http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17093036.cms
शिवाजीमहाराजांच्या नंतर जाणता राजा ह्या पदवीवर हक्क सांगणारे आपले अत्यंत लाडके, कर्तृत्ववान, तळागाळातील लोकांचे नेते हे महाराष्ट्राचे मद्यर्षी आहेत असे दिसते आहे. महाराष्ट्राचा मद्यराष्ट्र बनवायची महत्त्वाकांक्षी योजना ह्या राजाने अत्यंत विचारपूर्वक आखली आणि लोकांना, विशेषतः तरूणांना अंमलाखाली आणून अमलात आणली. वाईन अर्थात वारूणी हा एक प्रकारच फळांचा रस आहे अशी रसभरित वर्णने करुन हे पेय लोकांच्या गळी उतरवले जाते असा समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा दावा आहे.
अशा प्रचारामुळे आजकाल तरुणांत रेव्ह पार्ट्या वगैरे प्रकार बोकाळले आहेत. एकंदरीत लोकांना दारू सहज मिळते म्हणून लोक खूष, दारूवर भक्कम पैसा मिळतो म्हणून जाणता राजा आणि त्याचे भालदार चोपदार खूष आणि सगळाच आनंदी आनंद अशी ही गंमतीची योजना आहे.
प्रतिक्रिया
6 Nov 2012 - 1:34 pm | श्री गावसेना प्रमुख
सगळ्याच मोठ्या नेत्यांच्या नातेवाइकांना धान्यापासुन दारु तयार करण्याचे लायसन्स मिळाले होते,त्यात मराठवाडी नाथांची लेक्,बारामती लेक ह्या सुद्धा होत्या/आहेत्/असाव्यात.
जाणता राजाच कँसर ने ग्रस्त आहे.
9 Nov 2012 - 2:57 pm | चैदजा
जाणता राजाविषयीचे प्रतिसाद मॉडरेट झालेले दिसतात.
9 Nov 2012 - 4:56 pm | श्री गावसेना प्रमुख
म्हणजे? कशा पद्धतीने
9 Nov 2012 - 6:56 pm | चैदजा
ऊडवले गेले.
10 Nov 2012 - 10:08 am | श्री गावसेना प्रमुख
माहीत नाही,तसेही असेल कदाचीत.
6 Nov 2012 - 2:22 pm | प्रकाश घाटपांडे
दारुबंदी आता शक्य नाही. फार तर लोकांनी दारु कशी पिउ नये व कशी प्यावी हे सांगण्याची गरज आहे.
6 Nov 2012 - 2:34 pm | गवि
मद्यपान आणि रेव्हपार्टी यांच्यातलं थेट नातं स्पष्ट होण्याची गरज आहे. रेव्हपार्टीत मद्यपान(सुद्धा) होत असेल. पण मद्यपान हे रेव्हपार्ट्यांचं कारण नव्हे.
मद्यपान ज्यांना करायचं नाही त्यांनी करु नये हे खरं. मद्यपान न करणार्यांनी ते सुरु करु नये हेही खरं असेल. ते न करण्याने खास तोटा काही नाही. त्यात मनुष्य अल्कोहोलिक होण्याची शक्यताही थोड्या प्रमाणात का होईना पण असते हेही खरं. (अल्कोहोलिक बनणं हे माणसाच्या जेनेटिक्सवर अवलंबून आहे. खूप मोठ्या प्रमाणात माणसं मॉडरेट ड्रिंकर्स असतात आणि खूप खूप थोडे टक्केच लोक दारुडे - अल्कोहोलिक - बनतात. आपल्या शरिरिक घडणीत अल्कोहोलिक होण्याचा फॅक्टर असेल तर दारु प्यायला लागल्यावर अल्कोहोलिक बनण्याचा धोका असतो.. अशा वेळी हा धोका आधीच ओळखण्यासाठी संशोधन झालं तर बरं...)
हे सर्व मुद्दे खरे असले तरीही सरसकट "बंदी" करण्याची कल्पना चुकीची ठरेल. काही लोक अज्ञानाने, बेदरकारपणाने, शारिरिक, मानसिक किंवा आर्थिक कारणांनी अल्कोहोलिझम मधे ओढले जाऊन अधिकाधिक वाईट दर्जाची दारु पिऊन बळी जात असले तरी या दुर्दैवी वास्तवामुळे बहुसंख्य संयमित पिऊन आनंद घेणार्यांचे मद्यपान बेकायदेशीर ठरवणं चूकच आहे.
मर्यादित प्रमाणात मद्यसेवन ही गोष्ट हानिकारक आहे असं कोणत्याही मार्गे सिद्ध होत नाही. त्यामुळे मद्य = दुरित हे सरळसोट समीकरण बनवू नये.
संयम आणि शहाणपणा रुजवणं उत्तम. त्यामुळे श्री. प्रकाश घाटपांडे यांच्याशी सहमत.
6 Nov 2012 - 2:40 pm | बॅटमॅन
मेडिकली बरोबर, पण सामाजिकली तसे धोक्याचेच. प्यायला मिळते म्हटल्यावर मागेपुढे न पाहता कुत्र्यागत पिणार्यांची संख्याच अधिक, त्यामुळे मद्यसेवन हे हानिकारक आहे आणि ते टाळावे असे सांगितले तर ती एरर ऑन द साईड ऑफ कॉशनच होईल, त्यामुळे फार काही तोटा होईल असे वाटत नाही. उलट झालाच तर इन्फायनाइटेजिमल फायदाच होईल असे आपले माझे एक मत.
(सावध सनातनी) बॅटमॅन.
6 Nov 2012 - 2:51 pm | मी_आहे_ना
'मर्यादा' ही एकच गोष्ट अशी आहे जी सरसकट सगळ्यांना लागणे चांगले.
त्यामुळे गविंशी बाडिस आणि तुमच्याशी 'मर्यादेत' सहमत.
:)
7 Nov 2012 - 8:15 pm | मिहिर
संदर्भ काय?
7 Nov 2012 - 9:23 pm | गवि
http://www.m.webmd.com/a-to-z-guides/news/20040526/researchers-identify-...
हे अगदी सुरुवातीचं आहे. अजूनही काही लिंका देता येतील. पण त्या माझ्या म्हणण्याला सोयीस्कर आहेत असं वाटू शकेल. म्हणून तुम्ही सुद्धा ओपन सर्च करुन पहावी.
उलट म त आढळलं तर त्याच्या लिंक्सही द्या. म्हणजे मला मत बदलता येईल.
7 Nov 2012 - 9:33 pm | गवि
मुळात एका व्यसनमुक्ती केंद्रा ला माहितीसाठी केलेल्यावव्ह्जिटमधे ही माहिती मला प्रथम मिळाली. अल्कोहोलिक होणं व्यक्तीच्या जेने टिक्स आणि तदनुषंगिक ठेवणीवर अवलंबून असतं. म्हणून मेजॉरिटी लोक अल्कोहोलि क न होता राहतात.
6 Nov 2012 - 2:36 pm | निनाद मुक्काम प...
प्रगत देशात दारूचा महापूर येऊन सुद्धा त्यांनी प्रगती केली.
आता त्यांची संस्कृती वेगळी असा रडका सूर धरण्यापेक्षा
जन माणसात दारू पिणे ह्या संकल्पनेविषयी जागृती करणे महत्त्वाचे आहे.
जगात मधुमेही रोग्यांचे माहेर घर अशी भारताची हळूहळू ख्याती होत आहे.
म्हणून हलवायाच्या विरुद्ध कोणी बांग दिली नाही.
6 Nov 2012 - 2:39 pm | प्रकाश घाटपांडे
संबंध समजला नाही. गोड खाल्याने मधुमेह होतो असे नसून मधुमेह झाल्यावर गोड खाउ नये असे आहे.
6 Nov 2012 - 2:46 pm | गवि
मी एक उदाहरण देतो जे थोडंसं योग्य ठरेल.. (स्केलच्या बाबतीत माहीत नाही पण समांतर उदाहरण..)
काही मुलांना दुधातलं लॅक्टिक अॅसिड (चुभूदेघे) न पचवू शकण्याचा जेनेटिक आजार असतो. अशांसाठी दूध आणि दुग्धपदार्थ हे विषवत ठरतात. त्यांनी दूध प्यायलं की गंभीर अपचन इत्यादि होतं. याप्रमाणेच काही लोकांना गव्हातल्या ग्लुटेनचा (पुन्हा चुभूदेघे) इनटॉलरन्स असतो.
अशा जेनेटिकली डिफरंट लोकांवर (जसे अल्कोहोलिक टेंडन्सीवाले काही टक्के लोक असतात) दुधाचा, गव्हाचा गंभीर इनफॅक्ट जिवावर बेतू शकेल इतका दुष्परिणाम होतो, म्हणून दूध आणि पोळी व्यवस्थित खाऊन जगणार्या लोकांच्या गव्हाच्या लागवडीवर बंदी घालावी का?
त्याहूनही वेडगळपणा म्हणजे गव्हाच्या उत्पादनावर बंदी नाही पण विकण्यावर बंदी... खाण्यावर बंदी.. :)
6 Nov 2012 - 9:30 pm | निनाद मुक्काम प...
तुम्ही शब्द पकडण्यापेक्षा भावना पकडल्या
व त्या योग्य उदाहरणाद्वारे तुमच्या प्रतिसादात मांडल्या.
धन्यवाद
6 Nov 2012 - 3:00 pm | तर्री
हे उदाहरण योग्य नाही . दुधाच्या इनटॉलरन्स मुळे कुटुंब नाश पावत नाहित.
मधुमेहामुळे घरच्यास्त्री ला मारझोड झाल्याचे उदहारण नसेल.
दारू माफक पिणारे माफक घेणारे तसेच राहतात हे ही सत्य नाही. उलट त्यांचे सेवनाचे प्रमाण वाढते व दोन पिण्यामाधला कालावधी हळू हळू कमी होतो.
दारूचे दुष्परिणाम नव्याने सांगायला नकोत. आपण आवडत असेल तर जरूर प्या.काहीच हरकत नाही.
पण थोडेसे सुध्धा समर्थन , उद्दात्तीकरण नको.
6 Nov 2012 - 5:21 pm | अत्रुप्त आत्मा
@दारूचे दुष्परिणाम नव्याने सांगायला नकोत. आपण आवडत असेल तर जरूर प्या.काहीच हरकत नाही.
पण थोडेसे सुध्धा समर्थन , उद्दात्तीकरण नको. +++++++++++११११११११११११११११११ अग्दी बरोब्बर...! कारण...दारू प्यायल्याने जे जन्मतः बेवडे नाहित,त्यांना कोणताही तोटा होत नाही हे खरं आहे...पण म्हणून त्यातुन शारिरीक/मानसिक दृष्ट्या उपयोग/फायदा किंवा विशिष्ट फायदा होतो...असं अजिबात म्हणजे अजिबात नाहिय्ये. त्यामुळे
एवढं (श्रद्धेसारखं) मर्यादित व्यक्तिगत विधानच करावं..हे बरं :-)
6 Nov 2012 - 9:25 pm | सोत्रि
गुर्जी तुमचा काय अनुभव? काही दाखला असल्यास द्या बरं!
- (फायद्या दिसल्याशिवाय काहीही न करणारा) सोकाजी
7 Nov 2012 - 10:19 pm | अत्रुप्त आत्मा
@गुर्जी तुमचा काय अनुभव?>>> अनुभव माझा नाहीये,पण वल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन(w.h.o) या संस्थेनी काढलेला निष्कर्ष आहे तो...! :-)
@काही दाखला असल्यास द्या बरं! >>> कोणत्याही बेवड्याच्या अंतर्मनात डोकवा,किंवा अल्कोहोलिक्स अॅनॉनिमसच्या मिटिंगना वेल विशर म्हणून हजेरी लावा...आपोआप कळेल. :-)
@ (फायद्या दिसल्याशिवाय काहीही न करणारा) सोकाजी>>> अता तुंम्ही तुमचा दिसलेला फायदापण सांगा... :-)
9 Nov 2012 - 7:06 pm | सोत्रि
अहो तो तसा सांगितला तरीही तो बोलाची कढी आणी बोलाचा भात असे होइल ना ;)
- (सध्या कर्ड-राइस वर जोर असलेला) सोकाजी
10 Nov 2012 - 2:38 pm | अत्रुप्त आत्मा
@अहो तो तसा सांगितला तरीही तो बोलाची कढी आणी बोलाचा भात असे होइल ना>>> होऊं दे हो जे काय व्हायचं ते, पण तुंम्ही सांगा तर खंरं! ;-)
म्हणजे आंम्हालाही कळेल. :-b
10 Nov 2012 - 11:53 am | सोत्रि
- (आयुर्वेदिक) सोकाजी
6 Nov 2012 - 5:22 pm | गवि
या गोष्टी विषवत ठरल्याने त्या व्यक्तीचा / बालकाचा मृत्यू ओढवणे हे कमी सिरियस आहे.. ??!! दारु पिणार्याला निदान आपण काय पितो हे माहीत असतं. त्या बिचार्या बालकाला चारचौघांसारखं दूध पिण्यातला धोका हा पहिल्या आघातापर्यंत माहीतही नसतो. मग अशा शेकडो निष्पाप बळींना रोखण्यासाठी दुधावर बंदी घातली तर काय नुकसान आहे?
हे अतिशयोक्त उदाहरण आहे.. हा वादासाठी वाद वाटेल, म्हणून एक पाऊल मागे जाऊन हा मुद्दा बाजूला ठेवून म्हणतो की, अर्थातच मला तुमचा मुद्दा समजला.. विषय दारुच्या घातकतेच्या लेव्हलचा नसून सरसकट बंदी घालण्याइतकं ते विषारी द्रव्य नाही इतकंच. आवडत असेल तर जरुर प्या हे तुमचं वाक्य चपखल आहे.
हेही अगदी १०० % बरोबर..
पण "समर्थन" आणि "सरसकट बंदीकरणाला विरोध" या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
मद्याचं समर्थन नको हे जितकं खरं तितकंच हेही खरं की सरसकट बंदीच्या समर्थनार्थ मद्याचं घाऊक असमर्थनही नको.
6 Nov 2012 - 5:27 pm | मी_आहे_ना
(इथेही) गविंशी सहमत.
हे म्हणजे 'तुम्ही टीम अण्णा बरोबर नाही म्हणजे काँग्रेस सोबत आहात' झाले.
6 Nov 2012 - 5:36 pm | अत्रुप्त आत्मा
@हे म्हणजे 'तुम्ही टीम अण्णा बरोबर नाही म्हणजे काँग्रेस सोबत आहात' झाले.>>> =))

8 Nov 2012 - 9:13 am | श्री गावसेना प्रमुख
गाईने कींवा म्हशीने जास्तिचे दुध द्यावे म्हणुन जे इजेंक्शन टोचतात,
त्याने ते दुध पिणार्याला कँसर होतो अस ऐकल आहे मी.(म्हणजे तो काही लगेच होतो असे नाही,पण कालांतराने होउ शकतो)
9 Nov 2012 - 2:20 pm | चैदजा
१. दुध पिणारे किती ट्क्के लोक दुधाच्या इनटॉलरन्स मृत्यू पावतात ?
२. दारू पिणारे किती ट्क्के लोक त्याच्याशी संबंधित आजाराने लवकर मृत्यू ओढ्वुन घेतात ? किती ट्क्के लोकांच्या घरचे हाल होतात? गावांकडे हे प्रमाण जास्त आहे.
३. अजुन एक मुळ प्रश्न आहेच, ज्यावर वेगळा धागा होऊ शकतो. मद्यर्षीनी धान्यापासुन दारु बनवायचे परवाने घेतले आहेत. ते कितपत योग्य आहे ? ईथे अर्धी जनता अर्धवेळ उपाशी आहे. त्यांचे काय ? दारु पिऊन जगायचे ?
9 Nov 2012 - 2:32 pm | गवि
हे फक्त सरसकटीकरणाचं (सरसकटीकरणातला फोलपणा दाखवणारं) उदाहरण आहे. कट टू कट तत्सम प्रमाण असलेलीच उदाहरणं द्यायची तर उदाहरण, उपमा, वगैरे संकल्पनाच बाद होतील. दुधाची आणि दारुची तुलना असं समजलं जातंय यावरुन हे म्हणतोय.
मद्यपान नक्कीच रिस्की आहे. कोण किती वहात जाईल हे आधी सांगणं आजतरी कठीण आहे. पण आजघडीला मद्य पिणार्यांतल्या अल्कोहोलिक होणार्यांचं प्रमाण न होणार्यांपेक्षा कमी आहे. तेव्हा ज्यांचा संयम राहिला नाही अशा दुर्दैवी जिवांसाठी ज्यांना संयम कळतो त्यांच्यापासून मद्य काढून घेणारी बंदी ही परिणामकारक नाही असं म्हणणं आहे. नशेबाज वृत्ती ही एक मानसिक व्याधी आहे आणि दारु बंद करुन मुळातली "आहारी जाणं" ही प्रवृत्ती दाबता येत नाही. गॅरंटी आहे की अशा वेळी मिथेनॉल पितील असे लोक.. आणि घराघरात अवैध भट्ट्या लागतील.
6 Nov 2012 - 3:00 pm | सहज
>महाराष्ट्राचा मद्यराष्ट्र बनवायची महत्त्वाकांक्षी योजना ह्या राजाने अत्यंत विचारपूर्वक आखली आणि लोकांना, विशेषतः तरूणांना अंमलाखाली आणून अमलात आणली.
राजकारणी लोकांवर शरसंधान करताना आमच्या आवडत्या दर्दी मिपाकर (तरुण तुर्क व म्हातारे अर्क) दोस्तांवर नाहक टिका केल्याबद्दल निषेध!!
आमचे दर्दी मिपाकर काय कोण्या राजकारण्यांच्या अमलाखाली येउन वाईन एन्जॉय करणारे नाहीत! त्यांना दारुसकट कोणीही गळी उतरवू शकत नाही.
घ्या पुरावा
अवांतर - " जाणता राजा ह्या पदवीवर हक्क सांगणारे " कोण हो कोण हो? आणि हो, उगाच हुप्या केजरीवाल होउ नका. अशी पदवी असल्याचा व त्यावर हक्क सांगितल्याचा पुरावा द्या.
6 Nov 2012 - 3:40 pm | श्री गावसेना प्रमुख
जाणता राजा
हा पुरावा चालेल का?
आणी राजकारणी असे पुरावे मागे ठेवत नसतात.
ते म्हणतात कि लोकांनी आम्हाला पदवी दिलेली आहे
6 Nov 2012 - 3:18 pm | राही
ज्यांना उंची वाइन दारू वगैरे परवडते त्यांना ती घेऊ दे की.समजा ते अल्कॉहॉलिक झालेच तर त्यांच्याकडचा सर्व पैसा संपून ते भिकेला लागेपर्यंत कितीतरी काळ लोटेल, त्यांची मुलेबाळे मोठी होऊन नीट संसाराला वगैरे लागतील,सर्व ठीकठाक होऊन जाईल.पण ज्यांना ती परवडत नाही ते गावठी पिऊन धुमाकूळ घालतात,बायकामुलांना मारझोड करतात आणि पाच दहा वर्षात लिवर सिर्हॉसिस ने मरून जातात त्यांचे काय? की त्यांना चांगली दारू स्वस्तात मिळावी म्हणून वायनरीजकडून वाइनची लेव्ही वसूल करून ती स्वस्त दरात अशा लोकांना पुरवावी?
लोक दारू पितातच,बंदी असो वा नसो,ती शरद पवारांनी बनवलेली असो वा मुंढेंनी; हे वास्तव आहे.कटू किंवा कसेही.कदाचित वारुणीइतके कटू नसावे कारण तसे असते तर त्याविरुद्ध आरडाओरडा झाला असता.वारुणीविरुद्ध नव्हे.
6 Nov 2012 - 5:54 pm | अनन्न्या
कारण काहिही असो, पण मिपाकरांसारख्या सद्विचारींनी प्रमाणात दारू पिण्याचे समर्थन करावे, याचे आश्चर्य वाटले. व्यसन मग ते कसलेही असो ते सुट्णे प्रत्येक माणसाच्या ठाम निर्धारावर अवलंबून असते. कोणत्याही कायद्यावर नाही. उलट करू नये असे सांगितल्यावर ती करून पाहणे हा स्वभावधर्म आहे. कोणालाही दुखावण्याचा अजिबात हेतु नाही.
6 Nov 2012 - 6:14 pm | अत्रुप्त आत्मा
पण मिपाकरांसारख्या सद्विचारींनी प्रमाणात
दारू पिण्याचे समर्थन करावे,याचे आश्चर्य वाटले.>>> 
6 Nov 2012 - 6:33 pm | मी_आहे_ना
'व्यसन मग ते कसलेही असो ते सुट्णे प्रत्येक माणसाच्या ठाम निर्धारावर अवलंबून असते. -> अगदी १००% मान्य. (मनावर घेतले तर भ्रष्टाचारही सुटेल. पण एकट्या दुकट्याने नाही.)
पण सरसकट दारू पिण्यावर आणि विक्रीवर बंदी आणून (उत्पादनावर / आयातीवर नं आणता) आपणच कररूपी पैसा सरकारी तिजोरीत नं जाऊ देता ठराविक टोळक्याकडे जाऊ देतो त्याचे काय? (गुटखा बंदी बघा)
अर्थात, व्यसनाची व्याख्या 'रिलेटिव्ह' आहे.
(पुन्हा...मी शरद पवार किंवा मुंडे समर्थकही नाही)
8 Nov 2012 - 9:29 am | इरसाल
अनन्न्या दारु पिण्याच्या समर्थनाचे आश्चर्य वाटुन घेवु नका. काहीच काळापुर्वी काही जण आपण कुठे कशी कधी जावुन किती दारु प्यालो ह्याचे साग्रसंगीत कथन करत असत.
6 Nov 2012 - 6:06 pm | मदनबाण
दारु आणि दुधाची तुलना पाहुन मला वाटलं मलाच नशा चढली की काय ! ;)
असो... गरिबाला खायला भाकर तुकडा मिळाला नाही तरी चालेल ! शेतकर्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव नाही मिळाला तरी चालेल ! पण वाईनचा पूर मात्र वाहता राहिला पाहिजे !
काही दिवसांनी गांजा / अफु / चरस /एलएसडी / कोकेन यांचे सुद्धा लोक समर्थन करु शकतील असे वाटु लागले आहे. ;)
6 Nov 2012 - 7:05 pm | गवि
बाणा.. दूध आणि दारु दोन वेगळ्या संदर्भात तुलनेसाठी वापरणं म्हणजे त्या दोहोंना एक मान णं नव्हे.
गरीबाला भाकर तुकडा,शेतकर्या च्या मालाला रास्त भाव हे मुद्दे इमोशनल आणि योग्य असले तरी चालू मुद्द्या त काँट्रास्ट ततयार करण्याखेरीज त्यांचा काय रोल?
6 Nov 2012 - 7:15 pm | मदनबाण
बाणा.. दूध आणि दारु दोन वेगळ्या संदर्भात तुलनेसाठी वापरणं म्हणजे त्या दोहोंना एक मान णं नव्हे.
संदर्भ वेगळा असला तरी दुधाने मरणारे किती आणि दारुने मरणारे किती ?
गरीबाला भाकर तुकडा,शेतकर्या च्या मालाला रास्त भाव हे मुद्दे इमोशनल आणि योग्य असले तरी चालू मुद्द्या त काँट्रास्ट ततयार करण्याखेरीज त्यांचा काय रोल?
देशात इतके गंभीर प्रश्न असताना, वाईनचा पुर वाहण्यासाठी जो प्रयत्न होतो आहे,तो चुकीचा आहे !वाईनर्या बांधुन कितपत समाज कल्याण साधले जाणार आहे ? तुम्ही भुकेल्याला भाकरी देणार का वाईन ? हा मुद्दा इमोशनल नसुन वास्तवातला आहे आणि ज्यांचे वास्तवाचे भान सुटते तेच अयोग्य गोष्टींचे समर्थन करतात असे मला वाटते !
जाता जाता :--- पाकडे आणि चीन यांच्या पेक्षा आपल्या देशाला आपल्या भ्रष्ट आणि नितीमत्ता गहाण ठेवलेल्या राजकारण्यांकडुनच अधिक धोका निर्माण झाला आहे.
6 Nov 2012 - 9:37 pm | निनाद मुक्काम प...
@ पण वाईनचा पूर मात्र वाहता राहिला पाहिजे !
वाईन चा महाराष्ट्रात मुळात इतर मद्यांच्या तुलनेत खप अल्प आहे.
ती पिणारा वर्ग हा उच्च मध्यमवर्गीय ते उच्चभ्रू आहे.
जो नियमितपणे प्रगती व विकास करत आहे.
शार्डोने, ह्या जातीचे एक द्राक्ष असून त्याची वाईन बनते हे देखील गरीब जनतेला माहित नाही. त्याला माहित आहे मोसंबी , नारंगी
गरीब माणूस दारू मुळात व्यसन म्हणून का पितो ह्या वर चर्चा व उपाय हवा.
6 Nov 2012 - 10:30 pm | मदनबाण
वाईन चा महाराष्ट्रात मुळात इतर मद्यांच्या तुलनेत खप अल्प आहे.
उत्पादन आणि खप यात फरक आहे,मी उत्पादना बद्धल बोलतोय ! देशातल्या एकुण उत्पादनाच्या जवळपास ९४% उत्पादन महाराष्ट्रात होते,अंदाजे ७४ वायनर्या महाराष्ट्रात उभ्या आहेत.
आता बंग यांचे काय म्हणणे आहे,ते ही वाचा :- Bang blames Pawar for patronising alcohol culture
6 Nov 2012 - 6:14 pm | तर्री
हा वादासाठी वाद वाटेल, म्हणून एक पाऊल मागे जाऊन हा मुद्दा बाजूला ठेवून म्हणतो की, अर्थातच मला तुमचा मुद्दा समजला..
आपण दाखलेले "समजण्याचे " सामर्थ्य आवडले.
6 Nov 2012 - 6:55 pm | वडापाव
ते एक प्रकारचं औषधच आहे असं म्हणून बरेच लोक वेळ मारून नेतात. विशिष्ट क्लायमेट मध्ये ते घ्यायची गरज पडत असेलही लोकांना, अतिथंडीच्या प्रदेशात वगैरे. आपल्याकडे भारतात त्याची एवढी काय गरज? आणि एखाद्याला गरज लागलीच, तर डॉक्टर सांगेलच की द्या थोडी ब्रँडी यांना. पण औषध-औषध म्हणून ती भरमसाट प्रमाणात ढोसायची का? लोणचं झक्कास लागतं म्हणून कोणी वाटीभर खातं का? अॅस्कॉरिल चमचाभर घेता की पेग मारता(कुणी मारत असेल तर माहित नाही ब्वा)?
काही दिवसांपूर्वी मुं.मिरर मध्ये एक लेख आला होता दारूची सवय कशी लागते आणि ती कशी घालवावी या विषयावर. दारू प्यायल्याने वजनवाढ होते म्हणे, म्हणूनही बरेच जण बीअर प्यायला सुरुवात करतात(यामध्ये कॉलेजातल्या मुलांचे प्रमाण अधिक). या बीअर मध्ये वगेरे ज्या कॅलरीज असतात, त्या रिकाम्या असतात - त्यांच्यात पोषक द्रव्ये शून्य असतात, असं त्या पेपरातल्या लेखात म्हटलं होतं.
बरेच जण आपल्या घरातच बसून मुलांसमोर ढोसतात. याचा व्हायचा तो परिणाम होतो आणि दहावी-बारावीपासून(प्रसंगी याहूनही आधीपासून) मुलंसुद्धा पालकांच्या नकळत, आणि/किंवा त्यांच्याबरोबरच बसून प्यायला सुरुवात करतात.
मग ही मुलं दारू प्यायची कारणंही बरीच देतात. काही जणांना ते कूल वाटतं. काही जणांना दारू चढल्यावर वेडंपिसं(क्रेझी अँड वाईल्ड) होण्यात मजा येते(आम्ही दारू न पिता सुद्धा वेडेपिसे होऊ शकतो त्यात काय!). काहींचा कॉन्फिडन्स वाढतो- चटक लागली की हा कॉन्फिडन्स म्हणजे फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी असतो हे लक्षात येत नाही.
दारू सिगारेट पिणा-यांमध्ये स्ट्रेस, डिप्रेशन, अपयशामुळे निराश झालेल्या लोकांना वेळप्रसंगी, भावनेच्या भरात, असं म्हणताना ऐकलंय, की त्यांना कोणी समजू शकत नाही. त्यांना कोणत्याही व्यक्तीची, दोस्ताची वगैरे गरज नाही, त्यांचे ते एकटेच काय ते समर्थ आहेत त्यांच्यावर गुदरलेल्या अवस्थेवर मात करण्यासाठी, कोणाच्या आधाराची गरज नाही - पण व्यक्तींना पर्याय म्हणून तुम्ही दारू-सिगारेटचा आधार घेताय हे त्यांच्या लक्षात येत नाही. बरं या अशा आधाराचा काही फायदाही नसतो हेही कळत नाही.
काही जण लाईफ एन्जॉय करायची म्हणून पितात. जोवर त्यांच्यामुळे दुस-यांना त्रास होत नाही, तोवर त्यांना खुशाल पिऊदेत. आमचं काही म्हणणं नाही. असं केल्याने त्यांचेच अवयव खराब होतात, जे वेळप्रसंगी(अपघात वगैरे झाल्यास) घरातल्या दुस-या व्यक्तिला दान करण्यास ते मेडिकल रिसन्स मुळे असमर्थ ठरतात.
6 Nov 2012 - 7:23 pm | नितिन थत्ते
एक शंका आहे.
महाराष्ट्रातले वाईन कारखाने महाराष्ट्रातल्या जनतेसाठी वाईन बनवतात हे अभय बंग किंवा इतर कोणीही यांना का वाटते. ज्यांना भाकरी हवी आहे/मिळत नाही त्यांना वाईन परवडत असेल असे वाटत नाही.
6 Nov 2012 - 7:43 pm | मदनबाण
ज्यांना भाकरी हवी आहे/मिळत नाही त्यांना वाईन परवडत असेल असे वाटत नाही.
जिथे भाकरी मिळण्याचे वांदे ज्या महाराष्ट्रात आहे तिथे वाईनच्या पुराला महत्व का द्यावे असा खरा प्रश्न आहे ! शब्दछल करण्या पेक्षा वाचन करणे जास्त चांगले आहे असे मला वाटते.
मागच्या वर्षीच्या आकडेवारीनुसार दरदिवसाला ७७ बालके महाराष्ट्रात कुपषणाने मरण पावतात !बर या कुपोषणाच्या गंभीर प्रश्नावर देखील भ्रष्टाचार झालेला आहे.
7 Nov 2012 - 8:23 pm | राही
भारतात इंदिरा गांधी आणि वसंतराव साठे यांनी दिवसाला एक टी.वी.टॉवर बांधण्याचा धडाका लावला होता तेव्हा 'देशात इतके इतके लाख/कोटी लोक उपाशी/बेरोजगार असताना टी.वी.ची ऐश हवी कशाला'वगैरे वाद उफाळून आला होता. टी.वी.वरच्या 'घाणेरड्या'गोष्टी पाहून सर्व समाजाची नीतिमत्ता रसातळाला जाईल असेही हिरिरीने मांडले जात होते.
8 Nov 2012 - 9:35 am | मदनबाण
सेम लॉजिक
?कसे ? दारु (व्यसन) आणि टिव्ही (व्यसन) यांची तुलना करता आयुष्याचे वाटोळे दारु ने होईल की टिव्हीमुळे ?
8 Nov 2012 - 12:40 pm | राही
दुकानात दारूच्या बाटल्या ठेवल्याने लोक व्यसनी होतात हे आर्गयुमेंटच फसवे आणि दुबळे आहे.तेच मद्यनिर्मितीच्या कारखान्यांबाबत. कारखान्यांद्वारे मद्यनिर्मिती होत नव्हती त्या काळात लोक व्यसनी नव्हते काय? वास्तव असे आहे की अनादि काळापासून लोक नशाजनक पदार्थांचे सेवन करीत आलेले आहेत.समाजाचा काही टक्के असलेल्या व्यसनी लोकांना बरोबर घेऊनच समाज आणि संस्कृती पुढे सरकली आहे. तेव्हा फार बाऊ करण्यात अर्थ नाही.जोपर्यंत विवेक आणि समतोल अंगी बाणत नाही तोपर्यंत द्राक्षांची नसेल तर मोहाची, ताडाची,काजूची कुठली तरी दारू लोक पितीलच.(जसे ते आजतागायत पीत आलेले आहेत.)
शिवाय आजपर्यंत जगाच्या पाठीवरील कुठलेही सरकार दारूबंदी यशस्वीपणे राबवू शकलेले नाही.जे कुणालाच जमलेले नाही ते महाराष्ट्र सरकारने करावे ही अपेक्षा चुकीची आहे.मद्यनिर्मिती करणे म्हणजे लोकांना दारू प्यायला भाग पाडणे असे नव्हे.
8 Nov 2012 - 1:31 pm | श्री गावसेना प्रमुख
दुकानात दारूच्या बाटल्या ठेवल्याने लोक व्यसनी होतात हे आर्गयुमेंटच फसवे आणि दुबळे आहे
म्हणुनच म्हणतोय दारु रेशन कार्ड वर वाटप करण्यात यावी.
8 Nov 2012 - 1:36 pm | प्रकाश घाटपांडे
सहमत॑ आहे तरी एक प्रश्न उरतोच. तो असा कि दारुबंदी यशस्वी होणार नसली तरी मद्याची उपलब्धता मर्यादित प्रमाणात करता येते.
8 Nov 2012 - 2:00 pm | श्री गावसेना प्रमुख
दारु बंदी कशी होईल हो,सरकारचे उत्पन्न कसे वाढणार,अभय बंग
काय म्हणतात बघा,
6 Nov 2012 - 9:40 pm | निनाद मुक्काम प...
चाचा
भले शाबास
6 Nov 2012 - 7:49 pm | रेवती
दारू प्यायल्याने (कमी किंवा जास्त हा मुद्दा नाही) होणार्या दुष्परिणामांबाबत काही बोलत नाही पण बरेच दिवसांपूर्वी एक यादी दिली होती (कुठे ते आठवत नाही) त्यातल्या म्हणे सगळ्या राजकारण्यांकडे लायसेन्स होतं, मद्य बनवण्याचं आणि लोकांनी आरडाओरडा केल्यावर राजकारण्यांचे ओळखीचे पण नातेवाईक नसलेल्या चार दोन लोकांना लायसेन्स देऊन "बघा, बघा सामान्य लोकांनाही हे परवाने दिले जातात." हा पुरावा सादर केला होता.
लोकांना वेडेही समजत नाहीत तर फक्त गप्प करण्याचे उपाय शोधून आपलं काम चालू ठेवणं एवढाच उद्देश. कमी पिणारे खरच कमी पीतही असतील (तब्येतीला ती कमी दारू तरी किती चांगली हे सांगायला नको) पण त्यांची मुलं मात्र बरेचदा तुडुंब पिणारी असतात याची उदाहरणं इतकी डोळ्यासमोर आहेत की त्याबद्दल सांगून मलाच वाईट वाटत राहतं म्हणून काही बोलत नाही, जाऊ दे, पिणार्यांना त्यांच्या मुलांची काळजी नसेल तर दुसर्यांना ती का म्हणून असावी?
6 Nov 2012 - 8:27 pm | दादा कोंडके
सहमत!
दारुडी लोकं दारूचं समर्थन करण्यासाठी 'बिअर म्हणजे दारू नव्हे', किंवा कै च्या कै उदाहरणं देउन 'व्यसन मग ते चहाचं जरी असलं तरी वाईट' असं छाती बडवून सांगत रहाणं काही नवं नव्हे.
असो, प्रत्येक गोष्ट शास्त्रिय किंवा वैद्द्यकीय दृष्ट्या सिद्ध केलीच पाहिजे असं नाही. थोडसं आजुबाजूला बघून, सामाजिक परिणाम पाहून कोणताही संवेदनशील माणूस दारूपिण्याचं उदात्तीकरण करणार नाही.
6 Nov 2012 - 8:22 pm | गणपा
सोकाजी नानांच्या चावडीवरच्या मंडळींची* या बाबतीतली मतं जाणून घ्यायला आवडेल. :)
* तीच ती टपरी वरचा 'चा' पिणारी.
(कधी तरीच घेणारा, मग तो चा असो वा मद्य ) गणा
6 Nov 2012 - 10:41 pm | पिवळा डांबिस
>>सोकाजी नानांच्या चावडीवरच्या मंडळींची* या बाबतीतली मतं जाणून घ्यायला आवडेल.
आम्हाला देखील सोकाजीनानांच्या चावडीवरच्या मंडळींची मतं जाणून घ्यायला आवडतील!!
च्यायला, आजकाल आम्हाला नानांची चावडी ह्या तात्याच्या चावडीपेक्षा जास्त आवडायला लागल्येय की काय!!!
:)
6 Nov 2012 - 10:33 pm | चिरोटा
मिपाकरांना मराठी नेत्यांची प्रगती पाहवत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
6 Nov 2012 - 10:52 pm | हुप्प्या
अफू, गांजा, चरस वगैरे मादक पदार्थांवर भारत सरकार बंदी घालते. ते विकणे, फुकणे वा अन्य प्रकारे सेवन करणे ह्यावर बंदी आहे कारण (म्हणे) ते घातक आहेत.
मग दारूच्या बाबतीत मुक्त धोरण का? दारुचेही व्यसन लागू शकते, दारू जास्त प्यायल्यावर स्वतःवरील नियंत्रण हरवू शकतो, अतीसेवनाने जीवघेणे विकार होऊ शकतात. पण तिथे प्रगल्भ माणसाने विचार करून आपल्या हिताचे, आवडीचे असेल तसे वागावे अशी मुभा आहे.
मग हीच मुभा अन्य मादक पदार्थांकरता का नाही? हा दुटप्पीपणा नाही का? ह्या दोन प्रकारातील सीमारेषा नक्की कोणती?
6 Nov 2012 - 11:01 pm | सुनील
यात भारत सरकार काही जगावेगळे करत आहे, असे वाटत नाही!!! जगातील बहुसंख्य देशांचे हेच धोरण आहे.
असो, चरस सेवन केल्यावर गोड पदार्थ (विशेषतः जिलब्या) चांगल्या लागतात म्हणे!! ;)
7 Nov 2012 - 9:52 pm | मदनबाण
जगातील बहुसंख्य देशांचे हेच धोरण आहे.
अमेरिकेने सध्या हे धोरण बदलले दिसते आहे ! ;)कोलोरॅडो आणि वॉश्गिंटन या राज्यामधून गांजा आता कायदेशीर झाला आहे ! ;) गांजा बहाद्दरांच्या मते गांजा मुळे कॅन्सर, ट्यूमर यासारखे असाध्य आजार बरे होतात असा युक्तिवाद केला जातो आहे.
अधिक इथे:-
अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मतपत्रिकेवर गांजा !
7 Nov 2012 - 7:28 pm | फास्टरफेणे
पुलोत्सवातील अभय बंग यांच्या भाषणाचा व्हिडीओ मिळेल काय?
7 Nov 2012 - 11:38 pm | आनंदी गोपाळ
अल्कोहोलचे दारू बनविण्याव्यतिरिक्त इतर काही उपयोग असतात का हो?
(आपल्या देशात जवळजवळ सगळीच 'विदेशी' दारू अॅब्सोल्यूट अल्कोहोल व पाणी यांच्या मिश्रणास फ्लेवर देऊन बनवितात)
10 Nov 2012 - 1:32 pm | तिमा
ईथाइल अल्कोहोल हे अनेक प्रकारची औषधे, सुवासिक रसायने, सॉल्व्हंट, जंतुनाशक म्हणून वापरले जाते. रसायनशास्त्रात त्याचे असंख्य उपयोग आहेत. कुठलेही रसायन वाईट नसते, ते वापरणारा चांगला वा वाईट असतो. सल्फ्युरिक अॅसिड हे अत्यंत उपयोगी रसायन आहे. पण ते कुणाच्या तोंडावर फेकले तर ती व्यक्ती आयुष्यातून उठते.
11 Nov 2012 - 12:22 am | आनंदी गोपाळ
तर माणूस मरतो का? किंवा आयुष्यातून उठतो का?
धान्यापासून 'अल्कोहोल' निर्मितीचे परवाने आहेत. 'दारू'चे नाहीत. शिवाय जगातली प्रत्येक दारू, जी माणसाने आदीम काळी शोधली, ती धान्य वा इतर खाद्यान्नापासूनच बनते. व आदीम काळापासून प्राशन केली जाते.
असो.
8 Nov 2012 - 12:52 pm | किणकिनाट
चावडीवारच्या गप्पाना आता हाच प्रतिसाद दिला आहे.
"विषय आणि आशय तसेच प्रतिसाद जुळत नाहित असे वाटतेय.
बारामती, मद्यसम्राट, परमिटे, भ्रष्टाचार, धान्यापासून माद्य बनविणे, महाराष्ट्र आणि मद्य्र्राष्ट्र हे मुद्दे आणि मद्यप्राशनातील पारिमाणे, योग्यायोग्यता ह्या वेगवेगळ्या गोष्टी असाव्यात असे मझ्या अल्पबुद्धीस वाट्ते आहे.
ब॑गना यापेक्शा जास्त ट्यार्पी नक्कीच योग्य आहे. "
किणकिनाट
प्रस॑ग आणि सोबत पाहुन मी घ॑टा वा ग्लास बनतो
पण प्रसन्न आणि मन्जुळ किणकिनाट हवाच..........
11 Nov 2012 - 2:34 am | हुप्प्या
http://www.loksatta.com/maharashtra-news/dr-abhay-bang-will-fight-for-al...
अभय बंग हे मिसळपाव वाचत नाहीत हे उघड आहे. नाहीतर दारु कशी चांगली आहे हे त्यांना तात्काळ पटले असते.
आता बघू आपले मद्यर्षी, जाणते राजे काय प्रत्युत्तर देतात ते.