धर्म आणि नीतिमत्ता

मराठे's picture
मराठे in काथ्याकूट
15 Nov 2012 - 10:39 pm
गाभा: 

आज सकाळी सकाळीच ही बातमी वाचनात आली आणि पुन्हा धर्माच्या नावाखाली चाललेल्या अघोरी प्रकारामुळे तळतळाट झाला.
सविता हलपनवार नावाची आयर्लंड मधे राहणारी स्त्री डॉक्टरांनी अबॉरशन करायला नकार दिल्यामुळे मेली. अर्थात तुम्हीसुद्धा ही बातमी वाचलीच असेल. आयरीश कायद्यानुसार, जोपर्यंत पोटातल्या बाळाचे हृदय चालू आहे तोवर अबोर्शन करू शकत नाही. त्या दुर्दैवी बाईच्या नवर्‍याने हरतर्‍हेने डॉक्टरांशी बोलून पाहीलं असणार पण तीन दिवस असह्य वेदना सहन करून शेवटी तीने प्राण ठेवला. थोडक्यात म्हणजे धर्माने (किंवा धर्माच्या नावाखाली लोकांनी) आणखी एक बळी घेतला. शेवटी लग्नबाह्य संबध ठेवल्याच्या संशयावरून बाईला दगडाने ठेचून मारणारे काय, नवरा मेला म्हणून त्याच्या बायकोला जिवंत जाळणारे काय आणि हे 'तथाकथित' डॉक्टर काय. सगळे एकाच माळेचे मणी.
मधे एकदा एक वाक्य वाचलेलं आठवलं 'नीतिमत्ता धर्माशिवाय असू शकते. पण धर्म नीतिमत्तेशिवाय असूच शकत नाही'. मागे एकदा अमेरिकेतील एका पाहणीत २०% लोकं कोणत्याही धर्माशी निगडीत नसल्याचं दिसून आलं. आणि ही टक्केवारी वाढतेय हे वाचून थोडं बरं वाटलं. अर्थात कोणत्याही धर्माशी निगडीत नसणे आणि कोणत्याही धर्माच्या लोकांबद्धल इन्डिफरंट असणे हया वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. धर्माची आणि कायद्याची सरमिसळ होऊ न देणं हे इतकं अवघड का आहे 'गॉड नोज'!

प्रतिक्रिया

सकाळी बातमी वाचली आणि दिवसभर कामात लक्ष लागलं नाही... आयर्लंडमध्ये एक गर्भवती स्त्री धर्मांधळेपणामुळे बळी पडते, नॉर्वेत एका दांपत्याकडून वेल्फेअरच्या नावाखाली त्यांची मुले काढून घेतली जातात. भारत लाखपटींनी बरा नाही का??

मला वाटतं इथे ही बाई भारतीय होती हा निव्वळ योगायोग आहे. हिच्याजागी खरोखर आयरीश बाई जरी असती तरी हेच झालं असतं. इथे भारतीय वि. इतर देश असा काही प्रश्नच नाहीये. धर्मांधळेपणामधे भारतही कमी नाहीच शिवाय इतर 'पुढारलेले' देशही नाहीत. त्यामुळे 'देश' हा मुद्दा इथे महत्वाचा वाटत नाही. सिएनेन वर बातमी खाली चालू असणारी प्रतिक्रियायुद्ध बर्‍याचदा याच मुद्द्यावरून होतात. 'जर इतकं होतं तर इथे कशाला राहायचं?' अशा प्रकारची विधानं सर्रास लिहिली जातात. पण त्या व्यक्तीचं तिथे राहाणं या गोष्टीचा या घटनेशी तसा काहीच संबंध नाही.

विकास's picture

16 Nov 2012 - 12:43 am | विकास

सहमत. झाले ते फारच त्या व्यक्तीच्या आणि तिच्या कुटूंबियांच्या दृष्टीने दुर्दैवी झाले. पण आयरीश समाज, अरोग्यव्यवस्था आणि कायदा यांच्या करता यात दुर्दवी नाही तर केवळ धर्मांधता आहे.

अमेरीकेत देखील या संदर्भात टोक गाठणारी माणसे आणि नेतेमंडळी आहेत. अर्थात तरी देखील असला प्रकार घडण्याची शक्यता कमी आहे. रीपब्लीकन पक्षातील दोन उमेदवारांनी केलेली खालील वक्तव्ये या अत्याधुनिक देशाबद्दल बरेच काही सांगून जातील...

Richard Murdock while speaking on abortion accepted it in case of harm to mother's life but in case of rape he said: "I struggled with it myself for a long time, but I came to realize life is that gift from God. I think that even when life begins in that horrible situation of rape, that it is something that God intended to happen."

The other candidate Rep. Todd Akin when was asked on similar issue said: “Well you know, people always want to make it as one of those things where how do you slice this particularly tough, sort of ethical question,” he replied. “It seems to me first of all, from what I understand from doctors — that’s really rare. If it’s a legitimate rape, the female body has ways to try to shut that whole thing down. But, let’s assume that maybe that didn’t work, or something. I think there should be some punishment, but the punishment ought to be on the rapist and not attacking the child.

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Nov 2012 - 10:13 am | श्री गावसेना प्रमुख

त्यांनी वेगळा विचार केला असता का ?

सुनील's picture

16 Nov 2012 - 9:14 pm | सुनील

नॉर्वेत एका दांपत्याकडून वेल्फेअरच्या नावाखाली त्यांची मुले काढून घेतली जातात

ह्या घटनेचा आणि धाग्यातील घटनेचा संबंध समजला नाही!

अवांतर असले तरीही, तुमचा (आणि इतरांचाही) गैरसमज होऊ नये म्हणून हा प्रतिसाद.

संबंधीत मुलांचे पालक (विशेषतः आई) ही मुलांचे संगोपन करायला असमर्थ होती हे कोर्टातही सिद्ध झालेले आहे. तेव्हा मुलांना त्यांच्या ताब्यातून काढून घेऊन, दुसर्‍या पालकांना दत्तक दिली जावी, हेदेखिल न्यायलयाने मान्य केले आहे.

म्हणूनच मुलांना (सुरुवातीस नॉर्वेजियन पालक) आणि नंतर भारतात मुलांचे चुलते (लक्षात ठेवा चुलते, जैविक आई-वडील नाहीत) यांच्या ताब्यात दिले गेले. तेदेखिल चुलत्याचे बालसंगोपन प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच!

असो.

दोन्ही घटना या कायद्याशी निगडीत आहेत व दोन्हींमध्ये मानवतेच्या मूलभूत तत्त्वाला काही चुकीच्या अशा टोकाच्या गृहीतकांचा आधार घेऊन कठोरपणे चिरडले गेले.

आयरीश कायद्यावरील धर्माचा पगडा जसा भारतातील उदारमतवादी व तटस्थ न्यायव्यवस्थेच्या तुलनेत मागासलेला व मध्ययुगीन वाटतो, तसाच नॉर्वेचा चाइल्ड वेल्फेअर एजन्सी नावाचा भयानक प्रकार आधुनिक समाजाच्या नावाखाली चाललेला सरकारी दहशतवाद आहे. दोन्हींमध्ये काही बाबी समान आहेत. एखाद्या वरवर उदात्त वाटणार्‍या तत्त्वाभोवती भ्रामक समजुतींचे आवरण गुंडाळून त्याला कायद्याचे रूप द्यायचे आणि अशा तरतुदींचा वेळोवेळी स्वतःला सोयीस्कर वाटेल असा अर्थ काढून नको तिथे व्यक्तींच्या आयुष्यात हस्तक्षेप करायचा अधिकार मिळवायचा, मात्र जिथे हस्तक्षेप, कृती हवी तिथे मख्खपणे डोळ्यांवर कातडे ओढून पेंगत रहायचे हा प्रकार दोन्ही बाबतीत घडला आहे. जगात अनेक ठिकाणी अनेकदा घडत असतो.

न्यायालयामध्ये न्याय मिळत नाही. मिळतो तो निकाल. हा निकाल म्हणजे प्रचलित कायद्यांच्या चौकटीत राहून लावलेला अर्थ असतो. दोन्ही बाजूंनी मांडलेल्या युक्तिवादांपैकी ज्या बाबी, जी विधाने स्वीकारली जावीत असे सांगतो तो निकाल असतो. तो तर्कसंगत असला तरी न्याय्य असेलच असे नसते. किंबहुना न्यायतत्त्वाला हरताळ फासणार्‍या अनेक कायद्यांमुळे व त्यातील पळवाटांमुळे, दिरंगाईमुळे अन्याय झालेल्या पक्षावर पुन्हा त्याच अन्यायाला बरोबर ठरवले गेलेले डोळ्यांदेखत पाहत राहणे याखेरीज काहीच उरत नाही.

जर अशा रितीने कायदा अपूर्ण असतो व वेळप्रसंगी तो अन्याय्यही असू शकतो असे मान्य केले तर मग प्रश्न असा उरतो की अशा कायद्याच्या तरतुदींचा योग्य अन्वयार्थ काढणे हे कोणाचे काम आहे? हे काम आणि हा अधिकार तो कायदा करणारे, वापरणारे, बजावणारे व त्याआधारे न्यायदान करणारे यांचा आहे. भारत व इतर देश यांची जी मी तुलना केली ती नेमकी यासंदर्भात होती. त्यात कुठेही 'जर इतकं होतं तर इथे कशाला राहायचं?' अशा प्रकारची पिंक टाकली नाही. भारत इतर पुढारलेल्या देशांच्या तुलनेत उजवा यासाठी ठरतो कारण इथल्या समाजमनात एक प्रकारचा प्रचंड उदारमतवादी व मानवतावादी अंतर्प्रवाह वाहत आलेला आहे. इथले कायदे जसे धार्मिक प्रभावांच्या दृष्टींनी तटस्थ आहेत तसेच इथली न्यायव्यवस्था इथल्या कायद्यांचा सुसंगत व योग्य किंवा न्याय्य अर्थ लावण्याच्या बाबतीत प्रचंड कार्यक्षम आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर शहाबानो प्रकरण किंवा वो़डाफोन प्राप्तीकर प्रकरण आहे. या दोन्ही बाबतीत शेवटी सरकारला आपले म्हणणे खरे करण्यासाठी कायदाच बदलावा लागला. अशा प्रकारचा ज्युडिशिअल एक्टिविजम इतर देशांत तितका दिसून येत नाही. नॉर्वेतील प्रकरणात पालक (विशेषतः आई) ही मुलांचे संगोपन करायला असमर्थ होती हा न्यायालयात चाइल्ड वेल्फेअर एजन्सीने युक्तिवाद केला तेव्हा तो जसाच्या तसा मान्य करताना तेथील न्यायालयाने केवळ मख्खपणाचे व असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले. हा कायदा असा आहे की एकदा तुमच्याकडून तुमच्या मुलांचा ताबा काढून घेऊन फॉस्टर केअर मध्ये त्यांना पाठवल्यानंतर त्याला कशाही प्रकारे आव्हान देता येत नाही. हा निर्णय अंतिम असतो. फॉस्टर केअर मध्येही अशा मुलांचे योग्य संगोपन व संरक्षण होईलच असे नसते. श्टीग लार्सन यांची मिलेनिअम ट्रिलॉजी ज्यांनी वाचली असेल त्यांना याची कल्पना असेल. या प्रकरणात भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हस्तक्षेप केल्यावरच हा खटला पुन्हा चालवला गेला व भारताच्या दबावानंतरच ज्या चाइल्ड वेल्फेअर एजन्सीने मुले काढून घेतली जावीत व त्यांचा ताबा इतर कुठल्याही नातेवाईकांकडे दिला जाऊ नये असे रेकमेंडेशन कुटुंब न्यायालयाला आधी दिले होते त्याच एजन्सीने मुलांचा ताबा मुलांच्या काकांकडे दिला जाऊ शकतो व मुले भारतात परतू शकतात असा 'तोडगा' सुचवला. हा सर्व प्रकारच भारतीय मानसिकतेनुसार अनाकलनीय होता. ती मुले भारतीय नागरिक आहेत व त्यांनी कुठला गुन्हा केला नसताना इतर कुठल्याही देशाला अशा प्रकारे त्यांचा व्हिसा आपण होऊन वाढवून त्यांना ताब्यात ठेवणे कायदेशीरदृष्ट्याही शक्य नाही हा भारताचा युक्तिवाद होता.

आयर्लंडमध्ये केवळ त्या गर्भाच्या ह्रदयाचे ठोके पडत होते म्हणून गर्भपाताला नकार देणे व त्या जीवघेण्या वेदनांनी तळमळणारी स्त्री तशीच तडफडू देणे हे तद्दन पुरूषप्रधान मध्ययुगीन विकृतीचे लक्षण होते. इथेही असाच एक बथ्थड कायदा, त्या कायद्याचा मानवतेशी सुसंगत अर्थ लावायला नकार देणारी व्यवस्था व त्यापायी मानवी आयुष्यांची झालेली ससेहोलपट हे काही समान मुद्दे होते. दोन्ही बाबतीत अन्यायाला बळी पडलेली माणसे भारतीय होती याचा संबंधच नाही. मानवतेचे तत्त्व कुठल्या नागरिकत्वाशी बांधील नसते.कुठल्या देशांच्या सीमांपाशी ते थांबत नाही. आणि कुठल्या निर्दयी कायद्याची त्याला तमा नसते...

मला फक्त एवढेच म्हणायचे आहे.

राहता राहिला विकास यांनी उपस्थित केलेला मुद्दा - अशा नेत्यांची खुलेआम मारली पाहिजे. मग त्यांना समजेल बलात्काराची मनावर होणारी जखम काय असते ते...

सुनील's picture

16 Nov 2012 - 8:58 pm | सुनील

अत्यंत दुर्दैवी घटना.

वरकरणी पाहता, संबंधित डॉक्टरांचा धर्मभोळेपणा कारणीभूत असावा असे दिसते.

पण मूळ कारण अर्थातच, कायाद्याची संदिग्धता. कायदा जर पुरेसा सुस्पष्ट असता तर, डोक्टरांच्या धर्मभोळेपणालाही मर्यादा आल्या असत्या.

झाले ते झाले. आता तरी आयरिश (आणि इतरत्रही) गर्भपात कायद्यात जरूर त्या सुधारणा झाल्या तर, ही घटना म्हणजे इष्टापत्ती असे म्हणता येईल.

तिमा's picture

16 Nov 2012 - 9:10 pm | तिमा

ही घटना म्हणजे इष्टापत्ती असे म्हणता येईल.

याप्रसंगी 'इष्टापत्ती' हा शब्दप्रयोग अयोग्य वाटतो.

पुण्याचे वटवाघूळ's picture

16 Nov 2012 - 9:52 pm | पुण्याचे वटवाघूळ

आयरीश कायद्यानुसार, जोपर्यंत पोटातल्या बाळाचे हृदय चालू आहे तोवर अबोर्शन करू शकत नाही.

घडल्या घटनेला नक्की कोण जबाबदार आहे याचे उत्तर तुम्हीच दिले आहेत.आयरिश कायद्यात त्रुटी आहे आणि त्या त्रुटीमुळे या महिलेचा दुर्दैवाने बळी गेला.कॅथॉलिक धर्मात नक्की काय सांगितले आहे हे मला माहित नाही आणि ते माहित करून घ्यायची अजिबात इच्छा देखील नाही पण धर्मात काहीही सांगितले असले तरी असा कायदा करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे ही संबंधित माणसांची चूक आहे. हरियाणातील खाप पंचायतीचे लोक जातीबाहेर प्रेम केल्याच्या 'गुन्ह्याबद्दल' हाडामासाच्या माणसांना ठार मारायला मागेपुढे बघत नाहीत ते पण कोणत्या तरी जुन्या ग्रंथाच्या/परंपरेच्या नावानेच आपल्या कृत्याचे समर्थन करतात.पण या प्रकारांमागे त्या ग्रंथाला/परंपरेचा दोष असला तरी त्या माणसांचा दोष कोट्यावधी पटींनी जास्त नाही का?

या चर्चाप्रस्तावात त्या डोक्टरांची/कायदा बनवलेल्यांची चूक आहे यापेक्षा धर्मावर जास्त भाष्य दिसत आहे. मी पण धर्मवाला अजिबात नाही.पण या चर्चेत धर्माला जास्त दोष देणे अस्थानी वाटते.

पुण्याचे वटवाघूळ's picture

16 Nov 2012 - 10:07 pm | पुण्याचे वटवाघूळ

३-४ वर्षांपूर्वी मुंबईत एक केस झाली होती. एका महिलेला तिच्या गर्भात व्यंग आहे हे सोनोग्राफीत समजून आले आणि तिला गर्भपात करायचा होता.भारतीय कायद्याप्रमाणे २० व्या आठवड्यापर्यंतच गर्भपात करता येतो पण ही महिला त्यानंतर डॉक्टरकडे गेल्यामुळे डॉक्टरांनी गर्भपात करायला नकार दिला.गर्भपाताची परवानगी मिळावी म्हणून ती कोर्टात गेली पण न्यायाधीशांनी सद्यकालीन कायद्याप्रमाणेच निवाडा करणे आमच्या हातात आहे, कायदा बदलणे आमच्या हातात नाही असे म्हणत तिचा अर्ज फेटाळला.नंतर त्या महिलेची प्रसूती झाली पण मूल जन्मतः मृत निपजले.सुदैवाने त्या महिलेला काही त्रास झाला नाही आणि नंतर तिला मुलगाही झाला असे वाचले होते.त्या महिलेला किंवा अन्य कोणालाही कसलाही त्रास व्हावा अशी इच्छा नक्कीच नाही तर सगळ्यांचे चांगलेच व्हावे ही सदिच्छा.

पण भविष्यात परत अशी एखादी केस आली आणि आईच्या जीवाला धोका आहे हे २० व्या आठवड्यानंतर समजले तरी कायद्याप्रमाणे गर्भपात करता येतो का याची कल्पना नाही.पण तो करता येत नसेल तर मात्र ती भारतीय कायद्यातील त्रुटी झाली असे म्हणता येईल.आणि भविष्यात असा प्रसंग दुर्दैवाने कोणावर आला तर नक्की दोष कोणाला देणार? कायद्यालाच ना?की कुठलेतरी जुने पुस्तक काढून त्या पुस्तकात काहीतरी लिहिले आहे त्याला?

आर्यलंड प्रकरणी वेगळे काही आहे असे वाटत नाही.

मैत्र's picture

16 Nov 2012 - 11:16 pm | मैत्र

मेडिकल कॉम्प्लिकेशन साठी गर्भपात करता येतो / काही वेळा आईच्या सुरक्षिततेसाठी करावा लागतो. फरक इतकाच आहे की पूर्ण प्रोसिजरसह डिलिव्हरी करावी लागते. २० आठवडे झाल्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी प्रमाणे foetus बाहेर काढावा लागतो.
बहुतांश वेळा बाहेर येईपर्यंत foetus चे ठोके थांबलेले असतात (आधी दिलेल्या काही ट्रीटमेंट मुळे)
आणि कायदेशीर बाबी डॉक्टर आणि पालकांना पूर्ण कराव्या लागतात. पण कायद्याने यात अडवणूक नाही किंवा खूप कोर्ट कचेरी इत्यादी भानगडीही नाहीत. मेडिकली मात्र अर्धवट वाढ / अति लवकर डिलिव्हरी यामुळे प्रोसेस वेदनादायी असते.

मंदार कात्रे's picture

16 Nov 2012 - 10:16 pm | मंदार कात्रे

अतिशय दुर्दैवी घटना . अंधश्रद्धाळू फक्त हिंदूच असतात असे कोकलणाऱ्या महाभागांना सणसणीत चपराक !

या बाबतीत सविताच्या समर्थनार्थ आणि असे पुन्हा जगभरात कुठेही होऊ नये म्हणून एक व्यापक चळवळ (निदान फेसबुक/इंटरनेट वर तरी )चालवून करोडो भारतीयांच्या सह्या असलेले निषेधपत्र संबंधित चर्च/ देशांच्या सरकारांना पाठवणे आवश्यक.

आपण तेवढे तरी निदान केळेक पाहिजे असे वाटते..................!