साहित्यः तांदुळ, हरभ-याची डाळ, उडदाची डाळ, हळद मीठ, तेल, हिरव्या मिरच्या, आले कढिपत्ता.
प्रथम २ वाट्या तांदुळ, १ वाटी हरभ-याची डाळ, १/२ वाटी उडदाची डाळ हे एकत्र करून मिक्सरवर जाडसर दळून घ्यावे.
या जाडसर पिठाला भरडा असे ही म्हणतात. मिरच्या व कढिपत्याची पाने बारीक चिरून घ्यावी, आले बारीक पेस्ट करून घ्या
दोन ते तीन वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे त्या मध्ये १ चमचा हळद घालावी चांगली उकळी आल्यावर वरील पिठ
त्यात घालावे व लगेच गैस बंद करावा पिठ ढवळून लगेच झाकण ठेवावे.
वाफ जिरू द्यावी. तयास झालेल्या पिठाचा गोळा मळावा. मळताना त्यात चवी नुसार मिठ, हिरच्या मिरच्यांचे अगदी बारीक चिरलेले तुकडे, वाटलेले आले, कढिलिंबाची पाने बारीक चिरलेली हे घालावे. गोळा चांगला मळून घ्यावा. मळ्ताना पाणी वापरू नये.
या पिठाचे छोट्या पुरीच्या आकाराचे वडे थापून घ्यावे हे सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी डिप फ्राय करावेत. खमंग व खुशखुशीत वडे तयार. टमाटो केचप किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व करावेत.
टिपः उकळीला पाणी ठेवताना जरूरीपुरतेच पाणी असावे पाणी जास्त नको.
स्वादासाठी पीठ मळताना त्यात धन्याची पावडर घालू शकता.
हे गरमच चांगले लागतात.
डायट असेल तर या मळलेल्या गोळ्यामधे बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर घालून त्याचे कमी तेलावर थालिपीठ करू शकता. ते सुध्दा छान लागते.
प्रतिक्रिया
15 Dec 2012 - 1:35 pm | गौरीबाई गोवेकर
दिलेली चित्रे मजकुराच्या मधे मधे दिसण्यासाठी काय बरे करावे? कुणी सांगेल का?
16 Dec 2012 - 12:31 pm | ज्योति प्रकाश
वरच्या बारमध्ये मदत पान आहे त्याला क्लिक करा व त्यावरील मिसळपाववर फोटो कसा चढवावा?हा गणपाभाऊंनी दिलेला सचित्र लेख वाचा म्हणजे कळेल.
15 Dec 2012 - 5:29 pm | sunita123
mast disat ahet vade....
15 Dec 2012 - 5:32 pm | दिपक.कुवेत
वा वडे मस्तच दिसतायत. चवीला नक्किच खमंग असणार. करुन बघेन एकदा...
15 Dec 2012 - 9:31 pm | रेवती
वडे छान दिसतायत. चित्रांच्या मदतीसाठी गणपा व किस्ना प्रसिद्ध आहेत. वल्लीकडेही जाऊ शकता.
15 Dec 2012 - 10:47 pm | हिरवळ
फारच छान रेसिपी....दाल वडे म्हणतात ते हेच का?
17 Dec 2012 - 2:23 pm | गौरीबाई गोवेकर
मला वाटत दाल वडे म्हणजे हे नव्हेत. त्यात डाळी भिजवून+वाटून त्याचे वडे केले जातात.
15 Dec 2012 - 10:59 pm | पैसा
चहाबरोबर खायला मस्त खाणे.
15 Dec 2012 - 11:27 pm | अत्रुप्त आत्मा
आंम्हाला हे वडे श्राद्धाला खाऊन खाऊन जुने झालेले आहेत...पण तरी अवडले हे सुद्धा... :-)
16 Dec 2012 - 10:58 am | मनीषा
छान दिसताहेत वडे ..
व्यायाम आणि आहार नियंत्रणावरच्या चर्चा वाचून जरा टेन्शनच आले होते. :(
ही पा. कृ. वाचताना जरा बरे वाटले .
16 Dec 2012 - 5:46 pm | जयवी
अरे वा.......मस्त मस्त :)
वड्यांची ही नवी पद्धत वाचून तरी आवडली.
17 Dec 2012 - 2:25 pm | गौरीबाई गोवेकर
:) मग आता हे पण करून बघ..
19 Dec 2012 - 10:21 pm | केदार-मिसळपाव
छायाचित्र बघुन तोन्डाला पाणी सुटले...आज आम्च्याकडे बटाटावडयाचा बेत आहे...खायला सुरुवात करावी म्हणतो.