प्रॉन्स - मशरुम करी

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
12 Dec 2012 - 6:11 pm

प्रॉन्स - मशरुम करी

बायको: काय रे उद्या डब्याला काय हवयं?
मी: काहीही चालेल (हे आपलं मोघम उत्तर पण ती काय देणार आहे ह्या कडे हळुच कानोसा :)

तशी मला खोडी नाही पण नुसते परतलेले मुग म्हणा कींवा नुसती भेंडी घश्याखाली नाही जात...गेलाबाजार नीदान त्यात किमान कांदा तरी हवा. काय करणार जीभेचे चोचले...

असो, तर सर्व पर्याय संपले की बायको हळुच प्रेमळ विनंती वजा आदेश करते...ठिक आहे मग तुला हवं ते तु कर. थोडक्यात मला (बायकोला) आराम दे. मग तसा ४/५ दिवस भाज्या खाउन मलाही कंटाळा आलेला असतो...अशा वेळि मासे / प्रॉन्स मनापासुन आवडत असल्याने ते अशा आणिबाणिच्या वेळेस कामाला येतात.

बायकोनुसार मी नॉन-व्हेज मस्त करतो (हा अजुन एक स्तुती आड आदेश :)

चला तर मग लग्गेच तयारीला लागुया.

Curry

साहित्यः
१. बारिक चीरलेला कांदा - १
२. कोलंबी - १ वाटी (तीला (म्हणजे कोलंबीला) स्वच्छ धुवुन हळद, मीठ, लींबु रस लावुन १/२ तास ठेवणे)
३. कडिपत्ता - ४ ते ५ पानं
४. मशरुम - २ मध्यम चीरुन
५. हिरवी सीमला मीरची - १ मध्यम चीरुन
६. हिरवी पेस्ट / वाटण - मुठभर कोथिंबिर / पुदीना, हिरव्या मीरच्या आणि पेरभर आलं मीक्सर मधे मुलायम वाटुन घ्यावं
७. नारळाच घट्ट दुध - १ वाटि (मी रेडीमेड पावडरचं दुध केलं)
८. चवीनुसार मीठ
९. तेल - १ पळि

कृती:
१. मध्यम आचेवर एका कढईत १ पळि तेल टाकुन बारीक चीरलेला कांदा / कडिपत्ता घालावा
२. कांदा चांगला परतला की कोलंबी घालावी व झाकण ठेवावे
३. कोलंबी खाली लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी...अर्थात मधे मधे ढवळावे...कोलंबीला :)
४. थोडया वेळाने कोलंबीला पाणी सुटुन तीचा आकार कमी होइल
५. आता हिरवी पेस्ट / वाटण टाकुन परत थोडया वेळ कोलंबी परतावी
६. मग त्यात मध्यम तुकडे केलेलं मशरुम / हिरवी सीमला मीरची घालावी आणि एक वाफ आणावी
७. आता त्यात नारळाच घट्ट दुध / चवीनुसार मीठ घालुन मंद आचेवर करी उकळु द्यावी
८. ५ मी. गॅस बंद करुन गरमा गरम करी वाफळत्या भाता सोबत सर्व करावी

टिपा:

१. हिरवी सीमला मीरची एच्छीक आहे...घातली नाही तरी चवीत फरक पडत नाही
२. व्हेज वाले ह्यात कोलंबी एवजी पनीर घालु शकता फक्त कमीत कमी पाणी घालावे म्हणजे पोळी, नान, पराठया सोबत खाता येईल
३. मशरुमला पण पाणी सुटतं त्या प्रमाणात नारळ्याच्या दुधाचं प्रमाण ठेवावं नाहीतर ग्रेव्ही एकदम पातळ होईल...आज माझि ग्रेव्ही थोडी पातळ झाली.
४. ज्यांना ग्रेव्ही नको असेल त्यांनी नारळाचं दुध न घालता वाफेवर शीजवावी म्हणजे पोळी, नान, पराठया सोबत खाता येईल

जाता जाता....

आत्ताच लंच टाईम मधे ह्या करी आणि भातावर आडवा हात मारुन भरल्या पोटी त्रुप्त मनाने ही रेसीपी पोस्ट करत आहे...

प्रतिक्रिया

अनन्न्या's picture

12 Dec 2012 - 6:38 pm | अनन्न्या

त्यातले प्रॉन्स की काय ते वगळता पा.क्रु. गवताळांना चालेल असे वाटते आहे.

Mrunalini's picture

12 Dec 2012 - 7:10 pm | Mrunalini

वा वा वा.. छान पाकृ.. :)

पैसा's picture

12 Dec 2012 - 8:23 pm | पैसा

तुमच्या पाकृ एकदम वेगळ्याच असतात. पनीर घालून चांगली लागत असेल असं वाटतंय.

सानिकास्वप्निल's picture

13 Dec 2012 - 1:31 am | सानिकास्वप्निल

छान आहे पाकृ :)
एकदम हटके... ह्यात मश्रुमऐवजी काय घालू शकतो??

जयवी's picture

13 Dec 2012 - 12:20 pm | जयवी

ओहो.........एकदम झकास :)
क्या बात है..... आजकाल एकदम तबियतसे कुकींग सुरु आहे :)
लिहिलं पण एकदम मस्त !!
लिहिता रहा..... !!

दिपक.कुवेत's picture

13 Dec 2012 - 12:47 pm | दिपक.कुवेत

सगळयांना मनापासुन धन्यवाद

@सानिका: ह्यात मश्रुमऐवजी तु बटाटा, गाजर, ब्रोकोली/फ्लॉवर, रंगीबेरंगी सीमला मीरच्या घालुन मीक्स व्हेज करु शकतेस. पण पाणि न घालता नारळाच्या दुधातच शीजव म्हणजे भाजीला चव छान येईल

@ जयश्रि: अनेक धन्यवाद प्रोत्साहनासाठि...बघुया लिहणं कितपत जमतेय ते

तब्येतीत जमवलेली झकास पाकृ.
प्रॉन्स ऐवजी मश्रूम घालून केली तर ?
(गवताळांसाठी)

गौरीबाई गोवेकर's picture

15 Dec 2012 - 1:45 pm | गौरीबाई गोवेकर

वा छान...करून बघेन नक्की.