चिकन खिमा पराठा

Primary tabs

Mrunalini's picture
Mrunalini in अन्न हे पूर्णब्रह्म
9 Jan 2013 - 1:42 am

साहित्यः

चिकन खिमा - १/२ किलो (चिकनच्या thigh meat चा खिमा केल्यास जास्त चांगले)
मैदा - २ वाट्या
कांदा - १/२ वाटी बारीक चिरलेला
टोमॅटो - ३ चमचे बारीक चिरुन
दही - ३ चमचे
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १ चमचा
चाट मसाला - १/२ चमचा
हिरवी मिरची - २ बारीक चिरुन
कोथिंबीर - २ चमचे बारीक चिरुन
मिठ चवीनुसार

कृती:

१. चिकनच्या thigh meat चा मिक्सर मधे खिमा करुन घ्यावा.
२. मैद्यामधे चवीपुरते मिठ, १ चमचा तेल टाकुन निट मिक्स करुन घ्यावे. लागेल तसे गार पाणी वापरुन त्याची मऊ कणिक मळुन झाकुन ठेवावी.
३. कढईत तेल गरम करावे. त्यात कांदा टाकुन १ मिनिट परतुन, आले-लसुण पेस्ट घालावी. कांदा गुलाबीसर होई पर्यंत परतुन घ्यावे.
४. कांदा परतल्यावर त्यात हिरवी मिरची व टोमॅटो टाकुन २-३ मिनिटे परतावे. त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला टाकुन मिक्स करावे.
५. मसाल्याचे तेल सुटु लागल्यावर त्यात खिमा व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करुन घ्यावे.
६.खिमा थोडा परतल्यावर त्यात दही टाकावे. आता कढईवर झाकण ठेवुन खिमा शिजु द्यावा.
७. ५ मिनिटात खिमा शिजेल. खिमा पुर्ण सुका होई पर्यंत परतुन घ्यावा. सगळ्यात शेवटी त्यात चाट मसाला व कोथिंबीर टाकुन गॅस बंद करावा. आता हे पराठ्या साठी सारण तयात आहे.
८. भिजवलेल्या कणकेतुन एक छोटा गोळा घ्यावा. त्याची छोटी पुरी लाटुन घ्यावी. त्याच्या मधोमध हे गार केलेले खिम्याचे सारण भरुन पुरी बंद करावी.
९. ह्याचा हल़या हाताने पराठा लाटुन घ्यावा.
१०. तव्यावर हा पराठा दोन्ही बाजुंनी, बटर लावुन मस्त भाजुन घ्यावा.
११. गरमा-गरम पराठा खायला तयार आहे.

p1

टिपः

१. ह्या पराठ्यात आपण वेगवेगळ्या प्रकारे सारण भरु शकतो.
२. एक पोळी लाटुन, त्यावर सगळीकडे सारण भरायचे व वरतुन दुसरी पोळी ठेवुन, कडा बंद करुन भाजायचे.
३. मैद्याची एकदम पातळ पोळी लाटुन घ्यायची. त्याच्या मधोमध चोकोनात सारण भरायचे व चारी बाजुनी उरलेली पोळी आत दुमडायची. हलक्या हाताने थोडेसे लाटुन पराठा भाजुन घ्यावा.
४. ह्याच सारणात एक अंडे फेटुन, मिक्स करुन पराठ्यामधे भरले तरी मस्त लागते. पण मग त्या साठी आधी पातळ लाटलेली पोळी तव्यावर ठेवुन, त्यात सारण भरायचे व साईड्ची उरलेली पोळी आत दुमडायची.

p2

प्रतिक्रिया

दीपा माने's picture

9 Jan 2013 - 1:47 am | दीपा माने

एकदम चमचमीत!

शुचि's picture

9 Jan 2013 - 2:23 am | शुचि

ओहोहो!!! खपले :(

दादा कोंडके's picture

9 Jan 2013 - 3:17 am | दादा कोंडके

खत्रा पाकृ!

चिकनच्या thigh meat चा मिक्सर मधे खिमा करुन घ्यावा.

मागं एकदा चिकनचा मिक्सरमध्ये खिमा करण्याचा प्रयत्न केला होता. पण नंतर माझ्या शाकाहारी बायकोने मिक्सरच्या ब्लेडमध्ये अडकलेले बारीक धागे मला काढायला लावले होते आणि त्यासाठी बक्कळ एक तास लागला होता. काही उपाय?

मी पण खिमा मिक्सर मधेच करते... खिमा करुन झाल्यावर ते भांडे गरम पाण्याने ४-५ वेळा धुतले कि सगळे कण निघतात आणि मग शेवटी परत घासणीने साफ करुन घ्यायचे. पण माझ्या मिक्सरचे पाते निघुन येते... त्यामुळे साफ करायला जास्त सोपे जाते.

दादा कोंडके's picture

9 Jan 2013 - 3:56 am | दादा कोंडके

बघतो आता परत रिक्स घेउन.

बायको बदला! (किंवा वेगळा मिक्सर ठेवा) ;-)
मुख्य म्हणजे ह.घ्या. :)

स्पंदना's picture

9 Jan 2013 - 9:23 am | स्पंदना

शाकाहारी बायको!

मस्त! मिन्स चिकन मिळत माझ्या इथे ते चालेल का?

हो.. तो खिमा पण चालेल. जर त्या मधे मिक्स चिकन असेल तर. जर तो खिमा फक्त chicken breastचा असेल, तर तो शिजवल्यावर खुप dry होतो.. त्यामुळे मी चिकन खिमा नेहमी thigh meatचा करते.

सानिकास्वप्निल's picture

9 Jan 2013 - 10:20 am | सानिकास्वप्निल

चिकन खिमा पराठा भारी दिसत आहे :)
तोंडाला पाणी सुटलेय...कधी मार्गशिर्ष संपतोय असे झाले आहे :P

गणपा's picture

9 Jan 2013 - 12:40 pm | गणपा

प्राठा
मस्तच दिसतोय.

प्रभाकर पेठकर's picture

9 Jan 2013 - 12:59 pm | प्रभाकर पेठकर

ह्म्म्म..! चिकन खिमा पराठा, पराठा त्यात अंडे घालून वर बटर ठेवून आमच्या डाएटला भरचौकात फासावर लटकवले आहे.

डाएट बोंबललेच आहे तर, असा मटन पराठाही चांगला लागतो. आणि अंड्या ऐवजी त्यात चीझ घातल्यास फार यम्म्मी लागतो हे सहज कळावे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jan 2013 - 1:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

भुक लागली जोरात. कधितरी ट्राय करायला पाहीजे. अर्थात डाएट च्या नावानी शंख करुन. :)

नि३सोलपुरकर's picture

9 Jan 2013 - 2:38 pm | नि३सोलपुरकर

मस्तच ..चिकन खिमा पराठा एकदम क्लास

आईच्या हातची "खिमा करंजी " आठवली.

त्रिवेणी's picture

9 Jan 2013 - 2:48 pm | त्रिवेणी

बाउल मध्ये काय आहे?
पराठा मटार घालून करीन.

Mrunalini's picture

9 Jan 2013 - 3:29 pm | Mrunalini

मला actually हिरवी चटणी करायची होती, पण माझ्याकडे हिरवी मिरची आणि कोथिंबीर सुद्धा नव्हती. मग मी, माझ्याकडचा पेस्तो सॉस, थोड्याश्या दह्यामधे मिक्स केला आणि त्यात थोडे मिठ व काळि मिरी पावडर टाकुन serve केले. ;)

त्रिवेणी's picture

9 Jan 2013 - 3:36 pm | त्रिवेणी

reply साठी धन्यवाद

एस's picture

11 Jan 2013 - 11:01 pm | एस

फारच छान!

अशोक सळ्वी's picture

21 Jan 2013 - 4:24 pm | अशोक सळ्वी

तोडाला पाणी सुटलय! आम्ही करुन पाहू!!

धमाल मुलगा's picture

21 Jan 2013 - 5:05 pm | धमाल मुलगा

नुसतं वाचूनच भूक चाळवली. पराठा समोर आला तर हातघाईची लढाईच होईल. :-)

सुनील's picture

22 Jan 2013 - 12:00 am | सुनील

मस्तच!

आजवर खीमा बाहेरूनच आणला होता. मिक्सरमध्येही करता येतो हे पहिल्यांदाच समजले. उत्तम!

फक्त मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरल्यास "हेल्दी" होईल, असे वाटते!