बढतीमधले आरक्षण: राजकारण .. देशहित वगैरे

शैलेंद्रसिंह's picture
शैलेंद्रसिंह in काथ्याकूट
17 Dec 2012 - 6:15 am
गाभा: 

सरकारी नोकऱ्यांमधील बढतीमधे आरक्षण लागू व्हावे ह्यासाठी घटनादुरुस्तीचा प्रस्ताव संसदेत येणार आहे. शिवसेना आणि समाजवादी पक्ष ह्यांचा अपवाद वगळता प्रत्येक पक्षाने ह्याला पाठींबा जाहीर केलाय.
शिवसेनेचा जातीय आरक्षणालाच विरोध असल्याने त्यांचा विरोध समजण्यासारखा आहे, पण सपाचा विरोध ह्याकरता असावा की ओबीसीं आरक्षणाचा त्यात समावेश नाही. हे आरक्षण फ़क्त SC/ST गटालाच आहे.

ह्या विधेयकाने मायावतींचा सपोर्ट युपीएला पुढील दिड वर्ष मिळत राहिल आणि सरकार तरेल असं एक राजकारण त्यामागे असावं कारण मायावतीं ह्याचा प्रचार आधीपासुन करत आहेत. मायावतींचा राजकिय बेसही ह्यामुळे अधिक मजबुत होईल. कदाचित दलितांच्या राष्ट्रीय नेत्या म्हणुन त्या आता अधिक मोठ्या होतील. बाकीच्या राजकिय पक्षांनाही ह्याला विरोध करता येणार नाही..कारण ते निवडणुकीचे राजकारण करतात. अर्थातच शिवसेना ही अपवाद आहे (ह्याबद्दल मी "legacy of bal thackeray" म्हणुन लेख लिहिला होता).

राजकारणाच्या दृष्टीने हा मायावतींचा निश्चितच विजय आहे. पण अनेक लोकांनी (अराजकिय) ह्याचा निषेध केला आहे. कारण नोकरीभरतीत एकदा आरक्षणाचा फ़ायदा झाल्यावर नोकरीतील सेवाजेष्ठता, कार्यक्षमता आणि वरचा रोल करायची क्षमता ह्यावरुनच बढती मिळावी हे लॉजिकल आहे.

पण SC/ST संस्थांचा हा दावा आहे की नोकरीत भरती झाल्यावर पुढे बढती मिळत नाही कारण SC/ST असल्याने त्यांचा द्वेष केला जातो..त्यांच्याविरुद्ध prejudices असतात. सरकारी जावई म्हणुन त्यांना टोमणे मारले जातात. आणि पुढील बढतींसाठी त्यांचा विचारच होत नाही. उच्च पदांवर दलित नसल्याने सामाजिक न्यायाचे कार्यक्रम राबवले जात नाहीत.
नेटवर एक आकडेवारी काही दिवसांपासुन फिरतेय त्यानुसार केंद्र सरकारमधे ८०% पेक्षा जास्त उच्चपदस्थ अधिकारी हे ब्राह्मण समाजाचे आहे. ती आकडेवारी खरी की खोटी हे सांगता येत नाही पण एका ब्लॉगवर backward class commission च्या हवाल्याने असं म्हटलं आहे की टोटल ब्युरोक्रसीमधे ३७% ब्राह्मण आहेत. http://escapefromindia.wordpress.com/indias-brahmin-rule-data/

संविधानाचा अभ्यास असलेले लोकं म्हणतात की ही घटनादुरुस्ती घटनेच्या बेसिक फ़्रेमवर्कविरोधी आहे. Right to Equality चा भंग त्यामुळे होतो आणि सुप्रीम कोर्ट ह्या घटनादुरुस्तीला केराची टोपली दाखवु शकते.

माझं मत ह्यावर असं आहे की नोकरीत असलेल्या मंडळींचा विचार करण्यापेक्षा नोकरीत नसलेल्या लोकांचा विचार करणे हे दलित संघटना आणि राजकिय पक्षांसाठी जास्त महत्वाचं आहे. घटनादुरुस्तीत आपली सगळी उर्जा आणि प्रतिष्ठा पणाला लावायची होती तर कुठला मोठा विषय हाती घ्यायला हवा होता. घटनादुरुस्तीसाठी संसदेत एकुण २/३ सदस्यांचा पाठींबा लागतो. मायावतींनी वेळ योग्य शोधलीय, पण विषय खुपच निरर्थक आहे.

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Dec 2012 - 8:45 am | श्री गावसेना प्रमुख

पात्रता नसतांना फक्त जातीच्या नावावर पुढे जातात हे फक्त भारतातच होउ शकते,क्रिमीलेयर ची मर्यादा अजुन वाढवुन आणी आरक्षणाने सर्वसामान्य जनांचे मुले ह्याबाबतीत मागेच राहतात्,वडीलांचा पगार महीन्याला २५०००/३५००० हजार आणी मुलगा कॅटेगरीतुन गर्व्हमेंट कॉलेज आणी हॉस्टेल दोघांचे फायदे उपटतोय असे कसे चालायचे.बिगर आरक्षण वाल्यांनी काय करायचे.
बहुजन किंवा मराठा हे फक्त फक्त नावालाच मराठा किंवा बहुजन उरलेत आता ,महीला ३३% ओ बी सी किंवा तत्सम कॅटेगरी वाले ५०% धरणग्रस्त रिटायर्ड प्रकल्पग्रस्त २% उरलेले १५% मध्ये उरलेले ६० किंवा ७०% लोक ह्याने काय होनार आहे.मग जातीयता होणार नाही मग काय होइल्,आता फक्त उरावरच बसवायच राहीलेय

शैलेंद्रसिंह's picture

17 Dec 2012 - 11:26 am | शैलेंद्रसिंह

प्रमोशनसाठी आरक्षण देण्यात खरोखरच काहीही सेन्स वाटत नाही. नोकरशाही ही धोरणं ठरवत नसते. धोरण ठरवणारे राज्यकर्तेच असतात. दलित संघटनांच्या दाव्यानुसार नोकरशाही समाज रचना आणि सामाजिक न्यायाच्या कल्पना राबवेल म्हणजे नक्की काय करेल हे स्पष्ट होत नाही. बढती घेऊन वर गेलेले दलित समाजाचे अधिकारी जात-पात बघुन सामाजिक कामं करतील का?

माझ्यामते तरी हा सवंग लोकप्रियता मिळवायचा प्रकार आहे. दलित समाजालाही ह्याचा काहीएक उपयोग होणार नाहिये. मायावतींनी आणि युपीए सरकारने दलितांना रोजगार मिळेल ह्यासाठी काही घटनादुरुस्ती आणली असती तर ते निश्चितच स्वागतार्ह होते. पण ह्या प्रकाराने हे स्पष्ट होतेय की दलितांमधे जो क्रिमी लेयर बनला आहे, तो स्वत:च्या हितसंबधांचं रक्षण करायला दलितांची राजकिय शक्ती वाया घालवतोय. समाजाची एव्हढी काळजी असेल तर ह्या क्रिमी लेयरने स्वत:हुन आरक्षण नाकारावं आणि खरोखर गरजु दलित तरुणांना शिक्षण-नोकरीचा लाभ मिळु द्यावा.

बॅटमॅन's picture

17 Dec 2012 - 11:30 am | बॅटमॅन

बाडीस. बढतीमध्ये आरक्षण म्हणजे मूर्खपणाची हद्द आहे.

ऋषिकेश's picture

17 Dec 2012 - 12:05 pm | ऋषिकेश

१.

सरकारी नोकऱ्यांमधील बढतीमधे आरक्षण लागू व्हावे ह्यासाठी घटनादुरुस्तीचा प्रस्ताव संसदेत येणार आहे

हे घटनादुरूस्ती विधेयक असे आरक्षण यावे यासाठी नाही तर असे आरक्षण जर एखाद्या राज्याला किंवा केन्द्र सरकारला आणायचे असेल तर तसे करण्यापासून रोखणारे कलम बदलण्यासाठी आहे. या बदलानंतर असे आरक्षण प्रत्येक राज्यावर / केंद्रावर अनिवार्य नसेल.

२. बढतीमध्ये आरक्षण ही काही नवी गोष्ट नाही. स्वातंत्र्यानंतरच्या सुरवातीच्या वर्षांत ते होते. नंतर कोर्टाच्या निर्णयानंतर ते थांबवावे लागले होते कारण घटनेतील 'शब्द' त्याच्या मध्ये येत होते. कोर्टानेही हे मान्य केले होते की अश्या आरक्षणाची गरज आहे मात्र ते कोणाला द्यावे त्याचा निश्चित विदा हवा.. आताची दुरूस्ती असे आरक्षण देण्यामधील अडसर दूर करणार आहे इतकेच.

३. संसदीय लोकशाहीत राजकीय पक्षांनी 'मतांचे राजकारण' करण्यात चुकीचे ते काय?

शैलेंद्रसिंह's picture

17 Dec 2012 - 12:18 pm | शैलेंद्रसिंह

संसदीय लोकशाहीत मतांचे राजकारण करण्यात गैर निश्चितच नाही, पण ते जर राष्ट्रहिताच्या आड येत असेल तर मात्र नक्कीच विचार करायला हवा.

ऋषिकेश's picture

17 Dec 2012 - 1:29 pm | ऋषिकेश

राष्ट्रहित कशात आहे हे कोण ठरवणार?

संसदीय लोकशाहीत ते कोणी 'एक' ठरवत नसतो. 'बहुमत' ठरवत असते. जर बहुमताच्या प्रतिनिधिंना अश्या आरक्षणात राष्ट्रहीत आहे असे वाटत असेल तर असे विधेयक मंजूर होणे योग्य ठरावे.
तुम्ही 'एक' नागरीक म्हणून तुमचे मत देऊ शकताच पण ते राष्ट्रहिताचे आहे असे समजण्याचे काहीच कारण नाही.

चेतन's picture

17 Dec 2012 - 2:04 pm | चेतन

असहमत

संसदीय लोकशाहीत जर बहुमतात असलेला पक्ष जे म्हणेल ते राष्ट्रहीताचेच असेही काही समजण्याचे कारण नाही.

तुम्ही 'एक' नागरीक म्हणून तुमचे मत देऊ शकताच पण तेच राष्ट्रहिताचे आहे असे खुशाल समजावे. समजण्याने काहीही फरक पडत नाही आणि ते तुमचे मत आहे हे महत्वाचे.

असो.

अवांतरः बहुमतात असल्याने शहाबनो प्रकरणात कायदा बदलणे राष्ट्रहिताचे होते काय...?

संसदीय लोकशाहीत जर बहुमतात असलेला पक्ष जे म्हणेल ते राष्ट्रहीताचे असेही काही समजण्याचे कारण नाही.

सहमत आहे.

तुम्ही 'एक' नागरीक म्हणून तुमचे मत देऊ शकताच पण तेच राष्ट्रहिताचे आहे असे खुशाल समजावे. समजण्याने काहीही फरक पडत नाही आणि ते तुमचे मत आहे हे महत्वाचे.

कळले नाही ते राष्ट्रहिताचे आहे हे कसे? त्याव्यतिरिक्त राष्ट्रहिताचे काहिच असु शकत नाही?

अवांतरः बहुमतात असल्याने शहाबनो प्रकरणात कायदा बदलणे राष्ट्रहिताचे होते काय...?

तत्कालीन बहुमताला राष्ट्रहीताचे जे वाटले ते बदल त्यांनी केले. अन् माझे मत अल्पमतात होते.

शैलेंद्रसिंह's picture

18 Dec 2012 - 11:56 am | शैलेंद्रसिंह

कुठलीही राज्यव्यवस्था ही लोकांसाठी असते. लोकशाहीची झुंडशाही व्हायला लागली तर त्या व्यवस्थेवरला विश्वास कोणाचाही उडेल. संसदिय लोकशाहीला प्रमाण मानुन चालता येईलही..पण हि संसदिय लोकशाही तुमच्या मुलभुत अधिकारांचे संरक्षण करतेय का?
बढतीच्या आरक्षणाचं राजकारण जे करत आहेत किंवा मतांच्या राजकारणामुळे त्याला विरोध करायला जे कचरत आहेत त्यांनी आकडेवारीने हे स्पष्ट करावं की ह्या देशात आरक्षणाचे मागास समाजांचे कितपत भलं झालं? येत्या जगात नोकऱ्या खाजगी क्षेत्रात असणार आहेत की सरकारी क्षेत्रात? आधीच सरकारी क्षेत्रातील मनुष्यबळ हे प्रोफ़ेशनल नाहीये.
करदात्यांकडुन आपण कर वसुल करतो आणि त्यामोबदल्यात सुरक्षा, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यव्यवस्था, न्यायव्यवस्था ह्या सुविधा पुरवतो हे सरकार विसरली काय? आम्हाला आम्ही भरलेल्या कराचा योग्य विनिमय होतो की नाही हे ठरवायचा हक्कच नाही कारण आम्ही एका झुंडशाहीत अडकलेलो आहोत.
संसदिय लोकशाही व्यवस्थेचं पुढे प्रतिनिधींच्या हितसंबंधांच राजकारण एव्हढचं स्वरुप उरतं आणि आपण ते पाहतोच आहोत. मतदान कंपल्सरी करा आणि एका दिवसाच्या ऐवजी एका महिन्यात कधीही मतदान करायची मुभा द्या. मग व्होट बॅकेंच्या राजकारणात कोण टिकतं ते कळेल. अल्पसंख्यांकांच्या (धार्मिक, भाषिक, जातीय) झुंडीचे राजकारण संसदिय लोकशाहीत अपेक्षित आहे का?

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Dec 2012 - 10:16 am | श्री गावसेना प्रमुख

मतदान कंपल्सरी करा आणि एका दिवसाच्या ऐवजी एका महिन्यात कधीही मतदान करायची मुभा द्या.

असाच इतका खर्च होतो तर महीनाभर चालणार्‍या निवडणुकांनी आपला गरीब देश राहील का?असेही सरतेशेवटी गट्ठा मतदान केले जाते,ज्यांना मतदानच करायचे नाही त्यांना घरी जरी सोय करुन दिली तरी ते मतदान करनार नाहीत,त्यापेक्षा मतदानाची स्लिप दाखवुनच कुठलेही अनुदान द्यावे बघा कसा वठनीवर येत नाही तो गरीब्,असही नोकरदार मतदानच करीत नाही तो मतदानाचा दिवस हा सुट्टी समजुन एन्जॉय करतो.
आणी मतदान कंपल्सरी कधी होनारच नाही ते आपले धर्म निरपेक्ष पार्ट्या होवु देतील काय?

पुण्याचे वटवाघूळ's picture

17 Dec 2012 - 1:33 pm | पुण्याचे वटवाघूळ

एकूणच कुठल्याही आरक्षणाच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी दिसते तोच प्रकार इथेही बघायला मिळत आहे.

१. एका कोणत्या समाजगटाला आरक्षण मिळाले की तो समाजगट इतर कोणत्याही समाजगटाला आपल्यातला वाटा द्यायला तयार नसतो.राजस्थानात गुज्जरांना ओ.बी.सी चा दर्जा आणि आरक्षण हवे होते पण ओबीसी दर्जा असलेल्या इतर जातींचे नेते आपला वाटा गुज्जरांना द्यायला तयार नव्हते.
२. आरक्षणात आरक्षणही मान्य होत नाही.म्हणजे स्त्रियांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये आरक्षण हवे पण त्यात परत जातीनिहाय आरक्षण मागायला गेले की उच्चवर्णीय स्त्रिया त्याला विरोध करतात!! एकूणच काय की आम्हाला सवलती हव्यात पण आम्ही आमचा वाटा इतरांना देणार नाही अशी प्रवृत्ती असते.
३. सगळ्यात वाईट म्हणजे आरक्षणाला विरोध केला की असा विरोध करणारे लोक त्या समाजघटकाच्या विरोधात आहेत असा प्रचार करणे अगदी सोपे असते.म्हणजे जातीनिहाय आरक्षणाला विरोध म्हणजे दलित्/ओबीसी विरोध, स्त्री आरक्षणाला विरोध म्हणजे स्त्री-विरोधी इत्यादी.
४. अनेकदा स्त्री आरक्षणाचे समर्थन करत असलेल्या उच्चवर्णीय स्त्रिया (किंवा पुरूषही) ज्या मुद्द्यांवर त्या आरक्षणाचे समर्थन करतात तेच मुद्दे जर जातीनिहाय आरक्षणाचे समर्थन करत असलेल्यांनी मांडले तरी जातीनिहाय आरक्षणाचा विरोध केला जातो.
५. म्हणजेच अनेकदा असे आरक्षण स्वतःच्या स्वार्थासाठी पाहिजे असते एकूणच समाजात समता यावी यासाठी अशी मागणी केलेली नसते.
६. अनेकदा आपल्या अपयशाचे कारण म्हणून जात्/समुदाय/लिंग इत्यादीचा वापर केला जातो. म्हणजे शिक्षणात आरक्षण असेल तर परत नोकरीत कशाला हा प्रश्न विचारला की असे म्हणणार की मी अमुक जातीचा/लिंगाचा(ची) म्हणून मला चांगली नोकरी मिळणार नाही.नोकरीत आरक्षण दिले मग परत बढतीत आरक्षण कशाला हा प्रश्न विचारला की म्हणणार की मी अमुक जातीचा/लिंगाचा(ची) म्हणून मला बढती मिळणार नाही. हा प्रकार नेव्हर एंडिंग आहे.

कोणत्याही मुद्द्यावरून आरक्षणाची मागणी होते तेव्हा हे समान मुद्दे दिसतात.

बर्‍याच मुद्दांशी सहमत.

कोणत्याही मुद्द्यावरून आरक्षणाची मागणी होते तेव्हा हे समान मुद्दे दिसतात.
येथे किंचीत असहमत.

अपंगांना आरक्षण, रिटायर सैनीकांना कींवा सैनिकांच्या मुलांना आरक्षण यामध्ये हे मुद्दे येत नाहीत.

चेतन

परिकथेतील राजकुमार's picture

17 Dec 2012 - 2:57 pm | परिकथेतील राजकुमार

काही विशिष्ठ लेखकांसाठी मिपावरती देखील खरेतर आरक्षण असायला हवे. संपादकपदांमध्ये देखील आरक्षण असावे अशी आमची पूर्वीपासून मागणी आहेच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Dec 2012 - 4:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जाती पातीवरून नोकरी देणे, प्रवेश देणे किंवा बढती देणे हा प्रकार मुळातच बंद करुन टाकायला हवा. जाती-पातीच्या राजकारणाचा थेट कुठल्याही जाती-पातीला फायदा होत नाहीये.
आरक्षण द्यायचच असेल तर ते आर्थिक बाबी आणि गुणवत्ता पाहून देण्यात याव. ज्याच्यामधे बदलत्या परिस्थितीला सामोरे जायची लायकी असेल तो टिकेल, ज्याच्यात नाही तो मागे पडेल.
"Survival of fittest" हा सृष्टीचा नियम आहे.
जर का सरकार एकाला झुकत माप देऊन दुसर्‍याच्या तोंडातून घास हिराऊन घेणार असेल तर साधी सर्ल बाब आहे की ज्याचा घास हिरवला गेला तो झुकत माप दिलेल्याचा द्वेष करणाराच.
आता एक उदाहरण देतो.
अ ब आणि क तिघांच वार्षिक उत्पन्न आणि खर्च सारखे आहेत.
"अ" ओपन जातीचा आहे, त्याच वय १५ आहे. त्याला १० वी ला ७५% आहेत.
"ब" ओ.बि.सी. आणि "क" एस.सी./एस.टी. चा आहे, त्याच वय १७ आहे १० वी ला त्याला ७० टक्के आहेत. बहुतेक प्रवेश प्रक्रियांमधे "ब" आणि "क" गटाला मार्कांची आणि वयाची अट ५ नी शिथिल असते (तपशीलत थोडा फार फरक असु शकतो). ओ.बी.सी. ना निम्मी फी. तर, "क" गटाला अत्यंत माफक फी असते. म्हणजे वयाची आणि मार्कांची सूट मिळून त्यांना प्रथम प्रवेश आणि वरुन फी मधे सवलत मिळते. म्हणजे सरळ सरळ हा "अ" गटवर अन्याय नाही का? तुम्ही गुणवत्तेला महत्व द्या ना. एखादा "ब" किवा "क" गट वाला गुणी विद्यार्थी असेल तर त्याला प्रवेश द्यायला कोणाचाही विरोध नसेल. त्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तर त्याला फी मधुनही सवलत द्या. त्यालाही विरोध नाही कारण त्याच्यामधे गुणवत्ता आहे.

मी अभियांत्रिकीला असताना आमच्या इथे उदाहरण होत एकाच. आरक्षणातून प्रवेश मिळालेला त्याला. वडिलांची गावाला उसची शेती होती. वार्षिक उत्पन्न २५,००० किंवा ३४,००० दाखवून फी मधे सवलत मिळायची. हे साहेब त्याचा फायदा न करून घेता दिवसभर मस्ती करत बापाच्या पैशाचा धूर करत फिरायचे चार चाकीमधे. ३ वर्ष सेकन्ड ईयर ला काढून शेवटी सोडून दिल त्यानी. अश्या मस्तीखोर आणि उणाद पोराला काय उपयोग झाला आरक्षणाचा?
अजुन एक मुलगा होता, तो पण आरक्षण कोट्यमधुनच आला होता. आणि घरची परिस्थिती पण अतिशय नाजूक होती त्याच्या. पण अतिशय हुशार आणि सज्जन होता. त्याला पण फी मधून सवलत मिळाली. पण ह्या मुलानी ४ वर्ष अतिशय कष्ट काढून सुद्धा फस्ट आणि सेकंड क्लास कधी सोडला नाही. आज तो एका मोठ्या एम.एन.सी. मधे जबाबदार अधिकारी आहे. ह्या दुसर्या मुलाच्या केसमधे कोणालाही आरक्षणाबद्दल आक्षेप घ्यायच काहीही कारण नाहीए.

मी स्वता ओपन आहे. Lower middle class वाले सगळे प्रॉब्लेम फेस केलेत एके काळी माझ्या घरच्यांनी आणि मी. मला कधीही फी मधे सवलत किवा प्रवेशमधे सवलत मिळाली नाही. मग हा माझ्यावर म्हणा किवा माझायसारख्या अनेक लोकांवर झालेला अन्यायच नाही का?

माझा मुद्दा सरळ साधा आहे. गुणवत्तेवर आणि आर्थिक परिस्थितीवर आरक्षण हा नैसर्गिक न्याय आहे. उगाच पात्रता नसलेल्याना आरक्षण देण्यात काय अर्थ आहे?

असाच चालत राहील तर पुढची पिढी कुणाच्या बेजबाबदार हातामधे असेल ह्याचा विचार सर्वांनी करावा ही नम्र विनंती. कोणाचाही अथवा कोणाच्याही जाती-धर्माचा अपमान करायचा हेतू नाही. कोणी दुखावला गेला असेल तर त्यानी आपल दुक्ख स्वाताजवळच ठेवाव. इथे रडून जाहीर प्रदर्शन करू नये.

ऋषिकेश's picture

17 Dec 2012 - 4:40 pm | ऋषिकेश

उगाच पात्रता नसलेल्याना आरक्षण देण्यात काय अर्थ आहे?

अश्या मानसिकतेमुळेच आरक्षणाची अजूनही किती गरज आहे हे अधोरेखीत होते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Dec 2012 - 5:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तो ओपन वाला असु दे किवा आरक्शण वाला असु दे ज्याची पात्रता नाही त्याला अधिकार देण्यात काय अर्थ आहे? पात्रता नसताना फक्त आरक्श्ण आहे म्हणुन जागा देण्यात मला तरी काही शहाण पणा वाटत नाही. आता शेवटी ते प्रत्येकाच्या द्रुश्टिकोनावर अवलम्बुन आहे.
तुम्हि एका मट्ठ पण आरक्श्न आहे म्हणून डोक्तर झालेल्याकडून उपचार करून घ्याल का?

पात्रता सिद्ध करण्याची संधी म्हणजे आरक्षण...
(बाकी सरकारी मेडीकल कॉलेज मध्ये आरक्षीत कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी किती मार्क्स लागतात ते पहा...)

आजानुकर्ण's picture

17 Dec 2012 - 9:42 pm | आजानुकर्ण

तुम्हि एका मट्ठ पण आरक्श्न आहे म्हणून डोक्तर झालेल्याकडून उपचार करून घ्याल का?

हे वाक्य समजले नाही. आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या 'मठ्ठ' व्यक्तींचा डॉक्टर होण्यासाठीचा अभ्यासक्रम आणि 'ओपन' कॅटेगरीतून प्रवेश घेतलेल्या 'हुशार आणि पात्र' व्यक्तींचा अभ्यासक्रम हे वेगळे असतात की काय याबाबत मला पुरेशी कल्पना नाही. एखादी व्यक्ती मठ्ठ असल्यास ती डॉक्टर कशी काय होऊ शकते हे समजावून सांगितले तर बरे होईल? समजा मला काही आजार झाला आणि डॉक्टरकडे जावे लागले तर मी त्याचे जातप्रमाणपत्र मागून त्याने आरक्षणातून शिक्षण घेतलेले नाही हे पडताळून पाहावे काय?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Dec 2012 - 10:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी अभ्यासक्रम वेगळा आहे अस अजिबात म्हणलेलो नाही. किंवा आरक्शणामधुन वाईट लोक बाहेर पडत आहेत असाही म्हणलेलो नाहीए. मी एवढाच म्हणतोय की उमेदवार खुल्या वर्गातील असो किंवा आरक्षित वर्गातील असो, जो काय प्रवेश मिळायचा आहे तो संपूर्ण गुणवत्तेवर मिळावा. बढती बद्दल म्हणाल तर उमेदवाराची काम करायची पद्धत हा मुद्दा लावण्यात यावा. एखादा फक्त आरक्षित वर्गातील आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावर सोयी सुविधांचा वर्षाव करून त्यांची लढायची क्षमतच नष्ट करताय अस वाटत नाहीए का? आपण कष्ट नाही केले तरी आपल्याला प्रवेश म्हणा किवा फी माफी मिळेल अशी बटावणी करणारी कित्येक मंडळी पाहण्यात आहेत. ज्यांचा पायाच पक्का नाही त्यांच्याकडून तुम्ही योग्य दर्जाच्या कामाची अपेक्षा कशी करू शकता? आणि खास करून मेडिकल ऑर इंजिनिरींग सारखा पेशा जिथे एखादी चुक सुद्धा प्राण घातक ठरू शकते तिथे अश्या प्रकारच्या तडजोडी करण कितपत योग्य आहे? ह्या प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न करा मग मला काय म्हणायचे आहे हे तुमच्या लक्षात येईल.

तुम्ही जर खासगी क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की माहीत असेल, कोणीही तुमची जात-धर्म पाहत नाही. तुमच्या बॉस ला किवा कंपनीला फक्त तुम्ही देत असलेल्या आउटपुट शी मतलब असतो. आता काही कंपन्यांमधे जर का जात पात पाहून प्रमोशन मिळत असतील तर ते त्यांच नुकसान आहे. आणि त्याच प्रमाणही अतिशय कमी असेल. ही गोष्ट जास्त करून मद्रासी लोकांच्या बाबतीत घडते अस मझ निरीक्षण आहे. ते त्यांच्या लोकांना वर ओढून घेतात ही खरी गोष्ट आहे.

तुम्ही म्हणताय की मट्ठ लोक डॉक्टर होऊ शकत नाहीत? पैसा फेकला ना आपल्याकडे की आई-बाप पण विकत मिळतात, डिग्री काय चीज आहे?

@आबा साहेब,

आरक्षण ही पात्रता सिद्ध करायची संधी नाही. ती फक्त कुबडी आहे. पात्रता सिद्ध करायला लढायला लागत्.

आजानुकर्ण's picture

17 Dec 2012 - 10:20 pm | आजानुकर्ण

ज्यांचा पायाच पक्का नाही त्यांच्याकडून तुम्ही योग्य दर्जाच्या कामाची अपेक्षा कशी करू शकता? आणि खास करून मेडिकल ऑर इंजिनिरींग सारखा पेशा जिथे एखादी चुक सुद्धा प्राण घातक ठरू शकते तिथे अश्या प्रकारच्या तडजोडी करण कितपत योग्य आहे? ह्या प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न करा मग मला काय म्हणायचे आहे हे तुमच्या लक्षात येईल.

कुणाचा पाया पक्का नाही हे मला अजूनही कळलेले नाही. प्रत्येक व्यावसायिक अभ्यासक्रमाचे निकष हे प्रवेशसमितीने ठरवलेले असतात. उदा. मी अभियंता झालो तेव्हा अभियांत्रिकी प्रवेशासाठी खुल्या गटासाठी किमान ५० टक्के गुण व आरक्षित गटासाठी किमान ४५ टक्के गुण अशा स्वरुपाचे निकष होते. त्याशिवाय ज्यांनी आधीच आरक्षणाचे फायदे घेतले आहेत त्यांच्यासाठी क्रीमीलेअर निकषाद्वारे पुन्हा आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न केले जातात. हे प्रयत्न कदाचित कमी पडत असतील. मात्र प्रवेशासाठीच्या निकषामध्ये इथे केवळ पाच टक्क्यांच्या गुणांची तफावत आहे जी फार जास्त तडजोड नाही. मेडिकल आणि इंजिनियरिंगमध्ये होणाऱ्या एखाद्या प्राणघातक चुकीसाठी आरक्षण जबाबदार आहे हे पूर्णपणे अनाकलनीय आहे. मुळात एखाद्या व्यक्तीने मेडिकल अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला की तो डॉक्टर झाला असे नसते. खुल्या व आरक्षित या दोन्ही गटातून आलेल्या उमेदवारांचा अभ्यासक्रम सारखाच असल्याने त्यांचा 'पाया' ही सारखाच असावा. त्यामुळे चुका करण्याची शक्यताही जातनिरपेक्ष असावी असे वाटते.

तुम्ही जर खासगी क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की माहीत असेल, कोणीही तुमची जात-धर्म पाहत नाही. तुमच्या बॉस ला किवा कंपनीला फक्त तुम्ही देत असलेल्या आउटपुट शी मतलब असतो. आता काही कंपन्यांमधे जर का जात पात पाहून प्रमोशन मिळत असतील तर ते त्यांच नुकसान आहे. आणि त्याच प्रमाणही अतिशय कमी असेल. ही गोष्ट जास्त करून मद्रासी लोकांच्या बाबतीत घडते अस मझ निरीक्षण आहे. ते त्यांच्या लोकांना वर ओढून घेतात ही खरी गोष्ट आहे.

खाजगी क्षेत्रात जात-धर्म-भाषा वगैरे पाहत नाहीत हे विनोदी वाक्य आहे.

तुम्ही म्हणताय की मट्ठ लोक डॉक्टर होऊ शकत नाहीत? पैसा फेकला ना आपल्याकडे की आई-बाप पण विकत मिळतात, डिग्री काय चीज आहे?

मग प्रॉब्लेम काय आहे? आरक्षणावर पैसा फेकणे हा उपाय आहेच की. त्यासाठी आरक्षणाविरुद्ध बोंबाबोंब करायची काय गरज आहे. पैसे आहेत त्यांच्यासाठी पेमेंट सीट्स या वेगळ्या स्वरूपाच्या आरक्षणाची सोय आधीच उपलब्ध आहे.

पैसा फेकून आर्थिक मागास असल्याचे प्रमाणपत्रही मिळवता येते, तसे जात प्रमाणपत्र मिळवणे प्रचंड अवघड आहे. त्यामुळ सध्यातरी दुसरा फूल-प्रूफ पर्याय दिसत नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Dec 2012 - 9:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

खाजगी क्षेत्रात जात-धर्म-भाषा वगैरे पाहत नाहीत हे विनोदी वाक्य आहे.

ह्यातला विनोद प्लीज मला सांगा समजावून, माझ्या अल्पबुद्धीला समाजात नाहीए.
तुम्ही ओपन असा किवा आरक्षित गटातले असा, तुम्ही जोपर्यंत काम करताय आणि कंपनीला त्याचा फायदा होतोय तोपर्यंतच तुमची किंमत असते. तुमचा बॉस जर का कोणी परदेशी असेल तर त्याला दोन जाती मधला फरक कळेल का तुमचा परफॉर्मन्स कळेल? जो सरस असेल तोच पुढे जाईल. आणि तुम्ही स्वताही अभियंता आहात, टार्गेट्स च्या ओझ्याखाली जातीचा विचार करायला वेळ तरी मिळतो का?

पैसा फेकून आर्थिक मागास असल्याचे प्रमाणपत्रही मिळवता येते, तसे जात प्रमाणपत्र मिळवणे प्रचंड अवघड आहे. त्यामुळ सध्यातरी दुसरा फूल-प्रूफ पर्याय दिसत नाही.

तेही मिळत हल्ली. मधे भरपूर राजकारणी व्यक्तींनवर टीका झळी होती आणि काही जणांची पद सुद्धा गेली होती.

___

असु दे हो. साला ४ दिन की जिंदगी है, हसते खेलते बिताओ. :)

ह्यातला विनोद प्लीज मला सांगा समजावून, माझ्या अल्पबुद्धीला समाजात नाहीए.
तुम्ही ओपन असा किवा आरक्षित गटातले असा, तुम्ही जोपर्यंत काम करताय आणि कंपनीला त्याचा फायदा होतोय तोपर्यंतच तुमची किंमत असते. तुमचा बॉस जर का कोणी परदेशी असेल तर त्याला दोन जाती मधला फरक कळेल का तुमचा परफॉर्मन्स कळेल? जो सरस असेल तोच पुढे जाईल. आणि तुम्ही स्वताही अभियंता आहात, टार्गेट्स च्या ओझ्याखाली जातीचा विचार करायला वेळ तरी मिळतो का? >>>>>
हा हा हा हा हा ,

किती हसवाल !! अरे बाबा, आयटी तर प्रांतवाद देखील आहे.

( काम संपल्यावर वाकडच्या वाघजाईत बसून कामाच्या/जातीच्या आणी प्रांतवाद्याच्या नावाने धिंडवड्या डोळ्याने पाहणारा )
वाश्या

एस's picture

17 Dec 2012 - 11:21 pm | एस

मग मूळ प्रश्नाकडे वळू.

जात व जातीभेद कसा नष्ट करायचा? समता कशी आणायची? आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरभाषीय वगैरे विवाह कसे सर्रास होऊ शकतील? जातींच्या उतरंडींमध्ये प्रत्येक जातीचे सापेक्ष स्थान आहे, ही सापेक्षता कशी संपवायची?

फक्त आणि फक्त माणूस म्हणून जगायला कसं शिकायचं आणि कसं शिकवायचं?

(अवांतर - माझ्या आडनावावरून जात नक्की कळत नसल्याने मला थेट किंवा आडवळणाने मूळ गाव, नातेवाईक वगैरेंची माहिती विचारून माझी जात जाणून घ्यायचे प्रयत्न अगदी सर्रास होतात. आणि मी जेव्हा सांगतो की मी माणूस आहे तेव्हा समोरचा माणूस एका विचित्र अविश्वासाने माझ्याकडे बघतो. आजपर्यंत मी कोणाचीही जात विचारलेली नाही कारण ही व्यक्ती माणूस आहे एवढी माहिती मला पुरेशी वाटते.)

एस's picture

17 Dec 2012 - 11:23 pm | एस

मी किमान माझ्यापुरती जातधर्मवंशरंग वगैरे narrow domestic walls ना मूठमाती दिली याचा मला रास्त अभिमान आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Dec 2012 - 9:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

+१ अतिशय उत्तम.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Dec 2012 - 5:32 am | निनाद मुक्काम प...

नुकतच पार्टनर हा सिनेमा येत आहे असे कळले.
ह्या कादंबरीत व पु काळे ह्यांनी आरक्षणावर केलेले भाष्य आठवले.
बाकी आम्ही परदेशात राहत असल्याने अनिवासी म्हणून आम्हाला सुद्धा अजून जास्त व्याजदर मिळावा. असे आर्थिक आरक्षण हवे आहे , प्रवासी दिनाच्या निमित्ताने आमच्या मागण्या आम्ही आमच्या खात्याच्या मंत्र्यांच्या कानी घालणार आहोत.
आरक्षण जिंदाबाद
ही संकल्पना जगातील सर्व प्रमुख नेत्याच्या गळी उतरावी म्हणून मायावती ह्यांनी संयुक्त राष्ट्र संघात भाषण करावे असे मला मनापासून वाटते.

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Dec 2012 - 10:54 am | श्री गावसेना प्रमुख

ही संकल्पना जगातील सर्व प्रमुख नेत्याच्या गळी उतरावी म्हणून मायावती ह्यांनी संयुक्त राष्ट्र संघात भाषण करावे

यु पी चे आरक्षण समर्थक जर तिथे असतील तर त्या नक्कीच जातील्,फक्त एका अटीवर त्यांना फर्स्ट क्लास चे तिकीट आरक्षणात पाहीजे,म्हणुन विमान तिकीटात सुद्धा आरक्षण असायलाच हवे.

व्ही पी यांच्या मंडलाच्या शोधात असलेला

पंकज's picture

19 Dec 2012 - 9:56 am | पंकज

नको तीकडे जावून Affirmative Action असलं काहितरी पण पाहिजे अस म्हणतील.