरड्याची उडी इथपर्यंतच आहे! ;)

स्पंदना's picture

17 Jan 2013 - 3:01 am | स्पंदना

मग ओवा काय कामाचा? नाही रहात कोबीचा डोमिनेटिंग वास. अहो माझ्यासारखी कट्टर कनव्हर्ट झाली तर विचार करा.

रेवती's picture

16 Jan 2013 - 8:13 pm | रेवती

पराठा आवडला. अर्धगोल प्रकारतला पराठा फारसा माहित नव्हता. फोटून दिसताना तरी गोल का दिसतोय?

धन्या's picture

16 Jan 2013 - 8:39 pm | धन्या

पराठा पाहून तोंपासु. :)

स्वाती दिनेश's picture

16 Jan 2013 - 9:50 pm | स्वाती दिनेश

छान दिसतो आहे पराठा..
स्वाती

स्पंदना's picture

17 Jan 2013 - 3:03 am | स्पंदना

सार्‍यांना धन्यवाद.

लेखात चुकुन स्मायल्या पडल्या आहेत त्या मी काढुन टाकायची विनंती करते आहे. ते अ‍ॅकच्युअली :- अस वा /- अस होत. त्याची स्मायली कशी झाली देव जाणे.

कोबीची भाजी करताना झाकण ठेवेले तर कोबीला सुटलेल्या पाण्यामुळे उग्र वास येतो. उथळ तव्यावर परतून भाजी केली तर मस्त होते - हिरवी मिर्ची, हळद, हिंग व जीरे. सुपर्ब!!! हां मीठ व साखरही बरं का. मला फार आवडते कोबीची भाजी.

स्पंदना's picture

17 Jan 2013 - 3:20 am | स्पंदना

अच्छा! म्हणजे मी खात नाही ती भाजी डाळ घालुन केलेली असते अन ही बिन डाळीची नुसतीच परतुन करायची तर?
पण खर सांगु का? मी एकदा कोबी किंचित शिजवुन केलेला पराथा खाल्ला होता. अंहं! फिरुन कोबीचा तो नकोसा वास...

सानिकास्वप्निल's picture

17 Jan 2013 - 4:08 am | सानिकास्वप्निल

कोबी पराठ्यासाठी शिजवून घेताना जीरेपूड, कोथींबीर व किसलेले आले घालायचे, उग्र वास अजिबात येत नाही व चवीला ही छान लागतात पराठे :)

सूड's picture

17 Jan 2013 - 11:53 am | सूड

पराठ्याची रेशिपी छानच !! पण कोबी भज्यांमध्ये जितका छान लागतो तितका भाजीत कधीच चांगला लागला नाही.

मुक्त विहारि's picture

19 Jan 2013 - 10:00 pm | मुक्त विहारि

सुंदर..

अनिता ठाकूर's picture

22 Jan 2013 - 12:58 pm | अनिता ठाकूर

कणकेची पोळी सफेद व शेवटी पराठा पिवळा कसा झाला ते समजले नाही.बाकी, सोप्पा प्रकार आहे म्ह्णून बरे वाटले.करून पहाता येइल.

स्पंदना's picture

22 Jan 2013 - 3:12 pm | स्पंदना

आतल्या सारणाचा हळदीचा रंग चढला वरच्या आवरणाला गो बाय.

अपर्णा रागवणार नसलिस तर एक सुचवते............. कोबी खिसुन झाला कि थोडस मीठ लावून १० ते १५ मिनिटे तसाच ठेवायचा. नन्तर पिळुन पाणी काढुन टाकायचे. म्हणजे बाकी मसाला घातल्यवर जास्त पाणी सुटत नाहि. कणिक भिजवताना प्रथम तेच पाणी कणकेत घालायचे म्हणजे ते वायाहि जात नाहि.

दिव्यश्री's picture

22 Jan 2013 - 9:59 pm | दिव्यश्री

करूण बघितला आणी खाल्ला देखील...आणी मस्त लागतो.
कच्चा कोबी खिसल्या वर येणारा वास असहणीय आहे.पण पराठ्याला वास येत नाही.
पण आमच्या प्यान्ट्वाल्याला कोबी पराठा आवड्ला,त्यामुळे हा मेणू फिक्स....;) :)