"जय जय सुरवरपुजित" विषयी

अस्वस्थामा's picture
अस्वस्थामा in काथ्याकूट
17 Nov 2012 - 4:09 am
गाभा: 

अजय अतुल यांच्या एका गीत संग्रहामध्ये हे गाणे ऐकले..
अतिशय सुंदर लय आणि शब्द अगदी भारून टाकतात..
परंतु प्रयत्न करून ही याचे बोल कुठे मिळाले नाहीत. कुठलीही माहिती देखील नाही.. अजय अतुल यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी देखील याचे रचनाकार माहित नाहीत असे सांगितल्याचे आठवतेय..
तसा youtube वर एक audio सापडला..
मग बोल कसे-बसे लिहिले आहेत..

जाणकारांनी कृपया दुरुस्त्या सुचवाव्यात तसेच अर्थदेखील सांगू शकलात तर उत्तमच..
धन्यवाद..
---
जय जय सुरवरपुजित जित दानव कलभ ।
आस्वरवरलम्बोदर दर हर हर कलभ ॥

नवमी श्री भगवंतम् गणपती मति वरदम् ।
वरदंति मुखम् सुमुखम् सादर मे करदम् ॥

वरदम् विपदुधौतम् धौतमलम् शमलम् ।
शमलम् विदम् पिदतम् हत पापी शमलम् ॥

तरुणारुणरुचिरम् तरुणम् श्रीकांतम् ।
कांतम् कलितै कांतम् कलयेसुदुरम् ॥

करुणा वरुणा दयचरणम् दुजितरणम् शरणम् ।
या मोयमिरम् शरणम् द्रुतमतसुवितरणम् ॥

जय जय सुरवरपुजित जित दानव कलभ ।
आस्वरवरलम्बोदर दर हर हर कलभ ॥
---

प्रतिक्रिया

चेतन माने's picture

17 Nov 2012 - 5:09 pm | चेतन माने

मीही बर्याच ठिकाणी गाणे शोधत होतो पण पूर्ण गाणे मिळाले नाही, बरच झाल तुम्ही लिहिलत ते शब्द खरच भारावून टाकणारे आहेत .

चेतन माने's picture

17 Nov 2012 - 5:09 pm | चेतन माने

मीही बर्याच ठिकाणी गाणे शोधत होतो पण पूर्ण गाणे मिळाले नाही, बरच झाल तुम्ही लिहिलत, शब्द खरच भारावून टाकणारे आहेत .

मीनल's picture

18 Nov 2012 - 12:08 am | मीनल

अनेकदा ऐकले आणि अजून ही ऐकेन. गणेशस्तुती अतिशय आवडली.

बायडी's picture

22 Nov 2012 - 9:52 am | बायडी

आस्वरवरलम्बोदर दल हर हर कलभ ॥

वरदम् विपदुदधौतम् धौतमलम् शमलम् ।

कांतम् कलितै कांतम् कलयेसुदुरंतम्

मदनबाण's picture

22 Nov 2012 - 9:57 am | मदनबाण

अरे वा... छान. :)

चैतन्य दीक्षित's picture

23 Nov 2012 - 7:36 am | चैतन्य दीक्षित

खूप आवडते गाणे आहे. गाण्यात बरीचशी विशेषणे वापरली आहेत गणपतीसाठी..
जय जय सुरवरपूजित जितदानवकलभ
(देवांनी ज्याची पूजा केली आणि ज्याने दानवसैन्यावर विजय मिळवला अशा गणेशाचा जय असो)
भास्वरवर लम्बोदर दरहर हरकलभ |
(जो तेजस्वी आहे, लंबोदर आहे, भय दूर करणारा आहे आणि हराचा म्हणजे शिवाचा मुलगा आहे)

नौमि श्री भगवन्तं गणपतिमतिवरदं
वरदन्तीमुखं सुमुखं सादरम् एकरदं तम् |
(जो वर देणारा आहे, गजमुख, सुमुख आणि ज्याला केवळ एक दात आहे अशा गणेशाला माझा नमस्कार असो)

ह्यापुढचे गाण्याचे शब्द आणि त्यांचा अर्थ जरा अजून शोध घेऊन देईन.

अस्वस्थामा's picture

24 Apr 2013 - 5:05 am | अस्वस्थामा

धन्यवाद.. उर्वरित अर्थ सांगू शकेल काय ?