(मा जागुतै यांची क्षमा मागून)
साहित्य : दोन छटाक नवोदित मिपाकर (किंचित) कवी
दोन चमचे यमके
दोन चमचे चंद्र/ चांदणे/ पाऊस / आभाळ यापैकी आयत्यावेळी जे हाताला लागेल ते.
काही लाडिक खरडी.
एक चिमुट तरल भावना किंचित ठेचून.
अर्धी वाटी तिखट प्रतिसाद
पाव वाटी आंबट प्रतिसाद.
२-३ गोग्गोड प्रतिसाद. (हे शक्यतो नवमिपाकरांचे असावे )
फोडणीसाठी बेताचे उपरोधिक प्रतिसाद.
कृती : प्रथम नवोदित कवी लाडिक खरडीमध्ये घोळवून एक महिना मुरत ठेवावेत.
या काळात आंबट तिखट प्रतिसादांचा अभ्यास करावा. यानंतर मुरलेल्या कवीच्या मिश्रणात ठेचलेल्या भावना चांगल्या मिसळून घ्याव्यात. मग पत्येक ओळीच्या शेवटी एक एक यमक पेरावे. अधून मधून चंद्र/ चांदणे/ पाऊस / आभाळ शिंपडावे.
आता मिपावर प्रसिद्ध करावे. मग आंबट तिखट प्रतिसादांची आयती झणझणीत फोडणी त्यावर येऊन पडेल. आता ‘लाडिक खरडी’ वाल्यांना मध्ये मध्ये गोग्गोड प्रतिसाद पेरण्यास सांगावे.
झाले रुचकर चारोळ्यांचे लोणचे तयार ! किमान पन्नास प्रतिसादांची ग्यारंटी !
वाढत्या प्रतिसादांबरोबर लोणचे अधिकाधिक मुरात जाते.
टीप : राजकारणी धाग्यांमुळे आलेल्या अरुचीवर प्रभावी उपाय करणारे व तोंडास चव आणणारे आहे.
प्रतिक्रिया
1 Dec 2012 - 10:03 pm | जेनी...
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्
काय झनझनित लोणचं आहे गं स्नेहातै
भारी दिस्तय हं ! ;)
मी बै ' लाडिक खरडी ' गोग्गोड प्रतिसाद पेरणारी हं ! :)
डो. पा. सू. =))
2 Dec 2012 - 10:44 am | श्रीरंग_जोशी
# पूजा - तू नेहमी स्नेहाचेच कौतूक करते.
अंकिताचेही कौतुक व्हायला हवे.
# स्नेहा अन अंकिता - लोणचे आवडले बरं का?
3 Dec 2012 - 8:28 am | जेनी...
अय्या खरच की !
चुकलच माझं रंगाकाका .
स्नेहा पूरे हं तुझं कौतुक :-/
आता अंकिताची जरा खबर घेऊ ;)
अंकिता भारीये गं लोणचं चारोळ्यांचं :)
1 Dec 2012 - 10:05 pm | रेवती
अग्गायाया....मीच फसले. आधी वाटले की खरेच वेगळे लोणचे दिसते पण सुडंबन जमले आहे. खर्या चारोळ्यांचे लोणचे पाकृ नंतर द्या. ;)
3 Dec 2012 - 3:50 pm | स्पंदना
मला हा सुडंबन शब्द अवडंबर सारखा का दिसतो आहे.
मी म्हणेन सुडौल रचना. सुडंबन कस दुर्योधनाला सुयोधन म्हणल्यासारख वाटत,
1 Dec 2012 - 10:21 pm | निवेदिता-ताई
मी पण फसले, म्हटले आज लोणच्यांचा पाउस आहे काय?
भारी जमलय गो !!!!!!!!!!
1 Dec 2012 - 10:37 pm | लीलाधर
आवडेश ऑर्डर द्यावी म्हंतोय येकदाच द्ये की पाठवून चांगले बरणी भरून....... ;) :)
2 Dec 2012 - 6:39 am | ५० फक्त
तुम्ही तर होलसेल 'लोणचेवाले बंधु,' तुम्ही कशाला आर्डर देताय ?
3 Dec 2012 - 1:52 pm | बॅटमॅन
लोणचेवाले की डेअरीवाले ;)
1 Dec 2012 - 11:06 pm | अत्रुप्त आत्मा
=))
1 Dec 2012 - 11:40 pm | स्वाती दिनेश
लोणचे चटकदार दिसते आहे, ;)
स्वाती
1 Dec 2012 - 11:42 pm | बॅटमॅन
सुडंबित लोणचे अतिउत्तम!!!!
2 Dec 2012 - 12:02 am | प्यारे१
तोंपासु!
हे लोणचे सातत्याने वापरात ठेवण्यासाठी स्वतःच्या आभार प्रदर्शक, स्पष्टीकरणात्मक चमच्यांचा वापर करावा....! थोडंसं बुरशी लागल्यासारखं वाटल्यास झोंबणार्या प्रतिसादाच्या चमच्याने वरचा थर काढून हलकट प्रतिसादरुप गरम तेलाची धार सोडावी.
4 Dec 2012 - 7:51 am | स्पंदना
प्यारेमहाराज की जय!!
2 Dec 2012 - 12:44 am | अभ्या..
लोणचे घालणार आहे याची आपापसात खरडीमार्फत जाहिरात करुन ठेवावी. प्रतिसादाची फोडणी तर मिळतेच.
अधिकारी मित्रांना श्रेयवानवळा न दिल्यास प्रतिसाद मिळूनही लोणचे दर्शनमात्र होण्याची १००% ग्यारंटी.
2 Dec 2012 - 6:40 am | ५० फक्त
लई भारी, फार फार धन्यवाद. प्राकीनंतर तुम्हीच.
* - प्राकी म्हणजे काय हे ज्यांना समजायचे त्यांना समजले, बाकीच्यांनि जुन्या लोणच्याच्या बरण्या हूडकाव्यात हे बरे.
2 Dec 2012 - 8:31 am | श्री गावसेना प्रमुख
नवोदीत कवींचे लोणचे करणार्या प्रवृतींचा जाहीर णीषेध
2 Dec 2012 - 9:46 am | ज्ञानोबाचे पैजार
चांगल्या चारोळ्या आजकाल महाग झाल्या आहेत. आजकाल मार्केट मधे चारोळी म्हणुन जे विकले जाते तो बहुतांशी माल डुप्लीकेट असतो. चांगले रुजकर शोधण्याच्या नादात बर्याचदा डुप्लीकेट माल खावा लागतो मग प्रचंड डोकेदुखी आणि पोटदुखीचा त्रास होतो. यावर जालिम उपाय म्हणजे विडंबनारिष्ट.
आमच्या कडे बॅरल भर भरुन विडंबनारीष्ट उपलब्ध आहे गरजुंनी विनासंकोच संपर्क करावा.
(राजवैद्य)
4 Dec 2012 - 7:54 am | स्पंदना
माहिती बद्दल धन्यवाद.
4 Dec 2012 - 12:25 pm | सस्नेह
आमच्या कडे बॅरल भर भरुन विडंबनारीष्ट उपलब्ध आहे
असं म्हणता ?
मग येउद्या की एक झकास विडंबन !
शांपल तरी समजेल !
4 Dec 2012 - 12:36 pm | सूड
>>आमच्या कडे बॅरल भर भरुन विडंबनारीष्ट उपलब्ध आहे गरजुंनी विनासंकोच संपर्क करावा.
मी चुकून 'आमच्या कडे बॅरल भर भरुन विडंबनारीष्ट उपलब्ध आहे गुरुजींनी विनासंकोच संपर्क करावा.' असं वाचलं.
4 Dec 2012 - 2:04 pm | बॅटमॅन
पन सुडकेश, गुर्जी सोताच म्यान्युफ्याक्चरर हाइती, तेन्ला गरज न्हाय तेची ;)
2 Dec 2012 - 10:00 am | पैसा
आजकाल मिपावर पुरवठा कमी झाल्यामुळे मागणी खूप वाढली आहे. पुण्याच्या काही भागात या लोणच्याला जरा जास्त मागणी आहे असे कळले. तिथे या लोणच्याचा हातोहात फन्ना उडतो.
2 Dec 2012 - 12:57 pm | प्रचेतस
तुम्ही नदीपल्याडच्या सिंहगड रोड, धायरी ह्या भागाबद्दल बोलताय का?
2 Dec 2012 - 1:52 pm | पैसा
त्याशिवाय मुंबईजवळ बदलापूर वगैरे भागातही याला चांगली मागणी आहे.
2 Dec 2012 - 2:12 pm | प्रचेतस
खरंय.
बाकी बदलापूराबरोबरच हडपसरातसुद्धा लोणच्यांचा फन्ना उडतो म्हणे.
जाता जाता मागणीबरोबरच सिंहगड रोड भागात लोणच्यांची घाऊक दुकानेपण आहेत असे निरिक्षण नोंदवतो
3 Dec 2012 - 11:59 am | मोदक
लोकं लोणच्याचा मनमुराद आस्वाद घेत असताना उगाचच बरणी घट्ट बंद करून आस्वादप्रक्रियेत विनाकारण बाधा आणणार्यांना काय शासन द्यावे असे तुम्हास वाटते?
3 Dec 2012 - 12:24 pm | सूड
असं करणार्या सदस्याच्या खरडवहीत काव्यप्रसवबाधा झालेल्यांना पाठवून आठवडाभर रोज शंभर चारोळ्यांचा रतीब घालून येण्यास सांगावे. असे करीत असताना स्वतःची खव बंद करणाचा अधिकार त्याचेकडून आधी काढून घेणेत यावा. ;)
3 Dec 2012 - 12:57 pm | ५० फक्त
कोण हो कोण असे करणारे, अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या मालकाच्या पेनाचा गळा आणि किबोर्डाची / ब्रॉडबँडची वायर घोटणा-या अशा लोकांचे मिपावर/चेपुवर् डुआयडी काढुन त्यांच्या नावाने दोन चार एकोळी भडकावु धागे काढले पाहिजेत, सगळ्या उपलब्ध आयडिंना मज्यशी मयत री कर्णा रका.अशा खरडी केल्या पाहिजेत.
(ही शिक्षा भर चौकात विवक्षित ठिकाणी फटके दिले पाहिजेत याला आंतरजालीय पर्याय आहे असे समजावे)
3 Dec 2012 - 1:15 pm | प्रचेतस
लोणचे जितके जास्त मुरेल तितके ते अधिक चवदार लागते तस्मात बरणी घट्ट बंद करून ठेवलीय ती मुरण्यासाठीच.
3 Dec 2012 - 1:41 pm | अत्रुप्त आत्मा
@तस्मात बरणी घट्ट बंद करून ठेवलीय ती मुरण्यासाठीच.>>> अत्यंतिक सहमत.... :-)
आणी गरज पडल्यास बरणी उघडताही येईल,पण ती लोणचं,लोणच्या सारखं खाणार्यांसाठी,,, कायम जिथे/तिथे बचाबचा भाजी सारखं खाणार्यांना/ तोंड घालणार्यांना पूर्ण वंचित(चाखणमात्र :-p ) ठेवणच योग्य होइल ;-)
3 Dec 2012 - 3:21 pm | स्पंदना
ती लोणचं,लोणच्या सारखं खाणार्यांसाठी
बघा! बघा!! अतृप्त असुनही काय कस खाव हे चांगले जाणतात हे आत्मासाहेब.
3 Dec 2012 - 6:20 pm | अत्रुप्त आत्मा
@अतृप्त असुनही काय कस खाव हे चांगले जाणतात हे आत्मासाहेब.>>> =)) खरी अत्रुप्तता त्यातच असते.
3 Dec 2012 - 8:21 pm | प्रचेतस
मग त्रुप्तता कशात असते?
3 Dec 2012 - 10:17 pm | अत्रुप्त आत्मा
.................................................छळू अगोबा .
करंट आत्मा
@मग त्रुप्तता कशात असते?>>> हे दुष्ट अगोबा...तुझ्या अंगावर मिरपुड/मिठ फेकण्यात
4 Dec 2012 - 12:51 am | मोदक
"हे म्हणजे जो जास्ती गाणी गातो त्याला गवैय्या म्हणल्यासारखे आहे"
भाईकाकांचे वरील वाक्य आठवले.
3 Dec 2012 - 10:29 am | सूड
बरोबर !! फक्त आमच्याकडे करतात त्यात उपरोधिक/ उपरोधक प्रतिसाद जरा उजव्याच हाताने पेरतात. असं लोणचं काव्यप्रसवबाधा झालेल्यांसाठी लाभदायक ठरतं. पण रोग जुनाट असेल तर साक्षात ब्रह्मदेवही काही करु शकत नाही.
2 Dec 2012 - 10:58 am | अविनाशकुलकर्णी
मिपाच्या बरणीत मुरलय
चारोळ्यांचे रुचकर लोणचे.
घ्या लोणच्यातल्या चारोळ्या
नीनादे ब्रह्मांडात आरोळ्या
म्हणे एक जंतू चारोळी तला
डाल भात लोनचा.. कोण नाही कोनाचा
डाल भात लोनचा.. कोण नाही कोनाचा
2 Dec 2012 - 11:05 am | मनीषा
मस्तं पा.कृ.
नक्की करून बघणार ...
ही पा.कृ. 'यमके' न घालता कशी करावी ?
अवांतर : आता इथे 'तरल भावना' शोधणे आहे . :)
2 Dec 2012 - 12:56 pm | प्रचेतस
चारोळ्यांचे लोणचे लैच चमचमीत बर्का.
बाकी काही अनुभवी मिपाकर कवी सुद्धा हे लोणचे वरचेवर घालत असतात बरे.
4 Dec 2012 - 1:17 am | मोदक
बाकी काही अनुभवी मिपाकर कवी सुद्धा हे लोणचे वरचेवर घालत असतात बरे.
बरोब्बर..
काही सदस्य प्रत्यक्षपणे लोणचे घालतात...
काही अप्रत्यक्षपणे..
काही सदस्य कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवून असतात व कच्चा माल कमी पडू नये याची स्वतः जबाबदारी घेतात.
काही सदस्य दिसेल त्या कच्च्या मालाचे लोणचे करतात.
काही "पावरफुल" सदस्य बाकीच्या सदस्यांनी लोणचे घालू नये म्हणून बरणी घट्ट बंद करणे / बरणी लपवून समस्त जनांसाठी अदृष्य करणे अशा ही कला लीलया दाखवतात.
मुरलेले लोणचे वर उपसून स्वाद चाखणे तर काहीजणांचा आवडीचा खेळ आहे!!!
आत्तापर्यंत ऐकलेला खंग्री प्रकार.
एका आग्यावेताळाने एका निष्पाप सदस्याला लोणचे घालण्यासाठी भरीस घातले, त्या बिचार्याने कच्च्या मालावर लैच परिश्रम घेवून लोणचे घातले, संस्कारीत केले (फोडणी वगैरे!) लोणचे भारी झाले आहे असे खाजगी चर्चांमध्ये कौतुकही झाले, आणि त्याच आग्यावेताळाने त्याच लोणच्याबद्दल वाईट्साईट बोलून लोणच्यासह सदस्याची पब्लीकमध्य साले काढली! :-D
सर्वात वाईट वाटते ते आजारी सदस्यांचे :-(
या सदस्यांना वेगवेगळे समिक्षकी आजार असल्याने स्वत:शिवाय दुसरे कोणीही बनवलेले लोणचे वाईट्टच दिसते!
4 Dec 2012 - 5:18 am | अत्रुप्त आत्मा
@सर्वात वाईट वाटते ते आजारी सदस्यांचे
या सदस्यांना वेगवेगळे समिक्षकी आजार असल्याने स्वत:शिवाय दुसरे कोणीही बनवलेले लोणचे वाईट्टच दिसते! >>> बरोबर...अगदि बरोबर,अहो त्यामुळेच तर त्यांची अता हुच्च'ते कडे वाटचाल सुरु आहे.
2 Dec 2012 - 3:08 pm | परिकथेतील राजकुमार
विडंबन उत्तम जमले आहे. अर्थात इकडे मोठ्या प्रमाणावरती 'पालथे घडे' असल्याने ह्याचा परिणाम कितपत होईल ही शंकाच आहे.
अवांतर :- हाच लेख पुरुष अथवा पुरुषसदृश्य आयडी कडून आला असता तर काय प्रतिक्रिया आल्या असत्या ह्याचा विचार करून अंमळ हळवा झालो.
2 Dec 2012 - 5:50 pm | किसन शिंदे
सहमत!
बाकी विडंबन आवडलं.
3 Dec 2012 - 1:00 pm | ५० फक्त
सहमत व्हायचे दिवस संपले तुमचे आता, युनोच्या सुरक्षा समितीतली हौटसिट मिळालीय ना आता मग ?
4 Dec 2012 - 7:59 am | स्पंदना
आम्ही आधी सदस्य आहोत, मग युनोचीहॉट सीट!
दखल घेतल्की जावी,.
2 Dec 2012 - 3:33 pm | श्री गावसेना प्रमुख
पाठवणार्याचा पत्ता चुकीचा असावा.

3 Dec 2012 - 7:48 am | स्पंदना
झाले रुचकर चारोळ्यांचे लोणचे तयार ! किमान पन्नास प्रतिसादांची ग्यारंटी !
ब्वॉर!
अग मागल्यावर्षी पासुन माझ्याकडे काही चारोळ्या पडलेल्या आहेत. आता बघतेच करुन तुझ्या पद्धतिने.
बाकी हे लोचणे किती दिवस टिकते? आणि हे कधी आणि कुठे वाढावे?
3 Dec 2012 - 11:06 am | ५० फक्त
बाकी हे लोचणे किती दिवस टिकते? आणि हे कधी आणि कुठे वाढावे? - ही वाक्यं वाचताना महालक्ष्मीच्या कहाणीतली चिमादेवराणी आठवली एकदम.
3 Dec 2012 - 1:23 pm | ह भ प
कितिही वाढले लोणचे,
तरीही मी खचत नाही..
नऊ फोडींनंतर मात्र,
मलाही ते पचत नाही.. ;)
4 Dec 2012 - 7:56 am | स्पंदना
अग स्नेहांकिता सापडला बघ (किंचित) कवी ! ए पकडा पकडा याला. मला लोणच घालायच आहे.
6 Dec 2012 - 1:27 pm | गणपा
आम्हाला नवकवींची अॅलर्जी आहे. त्यास पर्याय म्हणुन नवलेखकू किंवा नवफोटूग्राफू चालतील काय?
त्या अनुशंगे पाककृतीत काय काय बदल करावे लागतील त्याबद्दल थोडे दर्शन द्यावे.
* (अर्रर्र वर 'थोडे' आणि 'दर्शन'च्यामध्ये 'मार्ग' लिहायचे राहुन गेले तेव्हा ते मार्ग घालुन वाचावे.)
6 Dec 2012 - 2:18 pm | सस्नेह
पन आमचं ‘दर्शन’ चालंल का ?
नाय, म्हंजे जाणकारांच्या चष्म्यातून आम्ही आता ‘नव’ लेखक राहिलो नाही, असं वाट्टंय...
7 Dec 2012 - 6:15 am | स्पंदना
त्याला (पकशी गणपाला, गणपा पकशी नाही पकवतो आहे, म्हणजे खाना पकवतो) तू नवीच ना? देउन टाक दर्शन. उगा भाव नको खाउ.