असे का?

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
21 Dec 2012 - 6:20 pm
गाभा: 

"तुला हा रोजचा अनुभव असेल"?
???
"तरी सुद्धा तपासुन पहा".
????
तुला एक मुलगा मला पण एकुलता.
?????
"अगदी स्वतः च्या घरातुन सुरु कर".
?????
"मी म्हणतो ते पटते का बघ".
काय पटायला पाहीजे? काय तपासु?
"मी अगदी जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घेतली. कधी मारले नाही. ओरडले नाही. अगदी जास्त हट्ट केल्यावर थोडेसे डोळे वटारणे ह्या वरच थांबलो. एवरीथींग बाय बुक. तरी सुद्धा असे का हे कळत नाही.
नेमके काय कळत नाही?
"नाही म्हणजे नाते संबंधात मुलाचा ओढा आईकडे जास्त असतो आणि मुलीचा बापाकडे. असे का? तुझा काय अनुभव?
दहा च्या पट्टीवर तुझ्या आणि तुझ्या मुलाच्या संबंधाला मार्क किती? आणि आईला किती"?
मला ६/१०. बायकोला ९/१०.
"माझ्याकडे ५/१० आणि बायकोला ९/१०. हे सगळीकडे असेच असते का? त्याला नेमके कारण काय? ह्या नियमाला अपवाद फारच कमी का असतात.टक्केवारीमधे हे प्रमाण काय"?
दहा मधे आठ घरात हाच सीन असतो.
"पण असे का"?
नेमके कारण मला माहीत नाही.मला सहा मधे आनंद आहे. तु पाच मधे आनंदी रहा.

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

21 Dec 2012 - 6:26 pm | किसन शिंदे

प्रभू मास्तर, क्लासमधला सीन का हा?

:)

नेमके कारण मला माहीत नाही.मला सहा मधे आनंद आहे. तु पाच मधे आनंदी रहा.

असेच म्हणतो.

शुचि's picture

21 Dec 2012 - 7:30 pm | शुचि

क्ररच असे का? :ऑ

त्रिवेणी's picture

21 Dec 2012 - 8:39 pm | त्रिवेणी

असे असेल का
वडिलांना असे वाटते की मुलगी नंतर दुसर्‍याच्या घरी जाणार त्यामुळे त्यांचा ओढा मुलीकंडे जास्तच असतो

मुलगी नंतर दुसर्‍याच्या घरी जाणार त्यामुळे त्यांचा ओढा मुलीकंडे जास्तच असतो

मग आईला तसे वाटत नसेल का?

त्रिवेणी's picture

21 Dec 2012 - 8:54 pm | त्रिवेणी

नाही नाही मला तसे नव्हते म्हणायचे. नऊ महीने तीनेच तर सांभाळले असते मुलांना पोटात.

अप्पा जोगळेकर's picture

21 Dec 2012 - 8:57 pm | अप्पा जोगळेकर

फ्रॉईडने यावर बरीच उत्तरे शोधली आहेत. पैकी काही खोटी ठरली बहुधा. इडिपस कॉम्प्लेक्स वगैरेचा संबंध याच्याशी असावा.

आबा's picture

21 Dec 2012 - 9:17 pm | आबा

ओडिपस कॉम्प्लेक्स सुद्धा बराच क्रिटिसाईझ झालाय.

मी सध्या अच्युत गोडबोले यांचे मनात हे पुस्तक वाचते आहे. त्यात फ्राइड व इतर मानसशास्त्रांनाच्या कार्याची त्यांच्या संशोधनांची खूप छान माहिती दिली आहे.

आबा's picture

21 Dec 2012 - 9:23 pm | आबा

आई आणि वडिलांकडे मुलाचा समसमान ओढा कसा निर्माण करावा, यावर कोणत्या जाणकारांनी मतं व्यक्त केलियेत (आणि कोणत्या पुस्तकात) ?!

५० फक्त's picture

21 Dec 2012 - 10:49 pm | ५० फक्त

a man will alwayas hate a man, its in the genes.

तुषार काळभोर's picture

22 Dec 2012 - 7:19 am | तुषार काळभोर

वुमेन?

इनिगोय's picture

22 Dec 2012 - 7:46 pm | इनिगोय

सेम.. ;)

कवितानागेश's picture

22 Dec 2012 - 12:10 am | कवितानागेश

हे प्रमाण नेहमीच म्हणजे सगळ्या वयात असंच असते का? की ३५-४० नंतर हे १०पैकी मार्क उलटसुलट होतात?

पिवळा डांबिस's picture

22 Dec 2012 - 12:26 am | पिवळा डांबिस

असू देत तिला ९/१०. पण एक लक्षात घ्या,
युवर सन इज युवर सन टिल ही गेट्स हिज वाईफ,
युवर डॉटर इज युवर डॉटर फॉर द रेस्ट ऑफ युवर लाईफ!!!!
:)

किसन शिंदे's picture

22 Dec 2012 - 8:23 am | किसन शिंदे

युवर सन इज युवर सन टिल ही गेट्स हिज वाईफ,
युवर डॉटर इज युवर डॉटर फॉर द रेस्ट ऑफ युवर लाईफ!!!!

तंतोतंत सहमत!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Dec 2012 - 2:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तुम्ही दोघे स्वतःवरून सांगता आहात का हे ?

कौशी's picture

22 Dec 2012 - 6:42 am | कौशी

पिडां काकांशी सहमत..

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Dec 2012 - 9:47 am | ज्ञानोबाचे पैजार

मला ६/१०. बायकोला ९/१० असे वाटणे
किंवा
युवर सन इज युवर सन टिल ही गेट्स हिज वाईफ,
युवर डॉटर इज युवर डॉटर फॉर द रेस्ट ऑफ युवर लाईफ

असे वाटणे म्हणजे काही व्यक्तीसापेक्ष अनुभवांचे अतिरंजीत जनरलायझेशन करणे.

एकांगी विचार करुन काढलेले भडक निश्कर्ष नेहमीच लोकप्रिय ठरतात.

आणि त्यातुन आपल्याला हवे ते अर्थ काढुन सामाधान मानण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

पैजारबुवा,

अनिल मोरे's picture

22 Dec 2012 - 10:56 am | अनिल मोरे

सहमत

परिकथेतील राजकुमार's picture

22 Dec 2012 - 10:21 am | परिकथेतील राजकुमार

:)

तिमा's picture

22 Dec 2012 - 11:29 am | तिमा

माझ्या अनुभवावरुन सांगायचे तर ,बाप म्हणून मी मुलीला जेवढा वेळ दिला तेवढा मुलाला देऊ शकलो नाही. (लांबच्या नोकरीमुळे), सहाजिकच मुलाचा ओढा आईकडे जास्त असणारच, कारण तिनेच त्याचे जास्त केलेले असते. तसेच तुम्ही मुलांशी किती प्रेमाने वागता त्यावर बरेच अवलंबून असते. मुलाला मार मिळतो तो बापाकडूनच जास्त असतो. तेही एक कारण असू शकते.
आमचा स्कोअर तर २/१० आणि ६/१० आहे.

चिर्कुट's picture

22 Dec 2012 - 1:30 pm | चिर्कुट

जनरलायझेशन होतंय असं वाटतय..

माझा स्कोर माझ्या आई-वडिलांसाठी ७/१० आणि ९/१० असा अनुक्रमे होता (आई होती तोपर्यंत. त्यानंतर २०/१० पप्पा.) कारण पप्पांनी आमच्यावर प्रचंड लक्ष ठेवलं होतं. दिवसातला जास्तीत जास्त वेळ त्यांच्याबरोबरच जायचा.

याचा अर्थ असाही नाही की त्यांनी फार मोकळीक दिली होती किंवा आमचे जास्त लाड करत. उलट बराच मार सुद्धा खाल्लेला आहे. पण तो मार देतानाही त्यामागची प्रेरणा आम्ही अगदी लहान असतानाही व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत असल्याने कधी कडवटपणा आला नाही.

हीच स्थिती अजूनही काही मित्रांची असलेली पाहिली आहे. (एक इंजिनिअरिंगचा मित्र तर चक्क त्याच्या इंजिनिअर वडलांबरोबर एकाच टेबलवर बसून घेतो. :))

समयांत's picture

22 Dec 2012 - 1:34 pm | समयांत

हे काय आहे बरं काहीच कळत नाहीए, स्कोअर अँड ऑल..:(

यसवायजी's picture

22 Dec 2012 - 1:54 pm | यसवायजी

असल काही जमत नाही ब्वॉ आपल्याला..
एकतर प्रेम आहे, किंवा नाही. बस्स..
प्रेम केल तर जीवापाड.. नाहीतर 'नाही'.
प्रेमाला अस मोजता येतच नाही.
आऊट ऑफ टेन मार्क द्या. :D
तुमच आई-वडिलांवरच प्रेम किती 'किलो' सांगा. :D

अनन्न्या's picture

22 Dec 2012 - 4:26 pm | अनन्न्या

बाकी प्रेम मोजमापात सांगणे कठिण आहे.

बाबा पाटील's picture

22 Dec 2012 - 7:50 pm | बाबा पाटील

आई आणी बाप दोघेही त्यांच्या पिल्लांवर सारखेच प्रेम करतात फक्त बाप डोळस प्रेम करतो आणी माय आंधळ प्रेम करते.....

पैसा's picture

23 Dec 2012 - 8:32 am | पैसा

हे मार्क्स कसे मोजलेत याबद्दल प्रचंड कुतुहल आहे!

सुहास..'s picture

23 Dec 2012 - 9:51 am | सुहास..

वेलकम बॅक मास्तर !

इन्दुसुता's picture

23 Dec 2012 - 9:11 pm | इन्दुसुता

असेच म्हणते .. फक्त जरासा बदल करून ... 'मास्तर इज ब्याक .. अ‍ॅन्ड हाऊ' :)

रच्याकने, मास्तर यात क्रिप्टीक काय ते कळेना... :)