तहलका!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in काथ्याकूट
26 Oct 2007 - 9:36 am
गाभा: 

आज तहलकाचा नवा बॉम्ब बघितलात?
निवडणुकीच्या तोंडवर बरोब्बर कसा फुटतो शोध पत्रकारितेचा टाईम बॉम्ब?
अशा माध्यमांना कायमचा चौकशी आयोगाचा दर्जा दिला तर?

प्रतिक्रिया

देवदत्त's picture

26 Oct 2007 - 10:52 am | देवदत्त

संदर्भ मिळेल का?
माझ्या घरी दूरदर्शन (संच) नाही. घरी वॄत्तपत्रही येत नाही.
आणि कार्यालयात बहुतेक संकेतस्थळांना मज्जाव आहे.

देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

प्रकाश घाटपांडे's picture

26 Oct 2007 - 11:01 am | प्रकाश घाटपांडे

नवी दिल्ली, ता. २५ - गुजरातच्या दंगलींमागील खरे खलनायक मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच होते आणि तीन दिवसांपर्यंत "वाटेल ते करण्याची' खुली सूट त्यांनी दंगलखोरांना दिली होती; शिवाय वंशसंहारानंतर "आप धन्य हो' असे म्हणत त्यांना शाबासकीही दिली, अशी धक्कादायक माहिती "तहलका' नियतकालिकाने आज येथे दिली. .......
बातमी दै. सकाळ दि, २६ अक्टोंबर २००७ खाली वाच

http://esakal.com/esakal/esakal/rightframe.html
प्रकाश घाटपांडे

ज्या विधायकाने तहलकाला मुलाखत दिली त्याने स्वतः कबूल केले की
- पंजाबवरुन १ ट्रक भरुन तलवारी दंगलीसाठी मागवल्या होत्या
- ६० लोकांना एका गावात ठार केले
- गर्भवती स्त्रीचे पोट चिरले
- एका मुस्लिमाचे हात पाय तोडून त्याला जिवंत जाळले

मानवतेला काळीमा फासणारी कृत्ये आहेत ही ..

निवडणुकिच्या तोंडावर आलेल्या या तेहलका मध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. वेळोवेळी या गोष्टि प्रकाशाला आल्या आहेत.
धक्कादायक, क्रुर, र्निधुण असे शब्द ऐकायला बरे वाटतात. पण ज्यां लोकांनी हे भोगले आहे त्यांनाच खरे काय ते माहित.
आज काल गुजरातमध्य काहिही झाले तर लगेच "मोदींच्या" नावाने ठणाणा करण्याची फॅशन आली आहे. मला वाटते की गुजरात दंगली सोडुन दुसरा कोणताही मुद्दा यावेळी विरोधकांकडे नाही कारन विकास या मुद्द्यावर मोदींनी केव्हाच विरोधकांची तोंडे बंद केली आहेत.
जे काही दंगली मध्य झाले ते निश्चीतच अमानवीय होते पण यात मोदींचा प्रत्यक्ष हात आहे असे कसे म्हणता येईल. आणि कुठल्या मोदी विरोधकाने दिलेल्या जबानीवर विश्वास न ठेवण्यातच "मिसळपावच्या सुज्ञ वाचकांचे " शहाणपण आहे. कारण हे किती फोल आहे हे खुप वेळा सिध्ध झाले आहे. तसे "सकाळ व तेहलका " चा पारदर्शीपण जगविख्यात आहेच..............

चालयचेच निवडणुका म्हटल्यावर असा धुराळा तर उडायचाच........... पण शेवटी विजयाची माळ मोदिंच्याच गळ्यात पडणार आहे.

राजे's picture

27 Oct 2007 - 12:03 am | राजे (not verified)

"तेहलका "

असे नसून तहलका असे असे आहे.

सुध्द लेखन कसा असावे हे सागण्याच्या विनम्र प्रतीसाद नही आहे आहे सांगणे ग्रजेचे आहे.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

देवदत्त's picture

26 Oct 2007 - 10:06 pm | देवदत्त

अशा गोष्टी बाहेर काढण्यात (?) प्रसार माध्यमे आणि तहलका सारखे बॉम्बर ह्यांनी आपली विश्वासार्हता कधीच गमाविली आहे . आता हे प्रकार फक्त स्वतःची लोकप्रियता वाढविण्याकरिता शोधले (की तयार केले?) जातात असे मला वाटते. आणि मग निवडणुकीचा काळ म्हणजे पर्वणीच.

आता ज्या माणसाने तो कबुलीजवाब दिला तो मोदींच्याच पक्षातील ना? मग आता ५ वर्षांनी त्यांनी हे बाहेर का काढले? एक तर त्यांना दुसरर्‍या पक्षात जागा मिळाली असेल नाहीतर काही व्यक्तिगत वाद.
जर त्याला मोदींचा विरोध करायचाच होता तर मग आताच का?
असेच प्रकार आधीही भरपूर लोकांनी केले आहेत. पक्षात राहून त्यांना खरे/खोटे चांगले/वाईट कळत नसते का? तिथे असतो फक्त स्वार्थ.. आणि त्याला बळी पडतो आपण सामान्य लोक...

हो... अशा माध्यमांची चौकशी व्हायलाच पाहिजे.

देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

राजे's picture

27 Oct 2007 - 9:05 am | राजे (not verified)

सहमत.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

दिनेश's picture

27 Oct 2007 - 12:40 pm | दिनेश

मनापासून आपले म्हणणे पटले.
दिनेश

कोलबेर's picture

27 Oct 2007 - 11:00 pm | कोलबेर

- पंजाबवरुन १ ट्रक भरुन तलवारी दंगलीसाठी मागवल्या होत्या
- ६० लोकांना एका गावात ठार केले
- गर्भवती स्त्रीचे पोट चिरले
- एका मुस्लिमाचे हात पाय तोडून त्याला जिवंत जाळले

सागर ह्यांनी दिलेल्या घटनांकडे पाहिले असता, ५ वर्ष काय ५० वर्ष काय निवडणुकीआधी की निवडणुकीनंतर ह्या गोष्टी बाहेर आल्याच पाहिजेत. 'निवडणुकीच्या तोंडावर स्वार्थ साधणे' ह्यातले गांभिर्य वर दिलेल्या घटनांसमोर मलातरी नगण्य वाटते. आपला स्वार्थ साधण्याच्या हेतूने का असेना ही माणुसकीला काळीमा फासणारी कॄत्ये बाहेर आली तर त्यात काय वावगे आहे?

देवदत्त's picture

28 Oct 2007 - 12:04 am | देवदत्त

माणुसकीला काळीमा फासणारी कॄत्ये बाहेर आली तर त्यात काय वावगे आहे?
ह्यात वावगे काहीच नाही.
वरील मुद्दयात ...
- ६० लोकांना एका गावात ठार केले
- गर्भवती स्त्रीचे पोट चिरले
- एका मुस्लिमाचे हात पाय तोडून त्याला जिवंत जाळले

हे झाले ह्याचा अत्यंत खेद वाटतो. नेहमीचेच म्हणून टाळू इच्छित नाही. हे प्रकार करणारे नराधमच आहेत. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.

बहुतेक प्रकार पूर्वनियोजीत असू शकतात, किंवा प्रक्षोभित जमाव हेही कारण असू शकते. म्हणतात ना गर्दीला अक्कल नसते.

माझे म्हणणे आहे की प्रथमतः ह्या सर्व प्रकाराची नीट चौकशी झाली पाहिजे. मग त्या माणसाने तसला कबुलीजवाब का दिला ते शोधले पाहिजे. संपुर्ण प्रकरणात विश्वासार्ह गोष्टी किती आहेत त्या बाहेर आल्या पाहिजेत. आणि गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे.

परंतु, हे असे लिहिण्याचे कारण की, ह्या आधीही असली प्रकरणे बाहेर आलीत (की काढलीत) त्यांचे काय झाले? किती लोकांना शिक्षा झाली?

मागील महिन्यात एका दूरदर्शन वाहिनीवर बंदी घालण्यात आली, कारण एका बनावट स्टिंग ऑपरेशन मध्ये त्यांनी काही प्रकरण सांगितले होते.
त्याआधी, बहुधा मागील वर्षी, एका माणसाने सरकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची धमकी दिली होती. त्याची खबर एका (की बहुतेक?) वॄत्तवाहिन्यांना होती परंतु त्या लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली नाही, ह्यामागे त्यांचा स्वार्थच दिसतो. मग भले एखादा माणूस त्यांच्यासमोर आत्महत्या करू देत. त्यांना मसाला मिळाला ना? वास्तविक पाहता ह्या वेळी आपण जी माणुसकी म्हणतो त्याप्रमाणे त्या वॄत्तवाहिनीच्या लोकांनी त्याला समजावले पाहिजे की तू असला प्रकार करू नकोस. आम्ही तुझे गार्‍हाणे सरकार कडे पोहोचवू. पण तसे नाही झाले.

म्हणूनच मी लिहिले होते ...
ह्यांनी आपली विश्वासार्हता कधीच गमाविली आहे

आता ह्या प्रकरणात आपण इथे बसून काथ्याकूट करत बसलोय. पण एक वाटतं, प्रसारमाध्यमांनी एखाद्या प्रकरणावर जोर दिला की आपण त्यावर चर्चा करत बसतो. त्यात बहुतेक वेळा नामवंताचेच ते प्रकरण असते. परंतु आपल्या समोर रस्त्यावर एखाद्या माणसाला एखादा गाडीवाला टक्कर मारून गेला तर किती लोक त्या गाडीवाल्याला शिक्षा झाली पाहिजे म्हणून दाद मागतात? मोजकेच लोक.
तसले फक्त मी जेसिका लाल हत्याकांड प्रकरणातच लोकांना जागृत झालेले (की एकत्र पुढे आलेले) पाहिले. (त्यात रंग दे बसंती ने ही थोडाफार हातभार लावला असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.)

(निर्विकार) देवदत्त

अगदी बरोबर बोललात देवदत्त,

अत्याचार होतात आणि होतच राहतात.
रस्त्यावरचा छोटासा अपघात करणारा ड्रायव्हर असो, वा सफेद वर्दीवाले राजकारणी असो.
कोणताही अपराधी सुटला नाही पाहीजे, तरच या देशात कायद्याला मानाचे स्थान राहील.

तसेही कायद्याला लोकांच्या नजरेत किंमत राहिलेली नाही, म्हणूनच लोक स्वतःच कायदा हातात घेऊ लागले आहेत
मग ते ब्लू-लाईन बसवर दगडफेक करुन प्रक्षोभ व्यक्त करणे असो, वा पकडलेल्या चोराला जागेवरच बेदम चोप देऊन ठार मारणे असो.
हे सरकारचे आणि कायदा आणि सु-व्यवस्था सांभाळणार्‍या शासकांचे अपयश आहे.
त्याबद्दल अर्थातच यांतील कोणालाही एका कवडीचीही शरम वाटत नाही. सरकारकडून दरमहा पगार घेऊन, सरकारी सुविधांचा लाभ घेऊन सुद्धा ह्या खोगीरभरताडांच्या निष्ठा सामान्य जनतेच्या हितांपेक्षा हफ्ता देणार्‍या पुंडांवर जास्त.

सामान्य जनतेने काय करावे? हा प्रश्न आहेच. पण येथे एकच सांगावेसे वाटते की एका कोणत्या पक्षाला मत देऊन ही परिस्थिती बदलेल असे वाटत नाही. जनतेने स्वतः जाऊन या शासकांना त्यांच्या प्रत्येक कामाचा जाब विचारला पाहीजे. हवं तर जनजागृतीच्या समित्या स्थापन करुन त्याद्वारे या लोकांना धारेवर धरावे तरच कामे होतील.

असो विषय थोडा भरकटतोय, पण मूळ हेच आहे. राज्यकर्ते सरळ झाले तर राज्य पण सरळ चालेल. गरिबाला मीठ-भाकर देखील खर्चिक होऊ लागली आहे हेच खरे... या राज्यकर्त्यांनी प्रत्येक विकासकामात ३०% पैसे खाल्ले तरी देशाचा विकास हळू हळू का होईना पण होईल.
पण या पुंडांना त्यांच्या स्विस बॅंकेच्या खात्यात किती कोटी जमा होत आहेत याचीच चिंता असते. त्यामुळे विकासकामासाठीचे ८०-९०% पैसे कसे अदृष्य होतात हेच भाबड्या जनतेला कळत नाही.. असो, यदा यदा ही धर्मस्य म्हणणार्‍या भगवान श्रीकृष्णांची आठवण प्रकर्षाने होत आहे. भगवंता सामान्य जनांच्या सुखासाठी जन्म घे रे बाबा....

(नेभळट राज्यकर्त्यांच्या मतलबीपणामुळे खिन्न झालेला) सागर

प्राजु's picture

27 Oct 2007 - 8:59 am | प्राजु

आता ज्या माणसाने तो कबुलीजवाब दिला तो मोदींच्याच पक्षातील ना? मग आता ५ वर्षांनी त्यांनी हे बाहेर का काढले? एक तर त्यांना दुसरर्‍या पक्षात जागा मिळाली असेल नाहीतर काही व्यक्तिगत वाद.
जर त्याला मोदींचा विरोध करायचाच होता तर मग आताच का?
असेच प्रकार आधीही भरपूर लोकांनी केले आहेत. पक्षात राहून त्यांना खरे/खोटे चांगले/वाईट कळत नसते का? तिथे असतो फक्त स्वार्थ.. आणि त्याला बळी पडतो आपण सामान्य लोक...

हो... अशा माध्यमांची चौकशी व्हायलाच पाहिजे.

देवदत्त यांच्याशी पूर्णपणे सहमत.
- प्राजु.

लोकशाहीत पुढार्‍यांना जबाब विचारण्याचे प्रमुख मार्ग तीन - न्यायालय आणि निवडणूक हे सर्वांना उपलब्ध असतात, आणि चौकशी हा तिसरा मार्ग अन्य लोकप्रतिनिधींना उपलब्ध असतो. हे तीन मार्ग एकमेकांना बाधक नव्हेत.
पुढार्‍याविषयी महत्त्वाची माहितीची निवडणुकीपूर्वी उजळणी करणे हा संधिसाधूपणा नाही - निवडणूक नसतानासुद्धा माहिती दिली पाहिजे, हे खरे, पण त्यावेळी त्या माहितीचा मतदाराला लगेच उपयोग करून घेता येत नाही. त्यामुळे निवडणुकीजवळ ही माहिती पुन्हा मिळावी.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Oct 2007 - 8:37 pm | प्रकाश घाटपांडे

पुढार्‍याविषयी महत्त्वाची माहितीची निवडणुकीपूर्वी उजळणी करणे हा संधिसाधूपणा नाही - निवडणूक नसतानासुद्धा माहिती दिली पाहिजे, हे खरे, पण त्यावेळी त्या माहितीचा मतदाराला लगेच उपयोग करून घेता येत नाही. त्यामुळे निवडणुकीजवळ ही माहिती पुन्हा मिळावी.

पुर्णपणे सहमत आहे. इतर वेळी मतदाराला विचारतो कोण? एक समाजवादी पुढारी लोकशाहीत एका मताला सुद्धा किती महत्व असतं, मत विकाउ नाही, मतदार खरा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, लोकप्रतिनिधी हा फक्त विश्वस्त आहे, वगैरे वगैरे ... हे सांगायला नगर जिल्ह्यातील खेड्यात खाजगीत प्रबोधन करत होते, एक गरीब शेतक-याने सगळे ऐकले. तो म्हणाला ते सगळ ठीक आहे , आत्ता पाच वाजेपर्यंत मत दिलं तर एक गांधीबाबा तरी भेटतोय. नंतर तो बी भेटणार नाही.
( गांधीबाबा म्हणजे पाचशे ची नोट हे सांगणे न लगे)
प्रकाश घाटपांडे

आजानुकर्ण's picture

29 Oct 2007 - 10:11 pm | आजानुकर्ण

सहमत आहे.

तहलकाचे काय निष्कर्ष आहेत हे पहा. त्यांनी १० महिन्यापूर्वी जरी हे संशोधन(?) केले असते तरी हेच निष्कर्ष निघाले नसते का? उगाच वेळ चुकली वगैरे फाटे फोडण्यात काही पॉइंट नाही. त्यांचे निष्कर्ष खरे असतील तर मोदी हे दुसरे हिटलर आहेत असे म्हणावे लागेल.

देवदत्त's picture

29 Oct 2007 - 10:33 pm | देवदत्त

५ वर्षांपुर्वीच्या घटनेचे संशोधन १० महिन्यांपुर्वी केले. मग ह्या दहा महिन्यात ते काय कुंडली मांडून मुहुर्त शोधत होते? जर त्या सगळ्या गोष्टींचा निष्कर्ष ५ वर्षांपुर्वी किंवा १० महिन्यांपुर्वी तोच निघणार होता, तर मग सांगण्यात ही दिरंगाई का? जर एखादे सत्य बाहेर आले किंवा कळले, आणि मग त्याने कोणाला शिक्षा होउ शकते, लाखो लोकांना फायदा मिळत असेल तर मग ते तेव्हाच बाहेर पडले पाहिजे.

बाकी,
त्यांचे निष्कर्ष खरे असतील तर मोदी हे दुसरे हिटलर आहेत असे म्हणावे लागेल.
ह्याच्याशी सहमत. पण ते ह्या सर्वाची नीट चौकशी झाल्यावर.

ह्यात मी कोणत्याही पक्षाकडून मत मांडत नाही आहे.
(सत्याच्या शोधातील) देवदत्त

प्रकाश घाटपांडे's picture

28 Oct 2007 - 10:25 am | प्रकाश घाटपांडे

आनंद पटवर्धन यांचे " राम के नाम" व " पिता पुत्र और धर्मयुद्ध" हे लघुपट या पार्श्वभुमीवर पहाण्यासारखे आहेत. हे लघुपट किती लोकांपर्यंत पोचले आहेत ते माहीत नाही.
प्रकाश घाटपांडे

यशोदेचा घनश्याम's picture

29 Oct 2007 - 7:05 pm | यशोदेचा घनश्याम

----अशा गोष्टी बाहेर काढण्यात (?) प्रसार माध्यमे आणि तहलका सारखे बॉम्बर ह्यांनी आपली विश्वासार्हता कधीच गमाविली आहे .

देवदत्त यांच्याशी पूर्णपणे सहमत. व्रुत्तपत्रे आणि न्युज चॅनेल यांनी आपली विश्वासार्हता गमावणे म्हणजे, कुंपणानेच शेत खाण्यासारखे आहे.