नमस्कार !! सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आपल्याला माहित आहेच की मराठी ईंटरनेटचा विकास करण्यासाठी नमस्कार हे ई मासिक गेले वर्षभर सुरु आहे . विविध क्षेत्रातील मान्यवरांना , जे सहसा ईंटरनेटवर लिहित नाहीत , त्यांना लिहिते करायचा प्रयत्न आम्ही या उपक्रमातुन केला, ज्यामुळे इ वाचकाना नवनवे वैविध्यपुर्ण साहित्य वाचता येईल ,या उपक्रमात मिसळपाव. कॉम ने मोलाची साथ दिली आहे . त्यासाठी नीलकांत , प्रशांत व छोटा डॉन यांचे विशेष आभार .
आता हीच भुमिका आणखी पुढे नेत आम्ही "नमस्कार ई दिवाळी अंक " आणला आहे . या अंकाचे प्रकाशन नुकतेच एबीपी माझा चे स्टार अँकर प्रसन्न जोशी यांच्या हस्ते झाले.
या अंकाचे अतिथी संपादक ज्येष्ठ लेखक , भारताचे मालदिव मधील उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे हे आहेत . या अंकात संगीतकार ,गायक सलील कुलकर्णी ,ज्येष्ठ नाटककार , लेखक चं.प्र देशपांडे संपादक- लेखक संजय आवटे, लक्ष्मीकांत देशमुख , लीना मेहेंदळे , अवधुत परळकर , श्रीनीवास नार्वेकर यांसारखे दिग्गज लेखक , साधनाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ,राष्ट्रीय चित्रपटपुरस्कार विजेता नागराज मंजुळे , "दॅट्स द वे वी मेट" सारख्या ईंग्लिश कादंबर्यांचा बेस्टसेलर लेखक सुदीप नगरकर , काश्मिर मध्ये काम करणारा तरुण कार्यकर्ता अधिक कदम अशा दिग्गजांचा समावेश आहे . हे सर्व दिग्गज पहिल्यांदा ई दिवाळी अंकात लिहिते झालेले आहेत .
सर्व ई वाचकांना हा अंक ही एक मेजवानी ठरेल असे आम्हाला वाटते . हा अंक मिपाकरांसाठी उपलब्द्ध करत आहे .
या अंकाची पीडीएफ उपलब्ध आहे
याशिवाय प्रत्येक लेख वेगळा वाचण्यासाठी , त्यावर चर्चा करण्यासाठी http://www.namaskarnetwork.com/
येथे उपलब्द्ध आहे .
या प्रयोगाबाबत आपले मत नक्की सांगावे , आणि अंक आवडल्यास बिनधास्त इतरांना पाठवावा
लोभ आहेच , तो वाढत रहावा ही प्रार्थना .
धन्यवाद !!!!
आपला नम्र ,
विनायक
प्रतिक्रिया
14 Nov 2012 - 12:25 pm | ऋषिकेश
पीडीएफ आवृत्ती बघायला गेलो असता हा इरर आला:
Sorry, the page (or document) you have requested does not exist.
Please check the address and try again.
14 Nov 2012 - 12:51 pm | संजय क्षीरसागर
http://goo.gl/h2yx9
विनायकश्री, मनःपूर्वक धन्यवाद!