पांडेश्वरचे देखणे शिवमंदिर

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
6 Nov 2012 - 11:14 pm

लोणी भापकरची मध्ययुगीन मंदिरे पाहून परत फिरलो ते पांडेश्वरचे असेच शिल्पसमृद्ध मंदिर पाहण्यासाठी.

वाटेत मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन करण्यासाठी थांबलो पण महादरवाजाच्याही पुढे आलेली प्रचंड गर्दी पाहून तसेच परत फिरलो. मोरगाव-जेजुरी रस्त्यावर मोरगावपासून ५/६ किमी अंतरावर मावडी गावातून उजवीकडे पांडेश्वरला जाणारा फाटा आहे. खडबडीत रस्त्यावरून १५/२० मिनिटातच पूर्ण कोरड्या असलेल्या कर्‍हेवरचा पूल पार करून पांडेश्वर गावात पोहोचलो.
गाव बहुत प्राचीन, तशी साक्ष देणारे अवशेष या गावात भरपूर आहेत.
मंदिराच्या वाटेवरच एक वीरगळ आणि त्याशेजारीच नागाची प्रतिमा कोरलेला एक दगड आहे. समोरच एका भग्न मंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत. अवशेषांवरून हे मूळचे शिवमंदिर असावे असे वाटते.

१. पांडेश्वर मंदिराच्या अलीकडे असलेला वीरगळ आणि नागप्रतिमा

a
ते बघूनच पांडेश्वरच्या मंदिरात प्रवेश केला. ह्या मूळच्या हेमाडपंथी मंदिराचा मूर्तीभंजकांचा तडाख्यात सापडल्यामुळे शिवकाळात पुन्हा जीर्णोद्धार झालेला दिसतो.

पांडेश्वर मंदिर हे पांडवांनी बांधले अशी दंतकथा. इथल्या मंदिराच्या आवारात कुंती, धर्म, भीम, नकुल आणि सहदेव अशी लहान लहान मंदिरे बांधली आहेत. मूर्तींच्या जागी शेंदूर फासलेले दगड आहेत. अर्जुनाचे मंदिर मात्र येथे नाही. ते येथून जवळच असलेल्या जवळार्जुन नावाच्या गावात आहे अशी माहिती तेथे मिळाली. मात्र आवारात एका धनुर्धारी वीराची मूर्ती असलेला दगड कोरलेला आहे तिलाच अर्जुनाची मूर्ती असे स्थानिक लोक मानतात. मंदिर अर्धे हेमांडपंती शैलीचे तर वरचा अर्धा भाग नंतरच्या काळात नागरी शैलीत जिर्णोद्धारीत केलेला आहे.

मुख्य मंदिराच्या पुढ्यातच भव्य असा नंदीमंडप असून त्यात नंदीची देखणी मूर्ती कोरलेली आहे. कर्‍हेपठाराच्या ह्या भागातील इथल्या बहुतेक सर्व प्राचीन शिवमंदिरांच्या पुढ्यातले नंदीमंडप शैलीच्या दृष्टीने अगदी सारखे आहेत. नक्षीदार कलाकुसर केलेले हेमाडपंती शैलीतील खांब, नकसकाम केलेले छत आणि स्तंभांच्या मधोमध नंदीची देखणी मूर्ती अशी यांची रचना.

नंदीमंडपाच्या मागच्या बाजूला एक निमुळता स्तंभ बांधलेला असून त्यावर जाण्यासाठी आतूनच अरूंद पायर्‍या बांधलेल्या आहेत. स्तंभावर काही मूर्ती कोरलेल्या आहेत. ही बांधणी शिवकाळातली दिसते. ह्या स्तंभाच्या समोरच कर्‍हेचे आता ऐन पावसाळ्यातही कोरडेठाक असलेले पात्र आहे. मंदिराच्या आसपासच्या नदीच्या पात्राला लांबरूंद, प्रशस्त दगडी घाटाने बंदिस्त केले आहे. ह्या देखण्या घाटामुळे पूर्वीच्या काळी कर्‍हा भरभरून वाहात असावी असे वाटते.

२. धनुर्धारी वीराची मूर्ती
a

३ मंदिराच्या पुढ्यातील स्तंभ

a

४. स्तंभाच्या आतमधून वर जाण्यासाठी आतील बाजूस कोरलेल्या पायर्‍या
a

५. मंडपातला नंदी
a

स्तंभ बघून पांडेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आलो. मंदिराचे देखणेपण सामावले आहे ते याच प्रवेशद्वारात. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना विष्णूच्या 'जय', 'विजय' द्वारपालांसारखे द्वारपाल कोरलेले आहेत. अतिशय सुंदर दिसत असलेले हे दोन भव्य द्वारपाल मूर्तिभंजकांच्या तडाख्यामुळे विद्रूप झाले असले तरी त्यांचे मूळचे देखणेपण अजिबात लपत नाही. पायात तोडे, कटीवस्त्र, मेखला, कमरपट्टा, गळ्यात नक्षीदार माळ, छातीवर रूळणारे पदक, बाहूंना बाजूबंद, कानात कुंडले, मस्तकी नक्षीदार दाक्षिणात्य शैलीचा निमुळता मुकूट, त्यापाठीमागे चक्र आणि मुकुटावर सावली धरलेले दगडी छत्र अशी यांची रचना.
मंदिराच्या समोरीला बाजूस ह्या दोन्ही द्वारपालांच्या बाजूंना जाळीदार गवाक्षे, फुलाफुलांची नक्षी कोरलेली आहे. भिंतीत जागोजागी कोनाडे आहेत. एक दोन कोनाड्यांतील देखण्या मूर्ती शाबूत असून बाकी सर्व कोनाडे रिकामेच आहेत.

समोरील बाजू बघून मंदिराच्या अंतर्भागात प्रवेश केला. आतमध्ये चालुक्य शैलीतील ऩक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभांच्या शिरोभागी फणा काढलेले नाग कोरलेले आहेत तसेच स्तंभांच्या मध्यभागी व्यालमुख, तसेच वेलबुट्टीदार नक्षी कोरलेली आहे. मूळच्या मंदिराच्या गाभारा बहुधा उद्ध्वस्त झाला असावा. हल्लीचा गाभारा नागरी शैलीत बनवलेला असून त्यातच अतिभव्य अशी शिवपिंडी विराजमान आहे. इतकी भली मोठी पिंडी फार क्वचितच पाहावयास मिळते. पाटेश्वर इथल्या काही शिवपिंडी इतक्या मोठ्या आकाराच्या आहेत.

६. मंदिराचे देखणे प्रवेशद्वार
a

७. देखणे द्वारपाल
a

८. द्वारपाल
a

९. जाळीदार गवाक्ष
a

१०. कोनाड्यातील मूर्ती
a

११. मंदिराचा अंतर्भाग
a

१२. भव्य शिवलिंग
a

पांडेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिराला नदीच्या बाजूने घाटाबरोबरच एक प्रशस्त तटसुद्धा बांधून काढलेला आहे. तटाच्या आतल्या बाजूच्या भिंतीवर विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. तटात खालच्या बाजूला इस्लामिक शैलीत बांधलेली कमानीकमानीची रचना असलेली प्रशस्त ओसरी असून तटावर जायला दोन ठिकाणांहून जिने खोदले आहेत. तटाचे हे बांधकाम बहुधा आदिलशाही सरदार मुरार जगदेवाच्या काळात झालेले असावे. तट चांगला रूंद असून सभोवतालचा परिसर मोठा सुरेख दिसतो. तटाच्या वरतून बघत असता तटाच्या बाहेर बाभळीच्या काट्यांत एक वृंदावन दिसले. तट उतरून मंदिराच्या बाहेर पडून समाधीपाशी गेलो. रूंद दगडी चौथरा आणि त्यावर देखणे वृंदावन अशी याची रचना. इकडील रहाळात इतकी चांगली समाधी दुसरी दिसली नाही यावरून ही एका नामांकित सरदाराची असावी हे उघड आहे.
समाधीपासून तसेच पुढे जाता आता पूर्ण भग्नावस्थेत असलेले अजून एक लहानसे शिवमंदिर आहे, नव्हे उद्ध्वस्त दगडांच्या ढिगार्‍यात असलेले शिवलिंगच ते.

१३. मंदिरासभोवती असलेली तटबंदी
a

१४. मंदिराच्या आसपासची पांडवांची मंदिरे
a

१५. इस्लामिक स्थापत्यशैलीतील कमानदार रचना
a

१६. तटाच्या भिंतीत कोरलेल्या मूर्ती
a

१७ तटाच्या भिंतीत कोरलेल्या मूर्ती
a

१८. जवळच असलेले देखणे समाधी वृंदावन
a

हे बघूनच परत पांडेश्वरापाशी येऊन बाहेर पडू लागलो तर मंदिराच्या नदीकाठावरील असलेल्या दरवाजापाशी दोन वीरगळ दृष्टिस पडले. एक वीरगळ नेहमीसारखाच युद्धाचा प्रसंग असलेला, घोडेस्वारांशी एकट्यानेच भाल्याचा उपयोग करून लढत असलेल्या वीराचा तर दुसरा वीरगळ मात्र अगदी वेगळा वाटला. ह्या वीरगळावर वीर चक्क वाघाशी झुंज देतांना दाखवला आहे. उघड आहे ह्या वीराचा मृत्यु वाघाशी झुंज देतांना झालेला असावा.

१९. मंदिर पायर्‍यांपाशी असलेले वीरगळ
a

२०. वाघाशी लढताना झालेल्या मृत्युशी संबंधित वीरगळ
a

हे वीरगळ बघून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सासवडला जाण्यासाठी पांडेश्वर गावातून नाझरे मार्ग धरला. वाटेत अनेक जुनी मंदिरे दिसली, अचानक कोथळे गावानजीक एका लहानश्या टेकाडावर एक लहानसे शिवमंदिर व पुढ्यातच एक वीरगळ दिसला. हे मंदिरही पांडेश्वराइतकेच जुने असावे. तशाच प्रकारच्या पुढ्यातला नंदीमंडप, नक्षीदार स्तंभांचा अंतर्भाग असलेले. मंदिराच्या आवारात ३/४ वीरगळ तसेच वीरगळ कोरण्यासाठी आयताकारात कापलेल्या कित्येक शिळा आहेत. नंदीमंडपाच्या बाजूलाच काही मूर्ती कोरलेल्या आहेत. शेजारीच एक सतीशिळा आहे. वरच्या बाजूला चंद्र सूर्य, खालच्या बाजूला कैलासवासी झालेले पती पत्नी शिवलिंगाची पूजा करताना दाखवले असून मधल्या भागात संपूर्ण शिळा भारून टाकलेला आशीर्वादपर मुद्रेतील सतीचा हात अशी याची रचना.

२१. कोथळे शिवमंदिर
a

२२. नंदीमंडप
a

२३. मंदिराच्या आवारातील वीरगळ
a

२४. मंदिराच्या आवारातील अजून एक वीरगळ
a

२५. आवारातील काही मूर्ती
a

२६. सतीशिळा
a
हे मंदिर बघूनच पुढे निघालो. सासवड गाठून आता भुलेश्वरच्या मार्गाला लागलो. भुलेश्वराचे दर्शन झाले. अर्थात ह्या अतिशय देखण्या मंदिरावर आधीही येथे लिखाण झालेले असल्याने परत त्यावर लिहिणार नाही. भुलेश्वराचा घाट उतरल्यावर एका रोचक ठिकाणाला भेट दिली त्यावर अत्रुप्त आत्मा लवकरच लिहितील.

प्रतिक्रिया

तुझे भटकंतीचे धागे पहाणे/वाचणे म्हनजे मेजवानीच.
हे 'वीरगळ' म्हणजे नक्की काय? कुणाच्या मुर्ती असतात या?

तुषार काळभोर's picture

7 Nov 2012 - 7:41 pm | तुषार काळभोर

'सतीशिळा'विषयी थोडी माहिती द्या...

वीरगळांवर आख्खा धागा लिहिलाय की मालक.
इथे पहा: http://www.misalpav.com/node/21649

तिथे लिखाण दिसत नसल्याने इथे पाहिलात तरी चालेल. http://borkarsagar.blogspot.in/2012/05/blog-post_14.html

धन्स रे. बहुतेक मी रजेवर असताना हा धागा येऊन गेलाय त्यामुळे पाहिला नव्हता.
:)

सौरभ२१११'s picture

8 Nov 2012 - 7:01 pm | सौरभ२१११

तुमचा धागा प्रकाशित करणे शक्य असल्यास तसें करणे..
तुमच्या ब्लॉग ला का व्हिजीट करायचं???

प्रचेतस's picture

8 Nov 2012 - 7:08 pm | प्रचेतस

आग्रह नाही.

सौरभ२१११'s picture

8 Nov 2012 - 7:22 pm | सौरभ२१११

विनंती तरी का?
वैयक्तिक असेल तर खव मधे करा ना

>>वीरगळांवर आख्खा धागा लिहिलाय की मालक.
इथे पहा: http://www.misalpav.com/node/21649

तिथे लिखाण दिसत नसल्याने इथे पाहिलात तरी चालेल.

या सगळ्यात तुम्हाला विनंतीचा सूर कुठे दिसला जरा सांगाल का सौरभ ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2012 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्लीशेठचे भटकंतीचे धागे पाहणे/ वाचणे म्हणजे मेजवानीच.

-दिलीप बिरुटे

कपिलमुनी's picture

7 Nov 2012 - 8:37 pm | कपिलमुनी

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आणि आनंददायक !!

अवांतर : काळ्याभोर कातीव दगडाला 'ऑइलपेंट' फासलेला दिसला कि डोक्यात जातात !!
मुळ सौंदर्य नष्ट होउन जाता ...

आनंदी गोपाळ's picture

11 Nov 2012 - 9:16 pm | आनंदी गोपाळ

काळ्याभोर कातीव दगडाला 'ऑइलपेंट' फासलेला दिसला कि डोक्यात जातात !!

बाडीस

गोंधळी's picture

7 Nov 2012 - 8:59 pm | गोंधळी

लेख व फोटो आवडले.

प्रास's picture

7 Nov 2012 - 9:05 pm | प्रास

व्वा! वल्लीभाऊ, तुमच्यामुळे अशा अनेक अनवट स्थळांची ओळख होते.

फोटो नि वर्णन, दोन्ही मस्त!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Nov 2012 - 10:44 pm | अत्रुप्त आत्मा

@भुलेश्वराचा घाट उतरल्यावर एका रोचक ठिकाणाला भेट दिली त्यावर अत्रुप्त आत्मा लवकरच लिहितील. >>> =)) बोंबला... वल्ली वाट लागली ना राव... अता बसा लिवायला रात्रीच... ;-)

रात्रीचं लिवायलाच बसवलाय नं, मग हरकत नै, बुवा...! ;-)

आनंदी गोपाळ's picture

11 Nov 2012 - 9:19 pm | आनंदी गोपाळ

रात्री लिहिताना पेनातली शाई पुरवून वापरा. किंवा घरी दौत आहे याची आधी खात्री करा.
(जुन्या स्टाईलमधे आनंदी) गोपाळ

किसन शिंदे's picture

8 Nov 2012 - 8:37 am | किसन शिंदे

शॉल्लेट!!

बहुत, नकसकाम हे शब्द सध्या वाचत असलेल्या पुस्तकातल्या उतार्‍यांची आणि पर्यायाने त्या पुस्तकाच्या लेखकाची आठवण करून देतात. ;)

स्पा's picture

8 Nov 2012 - 8:56 am | स्पा

bharich re valli
vrutant ani photu jabrat

चौकटराजा's picture

8 Nov 2012 - 9:05 am | चौकटराजा

left

इरसाल's picture

8 Nov 2012 - 9:14 am | इरसाल

मस्त वृत्त्तांत आवडला.

पियुशा's picture

8 Nov 2012 - 10:15 am | पियुशा

लै भारी रे वल्ली
जाळीदार गवाक्ष तर सुप्पर्लाइकः)

मदनबाण's picture

8 Nov 2012 - 10:30 am | मदनबाण

नेहमीप्रमाणेच मस्त ! :)
शिवलिंग सुंदर आहे. :)

जरासे अवांतर :--- पारद शिवलिंग
(In Sanskrit, Linga means a 'mark' or a symbol, which points to an inference. Thus the Shiva Linga is a symbol of Lord Shiva - a mark that reminds of the Omnipotent Lord, which is formless.)
हिंदुस्थानात माझ्या माहिती प्रमाणे पारदलिंगाची (पारद-mercury पारा ) २ शिव मंदिरे आहेत.
यातले पहिले सिद्ध आश्रम उजैन (मध्यप्रदेश) येथे आहे,आचार्य महामंडलेश्वर स्वामी नारदानंद परमहंस यांच्या आश्रमात हे जगातील सगळ्यात मोठे (2500 kilograms of Parad (mercury) ) पार्‍याचे शिवलिंग बनवले आहे.तर दुसरे दक्षिण भारतात ध्यानलिंग मंदिर हे कोयंबतूर पासुन ३० किलोमिटर अंतरावर आहे. पार्‍या पासुन शिवलिंग बनवण्याची पद्धत अत्यंत कठीण असुन ही पद्धत गुप्त ठेवली गेली आहे असे समजले जाते. शिवलिंगासाठी पार्‍याचा वापर का ? याचे उत्तर मिळवण्यासाठी जालावर शोधाशोध करावा...
आता दोन्ही देवळांचे जालावर असलेले फोटो देतो.
Siddha Ashram
सिद्धाश्रम उजैन.
dhyanalinga
ध्यानलिंग

आत्म्याची वाट पाहतो,म्हणजे त्यांच्या लेखाची. ;)

काय जबरी फटू हो तुमचं ते!!!!!! हाण &^%$&*!!!

बैदवे ते ध्यानलिंग उज्जैनच्या सिद्धाश्रमातच हाय का अजुन कुन्कडं????

बैदवे ते ध्यानलिंग उज्जैनच्या सिद्धाश्रमातच हाय का अजुन कुन्कडं????
विकी दुवा :--- http://en.wikipedia.org/wiki/Dhyanalinga

या मंदिराचे फोटो spiritualindia.org या साईटच्या फोरमवर पाहता येतील.
बर्‍याच जणांना शिवलिंगा बद्धल माहिती हवी असते,तर काही जणांकडे चुकीची माहिती असते !
या बद्धल अधिक माहिती इथे मिळेल :--- Shiva Lingam – Meaning and the myths

बॅटमॅन's picture

8 Nov 2012 - 4:01 pm | बॅटमॅन

बहुत धन्यवाद मदनबाणजी :)

अवांतरः मदनबाणाने शिवलिंगाची माहिती द्यावी याची मज्जा वाटली, आमच्यावेळी असं नव्हतं ;)

मदनबाणाने शिवलिंगाची माहिती द्यावी याची मज्जा वाटली, आमच्यावेळी असं नव्हतं
हॅहॅहॅ... मदनला शंकारानेच भस्म केलं होत !;)
या युगात ती "रिस्क" घेणे परवडणारे नाही बाँ... ;)

म्हणून मदनाचे बाण झालात तर :)

प्रचेतस's picture

8 Nov 2012 - 7:36 pm | प्रचेतस

दुव्यांबद्दल धन्स रे बाणा.

त्यातल्या शिवलिंगाविषयीच्या काही मतांविषयी मतभेद आहेत.
वरील दुव्यात रुद्राला निराकार म्हटले आहे. The Supreme Shiva doesn’t have a form and every form is his form. The Shiva Lingam represents him, the Supreme Shiva¸ who is formless.

पण वैदिक वाड्मयात रूद्राविषयी बरीच वर्णने आढळतील.
रूद् धातूपासून रूद्र हा शब्द बनला आहे. रूद् म्हणजे रडणे, ओरडणे किंवा प्रकाशणे अथवा ताम्रवर्णी असेही अर्थ आहेत.
रूद्राला हात, पंजे आणि इतर दृढ अवयव आहेत, त्याचे ओठ सुंदर आहेत, त्याच्या केसांची वेणी घातली आहे, तो सुवर्णालंकार धारण करतो, सोन्याची व चकाकणारी माळ धारण करून तो रथात बसतो असे रूद्राविषयी वर्णन ऋग्वेदात आले आहे.
तर अथर्ववेदात रूद्राला तोंड, जिव्हा आणि दात आहेत, त्याचे पोट काळे आणि पाठ तांबडी आहे, तो नीलकण्ठ असून त्याच्या डोक्यावर निळ्या रंगाचा तुरा आहे, तो कातडे वापरतो आणि पर्वतांत राहतो, धनुष्यबाण हे त्याचे प्रमुख आयुध असून तो कधीकधी वज्र धारण करतो, रोंद तोंडाचे, ओरडणारे आणि मांसभक्षक कुत्रे त्याजपाशी आहेत असे म्हटले आहे.

रूद्रालाच ऋग्वेद आणि इतर वेदांत एकाच वेळी भयानक आणि संहारक आणि त्याचवेळी भयनाशक आणि कल्याणकारक म्हणूनही संबोधलेले आहे.

रूद्र ही मूळची अनार्य देवता असे मानले जात असल्याने वैदिक देवतांत रुद्राचा समावेश होऊनही त्याची मूळची संहारक असलेली अनार्य प्रतिमेची स्मृती कायम ठेवली आहे.

आता काहीसे लिंगाविषयीची- सजीव सृष्टी जर योनि आणि लिंग यांच्या संयोगाने उत्पन्न होते तर निर्जीव सृष्टी तशाच तर्‍हेने उत्पन्न होत असली पाहिजे तेव्हा हेच जगाचे आदिकारण असल्याचे मानले जाऊन सयोनीलिंग स्वरूपात लिंगपूजा प्रचारात आली.
बाकी शिवलिंगांचे प्रकारही रोचक आहेत. सयोनी लिंग, अयोनीलिंग, धारालिंग, चतुर्मुखलिंग, मुखलिंग, अष्टोत्तरशत लिंग, सहस्त्र लिंग्,हे सर्व प्रकार पाटेश्वरच्या डोंगरात दिसून येतात तर लिंगोद्भव प्रतिमा पुण्यातल्या त्रिशुंड गणपती मंदिरात दिसून येते.

स्पा's picture

10 Nov 2012 - 11:18 am | स्पा

उत्तम माहिती रे

इरसाल's picture

9 Nov 2012 - 9:36 am | इरसाल

लोकास्नी नाराज व्हयाचं काम न्हाय हे पघा.
http://www.hindu-blog.com/2008/04/unique-mercury-shivling-at-earth-peace...

आनंदी गोपाळ's picture

11 Nov 2012 - 9:21 pm | आनंदी गोपाळ

(In Sanskrit, Linga means a 'mark' or a symbol, which points to an inference. Thus the Shiva Linga is a symbol of Lord Shiva - a mark that reminds of the Omnipotent Lord, which is formless.)

लिंग म्हंजे लिंग. उग्गा कीस काढू नका. ओके?

सस्नेह's picture

8 Nov 2012 - 10:41 am | सस्नेह

फोटोंवरून मंदिर मोठ्या निसर्गरम्य परिसरात आहेसं वाटतंय.
भेट द्यायची इच्छा आहे.

मी_आहे_ना's picture

8 Nov 2012 - 10:43 am | मी_आहे_ना

भारी फोटू आणि वर्णनही...परवाच मोरगावला जाऊन आलो तेव्हा माहित नव्हतं, आत नेक्ष्ट टायमाला नक्की..

मूकवाचक's picture

8 Nov 2012 - 11:14 am | मूकवाचक

_/\_

ह भ प's picture

8 Nov 2012 - 1:09 pm | ह भ प

या पावसाळ्यात भुलेश्वरला गेलो होतो.. त्या मंदिराची लिंक टाकाना. पल्लीज..

ह भ प's picture

8 Nov 2012 - 5:33 pm | ह भ प

भुलेश्वरची लिंक..

प्रचेतस's picture

8 Nov 2012 - 6:58 pm | प्रचेतस

लिंक दिली असती हो पण सध्या जुने धागे मि. इंडिया झालेत.

इथल्या धाग्यांचं काय भविष्य आहे माहित नाही, माझ्या ब्लॉगवरचे दोन धागे देतो आहे, बघा चालले तर.

http://harshad-gaaanikha.blogspot.in/2010/11/blog-post_25.html
http://harshad-gaaanikha.blogspot.in/2010/11/blog-post_30.html

वल्ली साहेब, फारच सुंदर नक्कीच ह्या ठिकाणी जाउन येईन.

वाह्यात कार्ट's picture

8 Nov 2012 - 3:40 pm | वाह्यात कार्ट

फोटो क्र.१६ आणि १७ मधील मूर्ती या कोरलेल्या नसून चुन्यात घडवलेल्या आहेत !! बाकी एका अनवट ठिकाणाबद्दल
माहिती पुरवल्याबद्दल आभार !!!

वल्ली जोन्स म्हंजे नादच खुळा हां काय!!!!!

नेहमीप्रमाणेच सुंदर!!

उपाध्येगुरुजी's picture

8 Nov 2012 - 5:12 pm | उपाध्येगुरुजी

श्रीक्षेत्र पांडेश्वर
महाराष्ट्रातील बहुतेक मंदिरे पांडव कथेशी जोडलेली असतात तसेच या मंदिराविषयी सांगितले जाते ते 'पांडव कालीन किंवा पांडवानी एका रात्रीत मंदिर उभारले असल्याने या क्षेत्राला पांडेश्वर असे म्हणतात' अशी लोकधारणा आहे .या मंदिराला गौरवशाली वारसा आहे या मंदिराचे बांधकाम तब्बल सोळाशे वर्षापूर्वीचे असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मुळचे चैत्यगृह नंतरचे शिखर ,दगडी मुखमंडप ,नदीकाठचा तट लगतच्या ओवा-या ,मराठा कालीन भित्तीचित्रे , रंगकाम आदी बाबींमुळे सोळाशे वर्षातील मंदिर रचनेतील बदलांचा आलेख दर्शवणारा ठेवा म्हणून इतिहास संशोधक व अभ्यासक याकडे पाहतात.
श्रीक्षेत्र पांडेश्वर विषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा http://www.jejuri.in/around_jejuri
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा..

लई भारी आणि बुवांच्या वुईथ व्हिडो रिपोर्टच्या प्रतिक्षेत.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Nov 2012 - 10:44 pm | अत्रुप्त आत्मा

@बुवांच्या वुईथ व्हिडो रिपोर्टच्या प्रतिक्षेत.>>> येस्स स्सर...! तो पर्यंत हा पांण्डवेश्वरा बाहेरच्या त्या गिरणीच्या बंबासारख्या/चिमणी सारख्या टेहेळणी चिमणीचा व्हिडो री-पोर्ट बगा... ;-) (प्रस्तुत धाग्यातील फोटू क्रमांक-३)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Nov 2012 - 10:47 pm | अत्रुप्त आत्मा

आणी हे २ फोटू....
१)स्तंभ
https://lh6.googleusercontent.com/-i1St3vZpseI/UJuLHCMGPbI/AAAAAAAAByk/sQNCIJmA79c/s512/Photo-0239.jpg
२) स्तंभा-आतून दिसणार्‍या पायर्‍या
https://lh6.googleusercontent.com/-Nlr3CVMHWz0/UJuKR0ffNvI/AAAAAAAAByc/slyBtluQpPU/s640/Photo-0225.jpg

स्मिता.'s picture

8 Nov 2012 - 7:19 pm | स्मिता.

लेख नेहमीप्रमाणेच वाचनीय आणि प्रेक्षणीय आहे.

अतिशय सुरेख, जुन्या आणि दगडात घडवलेल्या मंदिरांना असे भडक, विचित्र ऑईलपेंटने का पोथारत असतील? मंदिराची पार रयाच जाते त्याने. डागडुजीची गरज असते हे मान्य पण जरा सौंदर्याचाही विचार व्हायला हवा असं वाटतं.

प्यारे१'s picture

8 Nov 2012 - 7:28 pm | प्यारे१

वल्ली द स्पेशलिस्ट!

मस्त रे....

निगुतीनं स्वैपाक करणारे आपले बल्लव नि त्याच निगुतीनं इतिहास उल्गडून दाखवणार्‍या वल्ल्या...!

खरंच मस्त.

मी-सौरभ's picture

8 Nov 2012 - 7:33 pm | मी-सौरभ

सहमत

लीलाधर's picture

8 Nov 2012 - 11:31 pm | लीलाधर

खुपच मस्त वृत्तांत आणि फोटो धन्यवाद आम्ही आपले आभारी आहोत.

स्पंदना's picture

9 Nov 2012 - 4:50 am | स्पंदना

आता मी आणि काय लिहु वल्ली. सुरेख माहिती. मस्तच!

अन्या दातार's picture

9 Nov 2012 - 8:20 am | अन्या दातार

वाह वाह

किसन शिंदे's picture

9 Nov 2012 - 9:01 am | किसन शिंदे

वाह वाह :D

(अजुन दोन जण हवेत रे ;))

सूड's picture

9 Nov 2012 - 2:48 pm | सूड

चला उचला आता !!

इरसाल's picture

9 Nov 2012 - 9:31 am | इरसाल

मागे एक खाजगी गुप्तहेर लावावा असा विचार चालु आहे. जेणे करुन साहेबांचा पुढचा दौरा कुठे ह्याची माहिती तरी मिळेल आणी काही हौशी लोकांना बरोबर तरी जाता येयिल.

मालोजीराव's picture

9 Nov 2012 - 1:14 pm | मालोजीराव

फोटू आणि वर्णन नेहमीप्रमाणेच खल्लास ! साधारण किती जुने आहे मंदिर ? जवळपास असेच मंदिर हिवरे ता.पुरंदर इथे आहे.

अवांतर : वल्लीशेठ जोन्स...हितक्या ठिकाणी हिंड्लासा....कुटतर घबाड घावलं का नाय ?

कमीत कमी १००० वर्ष तरी जुने नक्कीच.

इतिहासाचं भरपूर घबाड घावलंय की. अजून काय पाहिजे?

सुहास झेले's picture

9 Nov 2012 - 1:55 pm | सुहास झेले

जबरदस्त रे वल्ली....

पैसा's picture

9 Nov 2012 - 4:55 pm | पैसा

गावोगावी अशी फार प्रसिद्ध नसलेली मंदिरे आहेत. शक्य तेवढी मंदिरांची माहिती आमच्यापर्यंत आणण्याबद्दल धन्यवाद!

सुहास..'s picture

9 Nov 2012 - 8:38 pm | सुहास..

टिपीकल वल्ली स्टाईल !!

अर्थातच आवडेश !

कवितानागेश's picture

10 Nov 2012 - 12:52 am | कवितानागेश

मस्त.

गुरुनाथ्काळे's picture

11 Nov 2012 - 10:59 pm | गुरुनाथ्काळे

अजून काही माहिती या मंदिरा बद्दल..

१. पांडवानी बांधलेली या मंदिरात ध्युत/सारीपाट (लुडो) कोरला आहे मंदिराच्या दरवाज्या जवळच.
२. मी प्रत्यक्ष पाहिल नाही, ऐकीव माहिती, मंदिराच्या बांधकाम वेळी चुना गाळन्या साठी वापरलेले एक मोठं जात देखील आहे. आता ते गावातील लोकांनी ढकलून बाजूला नेऊन ठेवल आहे.

..छान माहिती दिलीत :)
माझं मुळ गाव असून देखील जास्त काही माहिती देऊ शकत नाही या बद्दल खंत वाटते. याच वर्षी एप्रिल मध्ये जत्रेला गेलेलो (जन्मानन्तर पहिल्यांदाच).

बर्याच वर्षांपूर्वी ''भटकंती" मध्ये दर्शन घडलेले.. तेव्हा देखील हायसं वाटलेलं.
(ब्याटरी चार्ज नसल्या मुळे.. आणि गावात लाईट नसल्या मुळे फोटो काढता आले नाहीत. भावाच्या मोबाईल मध्ये सापडले तर नक्की शेअर करीन)

दीपा माने's picture

28 Nov 2012 - 8:30 am | दीपा माने

वल्ली, वर्णन आणि फोटोंमुळे उत्कृष्ट माहीती दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.