बाळासाहेब....

उदय ४२'s picture
उदय ४२ in काथ्याकूट
16 Nov 2012 - 8:31 pm
गाभा: 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या तब्येतीची काळ्जी सध्या प्रत्येक मराठी माण्साला लागलेली आहे. आपणदेखील प्रार्थना करूयात

प्रतिक्रिया

एखाद्यावर जीव ओवाळुन टाकावा अशी माणसे खुप कमी असतात. बाळासाहेब त्यातलेच एक. आपलं आयुष्य कमी करुन ते ज्याला दयावेसे वाटावे अशी माणसे (आईवडील, भाऊबहिण असे जवळचे नातेवाईक वगळुन) खुप कमी असतात. बाळासाहेब त्यातलेच एक. इतक्या कठीण प्रसंगातुन ते जात आहेत आणि इतक्या लोकांच्या सदिच्छांवर आजाराशी झुंजत आहेत. त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच देवाचरणी प्रार्थना. दसरा मेळाव्यातील भाषण ऐकुन काळजात चर्र होणं म्हणजे काय ते माझ्यासारख्या अनेक लोकांना कळलं. पुढील दसरा मेळाव्यात ते पुर्वीच्याच उत्साहात बोलताना दिसावेत हीच इच्छा.

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Nov 2012 - 10:01 am | श्री गावसेना प्रमुख

आई भवानीच्या आशिर्वादाने बाळासाहेबांना उदंड आयुष्य लाभो.
जय शिवराय.

हुप्प्या's picture

17 Nov 2012 - 11:26 am | हुप्प्या

बाळासाहेबांच्या आजारपणाविषयी जे वाचायला मिळते ते मुख्यतः किती व्ह्यायपी लोकांनी हजेरी लावली इतकेच.
पण नक्की रोग काय आहे हे गुलदस्त्यातच आहे. कुणाला माहित आहे का की त्यांना नक्की आजार काय आहे?
काही असले तरी लवकर बरे होऊन परत येवोत हीच इच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Nov 2012 - 11:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बातम्यांवरुन असं दिसतं, की बाळासाहेबांना श्वसनाचा त्रास आहे, आता हा श्वसनाचा त्रास कशामुळे होतो हे माहिती नाही. वाढलेलं वय आणि अन्य कारणेही असतील. याच वर्षी मे महिन्यातही बाळासाहेबांनी लिलावतीत उपचार घेतला आहे. बाळासाहेबांची प्रकृती आता सुधारत आहे, बाळासाहेब लवकरच ठणठणीत बरे होतील. बाळासाहेबांना उदंड आयुष्य लाभावं अशी प्रार्थना आहेच.

बाळासाहेब किती लोकप्रिय आहेत त्याची झलक दिसत आहे. सामना म्हणतो- दि न्यूयार्क टाइम्स, बीबीसी, पाकिस्तानी वृत्तपत्रांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी सातत्याने माहिती दिली आहे.

रक्ताने पत्र लिहिणे, होमहवन करणे, उपवास करणे, देवांना नवस करणे, देवी-मंदिरात आरत्या, मशिदीत पार्थना, तळागाळातील माणसापासून ते राजकीय दिग्गज-सिनेष्टार, उद्योगपतींच्या भेटी, वगैरे ही बाळासाहेबांवर असलेली श्रद्धा आणि लोकप्रियतेची पावतीच आहे, यात काही वाद नाही.

-दिलीप बिरुटे

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Nov 2012 - 3:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे

Times of India च्या संकेत स्थळावर बाळासाहेबांबद्दल कुठलीही बातमी असेल तर खाली अनेकांनी शिव्यांची लाखोली वाहिलेली असते. त्यात एक प्रश्न नेहमी विचारतात हे लोक, की या माणसाने मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी किंवा मराठी माणसासाठी नेमके काय केले? एकेकाळचा सेनेचा मतदार असूनसुद्धा समोरच्याच्या तोंडात मारल्यासारखे उत्तर मला देता येत नाही. कुणी इथे सांगू शकेल काय?

कवितानागेश's picture

17 Nov 2012 - 4:00 pm | कवितानागेश

योग्य उत्तरे देउनही त्यांना शिव्या घालणे थांबेल अशी वेडी आशा बाळगायला तुम्ही कुठून शिकलात विमेकाका?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Nov 2012 - 5:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे

योग्य आणि चोख उत्तर माहित असावे म्हणून. नेटवरील random माणसांना गप्प करण्यासाठी म्हणून असे नाही.

बॅटमॅन's picture

17 Nov 2012 - 10:25 pm | बॅटमॅन

अगदी अगदी हेच म्हणतो. बाळासाहेब हे एक प्रचंड प्रभावी व्यक्तिमत्व होते यात शंकाच नाही- पण त्यांचे भरीव कार्य असे ते काय? असे विचारले असता भावनोत्कट उद्गार तेवढे पहावयास मिळतात. ज्या माणसाने गेली ४० वर्षे मुंबैवर राज्य केले त्याच्या बाबतीत हा प्रश्न विचारणे म्हणजे लयी नाही मागणे असे मलादेखील वाटते.

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Nov 2012 - 7:03 pm | श्री गावसेना प्रमुख

विरोध करणार्याला आपण कितीही खरे सांगीतले,तरी त्याचे समाधान होत नाही.
त्याचा हेतु फक्त विरोधासाठी विरोध असतो.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Nov 2012 - 7:27 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अरे विरोध करणाऱ्यांचे सोडा, मला तरी सांगा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2012 - 10:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१] प्रस्थापित [आप्पा, तात्या, आबांना सोडून] राजकारणात सामान्य माणसाला राजकारणात संधी दिली. आमदार, खासदार,नगरसेवक, मुख्यमंत्री बनविले.
२] मराठी माणसांना नोकरी आणि उद्योग धंद्यात प्रथम स्थान द्यावं, यासाठी बाहेरच्या लोंढ्याला थोपवून मराठी माणसाला संधी मिळावी यासाठी अधिकचे प्रयत्न केले.
३] सामान्य माणसाला झुणका भाकर दिली. रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणुन सेना-भाजपच्या सरकारात उड्डानपुलं मुंबईत उभारली. वृद्धाश्रमासाठी योगदान.
४] मराठी माणसाला आणि हिंदु माणसाला मुंबई सुरक्षित केली.
५]
६]
७]
८]
९]
१०]

-दिलीप बिरुटे

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Nov 2012 - 10:46 am | श्री गावसेना प्रमुख

१] प्रस्थापित [आप्पा, तात्या, आबांना सोडून] राजकारणात सामान्य माणसाला राजकारणात संधी दिली. आमदार, खासदार,नगरसेवक, मुख्यमंत्री बनविले.
हेच ते +१

श्रीरंग_जोशी's picture

19 Nov 2012 - 10:48 am | श्रीरंग_जोशी

काही कामे अशी असतात की बाह्यदर्शनी त्यांचे महत्त्व दिसून येत नाही पण समाजासाठी व देशासाठी त्यांचे महत्त्व नक्कीच असते.

त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जात व पैसा या दोन गोष्टी न बघता त्यांनी अनेक तरुणांना घडवले, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसीत केले.

माणसाच्या जातीपेक्षा त्याच्या योग्यतेला किंमत देणारा व मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला पक्ष म्हणजे शिवसेना.

कुठलेही संकट असो वा अपघात, शिवसैनिक अर्ध्या रात्रीही मदत करायला सज्ज असतात. माध्यमांतून नेहमी असे चित्र उभे केले जाते की शिवसेनेचे कार्य केवळ मुंबईतच आहे पण गेल्या तीन दशकांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते कार्य जोमाने सुरू आहे.

९५ साली युती सत्तेमध्ये आल्यावर अनेक लोकोपयोगी व राज्याच्या दीर्घकालीन हिताच्या अनेक योजना यशस्वीपणे राबविण्यात आल्या त्यापैकी अनेक योजनांमागे बाळासाहेबांची प्रेरणा व दूरदृष्टी होती. मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गासाठी १९९१ सालीच तत्कालीन मुख्यमंत्र्याकडे (श्री शरद पवार) बाळासाहेबांनी प्रस्ताव मांडला होता ज्यावर अंमल झाला नाही. पण युतीच्या काळातच तो प्रकल्प जोमाने राबवण्यात आला.

अन सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशहिताकरिता वाजपेयींसारख्यांचे पंतप्रधानपदी राहणे आवश्यक होते. त्यासाठी देशातील अनेक प्रादेशिक पक्ष ब्लॅकमेलिंग करत असत व आपापल्या राज्याकडे अवाजवी निधी वळवून घेत असत. बाळासाहेबांनी उदार मनाने बिनशर्त पाठिंबा दिला होता. देशहितासाठी महाराष्ट्राने मोठ्या भावाची भूमिका निभावत त्याग केला. त्यामागे बाळासाहेबांचेच खंबीर नेतृत्व होते. राज्यहितापेक्षा राष्ट्राहिताचा विचार करणारे नेते म्हणजे बाळासाहेब.

मृगनयनी's picture

19 Nov 2012 - 6:54 pm | मृगनयनी

विश्वनाथ मेहेंदळे - Sat, 17/11/2012 - 14:11
नवीन

Times of India च्या संकेत स्थळावर बाळासाहेबांबद्दल कुठलीही बातमी असेल तर खाली अनेकांनी शिव्यांची लाखोली वाहिलेली असते. त्यात एक प्रश्न नेहमी विचारतात हे लोक, की या माणसाने मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी किंवा मराठी माणसासाठी नेमके काय केले? एकेकाळचा सेनेचा मतदार असूनसुद्धा समोरच्याच्या तोंडात मारल्यासारखे उत्तर मला देता येत नाही. कुणी इथे सांगू शकेल काय?

वि.मे. ....कालच्या बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला, अंत्यदर्शनाला २० लाखाहून जास्त जनता उपस्थित होती...
एखाद्याच महात्म्याचा मृत्यू हा पंचत्वात विलीन होण्याचा एक सोहळा असतो. आणि त्याच्या अंत्यविधीला 'न भूतो न भविष्यति'...अशी गर्दी होणं.. हे हजारो वर्षातून एकदाच होतं...

बहुतेक टा.ऑ.ई. च्या टीकाकारांना काल सणसणीत उत्तर मिळालं असेल!!!.....

जानु's picture

17 Nov 2012 - 5:02 pm | जानु

साहेब आता नाही राहिले.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Nov 2012 - 5:18 pm | अत्रुप्त आत्मा

गेले हो बाळासाहेब. :-(
आजच्या काळात हिंदू हा शब्द सन्मानानी घ्यायला शिकवला,तो बाळासाहेबांनीच!
आमची भावपूर्ण श्रद्धांजली.

मंदार कात्रे's picture

17 Nov 2012 - 8:56 pm | मंदार कात्रे

वाईटातून चांगले घडावे ............अशी एक अंधुक आशा ...................साहेबांची सेना आणि म न सेना आता तरी एक व्हावी...............!
साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली !

अनामिका's picture

17 Nov 2012 - 10:23 pm | अनामिका

आईबाबांच्या जाण्याने अनाथ झालेली मी आज माननिय बाळासाहेबांच्या जाण्याने खर्‍या अर्थाने पोरकी झाले.....
अस्वस्थ,नि:शब्द.........
जन्माने शिवसैनिक
"अनामिका"