साहित्यः
२-३ गाजर सालं काढून, उभे तुकडे केलेले
३-४ हिरव्या मिरच्या चिरुन घ्याव्यात (मिरच्यांचे प्रमाण,गाजर किती घ्याल त्याप्रमाणे वाढवावे किंवा आवडीप्रमाणे कमी-जास्त)
२ टेस्पून लिंबाचा रस
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१-१/४ टीस्पून मेथीदाणे वाटून पूड केलेली
१-१/४ टीस्पून मोहरीची डाळ
मीठ चवीप्रमाणे
तेल
पाकृ:
गाजर आणी मिरच्यांच्या तुकड्यांना मीठ, हळद, लाल तिखट,लिंबाचा रस,मेथीदाणेपूड व मोहरीची डाळ एकत्र करुन चोळून घ्यावे.
स्वच्छ, कोरड्या बर्णीत हे मिश्रण एक - दोन दिवस बंद करुन ठेवावे.
साधारण लोणचे पूर्ण बुडेल इतके तेल घ्यावे (मी पाव वाटी तेल वापरले) व ते गरम करावे.
गरम केलेले तेल पूर्ण गार झाले की मिश्रणात ओतावे.
३-४ दिवस मुरु द्यावे. अधून्-मधून चमच्याने लोणचे हलवावे.
हे लोणचे तुम्ही पराठा, खिचडी, वरण-भात, थालीपीठाबरोबर खाऊ शकता.
नोटः
मी कमी प्रमाणात हे लोणचे तयार केले आहे.
आवडीप्रमाणे मिरच्या, लाल तिखटाचे प्रमाण वाढवू शकता.
२-३ महिने सहज टिकतं हे लोणचं.
प्रतिक्रिया
21 Dec 2012 - 10:52 pm | रेवती
अरे वा! तोंपासू फोटू आला आहे अगदी. कृतीही सोपी आहे.
23 Dec 2012 - 12:55 pm | सस्नेह
एकदम झटपट अन चटपटीत !
पूर्वी कधीतरी खाल्ल्याचे आठवते..
21 Dec 2012 - 10:58 pm | आनन्दिता
एकदम भन्नाट !! तोंपासु,,
21 Dec 2012 - 11:36 pm | पैसा
काय देखणं झालंय लोणचं!!
21 Dec 2012 - 11:58 pm | गणपा
स्स्स्ल्ल्ल्प्प्प....
22 Dec 2012 - 12:07 am | कवितानागेश
यम्मी!
मिक्स भाज्यांचेपण असेच करायचे का?
22 Dec 2012 - 1:42 am | दीपा माने
सानिका, पाकृ योग्य मोसमात मिळाली कारण आता अमेरिकेच्या नॉर्थइस्टच्या हिवाळ्यात सुर्यदेव मंदस्मित करु लागलेत त्यामुळे इतर लोणच्यांच्या पाकृंप्रमाणे दररोज लोणचं घातलेली बरणी दिवसा सुर्यप्रकाशात ठेवून संध्याकाळी घरात आणायची ही खटपट वाचली. मी तुमच्या पाकृ आवडीने वाचत असते. धन्यवाद.
22 Dec 2012 - 10:40 am | अनन्न्या
झालय एकदम मस्त!
22 Dec 2012 - 11:49 am | दीविरा
छानच दिसत आहे.करुन पाहिन.
22 Dec 2012 - 12:00 pm | अक्षया
वा!! मस्तच नेहमीप्रमाणे :)
22 Dec 2012 - 4:16 pm | ज्योति प्रकाश
आजच करुन पाहते.गाजरे आणलेली आहेतच्.फोटो बघुन तों.पा.सु.
22 Dec 2012 - 4:17 pm | खादाड
तोंडात पूर आला !!! ;)
22 Dec 2012 - 5:01 pm | प्यारे१
खूपच छान!
22 Dec 2012 - 5:05 pm | दिपक.कुवेत
मस्त दिसतय लोणचं..हे बाहेर ठेवलं तरि चालेल का फ्रिजमधेच ठेवावं लागेल?
22 Dec 2012 - 6:03 pm | सानिकास्वप्निल
हे लोणचं बाहेर ठेवलं तर सहज टिकतं.
23 Dec 2012 - 1:23 pm | पिंगू
हे लोणचं किमान दहा दिवस मुरवुनच खायला हवे.. तांदळाची कडक भाकरी आणि हे लोणचे कसलं जबरी लागतं..
मी ह्यात ओल्या हळदीचे तुकडेपण टाकतो..
- पिंगू
23 Dec 2012 - 4:32 pm | पियुशा
लप्लप्लप्लप्लप्लप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प :)
23 Dec 2012 - 6:51 pm | Mrunalini
सहीच एकदम.... पण मला इथे मोहरीची डाळ काय मिळत नाही. कधी मिळाली तर नक्की करुन बघेल. :)
25 Dec 2012 - 4:25 pm | रुमानी
मस्तच....!
एकदम फक्कड दिसतय लोणचं(फोटुत)
23 Jan 2013 - 6:35 pm | समंजस
गाजराचं आणि मिरचीचं लोणचं अतिशय आवडणारं (कैरी पेक्षाही)
आणि इथे तर दोन्हीही सोबतच :)
धन्यवाद.
24 Jan 2013 - 6:11 am | निखिल - प्राजक्ता
मोहरीची डाळ कडवट लागते. :( :(
24 Jan 2013 - 8:44 am | स्पंदना
मोहरीची डाळ तर खुप सार्या लोणच्यात वापरतात. नाही लागत कडवट, उलट एक प्रकारच सळसळत टेक्स्चर येते लोणच्याला. मला तर आवडते मोहरीची डाळ लोणच्यात.
25 Jan 2013 - 9:52 pm | सानिकास्वप्निल
हेच म्हणते.
24 Jan 2013 - 9:14 am | मुक्त विहारि
तुमच्या पोस्टस वाचत नाही...
25 Jan 2013 - 8:34 pm | मदनबाण
आहाहा... :)
तोंपासु... तोंपासु... तोंपासु ! :)