जगी हा खास वेड्यांचा पसारा..

नानबा's picture
नानबा in काथ्याकूट
2 Jan 2013 - 1:09 pm
गाभा: 

परवाच लोकलने कामावर जात होतो. काही कारणांमुळे गाड्या उशिराने धावत(?) होत्या. (मुंबईत राहणार्‍यांना याची सवय असतेच म्हणा.) गाडीतल्या सर्वांनाच कामावर जायला उशीर होणार असल्यामुळे कार्यालयातल्या परिस्थितीचा अंदाज बांधत सगळेच जण रेल्वेवर शिव्यांची लाखोली वाहत होते. (त्यात मीपण होतोच.) तेव्हा गर्दीत उभ्या उभ्या मनात विचार आला, जसं मुंबईला आणि मुंबईकरांना वेळ या वस्तूत फार रस आहे, तसाच भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहराला एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल आहेच की.

मग मी पाहिलेल्या शहरांबद्दल विचारचक्र सुरु झालं. पहिल्यांदा अर्थातच आठवली आमची मुंबई. पुलंनी म्हटल्याप्रमाणे, मुंबईला वेळेचं महत्त्व फार. सकाळी ५.५५ चा अलार्मपासून ७.३२ ची ट्रेन, ८.१५ ची ८४८ नंबरची बस अशा नुसत्या घड्याळाच्या काट्यावर मुंबईकर नाचत असतात. २६.११ होवो किंवा अजून काही, या शहराला थांबणं मंजूरच नाही. (अपवाद- बाळासाहेबांची अंत्ययात्रा. तेव्हा मात्र मुंबईकर स्वतःहून थांबला होता.)

त्यानंतर येतं पुणे. पुणेकरांना सर्वात जास्त वेड कशाचं असलं तर तो म्हणजे त्यांचा बाणा. पुण्यात राहून जर तुमच्याकडे खास पुणेरी Attitude नसला, तर तुम्हाला तिकडे राहण्यास मनाई आहे. पुन्हा पुलंनी म्हटल्याप्रमाणे, "पुण्यात राहताना तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीचा जाज्ज्वल्य अभिमान असायला हवा. तो कशाचाही असेल, पण तो जाज्ज्वल्य हवा." नुकतंच काही कारणामुळे ३ महिने पुण्यात रहायचा योग आला. तेव्हा तर प्रत्येक क्षणी ही गोष्ट पटली. अहो, संध्याकाळी ६.३० वाजता डेक्कन जवळच्या प्रचंड रहदारीत माझ्या गाडीसमोर तू तुझी गाडी घातलीसच कशी, म्हणून भर रस्त्यात आपापल्या गाड्या पार्क करून एक्मेकांशी तावातावाने भांडणारे पक्के पुणेकर पाहिलेत मी. तेव्हा पुणेकरांचं वेड पुणेरी बाण्यात असतं एवढं मात्र नक्की.

मुंबई आणि पुण्यानंतर येणारं मराठी शहर म्हणजे नागपूर. नागपूर, आणि सगळ्याच विदर्भाला "स्व" बद्दल अतिव प्रेम. मी, माझं यातच त्यांना रस असतो. आमचं नागपूर, आमच्या नागपूरची संत्री, आमच्या विदर्भातलं ताडोबा, आमची विदर्भी थंडी, आमचा नागपूरी वडाभात, आमचा वर्‍हाडी ठेचा... नागपूरकरांची ही आमचं ची यादी न संपणारी आहे.

हे तर झालं आपल्या महाराष्ट्राबद्दल. गेले एक वर्ष कामानिमित्ताने इंदौर ला होतो. त्या शहराचं आणि इंदौरकरांचं प्रेमाचं ठिकाण म्हणजे खाणं. अस्सल इंदौरी माणूस पट्टीचा खवय्या आहे. सकाळी सकाळी मिळणा-या खास इंदौरी पोह्यांपासून दाल बाटी, गजक, रबडी, अशा सगळ्या पदार्थांमुळेच इंदौर खवय्या शहर म्हणून प्रसिद्ध आहे. इंदौरमधील खवय्यांचं पंढरपूर म्हणजे सराफा चौराहा. या भागात सराफांची मोठमोठी दुकानं आहेत. संध्याकाळी ही दुकानं बंद झाली, की दुकानांसमोरील कट्ट्यांवर पदार्थांचे ठेले लागतात, आणि खवय्यांची पावलं आपसूकच तिकडे वळतात. सराफा ला मिळणारे सगळेच पदार्थ बेफाट. मग तो आलू बोंडा (बटाटा वडा) असो, रुमाली रोटी आणि पनीर माखनवाला असो, प्रसिद्ध दहिवडा असो (हा देताना तो ठेलेवाला एका द्रोणात दही घेतो, आणि वडा एकदम स्टाईलमध्ये १०-१२ फूट हवेत उडवतो आणि थेट दह्याच्या द्रोणात पकडून आपल्या हातात देतो.), केसर रबडी असो, खास इंदौरी मटका कुल्फी असो, चिकन रेशमी कबाब असो, सगळंच जाम भारी.

काही वर्षांपूर्वी भटकायला राजस्थानला गेलो होतो. तिकडे अजून वेगळंच. राजस्थानी माणसाचं प्रेम आहे ते त्यांच्या ऐतिहासिक ठेव्यांवर. राजस्थानात राजेशाही घराणी असल्यामुळे जवळपास प्रत्येक शहरात जुने मोठमोठाले राजवाडे आहेत. आणि नव्या पिढीनेसुद्धा अतिशय काळजीपूर्वक त्यांना जपलंय. (महाराष्ट्रातले गड किल्ले आणि त्यांची अवस्था आठवतेय ना? खरं तर आपले गड नीट जतन केले तर राजस्थानी राजवाड्यांच्या तोंडात मारतील असले भव्य दिव्य आहेत. पण सरकारी अनास्था, आणि आपला निष्काळजीपणा.) आता बर्‍याचशा राजवाड्यांचे ३ भाग करून एक भाग त्या घराण्याला रहायला, एका भागात पंचतारांकित हॉटेल, आणि तिसर्‍या भागात म्युझियम अशी त्यांनी वाटणी केली आहे.

भारताचं नंदनवन असणार्‍या काश्मीर आणि काश्मिरी माणूस यांची कथा अजून वेगळी. काश्मिरी माणसाला काश्मिरच्या निसर्गाचं, दाल सरोवराचं, हजरतबल दर्ग्याचं, शंकराचार्य मंदिराचं वेड आहे. पण काश्मिरचे मुख्यतः ३ भाग पडलेत, एक पर्यटकांचं काश्मिर, एक दहशतवादाने होरपळणारं काश्मिर, आणि एक लेह लदाख. श्रीनगर, जम्मू, पहलगाम, सोनमर्ग, गुलमर्ग या भागातल्या लोकांचं विशेष प्रेम तिकडे जाणार्‍या पर्यटकांवर, कारण पर्यटनातूनच त्यांचं घर चालतं. अनंतनाग, पुंछ, कुपवाडा या दहशतवाद्यांच्या भागातल्या जनतेला स्वतःचा जीवच इतका प्यारा आहे, की त्यांच्यासाठी तेच प्रेमाचं ठिकाण आहे. (बरोबरच आहे हो, जान है तो जहान है.) लदाखला जायचा योग अजून यायचाय.

भारताची राजधानी दिल्ली. त्यांचं भलतंच. दिल्लीकरांना उगाचची नाटकं करण्यात रस आहे. (कॉलेजियन भाषेत आपण त्याला "फलवेगिरी" म्हणतो.) राजधानीच्या शहरात राहतात म्हणजे आपल्या डोक्यावर शिंगं आहेत, आणि फ**गिरी करणं हा आपल्याला सरकारने दिलेला हक्क आहे असं बहुधा यांना वाटत असावं.

ही यादी उत्तरेकडच्या राज्यांची. दक्षिणेच्या राज्यांचं बोलायचं तर त्यांचं सर्वात जास्त वेड आहे ते धर्मात. मी कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या चारही राज्यात हिंडलोय. कुठेही गेलं तरी कुठल्या ना कुठल्या धार्मिक स्थळाचं दर्शन हमखास होतंच. हैदराबाद, सिकंदराबाद आणि कोस्टल कर्नाटक भागात बर्‍याच मशिदी आहेत, तामिळनाडूमध्ये गोपुरम आणि मंदिरं भरपूर, तर केरळात विपुल संख्येने चर्चेस. (बाकी धर्मस्थळंसुद्धा आहेत, पण त्या त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात ती ती स्थळं जरा जास्त आहेत.)

दक्षिणेतलं हेवन म्हटल्या जाणार्‍या गोव्याबद्दल तर काही सांगायलाच नको. त्यांचं सगळं प्रेम काचेच्या बाटलीत भरलेल्या रंगीत पाण्यावर आहे. वास्कोच्या एका जेमतेम ७०-८० मीटर लांबीच्या बोळात रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे मिळून असणारे १४-१५ बार पाहिल्यावर तर मला याची अगदी खात्री पटली होती.

असो, आपापली वैशिष्ट्ये आणि खासियत घेऊन सगळेजण राहतायत. "जगी हा खास वेड्यांचा पसारा, मांडला सारा" हे खरंच आहे. प्रत्येकाची अदा निराळी, ढंग निराळे, तरीही आपण सगळे गुण्यागोविंदाने एकत्र नांदतोय. हे मात्र फक्त भारतातच होऊ शकतं.

प्रतिक्रिया

थोडक्यात आवरल तुम्ही फडणिस.
पण तरीही धाग्यात पुणं, आलय म्हणजे....

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jan 2013 - 1:21 pm | परिकथेतील राजकुमार

मिपावरच्याच १०/१२ धाग्यांचे सार वाचल्यासारखे वाटले.

निष्कर्ष आणि माहिती अतिशय तोकडी आणि एकांगी वाटली. मुख्य म्हणजे शेवटच्या समारोपाच्या ३ ओळी वाचल्यावरती, ह्या लिखाणावरती काय काथ्या कूटावा असा प्रश्न पडला आहे.

बॅटमॅन's picture

2 Jan 2013 - 2:22 pm | बॅटमॅन

+१.

असला हुच्चभ्रू लिबरल शेवट केल्यास काथ्या कुटणार्‍यांची प्रेरणा नाहीशी होऊन जाते. गेलाबाजार पुणेकर, उत्तर/दक्षिण भारतीय आणि त्यांचा अडेलतट्टूपणा, दिल्लीकरांची मिजास, वैग्रेंबद्दल जरा पोटतिडिकीने लिहिलं की काथ्याकूट करायला जी मजा येते महाराजा!!! आहाहाहा...

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2013 - 2:15 pm | अत्रुप्त आत्मा

जागा चुकली,पण चेंडू बरोब्बर पडला .... ;-)
=====================================================
अट्टल पुणेरी आत्मा--- :-p

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो
धन्यवाद

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2013 - 2:34 pm | अत्रुप्त आत्मा

=)) =)) =))
--कट डोंबिवलीकर स्पा--------- http://www.freesmileys.org/smileys/smiley-devil24.gif आ-भार परदरशणाबद्दल आम्चेही धण्यवाद्स :-p

पैसा's picture

2 Jan 2013 - 2:25 pm | पैसा

त्यांचं सगळं प्रेम काचेच्या बाटलीत भरलेल्या रंगीत पाण्यावर आहे. वास्कोच्या एका जेमतेम ७०-८० मीटर लांबीच्या बोळात रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे मिळून असणारे १४-१५ बार पाहिल्यावर तर मला याची अगदी खात्री पटली होती.

ते तुमच्यासारख्या टुरिस्टांसाठी असतं. दारू पिऊन गटारात पडलेला एकही गोवेकर मी २२ वर्षांत बघितलेला नाही. दारू न पिणारे गोवेकर जास्त आहेत. वास्कोतली एक गल्ली म्हणजे गोवा किंवा गोवेकर नव्हे. बादवे, तुम्ही त्या गल्लीत काय करत होता?

चला झाली सुरुवात =))

बॅटमॅन's picture

2 Jan 2013 - 2:56 pm | बॅटमॅन

इंडीड =)) =))

मृत्युन्जय's picture

2 Jan 2013 - 2:52 pm | मृत्युन्जय

आय्ला गोव्याचा सुद्धा जाज्वल्य का काय तो अभिमान असतो म्हणायचा की. ;)

कोलकात्याला विसरलेत कं??? एइ चोलबे ना चोलबे ना!!!

दादा कोंडके's picture

2 Jan 2013 - 2:54 pm | दादा कोंडके

हा हा.
बंगळुरु नसल्यामुळे, होगू....

बॅटमॅन's picture

2 Jan 2013 - 2:57 pm | बॅटमॅन

येन्निट्टैम!!

पैसाताईंशी १००% सहमत.
मुळात गोव्यातले लोक जे पक्के गोवेकर आहेत ते कधीच दारु पिऊन गटारा लोळताना दिसणार नाहीत. गोव्यातले लोक हे अतशय प्रेमळ व मदतीला सदैव तत्पर असतात. आजकाल गोव्याचे नाव थोड फार बदनाम झाल आहे ते गोव्यातील लोकांमुळे नाही तर गोव्यात आलेल्या बाहेरच्या लोकांमुळे.

मृत्युन्जय's picture

2 Jan 2013 - 2:54 pm | मृत्युन्जय

समुद्राअलीकडचे आणि समुद्रापल्याडचे असे गोव्यातही काहीए विभाग आहेत की काय?

पैसा's picture

2 Jan 2013 - 2:59 pm | पैसा

'गोंयकार' आणि 'भायले' अगदी जातीपेक्षा कटाक्षाने उल्लेख होणार्‍या क्याटेगर्‍या. कानडी लोक ते 'घाटी'

किसन शिंदे's picture

2 Jan 2013 - 3:08 pm | किसन शिंदे

समुद्राअलीकडचे आणि समुद्रापल्याडचे असे गोव्यातही काहीए विभाग आहेत की काय?

=))

मराठे's picture

2 Jan 2013 - 10:41 pm | मराठे

>> आजकाल गोव्याचे नाव थोड फार बदनाम झाल आहे ते गोव्यातील लोकांमुळे नाही तर गोव्यात आलेल्या बाहेरच्या लोकांमुळे.

या वाक्यात गोव्याच्या ऐवजी मुंबई, पुणे, नागपूर इतकंच कशाला डोंबिवली, डहाणू वगैरे टाकलं तरीही खपून जाईल! (थोडक्यात आपल्या गावाचं नाव बदनाम बदनाम झालं आहे हे सगळ्यांना कबूल आहे!;-)

मृत्युन्जय's picture

2 Jan 2013 - 2:56 pm | मृत्युन्जय

दक्षिणेतलं हेवन म्हटल्या जाणार्‍या गोव्याबद्दल तर काही सांगायलाच नको.

एक बेसिक शंका बादवे. गोवा दक्षिणेत की पश्चिमेत?

पैसा's picture

2 Jan 2013 - 3:00 pm | पैसा

अर्थातच पश्चिम. गोवा म्हणजे सौदिंडियन लोकांचा हेवन नैय्ये.

ऋषिकेश's picture

2 Jan 2013 - 3:11 pm | ऋषिकेश

+१
फार तर पंजाब्यांचा हणमून स्पाट म्हटता येईल ;)

बॅटमॅन's picture

2 Jan 2013 - 3:12 pm | बॅटमॅन

-१.

हणमून स्पॉटवर फक्त पंजाब्यांचा दावा सांगितल्याबद्दल णिशेढ!!

श्री गावसेना प्रमुख's picture

2 Jan 2013 - 3:22 pm | श्री गावसेना प्रमुख

सध्या थंडीही खुप आहे,

ऋषिकेश's picture

2 Jan 2013 - 4:28 pm | ऋषिकेश

नव्हे नव्हे.. इतरांचा स्पॉट आहेच, पण पंजाबात याशिवाय वेगळा पर्याय माहित नसावा ;)

बॅटमॅन's picture

2 Jan 2013 - 4:31 pm | बॅटमॅन

+१.

पंचनदातले लोक तसेही वायझेडच म्हणा एकूण.

शुचि's picture

11 Jan 2013 - 7:59 am | शुचि

माजुर्डे मेले :/

मी गोव्याच्या आतापर्यंत ३ वार्‍या केल्या. पण मला एकदा पण रस्त्यावर दारु पिऊन टाईट झालेला बेवडा दिसला नाही. जो बहुतेक वेळा पुण्या/मुंबईत दिसतोच. निरीक्षण काही बाबतीत एकांगी आहे.

- पिंगू

इरसाल's picture

2 Jan 2013 - 3:31 pm | इरसाल

जो बहुतेक वेळा पुण्या/मुंबईत दिसतोच.

पुण्या अगोदर लिहीणे गरजेचे होते काय?

प्रभाकर पेठकर's picture

2 Jan 2013 - 3:19 pm | प्रभाकर पेठकर

'शहरांची वैशिष्ट्य' म्हणण्याइतका शहरांचा अभ्यास जाणवला नाही.

एकेका शहरावर एकेक लेख पाडता येईल असे वैविध्य ज्या भारतात आहे त्या भारतास पन्नासएक ओळीत गुंढाळल्याने जरा निराशाच झाली.

गोव्याच्या बाबतीत पैसा आणि निश ह्यांच्याशी सहमत.अगदी तोकड्या भेटीतही पर्यटक गोव्याच्या प्रेमात पडतो तो बाटलीतल्या रंगीत द्रव्यामुळे नाही. जो पर्यटक गोव्याला जायच्या आधीच रंगीत द्रव्याच्या प्रेमात असतो त्याला गोव्यात जिकडेतिकडे फक्त रंगीत द्रव्यच दिसते. गोव्यातील देवळे, चर्चेस, निसर्गसौंदर्य, खाद्यसंस्कृती आणि गोवेकरांची रसिकता ह्यातील काही म्हणता काहीच दिसत नाही. असो.

विषय तसा बरा आहे. पण अजून अभ्यासपूर्ण लिखाणाची अपेक्षा आहे.

किसन शिंदे's picture

4 Jan 2013 - 7:09 am | किसन शिंदे

एकेका शहरावर एकेक लेख पाडता येईल असे वैविध्य ज्या भारतात आहे त्या भारतास पन्नासएक ओळीत गुंढाळल्याने जरा निराशाच झाली.

पेठकर काकांच्या या वाक्याशी हज्जारवेळा सहमत!

अशी एखादी लेखमालिका मिपावर चालू झाली तर किती मजा येईल. :)

फुटली रे अस्मितागळवे फुटुक फुटुक!

इष्टुर फाकडा's picture

2 Jan 2013 - 4:04 pm | इष्टुर फाकडा

बाकी चालुद्या !
तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल, ते ते लाह्या खात पाहावे !

नाना चेंगट's picture

2 Jan 2013 - 4:27 pm | नाना चेंगट

हं...

शुचि's picture

11 Jan 2013 - 8:01 am | शुचि

नक्की काय होतय? :D

आमच्या कोंकणाविषयी नाहीं तें फार लिहिलेंत..? कोंकणाच्या आणि कोंकणी माणसाच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा हों... आम्हाला वेगळां काढून द्या कोंकण.. कसां फस्क्लास चालवून दांखवतों तें पहा...

अहो, मी अजून कोलकाता काळं की गोरं पाहिलं नाहिये... त्यावर लिहू काय, कपाळ??

हम्म...कपाळ सोडा, दक्षिणेची तीनही शहरे एकत्र केलीत ती का बरे? हैदराबादचा चारमिनार एरिया आणि तिथले नमुने यांबद्दलसुद्धा लिहा की थोडं. बंगळूरूचे रिक्षावाले असे की त्यांपुढे पुणेरी रिक्षावाले म्हंजे सौजन्यमूर्ती. तर हे जरा वाईच इस्कटून सांगा.

त्यांचं सगळं प्रेम काचेच्या बाटलीत भरलेल्या रंगीत पाण्यावर आहे. वास्कोच्या एका जेमतेम ७०-८० मीटर लांबीच्या बोळात रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे मिळून असणारे १४-१५ बार पाहिल्यावर तर मला याची अगदी खात्री पटली होती.

वास्कोची एक गल्ली म्हणजे अख्खा गोवा? अगदी ग्लासावरुन बाटलीची परीक्षा करायला त्या गल्लीत पोचला होतात की काय? म्हणजे तुमच्या गोव्याबद्द्लच्या ज्ञानाबद्दल तुमच्याच ह्या भाषेत हाय कंबख्त तूने धडपणे पी ही नहीं म्हणायला हवं!

उगाच आमच्या गोव्याचं नाव खराब करु नका.

गोवा पाहिलांत?

स्पंदना's picture

3 Jan 2013 - 5:24 pm | स्पंदना

हायला! इथे बाटल्या उपसुन दोघीजणी उभ्या राहिलेल्या दिसताहेत.
काय प्रथमसाहेब आल्या आल्या बाटल्यांवर पाय?

यशोधरा's picture

3 Jan 2013 - 9:59 pm | यशोधरा

उपसून वगैरे नाही गं पण गोव्याचं थोडं तरी अंतरंग लेखकसाहेबांनी पाहिलं आहे का? केवळ दारुचे गुत्ते म्हणजे गोवा हे निरीक्षण वाचून लेखकाची अगदीच कीव करावीशी वाटली! खेड्यापाड्यातला गोवा कधी पाहिला आहे? मांडोवीच्या प्रवाहातून कधी रात्रीच्या वेळी आकाशातलं चांदणं डोक्यावर घेऊन सफर केली आहे? एखाद्या आडगावातल्या देवळातली स्वच्छता, देवाबद्दल पुजार्‍यांना आणि भाविकांना असणार्‍या आत्मीयतेची सहसंवेदना अनुभवली आहे? कोकणे फेंस्त, कोकणी गाणी, खास कोकणी स्वयंपाक आणि केवळ मांसाहारीच नव्ह्ते तर शाकाहारीही डिशेस चाखल्या आहेत? पहाटवेळेला एखाद्या फारशा प्रचलित नसलेल्या समुद्रकिनार्‍यावर किंवा खाडीवर जाऊन सूर्योदय अनुभवला आहे? सुरुच्या बनातून फिरणं झालंय? नारळीच्या पोफळीच्या बागांतून निवांत गप्पा मारत बसलाय?

शांतादुर्गा- मंगेशी - रामनाथी, कहीच नाही तर नागेशीचा पालखी उत्सव पाहिलाय कधी?

हा असा गोवा पाहून या कधीतरी :) आमच्या बाकींबाबनी उगाच नाही गोडवे गायलेत गोव्याचे! :)

ह्म्म्म !! रविवारच्या मेगाब्लॉकमध्ये ट्रेनीत टाईमपास म्हणून लिहिल्यासारखा वाटला लेख.

योगप्रभू's picture

3 Jan 2013 - 7:11 pm | योगप्रभू

लेख बारकाईने वाचल्यावर पुणेकरांवर मुद्दाम उडवलेल्या राळेचा विषाद वाटला.
लेखात वेड हा शब्द केवळ पुण्याबाबत आणि काश्मीरींबाबत वापरला आहे. काश्मीरींबाबत तो निसर्गाचे वेड अशा चांगल्या अर्थाने वापरला आहे. बाकी इतर शहरांबाबत रस हा शब्द वापरला आहे. मुंबईकरांची वेळ पाळण्याची शिस्त असते. वैदर्भियांचे स्वत्वाचे प्रेम असते. पुण्यात मात्र बाण्याचे वेड असते, असे लिहून जाता जाता वेड नक्की कुठे असते हे धागालेखकाने सूचकपणे सांगितले आहे. इंदूरच्या खाण्याला प्रचंड नावाजताना आत्मीयतेने आणि माणुसकीने वागणार्‍या गोव्यावर उगा का बरे शिंतोडे उडवावेत?

मृत्युन्जय's picture

4 Jan 2013 - 2:25 pm | मृत्युन्जय

तसे नाही हो मास्तर. तो वेड शब्द "वेडात मराठे वीर दौडले सात" किंवा "वेडी माणसेच इतिहास घडवतात" किंवा "न्युटन गुरुत्वाकर्षणाचे वेडाने झपाटला होता"" अश्या अर्थाने होता.

योगप्रभू's picture

4 Jan 2013 - 3:20 pm | योगप्रभू

ठीक आहे मृत्युंजयदा.
पुणेकरांचे वेड चांगल्या अर्थाने असते, असे म्हणायचे असेल. पण किस्सा निवडला तो गर्दीतल्या भांडणाचा. आता अशी भांडणे काय मुंबईत होत नसतील का? 'माझ्याकडं टक लाऊन का बगतुस?' या कारणावरुन छोट्या गावात प्रकरण हमरीतुमरीवर आल्याचे मी बघितले आहे.

असो, प्रतिवादाचे आणखी काही माहितीपूर्ण मुद्दे मांडण्यास कुणी पुणेकर पुढे येतील काय? या विषयावर अधिक विस्तृत चर्चा व्हावी आणि धाग्याच्या रंजकतेत भर पडावी, हा माझा उदात्त हेतू आहे. आम्हा गरीबांना वाचनानंदाखेरीज कुठचा विरंगुळा असणार?

आनन्दिता's picture

4 Jan 2013 - 10:54 pm | आनन्दिता

१००% सहमत....

गाड्यांच्या छोट्या-मोठ्या टकरा झाल्यावर,नको तिथे भसकन ओवरटेक केल्यावर, बाकिच्या शहरातले लोकं ' आपल्या गाड्या बाजुला घेऊन' प्रेमाने एकमेकांची गळाभेट घेतात की काय?.

>> लिहून जाता जाता वेड नक्की कुठे असते हे धागालेखकाने सूचकपणे सांगितले आहे.

__/\__

सस्नेह's picture

3 Jan 2013 - 9:19 pm | सस्नेह

अभ्यास वाढवावा लागेल...

आनन्दिता's picture

3 Jan 2013 - 9:48 pm | आनन्दिता

=))

आमचे सख्खे शेजारी गोयंकरांनी फारच मनाला लावून घेतलेले दिसतेय. यशोधरा ताई, तुमचा हा निसर्गरम्य गोवा पाहिलाय हो. पोर्वरिम गावा बाहेर असणा-या पाटो ( नदीवरचा लहानसा पूल. तिकडलाच शब्द.) वर चांदण्या रात्रीत सुखद गारव्यात रात्रभर गप्पा कुटल्यात. दक्षिणेकडच्या वारकाच्या एकांत समुद्रकिनारी नारळाच्या झाडांखाली वाळूत पसरून पुलंचं अपुर्वाई पुन्हा एकदा वाचलंय. दुध सागर वरून निघून बाईकने पणजीकडे येताना मुद्दामहून धोपट मार्ग सोडून ग्रामीण गोव्यातून हिंडताना निसर्गाची मुक्त हस्ते उधळण म्हणजे काय हे सुद्धा पाहिलंय.
मुळात मूळचा गोवेकर सदान कदा दारूच्या गुत्त्यात बसलेला असतो असं माझं मत नाहीच आहे. तिकडे बसणा-यां पैकी ८०% तळीराम हे पर्यटकच असतात. गैरसमज नसावा.. :)

आणि समजा १०० टक्के गोवेकरही बसत असतील, तरी त्यात दूषण किंवा वाईट काय आहे. पसंत अपनी अपनी.

त्यांची फेणी तर.. क्या केहने.. गोव्याबाहेरही ही मिळायला लागेल तो सुंदर दिवस..

बाकी निसर्गबिसर्ग कोंकण अन गोव्यात बाय डिफॉल्ट.. त्यात सांगण्यासारखं काही नाही. एस्किमो लोक बाहेरच्या जगाकडे सारखेसारखे "आमच्याकडे जाम थंडी असते बुवा" असं आवर्जून अधोरेखित करत असतील का?

पोर्वरिम नव्हे, पर्वरी :) सरसकट पोर्तूगीज उच्चार करु नयेत.

असतीलही.. माझा मूळ मुद्दा त्यांच्यावर कसलेही आरोप करणं नव्हताच वो. त्ये उगा ताईंनी मनाला लावून घ्येतलय बगा...

मूळ मुद्दा होता तरी काय मग? :)
तरी बरं, तरी मी आमच्या पुण्याबद्दल जे लिहिलं आहेत त्याबदल काहीच म्हटलं नाहीये!:P
म्या गोयंकाराचा पुणेरी प्रश्न - मुळात मुद्दा तरी होता का?

मुद्दा मला मी पाहिलेल्या ठिकाणांची "मला" जाणवलेली वैशिष्ट्ये इतकाच आहे... :)

यशोधरा's picture

4 Jan 2013 - 1:56 pm | यशोधरा

लेख आणि हे नंतरचे २-३ प्रतिसाद ह्यात फार विरोधाभास हे दादा!
असो.

गर्दीत उभ्या उभ्या मनात विचार आला, जसं मुंबईला आणि मुंबईकरांना वेळ या वस्तूत फार रस आहे, तसाच भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहराला एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल आहेच की.

मग मी पाहिलेल्या शहरांबद्दल विचारचक्र सुरु झालं.

हे मी लिहिलं होतंच की....

अरे पाप्या,( पापी ह्या अर्थी नव्हे, अरे माणसा ह्या अर्थी) पॉईंट तोच आसा नी! की तुवें इतले सुंदर गोयं पळयला पुणि तुज्या "विचारचक्रात" याद आसा ती मात्र १० - १२ गुत्त्यांची, तू आपले सोंताचे "विचारचक्र" क्लीन्स कर कशें! :D

आणि पर्वरी बद्दल... माझे २-३ कॅथलिक पोर्तुगीज ख्रिश्चन मित्र तिकडे राहत असल्यामुळे मला ते नाव कळलं होतं:)आज पासून पर्वरीच... सुधारणेबद्दल आभारी आहे... :)

काय हो.. फारच पक्के मुंबईकर दिसता.. इतक्या पटकन मान्य करुन मोकळे..!!

पर्वरिम किंवा पोरवोरिम् हाच उच्चार कसा मूळ अतएव योग्य आहे. आणि पोच्यूगीज हेच कसे त्या नावाचे मूळ जनक आहेत यावरुन जरा वाद घालायचात की? ;) हवं तर पोर्वराईम असा एक नवा (मूळ) उच्चारही पुढे आणता आला असता.

-गविम्

हायला, संपादकमहोदयच काड्या टाकत आहेत! :D

"चर्चेला प्रोत्साहन" या सकारात्मक कृतीला "काड्या टाकणे" हा काहीसा निकृष्ट शब्दप्रयोग करण्याबाबत मी निषेध नोंदवीत आहे. :)

आमच्या शब्दप्रयोगाला "निकृष्ट" म्हटल्याबद्दल डायरेक निषेध! नोंदवला नसून डायरेक केलाय हे कळावे.
आणि ते निष्कृष्ट हाये! :D त्याबद्दल वेगळा अजून एक निषेध :D

बॅटमॅन's picture

4 Jan 2013 - 2:36 pm | बॅटमॅन

आणि ते निष्कृष्ट हाये!

निष्कृष्ट नाही निकृष्ट!!!!!

(कधीकधी व्याकरण-तालिबानी होणारा) बॅटमॅन.

निकृष्ट=कमी दर्जाचे/प्रतीचे इ.इ.

निष्कृष्ट=बाहेर ओढलेले/काढलेले. निष्कर्ष करून काढलेले ते निष्कृष्ट.

संदर्भ

http://spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=niSkRST...

हे राम.. %) ब्याटम्याना.. भाषेचे निष्कर्षण म्हणायचे का हे?

बॅटमॅन's picture

4 Jan 2013 - 2:49 pm | बॅटमॅन

;)

निष्कर्ष काहाडल्येलाच हायेच ना? त्याइना काय हाये?

मृत्युन्जय's picture

4 Jan 2013 - 2:27 pm | मृत्युन्जय

मिपाचे संपादक काही मिपाकरांना सुधारु द्यायचे लाभित. कल्युग आलय हो.

यशोधरा's picture

4 Jan 2013 - 2:45 pm | यशोधरा

पहा म्हंजे झालें!

असो, आता माझ्यापुरता दंगा आवरता घेते, जुन्या मिपावर दंगा केल्यासारखे वाटले क्षणभर. :)

समीरसूर's picture

4 Jan 2013 - 5:30 pm | समीरसूर

लेख छान आहे पण हे मुंबईचं जे नेहमी नेहमी 'वेळेचं महत्व' आणि 'मुंबई थांबत नाही' हे कौतुक सगळीकडे होत असतं ते मात्र अनाठायी आणि निरर्थक आहे. मुंबई थांबत नाही म्हणजे काय? कोण थांबतं? डांगसौंदाणे या नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातल्या एका लहानशा खेड्यात जरी बॉम्ब्स्फोट झाले तरी ते गाव चालूच राहणार ना? की सगळे गाव सोडून, कामधंदा सोडून पळून जातील? मालेगावात, पुण्यात स्फोट झाल्यानंतर ही गावे काय बंद पडली? त्यामुळे मुंबईचं हे कौतुक करतांना पाहिलं की हसू येतं.

फक्त मुंबईतल्या लोकांनाच वेळेचं महत्व कळतं मग बाकीच्या शहरातले लोकं काय आट्यापाट्या खेळत आयुष्य कंठतात की काय? काहीतरी खुळचटपणा आहे. मरणाच्या गर्दीत लोकलमध्ये एकमेकांच्या घामाचा वास घेत तासंतास दवडण्यात कुठलं आलंय वेळेचं महत्व? ज्या शहरात प्रवासातच दिवसाचा निम्मा वेळ जातो आणि जिथे कामावर जाण्यासाठी आणि घरी परत येण्यासाठी ८०-१०० किमीचा रोजचा यातनादायी प्रवास करावा लागतो त्या शहरात वेळ महत्वाचा असणारच; यात कौतुक करण्यासारखे काय आहे? आणि थोड्या फार फरकाने आज बहुतांशी सगळ्याच शहरांमध्ये (पुणे, चेन्नई, बेंगळूरु, हैदराबाद, दिल्ली, नाशिक) अशीच परिस्थिती आहे. पुण्यात आज ३-३ तास प्रवास करणारे लाखो लोकं आहेत. वेळेचं महत्व सगळीकडे सारखंच असतं. फक्त घाई-घाईने वाघ मागे लागल्यासारखे आयुष्य व्यतीत करणे म्हणजेच वेळेचं महत्व समजणे असे नसते. हा मुंबईमधल्या लोकांचा प्रचंड मोठा गैरसमज आहे.

एवढ्या दीड कोटी लोकांचे ओझे सांभाळत असतांना मुंबईची लोकलसेवा चालू राहते आणि उत्तम सेवा पुरवते याचेच मला आश्चर्य वाटते. एवढा प्रचंड पसारा सांभाळणे, अपघात टाळणे, इतक्या प्रचंड प्रमाणावर लोकांची ने-आण करणे, वाहतुकीचे गणित व्यवस्थित बसवणे आणि चालवणे ही किती कठीण कामगिरी आहे हे मुंबईकरांना कधी समजेल काय? फार क्वचित लोकलसेवा खंडित होते. इतक्या किरकोळ घटना नक्कीच क्षम्य आहेत. काही प्रॉब्लेम झाला की लोकलसेवेला शिव्यांची लाखोली वाहायला मुंबईकर तयार!! अरे पण वर्षानुवर्षे या लोकलसेवेमुळेच तुमचे जीवन सुसह्य होत असते हे कसे विसरता? आपण साध्या-साध्या गोष्टींमध्ये हजारदा चुकतो. एवढ्या मोठ्या पसार्यात बिघाड होणारच नाही अशी अवास्तव अपेक्षा फक्त मुंबईकरच करू शकतात कारण त्यांना स्वतःची सोय याखेरीज दुसरं काहीच दिसत नाही.

असो.

गवि's picture

4 Jan 2013 - 5:39 pm | गवि

+१००

सहमत..

मुंबईकर नेहमी पटकन सहमत होतात.

दादा कोंडके's picture

4 Jan 2013 - 5:55 pm | दादा कोंडके

+७ पाहिजे का?

"उलट मुंबईला कुणी एक भिकार म्हटलं तर आपण सात भिकार असं सांगून मोकळं व्हावं" इती पुलं. :)

गवि's picture

4 Jan 2013 - 6:04 pm | गवि

सहमत...!! :)

वरील तिघा मुंबैकरांशी शमत आहे.

मृत्युन्जय's picture

4 Jan 2013 - 6:25 pm | मृत्युन्जय

खरंय खरंय. मुंबै ७ भिक्कार आहे. गवि आता ४९ भिक्कार म्हणणार काय?

मुंबईकर नेहमी पटकन सहमत होतात.

जिथे संपादकच काडी टाकतात........ =)) =))

राही's picture

4 Jan 2013 - 6:42 pm | राही

तमाम मुंबईकरांना वेळेचं किती महत्त्व असतं हे (मुंबईकरच असलेल्या)उपनगरी-रेल्-कर्मचार्‍यांना पुरतं ठाउक असल्याने ते रेल्वेने वेळा पाळाव्या यासाठी वेळेवर काम करतात आणि उरलेले मुंबईकर हे वेळेबाबत काटेकोर-मुंबईचा शब्द पर्टिक्युलर-(इतर कशाहीसाठी नाही,कुठल्या शेर्‍यासाठी नाही,ताशेर्‍यासाठी नाही,फक्त वेळेबद्दल)असल्याने लोकलला उशीर झाला की बोंबाबोंब करतात.

राही's picture

4 Jan 2013 - 6:58 pm | राही

मुंबईकरांना वेळेचे महत्त्व किती आहे हे पुरतं ठाऊक असल्याने (मुंबईकर)उपनगरी-रेल्-कर्मचारी रेलवेळापत्रक सुरळीत राखण्यासाठी दक्ष असतात आणि उरलेले मुंबईकर वेळेबाबत काटेकोर-मुंबईचा शब्द पर्टिक्युलर्-(इतर कशाहीसाठी नाही,शेरेताशेर्‍यांबाबत नाहीच,तिथे तर ते कायमच 'सहमत' मोड आणि मूडमध्ये असतात)असल्याने लोकलला उशीर झाला तर बोंबाबोंब करतात.

श्री गावसेना प्रमुख's picture

5 Jan 2013 - 8:59 am | श्री गावसेना प्रमुख

डांगसौंदाणेच का आठवल्,तिथ कोण कशाला जाईल
तिथे काही खुट्ट वाजल तरी तुमच नाव कळवतो पोलिसांना

पैसा's picture

4 Jan 2013 - 6:19 pm | पैसा

बरेच पक्षी मारण्याचा प्रयत्न चांगला होता.पण दगड भलत्याच ठिकाणी लागल्याने आफत ओढवली. आधी गोवा, आणि मग मुंबईकरांकडून कडा प्रतिकार झाला असल्यामुळे पुणेकरांकडून अपेक्षा फारच वाढल्या आहेत.

या शेवटच्या वाक्याला काडी टाकणे का म्हणू नये? ;)

पुण्याच्या बाबतीत फ्क्त काडी म्हणणे हे देखील काडि टाकण्यासारखे नाही का, गेलाबाजार सरपण तरी म्हणायला हवे.

पैसा's picture

5 Jan 2013 - 2:23 pm | पैसा

समिधा त्या.

किसन शिंदे's picture

4 Jan 2013 - 6:31 pm | किसन शिंदे

शतकी/द्विशतकी प्रतिसाद लक्षात ठेवूनच लेखकाने धागा काढला असावा काय?

ठाण्याबद्दल काहीच लिहीलं नाही म्हणून ठाणेकरांनी शंख करायला सुरुवात करा. शतक सहज होईल, मग कदाचित पुणेकर येतील द्विशतकात हातभार लावायला.

योगप्रभू's picture

4 Jan 2013 - 7:16 pm | योगप्रभू

धागालेखक हा डोंबिवली (तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे) या गावाचा रहिवासी असून तो स्वतःस 'आम्ही मुंबईकर' म्हणवतो.

मुंबई ही दादरला संपते, मुळूंद(मुलुंड)ला मुंबईच्या सेंट्रल लाईनची उपनगरं संपतात हे फार थोड्या लोकांना माहित असतं.

घ्या, मुळात दादरची असणारी आणि ऑस्ट्रेलियात राहुन एम्बिए करणारी माणसं स्वताला (बहुतेक चिसौका) देवरुखकर म्हणवतात, त्यात डोंबिवली - मुंबईकरांची का गोष्ट करता ?

अवांतर - कंसातले शब्द वाचुन, मुली शोधुन न सापडल्यांनी फ्रस्ट्रेट झालेल्यांनी खरडी वा व्यनि करु नयेत ही नम्र विनंती.

>>अवांतर - कंसातले शब्द वाचुन, मुली शोधुन न सापडल्यांनी फ्रस्ट्रेट झालेल्यांनी खरडी वा व्यनि करु नयेत ही नम्र विनंती.

हा हा !! अगदी अगदी, नायतर करायला गेलो नवस आणि आज निघाली अवस अशी गत व्हायची. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2013 - 6:57 pm | अत्रुप्त आत्मा

@जगी हा खास वेड्यांचा पसारा..
प्रेषक, प्रथम फडणीस, Wed, 02/01/2013 - 13:39>>>>> =))

अहो, खेड शिवापूरला राहणारे स्वतःला काय म्हणवतात?? पुणेकर, की सातारकर??

>>खेड शिवापूरला राहणारे स्वतःला काय म्हणवतात??

खेड शिवापूरकर !! =))

समीरसूर साहेब पण फारच तापलेले दिसतात बुवा.. अहो, सध्या चालू असणारा लोकलचा गोंधळ कशासाठी चाल्लाय ठाऊक आहे का? काय तर म्हणे त्याने डोंबिवली ते ठाणे प्रवासातले २ मिनीटं वाचतील.. या २ मिनीटं वाचण्यासाठी लोकांनी आत्ता २-३ तास उशिरा ऑफिसला गेलं तर चालतं असं रेल्वे वाल्यांचं म्हणणं आहे का? की त्यांच्या मते सगळे प्रवासी हे सरकारी कारकून आहेत, की त्यांना लेट मार्क ची काळजी नसते?

शतकासाठी आगाउ अभिनंदन, बाकी प्रामाणिक आणि हुशार सोलापुरकरांबद्दल काही लिहिलं नाहीत याबद्दल दत्त्याला बोलावण्यात येईल हे लक्षात ठेवा.

हायला ! फडणीससाहेबांनी भरपूर 'पसारा' गोळा केलाय की !

अरे होय.. प्रामाणिक आणि हुशार सोलापूरकर, उपेक्षित कोकणकर (गवि साहेबांच्या मते), तिखट खाण्यावर नितांत प्रेम करणारे कोल्हापूरकर राहिलेच की... :)

नि३सोलपुरकर's picture

5 Jan 2013 - 4:33 pm | नि३सोलपुरकर

प्रथम साहेब,
सोलापूरात कधी आल्ता ? आणी काय पाहिलय ..प्रामाणिक आणि हुशार सोलापूरकराचे तुम्हाला आलेले अनुभव किंवा निरिक्शण वाचायला आवडेल .

अभ्या..'s picture

5 Jan 2013 - 8:40 pm | अभ्या..

बास रे. एवढे बोलले बास झालं.
(५०दादाच्या द्त्त्याला घाबरले दिसतय ;))
आपणच करु आपापले गुणवर्णन. शिक जरा पुणेकरांकडून. ;)

क्रान्ति's picture

5 Jan 2013 - 4:37 pm | क्रान्ति

आमी नागपूरकर काउन बा नाय आलो तुमच्या नजरेत ?

चिगो's picture

5 Jan 2013 - 4:43 pm | चिगो

मुंबई आणि पुण्यानंतर येणारं मराठी शहर म्हणजे नागपूर. नागपूर, आणि सगळ्याच विदर्भाला "स्व" बद्दल अतिव प्रेम. मी, माझं यातच त्यांना रस असतो. आमचं नागपूर, आमच्या नागपूरची संत्री, आमच्या विदर्भातलं ताडोबा, आमची विदर्भी थंडी, आमचा नागपूरी वडाभात, आमचा वर्‍हाडी ठेचा... नागपूरकरांची ही आमचं ची यादी न संपणारी आहे.

ब्बार्र... मग? नागपूरकरांना नागपूरचा अभिमान का असू नये? प्रत्येकाला त्याचं गाव आवडतं की राव.. अगदी ते गाव 'हागणदारी-मुक्त गाव' नसले तरी..

अगदी ते गाव 'हागणदारी-मुक्त गाव' नसले तरी..

च्यायला =))

नि३ साहेब, माझं गाव आहे हो सोलापूर.. आमच्या मातोश्री सोलापूरातल्याच आणि पिताश्री अकलूजचे आहेत. त्यामुळे लहानपणापासून सोलापूर ला येतोय. शाळेत असताना दर वर्षी उन्हाळी सुट्टीत सोलापूरातच आजोळी असायचो २-३ महिने..

नानबा's picture

5 Jan 2013 - 8:49 pm | नानबा

नागपूरकर आलेत की बा... नागपूरचा येक अध्याय हाये की लिवलेला..

पिवळा डांबिस's picture

5 Jan 2013 - 8:58 pm | पिवळा डांबिस

च्यामारी, डोंबोलीकरांविषयी लिहिलंच नाय!!
आमच्याकडे सुद्धा वेडंवाकडं वाढलेलं कंस्ट्रक्शन आहे, पाण्याची सदैव टंचाई आहे, टप्पोरे टप्पोरे डास आहेत, फडके रोडवरती (टप्पोरी!) कन्या आहेत!!!
आमालासुद्धा त्यांचा जाज्वल्य अभिमान आहे!!!!
:)

ओ डांबिस, आपल्या डोंबोलीत बरंच काय हाय... कं र बाला वाले आगरी हायेत, खड्डेयुक्त रस्ते हायेत, फडके रोड हाये, यम आय डी शी हाये, रेल्वे टेशन समोरचे फेरीवाले आणि त्यांच्या मधून कसाबसा वाट शोधत रिक्शा स्टँडवरची लांबलचक रांग पाहून नाईलाजाने पाय घासत घरी जाणारा सर्वसामान्य मध्यमवर्गीय सुशिक्षीत पण लाचार डोंबिवलीकर सुद्धा आहे..

क्रान्ति's picture

5 Jan 2013 - 11:09 pm | क्रान्ति

येवडीच नाय हो नागपुरकराची वळख. आजुन सिताबर्डी राहिली, सचिनचा टेकडीचा गनपती राहिला, राहुल द्रविडची सासुरवाडी म्हनून नागपुरची वळख राहिली. नावालाच उपराजधानी म्हनून हिवाळी आदिवेशनाच्या नावाखाली समद्या राजकारनी लोकांचं पिकनिक स्पॉट बी हाय आमचं नागपुर.

नानबा's picture

5 Jan 2013 - 11:24 pm | नानबा

व्हयं व्हयं... ह्ये समदं राहुनंच गेलं बगा. :)

डोंबिवलीकर श्री. प्रथम फडणीस, आता कसं तुम्हाला ८.४२ च्या डब्बल फास्ट मध्ये लास्ट मोमेंटला घुसुन आत मिसळुन गेल्यासारखं वाटलं असंल ना.

अहो, मुंबईकरांमध्ये घुसळायची सवय होती... आज समस्त मराठीजनांमध्ये घुसळून निघालो... :)

(महाराष्ट्रातले गड किल्ले आणि त्यांची अवस्था आठवतेय ना? खरं तर आपले गड नीट जतन केले तर राजस्थानी राजवाड्यांच्या तोंडात मारतील असले भव्य दिव्य आहेत. पण सरकारी अनास्था, आणि आपला निष्काळजीपणा.)
या मुद्द्यावर एक नमूद करावेसे वाटते, बऱ्याच इतिहास प्रेमींचा हेच मत आहे. याला कारण इतिहासाचे अज्ञान हेच! महाराष्ट्रातले प्रत्येक गड काय लहानशी गढी देखील परकीय आक्रमकांशी जीवाच्या कराराने शेवटपर्यंत लढवली गेली आहे. जर शिवाजी महाराजान्नंतारचा इतिहास वाचा. पण राजस्तानच्या राजे आणि महाराजांनी परकीय आक्रमकांशी सोयरिकी करून किंवा त्यांचे मांडलिकत्व स्वीकारून आपापले राज्य वाचवले. जोधाबाई किंवा राजा मानसिंग आठवा. एखादा राणा प्रताप वेगळा.