साहित्य : चार ब्रेड स्लाईस, उकडलेले बटाटे दोन, उकड्लेले मक्याचे दाणे अर्धीवाटी,१ सिमला मिरची बारीक चिरून, मीठ, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, आले लसूण पेस्ट १ चमचा, लिंबाचा रस थोडासा, १ चमचा बटर.
एका कढईत थोडेसे बटर घेऊन वितळल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घाला, नंतर त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची , कुस्करलेले बटाटे, उकड्लेले मक्याचे दाणे, मीठ, चिली फ्लेक्स, लिंबू रस घालून थोडे ढवळावे व खाली उतरवावे. मिश्रण गार करावे. ब्रेडचा स्लाईस घेऊन त्याला बटर लावावे त्यावर हे मिश्रण घालावे त्यावर किसलेले चीझ घालावे व दुसरा ब्रेड्चा स्लाईस ठेवावा व टोस्टरमध्ये घालून टोस्ट करावा. टोमटो केचप बरोबर खायला द्यावा.
( हे टोस्ट पटकन होतात, मुलांना ड्ब्यात सुद्धा देता येतात. ही रेसीपी आधी केली असल्यामुळे फोटो देता आले नाहीत,पण जरुर करुन बघा)
प्रतिक्रिया
6 Nov 2012 - 2:14 pm | मेघना पूराणीक
मस्त...
6 Nov 2012 - 2:34 pm | पियुशा
फोटो न लोडवता टाकलेली रेसेपी ही
मेक-अप न केलेल्या हिरोइनसारखी वाटते ;) (ह्.घ्या.)
6 Nov 2012 - 5:20 pm | अत्रुप्त आत्मा
+१
पाककृती विभागात नवोदितांकडून फोटू टाकायची परंपरा लुप्त होत चाल्लि आहे ..
6 Nov 2012 - 6:00 pm | रेवती
+२.
जेंव्हा पाकृ कराल तेंव्हा मिपावर द्या पण फटू हवाच. ;)
6 Nov 2012 - 7:18 pm | अनन्न्या
काही नवोदित याला अपवाद आहेत हो.
पा. क्रु. सोपी आणि मस्त वाटते आहे.
16 Nov 2012 - 2:02 am | दीपा माने
चहाच्या वेळेचा आणखीन नवा पदार्थ. खुपच आवडला.