कोबीची कोशिंबिर

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in अन्न हे पूर्णब्रह्म
28 Nov 2012 - 1:29 am

साहित्य- १ लहान,कोवळा कोबीचा गड्डा,१ लहान सिमला मिरची,१ हिरवी मिरची,अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे,१ मोठा चमचा दाण्याचे कूट,१ मोठा चमचा तेल,फोडणीचे साहित्य,मीठ,साखर,कोथिंबिर
कृती- कोबी किसून घ्या. कोबीचा लहान गड्डा न मिळाल्यास मोठ्या कोबीचा साधारण ३ वाट्या कीस घ्या.
सिमला मिरची किसून घ्या.तीही साधारण वाटीवर असू द्या.
कोबी,सिमला मिरचीचा कीस एकत्र करा,
मिरची बारीक चिरुन घाला. दाण्याचे कूट घाला.
फोडणी करुन ती त्यावर ओता.
मीठ, साखर, कोथिंबिर आणि डाळिंबाचे दाणे घाला व कालवा.

.

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

28 Nov 2012 - 1:39 am | सुहास झेले

सहीच...!!

एकदा करून बघायला हवी :) :)

रूपाली.नाईक's picture

2 Dec 2012 - 6:07 pm | रूपाली.नाईक

थोदा चात मसाला घातला तर....

अभ्या..'s picture

28 Nov 2012 - 1:56 am | अभ्या..

आवडली एकदम सिंपल पाकृ. करायलाच पायजे एकदा.
दही चालत नाही का?

अत्रुप्त आत्मा's picture

28 Nov 2012 - 7:42 am | अत्रुप्त आत्मा

फोटू येकदम कातिल! :-)

दीपा माने's picture

28 Nov 2012 - 7:45 am | दीपा माने

सोप्पी आणि छानदार कोशिंबीर आवडली.

एकदम पटकन् होणारी पाकृ व चवदारही. फोटू छान आलाय.

इरसाल's picture

28 Nov 2012 - 9:33 am | इरसाल

माझी पत्नीसुद्धा अशाच एका वेगळ्याप्रकारे कोबीची कोशिंबीर बनवते. तिला सांगुन त्याची रेसेपी आणी फोटो चिकटवतो.

ज्ञानराम's picture

28 Nov 2012 - 9:37 am | ज्ञानराम

मस्त.....

ऋषिकेश's picture

28 Nov 2012 - 10:16 am | ऋषिकेश

मस्त! मी ही अशीच (वजा डाळींबदाणे) करतो आणि फोडणीत जरा जास्त हिंग घालतो (कोबीचा वास कमी होऊन मस्त वास सुटतो ;) )

कोबी-मुळा-मेयो अशी विदाऊट विस्तव कोशिंबीरही छान लागते.

जयवी's picture

28 Nov 2012 - 11:17 am | जयवी

आवडेश :)

सस्नेह's picture

28 Nov 2012 - 1:26 pm | सस्नेह

या लिंबाच रस घातल्यास अधिक चांगला स्वाद येतो.

स्मिता.'s picture

28 Nov 2012 - 3:34 pm | स्मिता.

एकूणच कोबीचा तिटकारा असला तरी इतर घटक पदार्थांमुळे ही कोबीची कोशिंबिर चांगली लागत असावी असं वाटतंय. ;)

निवेदिता-ताई's picture

28 Nov 2012 - 3:38 pm | निवेदिता-ताई

आवडली

सानिकास्वप्निल's picture

28 Nov 2012 - 4:54 pm | सानिकास्वप्निल

कोबीची कोशिंबीर अगदी छान दिसतेय :)
कोबी कच्चा, शिजवलेला कसाही आवडतोच त्यामुळे आजच करुन बघते :)
धन्यवाद

कवितानागेश's picture

28 Nov 2012 - 5:05 pm | कवितानागेश

छान दिसतेय कोशींबीर.
कोबी उग्र असेल तर खिसून झाल्यावर पाणी काढून टाकलेले बरे होइल असे वाटतय..

परिकथेतील राजकुमार's picture

28 Nov 2012 - 6:25 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍यादस्त ग तै.
एकदम आवडेश.

अनिल तापकीर's picture

28 Nov 2012 - 6:34 pm | अनिल तापकीर

करुन बघायला हरकत नाही पण आधी बायकोसाठी काहितरी घेउन गेले पाहिजे तेव्हा बेत आखता येईल

मस्त... एकदा नक्की करुन बघणार :)

पैसा's picture

29 Nov 2012 - 9:24 pm | पैसा

साधी सोपी पाकृ. डाळिंबाचे दाणे आणि भोपळी मिरची यामुळे दिसतेय छान आणि चव पण वेगळी आली असणार!

लीलाधर's picture

29 Nov 2012 - 11:04 pm | लीलाधर

आजच डब्यात पोळी = दिली होती आईने. ह्यालाच पचडी असेही एक नांव आहे. फार फार आवडीचा प्रकार आहे :)

कच्ची कैरी's picture

30 Nov 2012 - 11:56 am | कच्ची कैरी

मस्त आणि सोपी :)
http://mejwani.in/

जागु's picture

2 Dec 2012 - 11:28 pm | जागु

छानच.

गौरि's picture

10 Dec 2012 - 1:13 pm | गौरि

मस्त रेसिपि