साहित्यः
१. शीजवलेला मोकळा भात - २ वाटया
२. पांढरे तीळ - २ मोठे चमचे (हलकेसे सोनेरी परतुन घेणे)
३. चींचेचा कोळ - १/२ वाटि
४. कडिपत्ता - ४ ते ५ पानं
५. साधं लाल तिखट - १ चमचा
६. हळद - १/२ चमचा
७. आलं / लसुण पेस्ट - १ चमचा
८. चवीनुसार मीठ
९. तेल - १ पळि
१०. डिप फ्राय केलेले कांदे - २ (थोडा सजावटिसाठि बाजुला ठेवावा)
११. कोथिंबीर
कृती:
१. प्रथम भात मोकळा शीजवुन घ्यावा (फ्राईड राइस ला घेतो तसा) किंवा शीळा भात उरला असेल तर तो घ्यावा
२. मध्यम आचेवर एका कढईत १ पळि तेल टाकुन कडिपत्ता आणि आलं / लसुण पेस्ट टाकावी
३. पेस्ट चांगली परतली कि हळद / तिखट टाकावे
४. नंतर त्यात चींचेचा कोळ टाकावा
५. १ ते २ मी. परतुन शीजवलेला भात टाकावा व हलक्या हाताने मिसळावे
६. आता परतलेले तीळ, डिप फ्राय केलेले कांदे, चवीनुसार मीठ, बारिक चीरलेली कोथिंबीर टाकुन अलगद परतावे व ५ मी. गॅस बंद करावा
७. सर्व करतेवेळी वरुन तळलेला कांदा / कोथिंबीर घालुन आवडत्या लोणच्या / पापडा सोबत खायला द्यावे
टिपा:
१. चींचेच्या आंबटपणानुसार कोळाचे प्रमाण ठरवावे अन्यथा भाताची नुसती आंबट चव लागेल
चला तर मग...करा आणि कळवा! शुभेच्छा!
प्रतिक्रिया
18 Dec 2012 - 2:02 pm | ह भ प
श्ळर्रप..
तोंडाला पाणी सुटलं..
कधी येउ कुवेतला?
18 Dec 2012 - 2:07 pm | गणपा
छान दिसतेय डिश.
18 Dec 2012 - 2:10 pm | ५० फक्त
त्रासदायक मिपाकरांच्या लिस्टात स्थान मिळवताय लवकरच, शुभेच्छा.
18 Dec 2012 - 3:03 pm | दिपक.कुवेत
माफी असावी...परत असली चुक होणार नाही ह्याची खबरदारी नक्किच घेइन
18 Dec 2012 - 3:47 pm | ५० फक्त
अरे व्यनितुन लिहिलं आहेच इथं पण लिहितो, त्रासदायक म्हणजे, मा. गणपा, मृणालिनी, सानिका, स्वाती दिनेश वगैरे करणे आणि सजवणे पेश्शल मिपाकर.
18 Dec 2012 - 6:14 pm | पैसा
मस्त प्रकार आहे आणि सोप्पा. रात्रीच्या मिनिजेवणाला तर एकदम फिट्ट!
18 Dec 2012 - 9:59 pm | जयवी
ओ माय गॉड...........कसलं पाणी सुटलंय तोंडाला...........दीपक.......अरे घरी तरी बोलाव जेवायला ;)
19 Dec 2012 - 11:36 am | दिपक.कुवेत
अगदि कधिहि हक्काने ये....मस्त बेत करु