गाभा:
सांगलीचा प्रदीप मोहीते ह्यांनी एक हेलीकॉप्टर केले आहे. छोटेसेच आहे पण केले आहे. ते उडणारे नाही पण त्याचा प्रयत्न चांगला आहे. तो फक्त दहावी शिकलेला आहे असे न्युज मध्ये सांगितले. यु ट्युबवर आहे
कोणा सांगलीच्या मि पा करांना वा कोणालाही त्याचा पत्ता माहीती असेल तर मला द्यावा ही विनंती.
त्याला मदत करायची इच्छा आहे.
प्रतिक्रिया
15 Dec 2012 - 9:01 pm | मोदक
व्यनी केला आहे.
16 Dec 2012 - 7:29 am | गवि
व्यनि केला ते ठीक. पण काय हेलिकॉप्टर बनवले आहे याविषयी इतरांचीही उत्सुकता चाळवली गेली असावी. कोणी काही वैज्ञानिक प्रयोग केला असेल तर त्याची माहिती व्यनितून देण्यासोबत (व्यक्तिगत माहिती - फोन नंबर, पत्ता इ टाळून) इथेही देता येईल. जर केवळ प्रश्न पब्लिकली धाग्यावर आणि उत्तरे व्यनिने असा उद्देश असेल तर एकदोन दिवसांत धागा अप्रकाशित केला जाऊ शकेल.
16 Dec 2012 - 3:47 pm | दादा कोंडके
थोडीशी माहिती इथं द्याच.
16 Dec 2012 - 7:19 am | पाषाणभेद
रणजितसाहेब, लेखाचे शिर्षक पाहून घाबरलो ना मी. प्रदीप मोहीतेला काही झालेय का? अशी कोणती तातडीची, लवकर मदत तुम्हाला हवी आहे हे मनात येवून धास्तावलो.
पण आपण जी माहीती मागितली त्यात तातडीचे असे काही खास नाही. यापुढे असल्या तातडीच्या शिर्षकाचे धागे कृपया (कोणीही) काढू नये ही विनंती.
संपादकमहोदयांनीदेखील हे शिर्षक संपादित करावे ही विनंती. न जाणो लांडगा आला रे आला व्हायचा कुणाचा.
16 Dec 2012 - 2:34 pm | रणजित चितळे
चूक झाली. परत होणार नाही. माहीती लागलीच हवी होती. वेळ नव्हता. पटकन टाकला. वाटले मिळाली तर चांगलेच आहे. संपादकांना शिर्षकात फरक करायचा असेल तर करावा. किंवा धागा काढून टाकायचा असेल तर काढावा.