नमस्कार मंडळी,
सर्वांना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. हि दिवाळि सगळ्यांच्या सगळ्या ईच्छा / आकांक्षा सुफळ सपुर्ण करो.
तर इतके दिवस मीपाचा नीयमीत वाचक होतो आणि इथे प्रकाशित होण्यार्या सर्व गोष्टींचा मनापासुन आनंद घेत होतो आणि राहिन. आता हा आनंद अजुन द्विगुणित करण्यासाठि मी सुरु केलेला हा छोटासा प्रयत्न.
वाचताना काना, मात्रा, वेलांटया चुकलेल्या दिसतील...तेव्हा सांभाळुन घ्या.
कोफ्ता करि....उपासाची
साहित्यः १. कोफ्त्या साठि
१. किसलेलं कच्च केळं - १
२. उकडलेला बटाटा - १
३. कोथिंबिर, आलं, हिरवी मीरची पेस्ट - १ चमचा (पाणि न घालता वाटणे)
४. जीरं पुड - १/२ चमचा
५. राजगीरा / साबुदाणा पीठ - प्रत्येकि १ मोठा चमचा किंवा उपासाची भाजणी २ मोठे चमचे
६. चवीनुसार मीठ
७. ताक किंवा पाणि - गरजेप्रमाणे पीठ मळण्यासाठि
८. तळण्यासाठि तेल किंवा तुप
२. ग्रेव्ही साठि:
१. दाण्याचं कुट - २ मोठे चमचे
२. ओलं खोबरं, कोथिंबिर, आलं, हिरवी मीरची पेस्ट - १/२ छोटि वाटि (मुलायम वाटुन घेणे)
३. तुप, जीरं - फोडणी साठि
४. चवीनुसार मीठ / साखर
कृती:
१. प्रथम एका मोठ्या बाउल मधे कोफ्त्यासाठि दिलेले सर्व साहित्य एकत्र करावे. गरजेप्रमाणे ताक किंवा पाणि घालुन गोळा मळावा. शक्यतो ताक / पाणि लागत नाही कारण केळ्याचा ओलसरपणा पुरतो.
२. तयार पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करुन मंद आचेवर तेलात किंवा तुपात तळावेत. कमी तेलकट / तुपकट करणयासाठि सानिका नि सांगीतल्याप्रमाणे आप्पे पात्राचा वापर करावा
३. आता ग्रेव्ही साठि एका कढईत तुप - जीर्याची फोडणी करावी
४. त्यात तयार केलेली पेस्ट (नंबर २ मधे दिलेली) टाकुन जरा वेळ परतावे
५. मग दाण्याचं कुट टाकुन पाणि घालावे. ग्रेव्ही कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याच प्रमाण ठरवणे
६. चवीनुसार मीठ / साखर घालुन मंद आचेवर एक ५ मीनटं ग्रेव्ही उकळु द्यावी आणि गॅस बंद करावा
७. बाउल मधे तयार कोफ्ते ठेउन वरुन ग्रेव्ही घालावी
गरमा गरम कोफ्ता करी वरी तांदुळाचा भात, वरुन साजुक तुपाची धार, लिंबाचं लोणचं आणि भाजलेला / तळलेला बटाट्याच्या पापडा सोबत सर्व करावी...
टिपा:
१. कोथिंबिरिमुळे ग्रेव्ही ला छान हिरवा रंग येतो पण माझ्या मते उपासाला कोथिंबिर वापरत नाही पण जर चालत असेल तर कोथिंबीर एवजी खायचा रंग घालु शकतो...जाणकारांनी प्रकाश टाकावा.
२. केळि उकडुहि शकतो पण मळताना मीश्रण एकजीव होइल हे पहावे म्हणजे तळताना कोफ्ते फुटणार नाहित
३. दाण्याच्या कुटामुळे ग्रेव्ही लवकर आळु शकते म्हणुन गरज असल्यास वाढते वेळि थोडे पाणि घालुन ग्रेव्हि सारखि करावी
४. कोफ्ते अगदि आयत्या वेळेस घालावे म्हणजे त्याचा लगदा होणार नाही
५. नुसते कोफ्तेहि नारळाच्या चटणि सोबत छान लागतात
चला तर मग...करा आणि कळवा! शुभेच्छा!
प्रतिक्रिया
13 Nov 2012 - 3:24 pm | जयवी
अरे वा..... पहिल्या पोस्टबद्दल अभिनंदन दीपक :)
पाककृती एकदम झकास :) फोटो पण मस्तच आलेत.
आता लिहिता रहा... :)
शुद्धलेखनाचं मात्र बघ रे..... !!
13 Nov 2012 - 7:40 pm | पैसा
मिपावर स्वागत! नवीन आणि एकदम वेगळीच पाकृ. फोटोही सुरेख आलेत. असेच लिहीत रहा!
13 Nov 2012 - 7:56 pm | रेवती
अरे वा! वेगळी पाकृ.
14 Nov 2012 - 10:37 am | प्रास
आयला, हे छान आहे की! करून बघायला हरकत नै. पण ठरल्याप्रमाणे नेहमीचा प्रतिसाद देण्याशिवाय गत्यंतर नै, नै का? ;-)
धागा वाचला. फोटो पाहिले.
धन्यवाद.
14 Nov 2012 - 12:33 pm | दिपक.कुवेत
जयश्रि, पैसातै, रेवती आज्जी आणि प्रास...सगळ्यांना धन्यवाद
14 Nov 2012 - 2:05 pm | neeta
सुंदर, करुन बघायला पाहिजे.
14 Nov 2012 - 2:51 pm | अनन्न्या
असे पदार्थ असतील तर उपास करावेच लागतील.तेवढेच उपासाचे पुण्य!
14 Nov 2012 - 3:45 pm | चिंतामणी
सोप्पी आणि मस्त पाकृ.
बादवे. कोथिंवीर उपासाला चालते.
खाण्याचा रंग कोथिंबिरीच्या चविची जागा घेउ शकत नाही.
५. नुसते कोफ्तेहि नारळाच्या चटणि सोबत छान लागतात. या टिपबद्दल धन्यु.
परन्तु पाकृ वाचण्यापुर्वी फटु पाहील्यावरच हे डोक्यात आले होते.
16 Nov 2012 - 1:58 am | दीपा माने
मिपाच्या पाकृ विभागात आपले स्वागत. ही नविन पाकृ करायला आणि खायला आवडेल. नविन पाकृच्या प्रतिक्षेत!
17 Nov 2012 - 8:31 am | कच्ची कैरी
अरे वा नविनच !!!
http://mejwani.in/
19 Nov 2012 - 10:47 am | पियुशा
कोफ्ते भारीच पण आलं उपवासाला चालत का ?
क्रुपया शंकानिरसन करावे
19 Nov 2012 - 11:38 am | दिपक.कुवेत
सगळ्या रसिक खवय्यांचे मनापासुन धन्यवाद.
पियुशा...आलं उपवासाला चालत...म्हणजे घालु शकतेस :)