रिफ्राईड बीन्स टॅकोज

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
30 Nov 2012 - 6:23 am

साहित्य रिफ्राईड बीन्ससाठी:

१ वाटी राजमा किंवा पिंटो बीन्स (रात्रभर भिजवून ठेवणे, सकाळी कुकरला शिजवून व पाणी गाळून घेणे. )
१ छोटा कांदा बारीक चिरून
१ टोमॅटो बारीक चिरून
१ टेस्पून बारीक चिरलेला लसूण
१-१/२ टेस्पून मेक्सिकन सीझनींग (नाही मिळाल्यास प्रत्येकी २ टेस्पून पॅपरीका पावडर, जीरे पावडर, cayenne पेपर पावडर, ड्राईड ओरेगॅनो आणी १ टेस्पून गार्लिक पावडर, एकत्र करणे आणी हवाबंद डब्यात भरणे)
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
तेल

.

पाकृ:

एका पॅनमध्ये तेल गरम करणे व त्यात बारीक चिरलेला लसूण घालून परतणे.
लसूण खमंग परतला गेला की त्यात कांदा घालून गुलाबीसर परतावा.
मग त्यात चिरलेला टोमॅटो घालून मऊसर होईपर्यंत परतणे.
त्यात चवीपुरते मीठ व मेक्सिकन सीझनींग घालून चांगले परतणे.

.

आता त्यात शिजवलेला राजमा घालावा.
त्यात अगदी थोडेसेच पाणी घालून , झाकून शिजवावे.
राजमा मसाल्यात चांगला शिजला की चमच्याने घोटावे. (भरडसर घोटावे, एकदम पेस्ट करु नये बुळबुळीत लागतं)
वरून बारीक चिरलेली कोथींबीर घालावी.

.

टॅकोज सर्व्हींग साहित्य व कृती

रेडीमेड कॉर्न टॅकोज
तयार केलेले रिफ्राईड बीन्स
टोमॅटो सॉस (टोमॅटो सालसा ही वापरू शकता)
बारीक चिरलेल्या हॅलेपिनो मिरच्या
बारीक चिरलेले लेट्युस
किसलेले चेडर चीज (माँटेरी जॅक मिळाल्यास उत्तम)
ग्वाकामोली
ग्वाकामोली पाकृ :

अव्होकॅडोला मधोमध कापून दोन भाग करावेत.सुरीने त्याच्यामधली बी काढून टाकावी.
चमच्याने त्याच्या आतला गर अलगद काढावा.
गर चांगला मॅश करुन घ्यावा.
त्यात कांदा, हॅलेपिनो मिरची, कोथिंबीर, मीठ व मिरपूड आणी लिंबाचा रस घालावा व एकत्र करावे.
आवडत असल्यास ह्यात टोमॅटो ही घालू शकता.

कॉर्न टॅकोमध्ये तयारे केलेले रिफ्राईड बीन्स घालावे, त्यावर ग्वाकामोली, टोमॅटो सॉस, हॅलेपिनो मिरच्या व लेट्युस घालावे. किसलेले चीज घालावे.

.

रिफ्राईड बीन्स टॅकोज स्नॅक्स म्हणून सर्व्ह करू शकता.
नॉन-व्हेज खाणारे टॅकोजमध्ये बीन्स ऐवजी मटण खीमा किंवा बीफ खीमा घालून बनवू शकतात.

.

प्रतिक्रिया

मोदक's picture

30 Nov 2012 - 8:16 am | मोदक

ज ह ब ह रा....

नेहमीप्रमाणेच. :-)

पिंगू's picture

30 Nov 2012 - 9:26 am | पिंगू

टॅकोज जबरी आहेत..

- पिंगू

कच्ची कैरी's picture

30 Nov 2012 - 10:53 am | कच्ची कैरी

मस्त नक्किच करुन बघेल
http://mejwani.in/

ज्ञानराम's picture

30 Nov 2012 - 10:58 am | ज्ञानराम

तों पा सू

मदनबाण's picture

30 Nov 2012 - 11:01 am | मदनबाण

मस्त ! :)

प्रचेतस's picture

30 Nov 2012 - 11:46 am | प्रचेतस

खल्लास!!!

बाळ सप्रे's picture

30 Nov 2012 - 11:53 am | बाळ सप्रे

पाकृ झकास !! करून बघायची फार इच्छा आहे पण साहित्य उपलब्ध होणे खूपच कठीण दिसतय.
पिंटो बीन्स! मेक्सिकन सीझनींग!! पॅपरीका पावडर!!! cayenne पेपर पावडर!!!! माँटेरी जॅक!!!!! ग्वाकामोली !!!!!अव्होकॅडो!!!!!!

सप्रेसाहेब, यातील जवळ जवळ सगळ्या वस्तू भारतात मिळतात (तुम्ही भारतात राहता हे गृहित धरले आहे.). माँटेरी जॅक चीज नाही मिळाले तरी चेडर चीज मिळते. मला वाटते की अमूलचे मिळते. कायेन पेपर मिळत नसली तरी मेक्सिकन सीझनींग मिळते. सगळ्या ड्राईड हर्ब्ज आता भारतात मिळतात व त्यांचा उपयोगही केलेला (निदान मोठ्या शहरांमध्ये) दिसतो. ग्वाकामोलीसाठी अव्होकॅडो मात्र मिळतो की नाही ते पहायला हवे. सालसा मिळतो असे ऐकले आहे. खरे काय ते माहित नाही.

सुहास झेले's picture

30 Nov 2012 - 12:07 pm | सुहास झेले

निव्वळ अल्टीमेट... !!

धनुअमिता's picture

30 Nov 2012 - 12:23 pm | धनुअमिता

खुपच छान

तों पा सु

michmadhura's picture

30 Nov 2012 - 1:10 pm | michmadhura

मस्तच! पण सध्या फक्त आयटॉनिक (eye tonic) म्हणून घेतले आहे.

शिद's picture

30 Nov 2012 - 1:24 pm | शिद

जबरदस्त....!!!

स्वाती दिनेश's picture

30 Nov 2012 - 1:41 pm | स्वाती दिनेश

छानच दिसत आहेत टॅकोज.. मस्त एकदम!
स्वाती

स्मिता.'s picture

30 Nov 2012 - 3:19 pm | स्मिता.

टेम्प्टिंग दिसतंय अगदी!

हुच्च आणि अंमळ हिरवी पाकृ !!

विशाखा राऊत's picture

30 Nov 2012 - 4:33 pm | विशाखा राऊत

एकदम मस्त

मस्तच एकदम.... मी टाकोज अजुन कधी खाल्ले नाही. एकदा करुन बघायला पहिजे.

ग्रेट! त्रिवार धन्यवाद या पाकृ बद्दल. कालच ट्रेडर जोजमध्ये रीफ्राईड बीन्सच्या क्यान पाहून हे नक्की काय असावे असा प्रश्न पडला. ट्याकोज करण्याचे मनात घोळत होतेच. आता पुढच्या ग्रोसरी भेटीत घरात नसलेले प्रकार आणते आणि करतेच. तू लवकरच एक पुस्तक लिहिण्याचे मनावर घे.

जेनी...'s picture

1 Dec 2012 - 12:21 am | जेनी...

;) आज टॅको बेल्ल मध्ये जाणारच :)

आजच केलेत. छान चवदार झालेत (ग्वाकामोलीही घरीच बनवलय, ताज्याची चव जास्त आवडली, आता तयार आणणार नाही). नेहमीच्या पदार्थांमध्ये एक पदार्थ जमा! धन्यवाद सानिका.