इंडिअन पोस्टाचा अनुभव

प्रशांत हेबारे's picture
प्रशांत हेबारे in काथ्याकूट
9 Nov 2012 - 5:30 pm
गाभा: 

मला आलेला पोस्टाचा अनुभव एकदम झकास आहे.

तेच्या अगोदर पाठीमागची महिती सांगतो

माझी मुलगी अदिती तीन महिन्यापूर्वीच स्वीडन ला शिकायला गेली रोटरी युथ एक्ष्चेन्ज मार्फत. दिवाळी असल्यामुळे तिला दिवाळीचा फराळ पाठवायचा ठरला. तिने आम्हाला स्काएप मार्फत लिस्ट पाठीवली. चकली, कारंजी, लाडू, चिवडा, चटणी वगरे.
बायकोने इकडे पदार्थ कारायला घेतले. तीन ते कार दिवसामध्ये तिचे पदार्थ बनले. आता माझे काम सुरु झाले. पुस्तके, चितळे चे काही पदार्थ विकत घेतेल आणि रात्री सर्व प्याक केले. सगळ्या कुरीरअर् वाल्याकडून चार्जेस घेतले ते खालीलीप्रमाणे,
DHL – Rs. 3800 per Kg
Unique Express & all other courier – Rs. 3200 per Kg.

अरे बापरे पाच किलो ला रुपये १६००० पडतील. माझी तर हवाच सुटली. बायको पण हवालदिल झाली. मग मी व्होरा वळवला आपल्या सरकारी कुरिएअर वाल्याकडे. स्पीद्पोस्तला फोने केला. तेवा स्पीद्पोस्त ने सांगितले कि आमची सर्विस फक्त पेपर करिता आहे तेवा तुम्ही World net Express ला संपर्क साधा. शेवटी World net Express चा नुम्बेर मायाजाल वर शोधला आणि त्यांना संपर्क केला. विचार केला आता मुलीच्या नशिबात दिवाळीचा फराळ नाही. कारण शेवटी सरकारी कुरिअर वाल्यांना विचारतोय आणि ते काय मदत करणार. आणि कधी पोहचणार. संपर्क केल्यानंतर पहिला झटका म्हणजे आम्ही तुमचे पार्सल पाठऊ. त्यांनी पुन्यातल्या पोस्टाची नावे दिली. मला त्यांनी चार्जेस सांगितले पाच किलोस फक्त २९०० रुपये स्वीडन ला पाठवायचे.

पार्सल घेऊन मी ऑफिसला गेलो. माझ्या ऑफिस बॉय ला ( रोशन) सांगितले युनिवर्सिटी च्या पोस्त ऑफिस मध्ये जायचे आहे तेव्हा declaration certificate करून ठेव. सकाळी ११ वाजता युनिवर्सिटी पोस्टात निघालो. पंधरा मिनिटं मध्ये पोस्टात पोहोचलो. आता सुरु झाला सरकारी झटका.

काउनटर च्या मुलीला विचारले पार्सिल पाठवाचे आहे स्वेडेन ला. उत्तर आले - फक्त पेपर्स पाठीवले जातात. मी विचारले तुमच्याकडे World net Express आहे ना. उत्तर आले – आहे.
मग का पाठवत नाही. आम्हाला माहिती नाही - उत्तर आले. मग मी काय करू, मी अगोदर World net Express फोने करून आलो आहे. उत्तर आले – आत चौकशी करा. आत गेलो. पोस्टमास्तर पाठमोरे काहीतरी करीत होते. पाच मिनुते तसाच थांबलो. इकडे रोशन चुलबुल करायला लागला. म्हणाला साहेब आपल्या ऑफिस कुरिअर ने पाठूया. मी तसाच चिकाटीने उभा राहिलो. पोस्टमास्तराचे पाठमोरे काम संपल्या वर तेंचे लक्ष माझ्याकडे गेले. त्यांना माझे काम सानिगातले तर ते म्हणाले फक्त पेपर्स पाठवता येतात. परत मी त्यांना सांगितले मी अगोदरच World net Express शी बोलोलो आहे. तेवा त्यांणी सांगितले १० मिनुते थांबा. मी परत १० ते पंधरा मिनुते समोरच थांबलो. मग त्यांनी मला विचारले World net Express चा फोने नंबर द्या. मी म्हटलो तुमच्याकडे नाही का. उत्तर आले – नाही.
मी परत पोस्टाच्या बाहेर आलो आणि ऑफिस ला फोन लावून माझ्या डायरी मधून World net Express घेतला. आत आल्या वर पोस्टमास्तर ने अनौंस केले तुमचे पार्सल पाठीवले जाणार नाही कारण घरगुती फराळ पाठीवता येत नाही. आता मात्र माझा पेशनस संपला. मी माझ्या भ्रमणध्वनी वरून World net Express ला फोन लावला आणि विचारले काय प्रोब्लेम आहे. World net वाल्याने सानिग्तले काहीच प्रोब्लेम नाही. मग हे पोस्टमास्तर का घेत नाही माझे पार्सल, सर्व कागद पत्रे असून. World net वाल्याने फोन पोस्टमास्तर ला द्या म्हणून. पाच मिनटा नन्तर पोस्टमास्तर ने माझे पार्सल घेतो म्हणून सांगितले. आता मात्र सर्विसे मध्ये फरक पडला. पोस्टमास्तर ने मला बसयला सांगितेले. सर्व पेपर चेक करून त्यांनी स्वतः कुरिअर स्लीप भरली. व माफी मागितली माहिती नसल्याबद्दल. आता येथून पुढे आपल्या सरकारचे काम दिसले ते असे
World net Express चा DHL कुरीअर करार आहे. सगळे देशाचे बाहेर पार्सेल DHL कुरीअर् ने पाठविले जातात. आपल्या सरकारने DHL ला इंडिया मध्ये बिसिनेस साठी World net Express शी करार केलेला आहे. खूप कमी पैसे मध्ये जेणे करून सगळ्यांना हि सुविधा उपलब्ध होईल व सर्व ठिकाणी. तीन ते चार दिवसामध्ये कुरीयर पोहोचले जाईल. मग ह्याची जाहिरात कशी नाही. बऱ्याच जणांना काही माहिती नाही. आणि पोस्टाने पाठवणे म्हणजे जाणारच नाही हा आपला ग्रह.
लिहिण्याचा प्रपंच एवढंच की कुणाला काही कमी पैसे मध्ये बाहेर पार्सल पाठवाचे असेल तर World net ने पाठवा. आणि कमी पैसे करिता थोडे कष्ट घ्यायला लागतात !

प्रतिक्रिया

प्रशा॑त हेबारे साहेब, अतिशय योग्य माहिती दिलीत.
World net Express बद्दल माहितच नव्हते ते तुम्ही सांगितलत म्हणुन तुम्हाला धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2012 - 5:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> World net Express बद्दल माहितच नव्हते ते तुम्ही सांगितलत म्हणुन तुम्हाला धन्यवाद
पण, मुलीला फराळ पोहचला ना ?

इंडिअन पोस्टाचा अनुभव म्हटल्याबरोबर पुलंचे '' माझे पौष्टिक जीवन' दुवा तयारच होता.

-दिलीप बिरुटे

प्रशांत हेबारे's picture

14 Nov 2012 - 8:07 am | प्रशांत हेबारे

काल संध्याकाळी सुखरूपपणे पोहोचला. आता दुसर्या पार्सल ची तयारी करतो आहे.

खेडूत's picture

9 Nov 2012 - 6:11 pm | खेडूत

झालं?
आता हे पण पहा!

http://www.esakal.com/esakal/20121104/4629946882920955524.htm

माझा बहुतेक कुठल्याच सरकारी सेवेवर विश्वास नाही. त्यामुळे बाहेर शोधले तर चांगले पर्याय मिळतात असे नेहमीच दिसले आहे.

जाता जाता:

>>मग मी व्होरा वळवला आपल्या सरकारी कुरिएअर वाल्याकडे....

तुम्हाला मोर्चा म्हणायचे आहे का? की होरा? होरा म्हणजे अंदाज!

प्रशांत हेबारे's picture

9 Nov 2012 - 7:14 pm | प्रशांत हेबारे

unique express मधे अगोदर चौकशि केलि. न्यूज मध्ये सांगीतलेली माहिती काही अशी खरी आहे. USA & UK मधील काही राज्य व सिटी मध्ये हि सर्विस आहे. सगळा Europe & USA cover केलेला नाही. unique express ने २ किलोस रुपये ३८०० सांगितले. आणि १० दिवस लागणार. World net Express ने DHL शी करार आहे . जी world one courier service आहे.

सौन्दर्य's picture

28 Oct 2016 - 8:41 am | सौन्दर्य

"मग मी 'व्होरा' वळवला आपल्या सरकारी कुरिएअर वाल्याकडे."

खेडूत साहेब, मला वाटतं त्यांना मोहोरा म्हणायचे असावे.
माहिती उपयुक्त आहे.

दादा कोंडके's picture

9 Nov 2012 - 6:14 pm | दादा कोंडके

असाच काहीसा अनुभव परवा सिंहगड रस्त्यावरच्या पोस्ट ऑफीसमध्ये आला.

बायकोसाठी (माझ्या) पीपीएफ अकाउंट उघडावं म्हणून घराजवळ पोस्ट ऑफीस कुठे आहे त्याची चौकशी केली. वडगावात कुठेशी असल्याचं एका दुकानदारानी सांगितलं. वडगावात जाउन ५-६ जणांकडे चौकशी केल्यावर कळलं की नविन ऑफीस तिथून पुढे अभिरुची मॉलच्या पुढे आहे. तीथपर्यंत पायपीट केली आणि तिथं गेल्यावर कळलं की ते ऑफीस धायरीफाट्यापसून धायरीगावापर्यंत कुठेतरी डाव्या हाताला आहे. तिथून चालत जवळ-जवळ १०-१२ दुकानदारांकडे चौकशी केली पण पत्ता सापडला नाही. घरी येउन भारतीयडाकच्या साईट वर शोधलं, 'आस्क मी' ला विचारून झालं पण उपयोग शुन्य.

मग दुसर्‍या दिवशी थोडसं पुढचं पोस्ट ऑफीस शोधुया म्हटलं. माणिक बागेजवळ चौकशी केल्यावर कळलं की एक पोस्टाची फिरती गाडी संध्याकाळी येते. पण त्यात पीपीएफ्चे फॉर्म मिळण्याची शक्यता कमी होती म्हणून आणखी थोडसं पुढे गेलो. हिगण्याजवळ आत कुठेतरी पोस्ट असल्याचं कळलं. असंख्य जणांना विचारून एका अरूंद गल्लीत शिरलो. थोडसं पुढे गेल्यावर एका अंधार्‍या जिन्याखाली पोस्टाची कळकट पाटी दिसली. डाकेनी भरलेल्या पिशव्या-पोती ओलांडत काउंटरवर जाउन पीपीएफ फॉर्म मागितला. तिथल्या बाईने मी पोस्टात जाउन वडापावाची ऑर्डर दिल्यासारखा चेहरा केला आणि इथे फॉर्म मिळत नाही समोरच्या एसबीआयमधून घ्या असा सल्ला देउन आत निघून गेली.

तिसर्‍या दिवशी थेट स्वारगेटच्या पोस्ट ऑफीसमध्ये गेलो. तोंडात तंबाखूची गुळणी धरलेल्या एका माणसाने मला बचत खात्याचा फॉर्म दिला आणि सध्या हाच आहे. पीपीएफचा फॉर्म शिवाजीनगच्या पोस्टात मिळेल असं सांगून माझी बोळवण केली.

पोस्टाच्या आईचा घो!

सोत्रि's picture

9 Nov 2012 - 7:24 pm | सोत्रि

पोस्टाच्या आईचा घो!

बरं बरं!

- (संतुलित) सोकाजी

मी जपानला असताना बर्‍याचदा पोस्टाच्या सर्व्हिसने सामान मागवयचो. एकदम किफायतशीर सेवा आहे.
पण वाद घातल्याशिवाय काम होत नाही पोस्टात हे मात्र नक्की, आणि शिवाय हिडीस-फीडीस वागणूक मिळते ते वेगळेच. पण 'कुछ वाचवणे(पैसा)के लिये कुछ गवाना पडता है|" :)

- (पोष्ट्या) सोकाजी

Pearl's picture

9 Nov 2012 - 7:53 pm | Pearl

चांगली माहिती.
धन्यवाद प्रशांत.

रेवती's picture

9 Nov 2012 - 8:03 pm | रेवती

गेली अनेक वर्षे भारतीय डाककडून आमची अनेक पार्सले व्यवस्थित पोहोचलीत. त्यातून पुस्तके, दिवाळी अंक, औषधे, नातवंडांसाठी काहीच्याकाही (म्हणजे स्वस्तातल्या पण मुलांचा हट्ट म्हणून) गिफ्टस् असे अनेक प्रकार अजूनपर्यंततरी चारशे ते दीड हजार रुपयांच्या किमतीत आले आहेत. फराळ मात्र कधी मागवला नाहिये पण माझ्या भाच्याला त्याची आई कुरियर सर्व्हिसने दरवर्षी फराळ, आकाशकंदील असे पाठवते आणि सगळे मिळते असा अनुभव. याउलट भारतातल्या भारतात कुरियर सर्व्हिसने पाठवलेल्या वस्तू हजारो रुपये भरले तरी गहाळ होणे, फुटून तुटून येणे, चोरीला जाणे असा प्रकार तर ऑनलाईन (चांगल्या समजल्या जाणार्‍या वेबसाईटवरून)मागवलेल्या वस्तूंमध्ये फसवणूक, नंतर तक्रारीची दखल न घेणे असे झाले आहे. म्हणजे यावेळी आपले नशिब चांगले तर पार्सल मिळेल अन्यथा नाही.

भारतीय पोस्टावर माझा विश्वास आहे. माझे पिताश्री पोस्टातच काम करून रिटायर झाले. सरकार कडून या खात्याला कायमच सावत्र वागणूक मिळते. जास्त काम, कमी पगार, अपुरे आणि अकुशल मनुष्यबळ. तरिही आजही तुम्ही तुमची पत्रे अविश्वसनीय रित्या स्वस्त दरात पाठवू शकता. त्यात इमेल, फोन, कुरियर वगैरे प्रतिस्पर्धी सेवा आहेतच. या खात्याला सरकारने संपूर्ण् रित्या बदलून टाकून त्याला फायद्यात आणण्याचे स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. दुर्दैवाने ही सेवा जनतेशी निगडीत असल्याने सरकारला सेवेचे दर वाढवणे शक्य नसते. या दुस्टचक्रात पोस्ट अडकले आहे.

सुनील's picture

9 Nov 2012 - 10:47 pm | सुनील

पोस्टातून काही पाठविण्याचा अनुभव बर्‍याच वर्षात घेतलेला नाही परंतु टपाल वेळेवर घरी येण्याचे, घर बदलल्यानंतर (आणि संबंधीत कंपन्यांना तसे कळवल्यानंतरही) जुन्या पत्त्यावर येणारी पत्रे नव्या पत्त्यावर येण्याचे अनुभव, पोस्ट मास्तरांकडे एक लेखी अर्ज देऊन, घेतला आहे. सबब, पोस्टाबद्दल माझी तरी काही तक्रार नाही.

या खात्याला सरकारने संपूर्ण् रित्या बदलून टाकून त्याला फायद्यात आणण्याचे स्वातंत्र्य देण्याची गरज आहे.

देशभर पसरलेल्या पोस्टाच्या जाळ्याचा सरकार अनेक प्रकारे उपयोग करून घेऊ शकते. तशी ईच्छा (आणि योजना) मात्र हव्यात!!

उपाशी बोका's picture

14 Nov 2012 - 3:18 am | उपाशी बोका

माझा व्यक्तिश: पोस्टाचा अनुभव खूप चांगला आहे. गरीब माणसांनाही परवडतील असे दर ठेवून सेवा देणे, इतके वजन खांद्यावर पिशवीत नेवून ४-४ मजले चढून डाकेचे वाटप करणे (किमान पुर्वीतरी) हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मला फिलाटेलीचा छंद होता तेव्हा डीलर्सपासून लपवून त्यांनी मला पोस्टाची तिकिटेपण दिली आहेत. (डीलर्स कधी कधी सर्वच्या सर्व तिकिटे घेत असत.) भारतीय पोस्टाला माझा मानाचा मुजरा.

ता.क. मी किंवा माझ्या नात्यातील कोणीही पोस्टात काम करत नाहीत.

मंदार कात्रे's picture

9 Nov 2012 - 10:01 pm | मंदार कात्रे

या खात्याला सरकारने संपूर्ण् रित्या बदलून टाकून त्याला फायद्यात आणण्याचे स्वातंत्र्य देण्याची गरज आहे.

सहमत !!!

॥ सेनापती ॥'s picture

11 Nov 2012 - 1:16 am | ॥ सेनापती ॥

ह्या बद्दल उशिराने का होईना माहिती मिळाली. :) धन्यवाद. :)

मैत्र's picture

12 Nov 2012 - 9:36 am | मैत्र

चांगली आणि उपयोगी माहिती दिल्याबद्दल अनेक आभार!
पोस्टाचे अनेक उत्तम अनुभव आहेत. भारतातून बरेचदा युरोप / ऑस्ट्रेलिया मध्ये कागदपत्रे किंवा पत्रे सगळ्यात स्वस्त दरात आणि बर्‍या कालावधीत मिळाली आहेत.
World Net Express बद्दल माहिती नव्हती. गेल्या वर्षी समजले असते तर खूप उपयोग झाला असता. पण आता इतरांना कळवतो..

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Nov 2012 - 10:53 am | llपुण्याचे पेशवेll

फराळ मुलीपर्यंत पोचला का?

प्रशांत हेबारे's picture

14 Nov 2012 - 8:09 am | प्रशांत हेबारे

अतिशय उत्तम रित्या पोहोचला.

भारतीय पोस्ट खाते आणि कुरियरवाले यांचे बद्दलचा एक अनुभव:
भारतातील अमेरिकन एम्बसीने ९-११ च्या घटने नंतर उर्दू मधून 'स्पॅन' मासिक प्रकाशित करणे सुरु केले. (त्यावेळी मी 'स्पॅन' चे डिझाईन करत असे). हे मासिक अर्थातच मुस्लिम जगतात अमेरिकन संस्कृतीचा प्रपोगंडा करण्यासाठी होते. दिल्लीतील एका नामांकित कुरियर कं. ला संपूर्ण नावा-पत्त्यांची यादी देऊन वर्षभराचे कोन्ट्रॅक्ट करण्यात आले. परंतु खास मुस्लिम बहुल भागात (उदा. अलिगढ व दिल्लीतील ओखला इ.) ते मासिक न पोचता ते सर्व अंक परत येऊ लागले. याबद्दल चवकशी झाली, त्यातून याचे काय कारण होते, ते आम्हाला कळले नाही, परंतु नंतर भारतीय पोस्ट खात्यातर्फे अत्यल्प दरात मासिक व्यवस्थित पोहोचू लागले.

रुस्तम's picture

26 Oct 2016 - 6:50 pm | रुस्तम

छान माहिती

१००% असाच अनुभव मलाही आहे. फक्त एक पोस्ट हाफीसांतील साहेबांची ओळख असल्याने ते पोस्ट हाफिस वाट्टेल ते सामान घेऊन पाठवते आज पर्यां ४ हजार पेक्षा जास्त खर्चाने काही पाठवले नाही. कधी भेटेल ह्याचा काहीही ठावठिकाणा नाही २ महिने पासून २ आठवडे पर्यंत कितीही वेळ लागू शकतो. बहुतेक वेळा सामान मुंबईत आहे असेच दिसते.

अमितदादा's picture

27 Oct 2016 - 10:38 pm | अमितदादा

मला मात्र जरा वाईट अनुभव आला. माझ्या घरातील लोकांनी खायचे काही पदार्थ पोस्टाने परदेशी पाठवले, ते मला मिळाले एका महिन्यानंतर तसेच त्या पॅकिंग बॉक्स ला एक छिद्र पाडले होते त्यामुळे आतील वेगवेगळ्या पदार्थाचे पुडे फुटून मिक्स झालेले. पूर्ण बॉक्स प्लास्टिक च्या एका पिशवीत बांधून आलेला. अर्थात 50 टक्के पदार्थ मिसळल्या मुळे खराब झाले. माझा असा अंदाज आहे की सुरक्षा तपासणी साठी छिद्र पडले असावे कारण त्या बॉक्स मध्ये काही सेमी लिक्विड पदार्थ हि होते ( हा अंदाज आहे चुकीचा असू शकतो). लिक्विड किंवा सेमी लिक्विड पदार्थ ना परवानगी आहे का कोणी अश्या गोष्टी पाठवल्यात का ?

नाही सुरक्षा चाचणी साठी सामान फक्त क्स रे केले जाते. त्यांत आक्षेपार्ह सामान सापडले तर सेक्युरिटी वाले ते व्यवस्थित उघडून पूर्ण चेक करून बंद करून पुढे पाठवत. अमेरिकेन लोक एक पत्रक सुद्धा आंत ठेवतात. सुरक्षा प्रोटोकॉल प्रमाणे कुठलेही सामान कुठल्याही कारणास्तव फ्लॅग केले तर त्याची संपूर्ण तपासणी केली जाणे आवश्यक असते. उदा समाजा सेमी लिक्विड आहे म्हणून शंका अली तरी सेमी लिक्विड बरोबर इतर जे काही सामान आहे त्याची तपासणी सुद्धा आवश्यक असते. अर्थांत हा झाला प्रोटोकॉल, तो पाळला जातोच असे नाही (किमान भारतांत) त्याशिवाय महागड्या वस्तू चोरण्यासाठी सुरक्षा कर्मचारी छेडछाड़ करू शकतात.

आपल्या सामानाला छिंद्र पडण्याचे कारण केबिन प्रेशर सुद्धा असू शकते. सामान पाठवण्यासाठी सर्व एअर टीईट पॅकेट्स मधून हवा पूर्ण काढून टाका. सामान हलू नये ह्या साठी थर्मोकोल किंवा कागदाचे तुकडे भरा. मी गोव्यांतून काजूची पॅकेट्स मागवत होते तेंव्हा हमखास फुटून यायची. आता पाठवणार्यांना टाचणीने छिद्र पडायला सांगते.

अमितदादा's picture

28 Oct 2016 - 11:22 pm | अमितदादा

पडलेले छिद्र हे व्यवस्थित गोलाकार दिसत होते ते केबिन प्रेशर मुळे नसावे तसेच छिद्र सोडून तो बॉक्स व्यवस्तीत होता. असो प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Oct 2016 - 10:49 am | llपुण्याचे पेशवेll

अहो पण माझ्या माहीतीनुसार ही सेवा कमीत कमी ३ वर्षापूर्वीपासून उपलब्ध आहे. कारण मला पूर्वी असे पार्सल पाठवायचे होते तेव्हा चौकशी केली होती. भार्तीय पोस्ट सेवाच सगळ्यात स्वस्त होती. अजून एक लढाऊ व्यक्तीमत्व दिसले.

शाम भागवत's picture

28 Oct 2016 - 11:43 am | शाम भागवत

पोस्ट व टेलिफोन वेगवेगळे झाल्यानंतर पोस्टाची अवस्ठा फारच बिकट झाली आहे. स्वातंत्र्यानंतर पोस्ट खात्याकडे दुर्लक्ष होऊ लागले व खर्‍या अर्थाने पोस्ट खात्याची परवड सुरू झाली. हे एकमेव असे खाते आहे की जे भारतभर पसरलेले आहे व ज्या खात्याचे कर्मचारी भारताच्या कानाकोपर्‍यात राहणार्‍या नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन सेवा देतात.

एक काळ असा होता की, पोस्टातला पगार सर्वात जास्त असायचा. पोस्टाचा पगार रू.२५५/- तर रिझर्व्ह बँकेचा पगार रू.२५०/- असल्याने त्या पाच रूपयासाठी रिझर्व्ह बँकेची नोकरी सोडून लोकं पोस्टात गेलेली आहेत. १९५५-६० सालापर्यंत हे चालू होते. पोस्ट मास्तरला मान असे व गावातील पोस्टमास्तरला विशेष मान असे. बर्‍याच वेळेस गावात (शाळा नसल्यास) तो एकमेव शिक्षित माणूस असे.

टेलिफोन खाते पोस्टापासून वेगळे झाले आणि पोस्टाकडे होणार्‍या दुर्लक्षाबरोबर आर्थिक चणचण ही नवीन पोटदुखी सुरू झाली. केंद्र सरकारात हे खाते नगण्य समजले जायला लागले.

पण गेल्या दोन वर्षातील घडामोडी पहाता सरकारला या खात्याचे महत्व लक्षात आलेले आहे असे वाटायला लागले आहे. रिझर्व्ह बँकेने सरकारच्या शिफारशीनुसार पोस्टाला बँकिंग लायसेन्स द्यायचे ठरवले आहे. (खरे म्हणजे हे लायसेन्स द्यायचे काम रिझर्व्ह बँकेचे असले तरी या बाबतचा शिफारशीचा निर्णय सरकारने घ्यावा असे रिझर्व्ह बँकेकडून सुचवले गेले होते.) शिवाय सरकार या खात्यात नविन गुंतवणूक करत आहे हे जाणवायला लागले आहे. सीबीएस प्रणालीची सुरवात होत आहे. या प्रणालीला पोस्टाचे कर्मचारी व एजंट लोक अजून सरावलेले नाहीत. तसेच पोस्टाचे नियम इतके किचकट असतात की ते समजावून घेणे व त्यानुसार अल्गोरिथम बनवणे हे फार त्रासाचे आहे. संगणक तज्ञ व कामाची सर्वांगिण माहिती असलेला मध्यस्थ मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे सध्यातरी गोंधळाची परिस्थिती असली तरी पोस्टाचा डाटा जुन्या पिवळ्या पडलेल्या रजिस्टर्डमधून डिजीटल स्वरूपात यायला लागला आहे व आपोआपच एकप्रकारची युनिफॉर्मिटी यायला लागली आहे. असो.

अजून २-३ वर्षांनी या सर्व नवीन घडामोडींचा परिणाम दिसायला लागेल. ५-६ वर्षांनी कन्याकुमारी जवळच्या एका खेड्याजवळच्या वस्तीतून एखादा माणूस अरूणाचलच्या बॉर्डरवर असलेल्या एखाद्या वस्तीतल्या माणसाला पैसे पाढवू शकेल. (येथे असे प्रत्यक्षात होईल असे काही सुचवायचे नसून या सेवेची व्याप्ति लक्षात यावी इतकाच उद्देश आहे. यासाठी जेथे अजून बँक व्यवस्ठा पोहोचलेली नाही त्या ठिकाणांचा मुख्यत्वेकरून उल्लेख केलेला आहे.) फक्त मोबाईल रेंज असली की झाले. मुख्य म्हणजे सर्व प्रकारची सरकारी अनुदाने देण्यासाठी ग्रामीण भागातील पेमेंट गेटवे तयार झालेला असेल ज्याचा विस्तार खूपच मोठा असू शकतो. इतकेच नव्हे तर स्टेट बँकेपेक्षाही जास्त शाखा असलेली व जास्त खातेदार असलेली बँक अस्तित्वात येऊ शकेल.

महंमद युनुस यांनी खेड्यातील प्रत्येक घरात बँक सुविधा पोहोचली पाहिजे असे स्वप्न पाहिले होते. अगदी तसेच स्वप्न भारतात जर साकार होणार असेल व तेही खूपच कमी कालावधीत, तर त्यासाठी आपण शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो.

शुभं भवतु.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Oct 2016 - 6:43 am | llपुण्याचे पेशवेll

आत्ता देखील इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर चालू झाली आहे.पिन कोड असेल बरोबर तर तिसऱ्या दिवशी पैसे घरी पोचतात.

उल्का's picture

28 Oct 2016 - 11:47 pm | उल्का

हो, आपलं पोस्ट ऑफिस खूप सुधारत आहे. :)