साहित्यः
१. लांब मिरच्या - ३ ते ४
२. बारिक चीरलेला कांदा - १
३. मशरुम - २ ते ४ बारिक चीरुन
४. बारिक चीरलेला पाल़क - १/२ जुडी
५. बारिक चीरलेला लसुण - ४ ते ५ पाकळ्या
६. बारिक चीरलेली हिरवी मीरची - ३ ते ४ (तीखट असतील त्या प्रमाणात)
७. किसलेलं पनीर - ४ ते ५ क्युब्स
८. १/२ लींबाचा रस
९. चवीनुसार मीठ
१०. तेल - १ पळि
कृती:
१. मध्यम आचेवर एका कढईत १ पळि तेल टाकुन बारीक चीरलेला लसुण / कांदा / हिरवी मीरची घालावी
२. कांदा चांगला परतला की बारिक चीरलेलं मश्रुम आणि पालक घालावा
३. आता मश्रुम आणि पालकाला पाणि सुटेल तेव्हा पाणि आटेपर्यत मीश्रण सतत परतत रहा
४. मीश्रण कोरडं झालं कि किसलेलं पनीर घालुन १ मी. परता
५. मग लींबाचा रस, चवीनुसार मीठ घालुन गॅस बंद करावा
६. लांब मिरच्या ना मधे छेद देवुन आतील बीया काढाव्या व तयार केलेलं मीश्रण भरावे
७. तवा तापला कि १ पळि तेल टाकुन मीरच्या खरपुस भाजाव्या...आणि फक्कड तोंडिलावणं म्हणुन सर्व कराव्या
टिपा:
१. मिरच्या अगदी अलगद्/ह्ळुवारपणे सर्व बाजुनि भाजाव्या नाहितर त्या उलटताना मिश्रण बाहेर यायची शक्यता असते
२. मिरची जरा मधे मधे लागली (जळ्ली) तर अजुन खरपुस लागते
३. आवडत असल्यास मिश्रणामधे किसलेलं चीज टाकावं
विशेष सुचना:
१. मिरच्या आतुन सोलताना / पोकळ करताना हँड ग्लोव्ह्ज घालावे किंवा हात नंतर साबणाने चांगले २/४ वेळा खसखसुन धुवावे नाहितर नको त्या ठिकाणी आग/जळजळ व्हायची आणि तेव्हा ईनो घेउन पण काय उपेग न्हाय...:)
चला तर मग...करा आणि कळवा! शुभेच्छा!
प्रतिक्रिया
16 Dec 2012 - 3:41 pm | स्पंदना
अस सारण पहिल्यांदाच पाहिल. छान लागत असाव.तुमच्या सार्याच पाककृती वेगळ्या प्रकारच्या असतात. करुन पहायला आवडेल.
16 Dec 2012 - 3:45 pm | इष्टुर फाकडा
एकदा करुन पाहीली होती, फिसकटली. आता पुन्हा करुन बघेन.
16 Dec 2012 - 3:47 pm | पैसा
दिसतायत मस्त. चांगल्या लागत असणार. पण खायला भीती वाटते.
16 Dec 2012 - 4:40 pm | सस्नेह
एक तवा भरून चारच मिरच्या ? अशा किंगसाईझ मिरच्या कुठं मिळतात ?
16 Dec 2012 - 4:46 pm | मस्त कलंदर
या मिरच्या नेहमीच्या भाजीत घालण्याच्या मिरच्यांसारख्या दिसताहेत. भाजीसाठी वापरावयाच्या मिरच्या याहून थोड्या जाड असतात.
मला मश्रूम आवडत नाही, अति खटपट असेल तरीही मला कधीतरीच उत्साह येतो. म्हणून माझी साधी-सोपी पाकृ:
साधारण दोन चमचे बेसन,कोरडं खोबरं/किसलेलं खोबरं, चमचाभर बडीशेप, असतील तर थोडे तीळ हे सगळं तव्यावर वेगवेगळं खमंग भाजून घ्यावं. खोबरं किसलेलं नसेल तर किसून घ्यावं.(मी दुकानातलं किसलेलं खोबरं वापरते), त्यात बारीक चिरलेल्या दोन-चार लसूण पाकळ्या, धने-जिरे पूड, मीठ, आपापल्या वकुबाप्रमाणे तिखट घालून सर्व घटकपदार्थ चांगले मिक्स करून घ्यावेत. कोरड्या मिश्रणात अर्धा चमचा (टीस्पून) तेल घालून गरजेपुरतं दोनचार चमचे पाणी घालून थोडं ओलसर करून घ्यावं.
मिरच्या तवा/कढईवरती शिजवणार असाल तर मिरचीचा देठ कापावा आणि मधला बियांचा भाग काढून टाकावा. मिरची वेडीवाकडी असेल तर मिश्रण शेवटपर्यंत जात नाही, अश अवेळेस चमच्याच्या टोकाचा वापर करता येतो. मायक्रोवेव्ह मध्ये भाजायची असेल तर आडवा काप देऊन मिरची नीट भरता येते आणि शिजताना ते सारण कढईत शिजताना येतं तितकं बाहेर येत नाही. कढईत शिजवताना कमीत कमी तेलाची फोडणी करून सर्व मिरच्यांना ते तेल लागावं अशा तर्हेनं एकदोनवेळा टॉस करून वाफेवर शिजव्यावात. मायक्रोवेव्ह मध्ये करताना सर्व मिरच्यांना ब्रशने/बोटांनी हलकासा तेलाचा हात लावून अन्न गरम करण्याच्या मोडवर पाच-सात मिनिटांत मिरच्या चांगल्या शिजतात. दर दोन मिनिटांनी मात्र भांडं हलवून मिरच्यांची खालची बाजू वर करावी. गरज पडल्यास आणखी एक-दोन मिनिटे मायक्रोवेव्ह चालू राहू द्यावा.
तोंडीलावणं म्हणूनही अशा मिरच्या छान लागतात.
16 Dec 2012 - 7:44 pm | रेवती
अरे वा! दोन्ही कृती आवडल्या.
16 Dec 2012 - 7:56 pm | दिपक.कुवेत
@ अपर्णा: सारण थोड वेगळ असलं तरि चवीला छान लागलं...
@पैसा तै: अगदि बिनधास्त खा...ह्या मिरच्या दिसल्या तरि चवीला तिखट नसतात
@ मस्त कलंदरः तुम्हि दिलेलि कृती पण छान आहे...एकदा करुन बघेन
@स्नेहांकिता: ह्या मिरच्या अगदि सहज बाजारात मीळतात...वडापाव च्या गाडीवर ह्या बेसनात तळलेल्या असतात
17 Dec 2012 - 11:08 am | अनन्न्या
मश्रुमला काहीतरी पर्याय सांगा, बाकी पा.क्रु. झकास!
17 Dec 2012 - 1:48 pm | दिपक.कुवेत
अनन्न्या तु मश्रुम एवजी बारिक चीरलेली सीमला मीरची घालु शकतेस...
17 Dec 2012 - 5:28 pm | पिंगू
मशरुमएवजी उकडलेला बटाटा वापरला, तर कशी चव येईल. याचा विचार करतोय..
- पिंगू
18 Dec 2012 - 1:09 pm | जयवी
वॉव.....एकदम झक्कास :)
18 Dec 2012 - 4:30 pm | स्वीटी
लईईईईईईई भारी......
21 Dec 2012 - 6:01 pm | स्पंदना
बनवल्या...खाल्ल्या...आता झोपायला जायच आहे, म्हंटल साम्गुन जाव. तुमच्या कारणाने पोटात चार वेगळ्या चवीचे घास पडले.
27 Dec 2012 - 11:40 am | neeta
मस्त दिसतायत. करुन बघायला पाहिजे.